पोटदुखीवर नैसर्गिक घरगुती उपाय | Home Remedies For Stomach Ache 2023

Home Remedies For Stomach Ache पोटदुखी, पोट फुगणे, अपचन, गॅस, इत्यादी त्रासाने तुम्ही त्रस्त असाल तर करा पुढील घरगुती रामबाण उपाय, पुढे दिलेल्या उपाय केल्याने तुम्हाला नक्कीच आराम मिळेल.

Home Remedies For Stomach Ache

पोटदुखी, ज्याला अपचन किंवा पोट फुगणे म्हणून देखील ओळखले जाते, हे वेग वेगळ्या कारणांमुळे देखील होऊ शकते, ज्यामध्ये जास्त खाणे, मसालेदार पदार्थ किंवा चरबीयुक्त पदार्थ खाणे, ताणतणाव, इत्यादि कारणामुळे पोट दुःखीचा त्रास जाणऊ शकतो. त्यावर येथे काही घरगुती उपाय आम्ही संगीतलेले आहेत जे पोटदुखी कमी करण्यास मदत करू शकतात.

Home Remedies For Stomach Ache 2023

पोट दुखीची कारणे. Causes of stomach ache

सर्वात प्रथम आपण पाहूयात की पोट दुखीची कोण कोणती कारणे आहेत, पोट दुखी हा हा त्रास कशामुळे उद्भवतो.

  1. मसालेदार तेलकट तिखट पदार्थ वारंवार खाल्ल्यामुळे पोट दुखी हा त्रास होतो.

अशुद्ध व वेगवेगळ्या ठिकाणचे पाणी पिण्यात आल्यामुळे.

खूप वेळ उपाशीपोटी राहणे व नंतर पोटभर जेवण करणे.

वारंवार शिळे अन्न खाण्यात आल्यामुळे.

महिलांमध्ये मानसिक पाळीच्या वेळी पोटदुखीचा त्रास जास्त होतो.

जास्त प्रमाणात जेवण करण्यात आल्यामुळे.

बाहेरील पदार्थ आहारात सेवन केल्यामुळे.

जड वस्तू उचलल्यामुळे.

जेवण झाल्यानंतर खूप वेगाने धावणे.

इत्यादी कारणामुळे तुम्हाला पोटदुखी हा त्रास होऊ शकतो.

पोट दुखी ची लक्षणे कोण कोणते आहेत Symptoms of stomach ache

पोटामध्ये दुखणे तीव्र त्रास होणे.

उलटी व मळमळ होणे.

आम्लिय ढेकर वारंवार येणे.

पोट फुगणे पोट साफ न झाल्यासारखे वाटणे.

पोटामध्ये जळजळ होत राहणे.

परत परत संडासला जावेसे वाटणे पोट साफ न होणे.

ताप येणे.

इत्यादी पोट दुखी ची लक्षणे आहेत.
चला तर त्यावर घरगुती कोण कोणते उपाय आहेत ते आपण पुढे पाहूयात.

Home Remedies For Stomach Ache

Home Remedies For Stomach Ache

पोट दुःखी वर लिंबू पाणी उपाय Lemon water remedy for upset stomach

पोटदुखीवर रामबाण उपाय लिंबाचा रसचा पोट दुःखीवर उपयोग केला जातो. आपल्या सर्वांना तर माहीतच आहे आपल्या प्रत्येकाच्या घरात लिंबू पाहायला मिळते. आपले पोट हलक्या स्वरुपात दुखत असल्यास एक लिंबू घ्या आणि एक ग्लास पाणी, त्या पाण्यात लिंबाचा रस मिसळून घ्या, पाण्यात लिंबाचा रस मिसळल्यानंतर ते पाणी पिऊन टाका. तुम्हाला दहा मिनिटांमध्ये त्रास कमी झालेला दिसून येईल.लिंबामध्ये अम्लीय गुणधर्म आढळतात. त्यामुळे लिंबू हे पोटातील गॅस कमी करण्यास मदत करते.

Home Remedies For Stomach Ache

ग्रीन टी

कॉफीमध्ये जास्त प्रमाणात आम्ल युक्त पदार्थ आढळतात. त्यामुळे तुमचे वजन देखील वाढते आणि पोटाचे त्रास देखील जास्त होतात. त्यामुळे तुम्ही कॉपी न घेता ग्रीन टी चा वापर करा. ग्रीन टी घेतल्यामुळे पोट फुगणे तसेच पोटदुखी ढेरी सुटणे, इत्यादी त्रास होणार नाहीत.
ग्रीन टीमध्ये हेल्दी बायोएक्टिव्ह कंपाऊंड्स आणि अँटिऑक्सिडंट्स देखील असतात. त्यामुळे पोटाचे आजार कमी होतात.

Home Remedies For Stomach Ache

ताकाचे सेवन पोट दुखी वर उपाय Consuming buttermilk is a remedy for stomach ache

ताक आपल्या शरीरासाठी खूप आरोग्यदायी आहे.
त्यामध्ये लॅक्टिक अ‍ॅसिड आहे जे आपल्याला गॅस्ट्रिक अ‍ॅसिडिटीपासून आराम देण्यास मदत करते. तुम्हाला पुढच्या वेळी कधीही पोटदुखी किंवा गॅसची समस्या जाणवली तर सर्वप्रथम तुम्ही काळी मिरी आणि कोथिंबीरीचा काही पाने ताकात टाकून एक ग्लास ताक प्या, त्यामुळे तुम्हाला लवकरच गॅस पासून आराम मिळायला मदत होईल. ताक पिल्यामुळे पोट लवकर साफ होते व गॅस्ट्रोचा परिणाम शरीरावर जाणवत नाही.

Home Remedies For Stomach Ache

केळी खा पोट दुःखी वर घरगुती उपाय

केळीमध्ये व्हिटॅमिन बी 6 व पोटॅशियम जास्त प्रमाणात असते.
अ‍ॅसिडिटी किंवा गॅस दूर करण्यासाठी प्राचीन काळापासून केळीचा वापर केला जातो. केळी या पदार्थांमध्ये नैसर्गिक अँटासिड असतात जे अ‍ॅसिड रिफ्लक्स पासून बचाव करण्यास उपयुक्त ठरतात. गॅसपासून व पोट दुखी पासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही दररोज एक केळी खाऊ शकता. योग्य नियोजन पद्धतीने केळी खाल्ल्यास तसेच केळी वेगवेगळ्या पदार्थासोबत सेवन केल्यास तुमची वजन कमी किंवा जास्त करण्यास केळी उपयुक्त ठरू शकते.

Home Remedies For Stomach Ache

काळे मीठ पोट दुखी वर घरगुती उपाय

आपले आजोबा किंवा इतर म्हातारी माणसे आपल्याला पोट दुखीवर काळे मीठ खाण्यासाठी उपाय नेहमीं सांगतात. पोट दुखीवर काळे मीठ हा देखील रामबाण उपाय आहे. काळे मिठाचा घरगुती उपाय पुढील प्रमाणे करू शकता. काळे मीठ, हिंग व सुट सारख्या प्रमाणात घ्या या सर्वांचे बारीक पावडर बनवून घ्या, हे पावडर दोन-दोन ग्राम सकाळी नाश्ता झाल्यानंतर व संध्याकाळी जेवणानंतर एक ग्लास कोमट पाण्यामध्ये मिसळ करून प्यावे, ही कृती केल्यानंतर तुम्हाला शंभर टक्के पोट दुखीवर आराम मिळेल.

Home Remedies For Stomach Ache

पोट दुःखी वर उपाय तुळशीची पाने खा

तुळश ही खूप पवित्र वनस्पती आहे.
तुळशीच्या पानांमध्ये कार्मिनेटिव्ह सारखे विविध गुणधर्म असतात.
जे आपल्याला अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रो इत्यादी समस्या पासून लगेच आराम मिळवून देऊ शकतात. त्यासाठी पुढील कृती करा. तुम्हाला तुळशीची चार ते पाच पाने स्वच्छ धुऊन घ्यायचे आहेत. आणि ती चाऊन खायचे आहेत. चावून खाल्ल्यानंतर तुम्हाला लगेच 20 ते 25 मिनिटानंतर पोटदुखी कमी होण्यास मदत होईल. तसेच तुळशीचे पाने खाल्ल्यामुळे दात दुखीचा होणारा त्रास व त्वचारोग इत्यादीसाठी तुळस खूप उपयुक्त ठरते.

Home Remedies For Stomach Ache

पचनक्रिया चांगली ठेवणारे पदार्थ सेवन करा

तुमच्या रोजच्या आहारामध्ये दही, दूध तूप, बीट, आले, फळे , पालेभाज्या आणि मासे व प्रोटीन युक्त पदार्थाचे सेवन करा. ज्यामुळे तुमची पचनक्रिया सुधारते आणि पोट निरोगी राहण्यास मदत मिळते. तसेच वेळच्यावेळी पाणी पेत रहा कारण निरोगी पचनक्रियेसाठी पाणी खूप उपयुक्त आहे.

टीप : ही सामान्य माहिती असून कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊनच योग्य ते पाउल उचला.
पोट दुखीवर डॉक्टरांचा सल्ला देखील घ्यावा. पोट नेमके का दुखते यावर योग्य उपचार घेणं आवश्यक आहे.

पोट दुःखी चे कारणे

मसालेदार तेलकट पदार्थ व दूषित पाण्यामुळे पोटदुखीचा त्रास होतो

पोट फुगणे उपाय

पोट फुगल्या नंतर लिंबू पाणी किंवा सोडा पान्यात टाकून प्या

पित्तामुळे पोटात दुखते का

होय, पित्तामुळे पोटात त्रास होतो

पोट दुखीवर कोणते औषध वापरले जाते

सायक्लोपम टॅब्लेट [Cyclopam Tablet] हे पोटदुखीवर उपचार करण्यासाठी वापरले जाते.

Author :- Mr. Shankar Kashte

Shankar

तर मित्रांनो पोट दुखीवर नैसर्गिक घरगुती उपाय | Home remedies for stomach ache या लेखात आम्ही पोट दुखी विषयी विविध घरगुती उपाय सांगितलेले आहेत. व त्याविषयी संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे.
ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका…

वरील माहिती मध्ये काही चुका असतील किंवा काही लिहायचं राहून गेलं असेल तर ते आम्हाला कमेंट द्वारे कळवा आम्ही त्यामध्ये सुधारणा करत राहू.

धन्यवाद..

तर अशा या लेखातून आम्ही तुम्हाला जमेल तेवढी माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला जर आमचे काम आवडले असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा. तुम्हाला देखील लेख लिहायला आवडत असतील पण त्यासाठी व्यासपीठ मिळत नसेल तर आम्हाला कळवा.

Maze Gav Marathi Nibandh

Raksha Bandhan Nibandh In Marathi

ESSAY ON OUR FESTIVAL

Avatar
Shankar K

Leave a Reply