मोबाईल शाप की वरदान by सौ.क्रांती तानाजी पाटील | Impact of Mobile in Marathi 2024

साहित्यबंध समूह आयोजित साप्ताहिक स्पर्धेत सौ.क्रांती तानाजी पाटील यांनी Impact of Mobile in Marathi या कीवर्ड वर आधारित “मोबाईल शाप की वरदान” हा लेख लिहिला आहे. चला तर वाचूया.

मोबाईल शाप की वरदान | Impact of Mobile in Marathi

साहित्यबंध समुह आयोजित साप्ताहिक उपक्रम क्रमांक-५ विषय : – मोबाईल शाप की वरदान

मोबाईल शाप की वरदान | Impact of Mobile in Marathi

मोबाईल म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाचा आविष्कार आहे. प्रामुख्याने या मोबाईलचा वापर तातडीने निरोप देणे व घेणे या साठीच होता. कारण मोबाईल म्हणजे आपल्या सोबत आपण ती गोष्ट कुठेही नेऊ शकतो. त्यामुळे अगदी कोणत्याही कानाकोपऱ्यात जरी आपण असलो तरी, कोणतीही अडचण भासली तर आपण पटकन इतरांशी संपर्क करु शकतो. खरतरं अगदी प्राचीन काळापासून हे निरोप किंवा संदेश पाठवण्याची परंपरा आहेच. फक्त त्यांची रुपे वेगवेगळी आहेत. त्यातल्या त्यात प्रेमिकांचे तर विचारु नका.

मोबाईल शाप की वरदान | Impact of Mobile in Marathi

असे म्हणतात की कालीदासांनी प्रथम आपल्या प्रियेसीला, विरह वियोगात आषाढ महिन्यातील जे मोठमोठे काळेभोर मेघ येतात. त्यांच्या मार्फत त्यांनी आपल्या प्रियेला प्रेम संदेश पाठवले होते. त्यानंतर कबुतरां मार्फत सुध्दा निरोप पाठविले जात होते. “कबुतर जा,जा. पहिली प्यार कि,पहिली चिठ्ठी साजन को दे आ” यावरुन लक्षात येईलच. तसेच देवादिकांच्या राज्यात ही दूत होते. निरोप देण्या, घेण्यासाठी. तसेच राजेशाही आली. आणि दिंवडी म्हणजे ढोलकी वाजवून आरोळी देऊन निरोप गावात दिला जात. तर परगावी हस्तलिखित लखोटे लिहून . एखाद्या व्यक्ती मार्फत ते निरोप पाठवले जात.

मोबाईल शाप की वरदान | Impact of Mobile in Marathi

शिवाजी महाराजांच्या काळात तर ही पत्रे सुध्दा सांकेतिक भाषांनी पाठवली जायची. जसं की आज त्यांची जागा मोबाईल मधील इमोजींनी घेतली आहे. असो त्यानंतर ब्रिटिश राजवटीत टेलिफोन आले. सरकारी कार्यालयात त्यांचा वापर होत होता. त्याच काळात साधे पत्र, आंतरदेशीय पत्र व अगदी तातडीनं निरोप असेल तर तार यांच्याद्वारे निरोप दिले जात.
काळ बदलला तंत्रज्ञानाच्या जोरावर अनेक नवनवीन शोध लागले. औद्योगिककरण, यांत्रिकीकरण यांच्यात झपाट्याने वाढ होऊ लागली. आणि मग ही टेलिफोनची सेवा गावोगावी अगदी घराघरात पोहोचली. त्यामुळे एकमेकांशी पटकन संपर्क होऊ लागला. पण यासाठी सुरुवातीला अगदी सेकंदाला सुध्दा बोलताना पैसे पडत होते. त्यामुळे त्यांचा वापर हा मर्यादित होत होता. अगदी कारणास्तव फोन केले जात.

मोबाईल शाप की वरदान | Impact of Mobile in Marathi

पण त्यानंतर मोबाईल फोनचा शोध लागला. व घरोघरी फोन होते. त्याची जागा घराघरातील प्रत्येक व्यक्तीने घेतली.फोन आले. आणि मग सुरुवातीला आनंदाला उधाण आले. अगदी क्षणभरात व हवं तेंव्हा हव्या त्या व्यक्तीसोबत आपण बोलू शकत होतो. पण त्यावेळी सेकंदाला पैसे मोजावे लागत असल्याने त्याचा वापर गरजेनुसार व गरजेपुरताच होतं होता.पण हे तंत्रज्ञान म्हणजे एक जादुगार आहे. रोज नवनवीन प्रयोग करुन नवीन जादू लोकांसमोर सादर करतो. या तंत्रज्ञानाने असेच एक जादू केली. आणि मोबाईल फोन पेक्षाही सुंदर स्मार्ट फोनचा शोध लावला. आणि बघता,बघता हे निरोप,देण्या,घेण्याचे माध्यम एक नवं मोहिनी रुप घेऊन आपल्या समोर आले. या त्याच्या मोहिनी रुपात अगदी लहान बालकांना पासून ते वृद्ध लोकांपर्यंत प्रत्येकालाच त्याची भुरळ पडली.

मोबाईल शाप की वरदान | Impact of Mobile in Marathi

मोबाईल शाप की वरदान by सौ.क्रांती तानाजी पाटील | Impact of Mobile in Marathi 2024

आता अनलिमिटेड कॉल व अनलिमिटेड मेसेज आणि डाटा अगदी महिना किंवा तीन महिन्यांच्या रिचार्ज मध्ये मिळू लागला. त्यानंतर वायफाय मुळेच तर मग काही चिंता उरली नाही. व्हिडिओ कॉल मुळे अगदी देशातल्याच काय विदेशातील व्यक्तींशी एका क्षणात समोरासमोर बघून बोलू शकत होतो. कमी वेळात आपली अगदी महत्त्वाची कामे पटपट होऊ लागली. गुगलपेमेंट,फोन पे यांच्यामुळे आर्थिक समस्या सुध्दा घरबसल्या मिटत होत्या. ऑनलाइन खरेदीमुळे आपले शारीरिक श्रम कमी झाले. शिवाय एका क्षणात काय हवे,काय नको हे ठरविता येत होते. इमर्जन्सी असेल तर कॉन्फरन्स वर मिटिंग घेऊन मोठ, मोठ्या कंपन्या सुध्दा आपली महत्त्वाची कामे पार पाडतात. या स्मार्टफोनचा उपयोग कोरोनाच्या काळात मानवाला सर्वाधिक झाला.

मोबाईल शाप की वरदान | Impact of Mobile in Marathi

गुगल बाबा तर या नव्या पिढीचे ज्ञानी गुरुच आहेत. एका सेकंदात कोणत्याही विषयाची माहिती मिळते. युट्यूब मुळे घरबसल्या लाखो रेसिपी व कोणत्याही गोष्टींची माहिती सहज उपलब्ध होत आहे. प्रत्येक ठिकाणचे फोटो आल्या गुगलवर सेव्ह होत असल्याने प्रत्येक आनंदी क्षण कायम स्मृतीत राहू लागला. थोडक्यात काय तर हा स्मार्टफोन प्रत्येकाच्या गळ्यातील ताईत झाला.नकळत का होईना तो सर्वांना खूप आनंद देऊ लागला.

मोबाईल शाप की वरदान | Impact of Mobile in Marathi

पण…जसे एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात. त्याप्रमाणे प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात.म्हणजेच फायदे व तोटे हे असतातच. आणि फायदा व तोटा आला म्हणजे शाप की वरदान हे ओघानेच आले. त्याप्रमाणे मोबाईल शाप की वरदान हे ठरवताना आपण आतापर्यंत त्यांचे अनेक फायदे पाहिले. त्याच्या मुळे मिळणारा आनंद पाहिला,वेळेची बचत पाहिली अशा अनेक गोष्टींच्यामुळे मोबाईल हे मानवाला मिळालेले वरदानच मानावे लागेल.

परंतु मघाशी सांगितल्याप्रमाणे ही नाण्याची म्हणजे मोबाईलची दुसरी बाजू म्हणजे त्यांचे तोटे. त्याचे मानवी शरीरावर होणारे दुष्परिणाम. या मोबाईल मुळे आपला वेळ खुप वाचला. पण या स्मार्टफोनमुळे आपण वाचलेल्या वेळेची बचत करुन चांगल्या गोष्टींकडे वळलो नाही. म्हणजे जसे की पुस्तक वाचन पण आपण ते न करता हातांची बोटे स्क्रीन वर फिरवत राहिलो. आणि मग हा उरला वेळ नुसता सर्च करण्यात फुकट वाया घालवत राहिलो. निरोप देण्या, घेण्यासाठी वापरला जाणारा फोन आता तासनतास चॅटिंग करण्यात घालवू लागलो. माणुस हा समाजप्रिय आहे. परंतु या मोबाईल मुळे सामाजिक कार्यक्रमात जरी आपण असलो तरी संवाद कमी झाला.

एकमेकांची सुख,दु:खे ऐकून घ्यायला कुणालाच वेळ उरला नाही. जग जवळ आले. पण जवळचे सगळे दुरावत गेले. या मोबाईल मुळे कुटुंबा मध्ये सुद्धा मायेची दरी पडू लागली. नवरा,बायको मुले आई,वडील या कुटुंबव्यवस्थेवरही दुष्परिणाम जाणवू लागले.

मोबाईल शाप की वरदान | Impact of Mobile in Marathi

आपली मायेची माणसे दूर करुन. या सोशलमडियामुळे कधीही न पाहिलेली दुरची माणसे, प्रत्येकाला आपलीशी वाटू लागली. या सोन्याच्या मृगजळामागे धावून अनेकांच्या संसारात रामायण घडू लागली. वेगवेगळ्या एप्लीकेशन मुळे नको त्या गोष्टीत माणसांची रुची वाढू लागली. वेळेचे महत्त्व उरले नाही. आपला अमूल्य वेळ ही तरुणपिढी तर तासनतास स्क्रीनवर स्क्रोल करण्यात वाया घालवत आहे. कोणत्याही गोष्टीला निर्बंध नसल्याने संस्कार व संस्कृतींची पायमल्ली होत आहे. फॉरवर्डच्या या दुनियेत भावनांची किंमत शुन्य झाली. संवाद हरवला.माणुसकीची ही नाती संपली. मोबाईल मुळे माणुस हा एकाकी झाला. संघटन संपले. संवाद हरवला व तो डिप्रेशन मध्ये चालला. सोशल मीडियावर हजारोंच्या घरात फ्रेंड असूनसुद्धा तो आत्महत्या करुन लागला. पैसा, मनोरंजन सारं काही मिळून सुध्दा तो सुखी व आनंदी राहू शकला नाही. कारण मोबाईल.

मोबाईल शाप की वरदान | Impact of Mobile in Marathi

मोबाईलमुळे तो रात्रभर जागाच. मग सकाळी जाग कुठुन येणार. एकूण काय तर त्याच्या झोपण्याच्या ,खाण्या, पिण्याच्या वेळा बदलल्या आणि त्यामुळे शारीरिक व मानसिकदृष्ट्या तो दुबळा झाला. माणुसकीची ,प्रेम, जिव्हाळा, आपुलकी,मायेची नाती या मोबाईल मुळे संपली.मला माझी स्पेस हवी आहे. असे बोलणारी लोक या त्यांच्या मिळालेल्या विशाल स्पेस मध्ये स्वतः हरवून गेलीत. परतीचा मार्गच आता त्यांना सापडेना. गुगल कोणतेही लोकेशन टाकले तर व्यवस्थित त्याठिकाणचा मार्ग शोधून देत असला तरी तो तुमच्या प्रत्येकाच्या सुखाचा मार्ग कधीच शोधून देणार नाही. कारण तो शोध अजून तरी या तांत्रिकयुगाला लागलेला नाही.

मोबाईल शाप की वरदान | Impact of Mobile in Marathi

हा स्मार्टफोन म्हणजे आधुनिक काळातले चक्रव्यूह आहे. या चक्रव्यूहात शिरण्याचा मार्ग, ज्ञान प्रत्येकालाच आहे. पण ते चक्रव्यूह फोडून बाहेर पडण्याचा मार्ग ते ज्ञान मात्र कुणालाच नाही. या चक्रव्यूहात फसलात. तर मग त्याचा शेवट सर्व परिचीत आहे. “अति सर्वत्र वर्ज्यत्ये” या प्रमाणे “अती तिथे माती होणार”. व दुष्परिणामांना सामोरे जावे लागणारच. मग यातून मोबाईल तरी कसा अपवाद ठरेल. मोबाईल आवश्यकतेपेक्षा जर तुम्ही जास्त वापर केला. तर तो ही शापच ठरणार.
मोबाईल शाप की वरदान हे ठरविणे सर्वस्वी आपल्या हातात आहे. जर मोबाईलचा योग्य वापर केला तर मोबाईल मानवाला मिळालेले वरदानच आहे.

सौ.क्रांती तानाजी पाटील.
मु.पो.दुशेरे.
ता‌.कराड. जि.‌ सातारा.

मोबाईल शाप की वरदान | Impact of Mobile in Marathi

समाप्त.

साहित्यबंध समूहाची माहिती आणि जाहिरात

दिवसेंदिवस मराठी भाषेवर इतर भाषेतील शब्दांचा अतिरेक होत आहे. कित्येक मराठी शब्द तर नवीन पिढीच्या कानावर देखील पडले नाहीत. यामुळे पुढे जाऊन मराठी भाषा हळू हळू लुप्त होईल अशी आम्हाला भीती आहे. लिहिणे, बोलणे, ऐकणे आणि वाचणे ह्यातूनच मराठी भाषा अनंत काल टिकू शकते.

marathi lekh katha nibandh

त्यामुळे नवनवीन साहित्यिक मराठी भाषेतून निर्माण होणे ही काळाची गरज आहे. तसेच लेखकांचा पुरेसा सन्मान मिळणे आणि त्यांना योग्य प्लॅटफॉर्म उपलब्ध होणे त्याचबरोबर साहित्य चोरी थांबवणे या उद्देशातून आम्ही हा समूह तयार केला आहे.

मराठी भाषेच्या प्रती आमचे जे कर्तव्य आहे ते पार पाडण्याचा हा छोटासा प्रयत्न. तुम्ही देखील मराठी भाषेप्रती आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी हा समूह जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आमची मदत करा.

लक्षात घ्या की ह्या समूहाची सभासद फी ५०₹ प्रती महिना आहे. सभासद फी 9146494879 या Gpay किंवा PhonePe नंबर वर टाकल्यानंतर ग्रुप मध्ये add केले जाईल. एकदाच वार्षिक सभासदत्व घेणाऱ्यांना फी मध्ये १०० ₹ सूट मिळेल.

मोबाईल शाप की वरदान | Impact of Mobile in Marathi

या मासिक सभासदत्वामध्ये तुम्हाला मिळेल

१) साहित्यक्षेत्रातील प्रगतीसाठी ४ साप्ताहिक स्पर्धा

२) सहभागासाठी आकर्षक डिजिटल प्रमाणपत्रे

३) स्पर्धेतील तुमचे चार लेख सुप्रसिद्ध अशा मराठी टाईम वेबसाईटवर पब्लिश केले जातील. ज्याची लिंक तुम्ही कुठेही शेअर करू शकता.

४) तुमचा फोटो आणि लेखाच्या नावासहीत चार सुंदर वॉलपेपर.

५) लेख त्याच्या विषयाला अनुसरून छान वॉलपेपरसने सजविला जातील.

६) तुमचा लेख गुगल सर्च मध्ये आणण्यासाठी SEO techniques वापरल्या जातील.

मोबाईल शाप की वरदान | Impact of Mobile in Marathi

तुमच्या एका लेखावर अंदाजे ५००₹ चे काम केले जाईल म्हणजे ५०₹ च्या सभासद फी मध्ये ४ लेखांवर होणारे २०००₹ चे फायदे तुम्हाला मिळणार आहेत

https://chat.whatsapp.com/JDA5qGHXn43IofHbacHWBd

मोबाईल शाप की वरदान | Impact of Mobile in Marathi

9146494879 या Gpay/ PhonePe नंबरवर एका महिन्याची ५०₹ फी किंवा वर्षाची ५००₹ सभासद फी पाठवा. Payment कमेंट मध्ये स्वतःचे नाव टाका. आणि वरील ग्रुप लिंकला जॉईन व्हा.

आमच्या समूहातील कविता वाचण्यासाठी भेट द्या mazablog.online

मोबाईल शाप की वरदान | Impact of Mobile in Marathi

Mobile Shap ki Vardan

मोबाईल शाप की वरदान | Impact of Mobile in Marathi

Leave a Reply

%d bloggers like this: