आज आम्ही तुम्हाला एका वेगळ्या विषयाबद्दल या article मध्ये सांगणार आहोत. ज्याचं नाव Speech In Marathi आहे. भाषण म्हणजे काय? मराठी भाषण कसे करावे? भाषणाचे कोण कोणते प्रकार आहेत? भाषणाचे उपयोग काय आहेत? विद्यार्थ्यासाठी भाषणाचे महत्त्व काय आहे? आणि कोण कोणत्या विषयावर आपण भाषण करू शकतो? आणि भाषनाबद्दल बरेच काही आम्ही तुम्हाला या Article मध्ये सांगणार आहोत.
What is The Speech In Marathi । भाषण म्हणजे काय?

भाषण म्हणजेच त्याला मराठी मध्ये “वक्तृत्व” या सोबतच “व्याख्यान” असे देखील म्हणतात. एखाद्या विषयाला घेऊन त्याला समाजासमोर वर्णनात्मक पद्धतीने आणि आपल्या शब्दात त्या विशिष्ट विषयावर आपले विचार मांडण्याच्या पद्धतीला “भाषण” असे म्हणतात. आपल्या जनमानसात अशी आख्यायिका होती की, “भाषण” ही एक कला आहे आणि ती जन्मजात च असायला हवी मात्र ही आख्यायिका आता कालबाह्य ठरत चालली आहे. कारण भाषण करण्याची ही कला आता अवगत सुद्धा करता येते.
मराठी भाषण कसे करावे?
भाषण करणे आता फार अवघड राहिले नाही. ही एक कला जरी असली तरी देखील ही कला जन्मजात असायलाच हवी असं मुळीच नाही. कारण ही कला सरावाने अगदी सहजतेने आत्मसात करता येते.
भाषण करण्यासाठी सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आपल्या मध्ये आत्मविश्वास असायला हवा. आणि आत्मविश्वास वाढविण्यासाठी समोर असलेल्या व्यक्तीच्या डोळ्यात डोळे घालून बोलता आला पाहिजे. त्यासाठी तुम्हाला तुमच्या श्रोत्यांना आपलंसं करावं लागेल. त्यांच्याबद्दल मनात आपुलकीची भावना निर्माण करावी लागेल. तेव्हाच तुम्ही त्यांच्यासमोर येऊन बोलू शकता. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला तुमच्यावर पूर्ण विश्वास असायला हवा की, तुम्ही बोलू शकता. जर तुमचाच तुमच्यावर विश्वास नसेल तर तुमची जीभ बोलते वेळी थर थर कापेल आणि तुम्ही बोलू शकणार नाही.
आता भाषण कर यासाठी दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्ञान. आपल्या जवळ एखाद्या विशिष्ट विषयाबद्दल भरपूर ज्ञान असायला हवा. आणि त्यासाठी तुम्हाला भरपूर आणि रोज वाचन करने आवश्यक आहे. वेग वेगळे Daily News Paper’s, नव नवीन पुस्तकं, मॅगझिन असे रोज वाचायला हवं. त्यामुळे तुमच्या ज्ञानात भर पडत जाईल आणि तुम्ही उत्तमरीत्या भाषण देऊ शकता.
ज्या व्यक्तीमध्ये आत्मविश्वास आणि ज्ञान या दोन गोष्टी आल्या त्या व्यक्तीला भाषण करणे सहज शक्य होईल आणि त्यांना सभा गाजवता येतील.
Types Of Speech । भाषणाचे प्रकार

औपचारिक भाषण आणि अनौपचारिक भाषण असे दोन भाषणाचे प्रकार आहेत. आपण एक एक प्रकार पाहूया…..
१. औपचारीक भाषण
ज्या भाषणाची भाषा ही शास्त्रशुद्ध, नियमबद्ध, रचनात्मक आणि सहेतुक असते. त्याला “औपचारिक भाषण” असे म्हणतात. ज्यामधे अनेक उपप्रकार येतात जसे की, वर्णन, निवेदन, चर्चा, व्याख्यान, वादविवाद, कथाकथन, स्पष्टीकरण, संवाद, मुलाखत हे सर्व औपचारिक भाषण मध्ये येतात. कारण यांची भाषा ही शास्त्रशुद्ध, नियमबद्ध, रचनात्मक आणि सहेतुक असते.
२. अनौपचारिक भाषण
ज्या भाषणाला मुख्य हेतू नसतो, ज्याची भाषा शास्त्रशुद्ध नसते, ज्याला काही नियम नसतात, यासाठी विषय, वेळ किव्वा स्थळाचे बंधन सुद्धा नसते. शिवाय यामध्ये मनावर दडपण सुध्दा येत नाही ज्यात फक्त मनमोकळे करून बोलता येते त्याला “अनौपचारिक भाषण” असे म्हणतात. या भाषणामध्ये कौटुंबिक भाषण, गप्पागोष्टी तसेच संदेशवहन असे प्रकार येतात.
भाषणाचे उपयोग काय आहेत?
भाषणाचा जीवनात खूप महत्व आहे. भाषण हे एक आयुष्यातील कित्येक महत्वाचे काम पूर्ण होऊ शकतात. त्यासाठीच आम्ही तुम्हाला भाषणाचे काय उपयोग आहेत? हे सांगणार आहोत.
१. संवाद कौशल्य
भाषण हे मानवी संवादाचे प्राथमिक माध्यम आहे. संवादाशिवाय आपण भाषण करू शकत नाही हे जरी खरं असेल तरी देखील वारंवार भाषण केल्यामुळे आपला संवाद देखील अधिक उत्तम आणि प्रभावी होण्यास मदत होते. हे देखील तेवढंच खरं आहे. शिवाय भाषण मुळे आपल्या विचार करता येते, भावना इतरांसमोर मांडता येते, कल्पनाशक्ती वाढते आणि यासोबतच भाषणामुळे कित्येक गरजा सुद्धा पूर्ण होतात.
२. व्यक्तिमत्वाचा विकास । Personality Development
व्यक्तिमत्त्वाचा विकास वाढविण्यासाठी देखील भाषणाचा मोलाचा वाटा आहे. यामुळे तुमच्या मध्ये सर्जनशीलता म्हणजेच ज्याला आपण इंग्लिश मध्ये Creativity म्हणतो ते देखील भाषणामुळे वाढते. तसेच मत सुद्धा मांडता येते आणि आपला व्यक्तिमत्त्व सुधारते. यामुळे तुम्ही लोकांना प्रेरित करू शकता, लोकांचे मन वळवू शकता आणि आपल्या सोबत लोकांचाही व्यक्तिमत्त्वाचा विकास करवून घेऊ शकता. आणि समजत देखील बदल घडवून आणू शकता.
३. शिक्षण आणि शिकणे
भाषण हे असे माध्यम आहे जे शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना देखील त्यांच्या शिकवण्यात आणि शिक्षणात मदत करीत असते. शिक्षक आपला जास्तीत जास्त अभ्यासक्रम व्याख्यान पद्धतीने कमीत कमी वेळात पूर्ण करू शकते आणि विद्यार्थ्यांना सुद्धा कमीत कमी वेळात जास्तीत जास्त अभ्यासक्रम करून घेण्यास मदत होते.
४. करीअर
या तंत्रज्ञानाच्या युगात बेरोजगारी अधिकच वाढत चाललेली आहे. त्यामुळे मुलांना भाषण ही कला अवगत झालेली असेल तर ते विद्यार्थी या भाषणामध्ये देखील आपला उत्तम करियर करू शकतात. कारण अनेक सभा, कार्यक्रम, जयंत्या मध्ये भाषण करणाऱ्यांना पैसे देऊन बोलविले जाते. त्यामुळे भाषण हा करियर करण्यास सुद्धा तुमची मदत करीत असते.
५. भावनिक संबंध
भाषण हे एखाद्या व्यक्तीच्या भावना समजून घेऊन त्यांना सांत्वना देण्यासाठी देखील खूप उपयोगी पडत असते. या धकाधकीच्या जीवनात कित्येक लोकांना कित्येक दुःख असतात. त्यांना कुणीही समजून घेणारं किव्वा कुणीही समजून देणारं नसते त्यामुळे त्यांना कुणाची तरी गरज असते. अशा लोकांना भाषणाद्वारे समजुन सांगता येते आणि त्यांना दुःखातून बाहेर काढता येते.
६. सामाजिक प्रबोधन
भाषण हे सामाजिक प्रबोधन करण्याचं उत्तम साधन मानलं जाते. कारण यातून तुम्ही लोकांना न्यायासाठी काढण्यास प्रवृत्त करू शकता. आणि अन्याय अत्याचार यावर आजाव उठवू शकता. आणि सततच्या होणाऱ्या अन्याय अत्याचारावर आळा घालू शकता.
७. वयक्तिक विकास
भाषण आणि आत्मविश्वास या दोन गोष्टी एकमेकांवर अवलंबून आहेत कारण आत्मविश्वास शिवाय तुम्ही भाषण करू शकत नाही आणि एकदा भाषण करण्याची कला तुम्हाला अवगत झाली की यामुळे तुमचा आत्मविश्वास अधिक वाढतो. त्यामुळे तुम्ही समाजात आपले विचार परखडपणे मांडू शकता. आणि सोबतच तुमच्या विचार करण्याच्या प्रवृत्ती मध्ये बळकटी येते. त्यामुळे तुमचा बौद्धिक विकास देखील वाढते.
भाषण करण्याची मला तुम्हाला प्रभावीपणे जमली तर तुम्हाला ही कला तुमच्या आयुष्यात खूप उपयोगी पडेल. यामुळे तुमचा संवाद कौशल्य, तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास, तुमच्या शिक्षणात, तुम्हाला तुमचा करीअर घडविण्यात, तुमचा भावनिक विकास, सामाजिक प्रबोधन करण्यास आणि तुमचा वयक्तिक विकास देखील भाषण या एकमेव कलेमध्ये तुम्हाला करता येते.
विद्यार्थ्यासाठी भाषणाचे महत्त्व काय आहे?
भाषण या कलेचं महत्व इतर लोकांसाठी तर आहेतच परंतु सोबतच विद्यार्थ्यांना देखील या कलेचा खूप उपयोग होतो ते आपण खालील प्रमाणे पाहूया….
१. आत्मविश्वास
मुलांमध्ये त्यांच्या शालेय जीवनात आत्मविश्वासाची कमी असते परंतु नेहमी भाषण केल्यामुळे त्या विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढते.
२. कल्पनाशक्तीची वाढ
भाषणामुळे विद्यार्थ्यांची कल्पना शक्ती अधिक वाढते आणि मुलं नव नवीन कल्पना करायला शिकतात. त्यामुळे त्यांच्या विचारांना चालना मिळते.
३. शिक्षण
मुलांना भाषण करण्याची कला अवगत झाली की त्यांना नव नवीन पुस्तकं वाचण्याची आवड आपसूकच निर्माण होते. आणि त्यामुळे त्यांचा अप्रत्यक्षपणे फायदा त्यांच्या शिक्षणात होतो.
४. करीअर
भाषण ही कला विद्यार्थ्यांना अवगत झाली की त्यांना भाषण मध्ये सुद्धा आपला करीअर करता येतो आणि सोबतच त्यांना इतर क्षेत्रात करिअर करायचं असेल तर त्यांचा भाषणामुळे आत्मविश्वास वाढत असतो त्यामुळे ते सहज कुठल्याही मुलाखतीत select होऊ शकतात.
कोण कोणत्या विषयावर आपण भाषण करू शकतो?
तंत्रज्ञान ही दुधारी तलवार आहे, मृत्यू नंतर जीवन आहे, जीवन प्रत्येकासाठी कधीही न्याय्य नसते, मेहनतीपेक्षा निर्णय महत्त्वाचा असतो, आपण एकदाच जगतो, संगीताची उपचार शक्ती, लग्न करण्यासाठी सर्वात आदर्श वय कोणते आहे, इंटरनेटशिवाय जगणे शक्य आहे का? अशा अनेक विषयांवर तुम्ही भाषण करू शकता.
भाषणाचे अनेक विषय असतात परंतू आपल्याला ज्या विषयात सर्वात जास्त आवड असेल आणि आपण ज्या विषयावर सर्वात जास्त आणि वेगळं काहीतरी लोकांना सांगू शकतो अशा विषयांवर च भाषण केलेलं अधिक प्रभावीपणे होईल.
1 thought on “50+ भाषणाचे विषय एकाच ठिकाणी | Top Speech In Marathi”