समाधानाच्या अधिष्ठानावर जगणं समृद्ध करूयात | How to stay happy in Marathi 2024

साहित्यबंध समूह आयोजित साप्ताहिक स्पर्धेत रोशनी लक्ष्मी सुंदरलाल फुलझेले यांनी How to stay happy in Marathi या कीवर्ड वर आधारित “समाधानाच्या अधिष्ठानावर जगणं समृद्ध करूयात” हा लेख लिहिला आहे. चला तर वाचूया.

?साहित्यबंध समुह?

साप्ताहिक उपक्रम क्र. ६

कथा लेखन विषय :- छोट्या गोष्टीतील सुख
*दिनांक:२१/११/२०२३
*विषय-छोट्या गोष्टींतले सुख

समाधानाच्या अधिष्ठानावर जगणं समृद्ध करूयात | How to stay happy in Marathi

How to stay happy in Marathi

समाधानाच्या अधिष्ठानावर जगणं समृद्ध करूयात | How to stay happy in Marathi

समाधानाच्या अधिष्ठानावर जगणं समृद्ध करूयात | How to stay happy in Marathi

बरीच जण म्हणतात, माझ्याकडे पैसा आला न की मी सुखी होईल, मला नोकरी लागली तर च मी आनंदाने जगू शकेन, कितीही कीर्ती मिळाली तरी आपल्याला ती कमीच वाटते..समजा आज माझं जे कुठलं क्षेत्र असेल त्यात मी एक थोडा यशाचा टप्पा पार केला असेल तर माझी इच्छा काय असेल आणखी एक दुसरा टप्पा गाठूयात, मग तिसरा ..

अस जे आपण भौतिक सुखाच्या भंपक कल्पनेत रमून सुख, आंनद शोधतो न मित्रानो तिथेच खरा घोळ होत असतो.. खर तर भौतिक सुखात जर का आंनद असता तर आज जगातील प्रत्येक व्यक्ती सुखी झाली असती…याचा अर्थ असा नाही की महत्वकांक्षा असूच नये.. निश्चित असाव्यात.. पण त्याला खरोखरीच समाधानाच अधिष्ठान असावं..तरच ते खर..सतत कृतज्ञ असलं पाहिजे सर्वांप्रति..कृतज्ञता आपल्या महत्वाकांक्षे ला बळ देत…

समाधानाच्या अधिष्ठानावर जगणं समृद्ध करूयात | How to stay happy in Marathi

जेव्हा आपण कृतज्ञता व्यक्त करतो ना
तेव्हा आपल्याकडे जे नाहीये ते सुद्धा सहज येत..
भौतिक सुखात जर खरा आनंद असता तर आज जगाच्या पाठीवरील प्रत्येक व्यक्ती आनंदी राहिली असती..कुठेच अगदी क्षुल्लक कारणांमुळे रक्ताच्या थारोळ्यात लोक मरून पडली नसती, कुठेही विषमता माजली नसती, कुठल्याही पोरीवर अतिप्रसंग घडला नसता, जगात सगळीकडे सौख्य नांदल असत.. पण खरी दुखती रग माहितीये का कुठली आहे आपली ??? * आपल्याला आनंदी राहायच नाहीये, तर आपण किती आनंदी आहोत हे लोकांना दाखवायचं आहे*. खरय न..!!!
आणि खरा घोळ नेमका तिथेच होतो..
आणि मग सुरू होतो संघर्ष अंतरर्मनात

नेमकं सुख आहे तरी कश्यात….

समाधानाच्या अधिष्ठानावर जगणं समृद्ध करूयात | How to stay happy in Marathi

Ok..?
आता मूळ मुद्याला हात घालूयात..
सुख हे आपल्या अंतर्मनाच characteristic आहे हे ज्या दिवशी आपल्याला उमगलं ना मित्रांनो त्या दिवशी जगण्याला खरी सुरुवात झाली अस समजायला हरकत नाही…
पण आता ते कळत नाही कस सुखी होणार आहोत आपण आणि दुसरा वाटतो आपल्याला सुखी आहे… त्यासाठी एकमेव मार्ग आहे अन तो म्हणजे अंतर्मनात डोकावन…

समाधानाच्या अधिष्ठानावर जगणं समृद्ध करूयात | How to stay happy in Marathi

आपल्याला ज्या करायला लागतात गोष्टी त्या आपण करतोच आवर्जून (नोकरी आहे, काम आहे पैसे कमवन आहे) पण ज्या करायला आवडतात गोष्टी त्यासाठी 24 तासातून किमान तासभर तरी झगडावं प्रत्येकाने…आणि त्यातून आपण उलगडत जातो स्वतःला एका वेगळ्याच पातळीवर… काय कुठल्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला आवडतात, काय आवडत नाहीत, काय आहे जे आपण सहन करू शकतो, काय tolerate नाही करायला पाहिजे…हे ज्या दिवशी आपल्याला कळलं, वळलं, रूळल ना

समाधानाच्या अधिष्ठानावर जगणं समृद्ध करूयात | How to stay happy in Marathi

सुख समाधान काय असत त्याची प्रचिती तिथेच येते…
मी medical field शी related आहे त्यामुळे त्याच भाषेत सांगते.. ज्या दिवशी माझ्या नावापुढे “Director” हे title लागलं निश्चित च आंनद झाला कारण yes आपण मेहनत करत असतो जीवतोडुन..स्वतःला सिद्ध करण्यासाठी..तेव्हा आंनद झाला ही पण तो कदाचित क्षणभर टिकला असेल, पण एके दिवशी मला समोरून फोन येतो एका अश्या व्यक्तीचा जी खूप अश्या एका दुर्धर आजाराशी वर्षानुवर्षे झुंजत असते लढत असते आणि आपल्यावर विश्वास ठेवून त्यांनी आपल्या कंपनी चे Supplements घेतलेले असतात.. ते घेताना आवाजात थरथर असते, कारण आजारामुळे आत्मविश्वास पूर्ण ढासळलेला असतो.. पण त्या दिवशी फोन वरचा आवाज एकदम खणखणीत आणि लाखमोलाचे शब्द कानावर पडतात..

समाधानाच्या अधिष्ठानावर जगणं समृद्ध करूयात | How to stay happy in Marathi

बाई तू दिलेल्या गोळ्या खाऊन लय बर वाटाया लागलं बघ… तुम्हाला सांगते त्या क्षणी डोळ्यातून खळखळ वाहणाऱ्या अश्रूं बरोबर बऱ्याच खोट्या गोष्टी गळून पडल्या ..
नि कळल त्या दिवशी जरी
एखाद्याच्या आनंदाच कारण होता येत नसेल तर निदान त्याच्या जखमेवरच मलम होऊन बघावं कदाचित त्याने आपलेच घाव भरले जातात

दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आयुष्य ही इतरांच्या साठीच जगण्याची बाब आहे..
आपल्या कडे जे आहे त्यातलं थोडं तरी इतरांना देण्याची दानत आपल्या मध्ये असली पाहिजे..मग कोणी सांगितलं पैसाच ओतला पाहिजे असं.. ज्यांच्याकडे जे आहे त्याने ते द्यावं…
कुणाच्या गळ्यात गाणं असेल त्याने चार दोन गाणी गावीत..

समाधानाच्या अधिष्ठानावर जगणं समृद्ध करूयात | How to stay happy in Marathi

आपल्याला शब्दांच दान फार सहज पडत असेल तर आपण शब्दांनी आधार द्यावा.. कदाचित एखाद्याची आत्महत्येकडे वळणारी पावले जगण्याच्या दिशेने वळतील..
आयुष्यात घडणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टीनी आयुष्याला फुलवता आलं पाहिजे..
दुःखच आहे म्हणून रडत बसण्यापेक्षा ही जगण्याचा उत्सव करता यायला पाहिजे…
कधीतरी कुणामुळे आपलं आयुष्य वैराण झालं तरीही त्याला माफ करून पुढं जाता यायला पाहिजे.. कारण माहितीये का कित्येकदा माफ करवून टाकणं हे समोरच्या व्यक्ती पेक्षा ही स्वतःसाठी च खूप गरजेचं असत त्याने आपण खूप सराईत आयुष्य जगू शकतो… नाहीतर हे वेड मन तुलना करायला लागत, तक्रारी करायला धजावत माझ्या आयुष्यात दुःख आणि मला त्रास देणारा आनंदी कसा.. तर तस नसत अहो ते

समाधानाच्या अधिष्ठानावर जगणं समृद्ध करूयात | How to stay happy in Marathi

आपण जर इतकेच भाग्यवान असलो न तर आपल्या आयुष्यात वाईट करून ठेवणाऱ्या माणसांच्या आयुष्यात वाईट होताना बघणं हे आपल्या नशिबात असत, आणि जर तस नाही घडलं तर देवाने आपल्याच आयुष्यात काटे कसे पेरले आणि तो सुखी कसा ?? याहीपेक्षा हे महत्त्वाचं की प्रत्येक जण आपल्या कर्माने आपलं नशीब आणि प्राक्तन घडवत असत…आणि ते अनुभवत असतो..

म्हणून तर म्हंटल जगण्याचा उत्सव करता आला पाहिजे ..तरच नियतीने आपल्याला माणसाचा जन्म देऊन चूक केली नाही अशी पावती स्वतःला द्यायला हरकत नाही…
बाकी आयुष्य सुंदर आहेच..
आणि तुमच्या आशीर्वादाने ते आणखीच सुंदर बनवायचं आहे…

समाधानाच्या अधिष्ठानावर जगणं समृद्ध करूयात | How to stay happy in Marathi

शेवटी एकच सांगेन
इतकं Abundance आहे या जगामध्ये
इतकी संधी आहे, इतकी लक्ष्मी आहे, इतकं ज्ञान आहे इतकी चांगली माणसं आहेत अवती भोवती आपल्या.. हे सगळं चांगल आपल्या वाट्याला येऊ शकत..फक्त ते अवलंबून आहे आपल्या विचारावर … मी याच सर्व गोष्टी मधून माझं सुख शोधते आणि खूप समाधानी राहते..

नाव :- रोशनी लक्ष्मी सुंदरलाल फुलझेले

ठिकाण :- यवतमाळ

समाधानाच्या अधिष्ठानावर जगणं समृद्ध करूयात | How to stay happy in Marathi

Read More :-

Impact of Mobile In Marathi

Happy Diwali Quotes in Marathi

Avatar
Marathi Time

Leave a Reply