Warning: Undefined array key "@type" in /www/wwwroot/marathitime.in/wp-content/plugins/seo-by-rank-math/includes/modules/schema/class-frontend.php on line 107

Warning: Undefined array key "@type" in /www/wwwroot/marathitime.in/wp-content/plugins/seo-by-rank-math/includes/modules/schema/class-frontend.php on line 180

सणांचे बदलते स्वरूप by सौ.क्रांती तानाजी पाटील | Information on Festivals in Marathi 2024

साहित्यबंध समूह आयोजित साप्ताहिक स्पर्धेत सौ.क्रांती तानाजी पाटील यांनी Information on Festivals in Marathi या कीवर्ड वर आधारित “सणांचे बदलते स्वरूप” हा लेख लिहिला आहे. चला तर वाचूया.

सणांचे बदलते स्वरूप | Information on Festivals in Marathi

साहित्यबंध समुह
उपक्रम क्रमांक -४
लेख विषय – सणांचे बदलते स्वरूप

सणांचे बदलते स्वरूप | Information on Festivals in Marathi

भारतीय संस्कृतीत सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रत्येक मराठी महिन्यात सण हा असतोच. त्याचा सखोल विचार केला तर आपल्याला लक्षात येते. त्याच्या पाठीमागे ही आरोग्य व शास्त्रीय दृष्टिकोन हा आहे. आपल्याकडे बोली भाषेत बोलले जाते. ‘बेंदुर व सणांचे लेंढूर’ म्हणजे एकामागोमाग एक सण येतात. आता मराठी महिन्यानुसार जर पाहिले. तर नववर्षाच्या स्वागतासाठी येणारा….

१) पहिला सण म्हणजे चैत्र महिन्यात येणारा गुढीपाडवा . प्रत्येकाच्या घरोघरी काठीला नववस्त्र म्हणजे साडी,पिस,साखरेची माळ, कडुलिंबाचा डहाळा बांधून त्याची मनोभावे पूजा केली जाते. सडा, रांगोळीने अंगण सजते. झेंडूच्या फुलांनी दारावर तोरण लागते. व मोठ्या आनंदाने नववर्षाचे स्वागत होते. याची अख्यायिका जर ऐकली. तर रामाने रावणावरती विजय मिळवून राम त्यादिवशी वनवास संपवून परत आले होते. म्हणून त्यांच्या स्वागतासाठी गुढी उभारली जाते. याचा अर्थ ‘वाईटावर नेहमी चांगल्या गोष्टींचा विजय होतो.’ यांचे स्मरण देणारा हा दिवस व मानवतेची गुढी उभा करण्याचा संकल्प करा. यासाठी आपण गुढीपाडवा सण पुर्वा पार साजरा करत आलो आहोत.

सणांचे बदलते स्वरूप | Information on Festivals in Marathi

या दिवशी कडुलिंबाचा पाला व डाळ प्रसाद म्हणून खाण्याचा मान आहे. कारण ऋतू बदलाची सुरुवात असते. सकाळी थंड वारे व दुपारी कडाक्याचे ऊन यामुळे पित्त प्रकोप वाढतो. आपल्या शरीर स्वास्थ्यासाठी औषध म्हणूनच हा कडुलिंबाचा प्रसाद आहे. याउलट आता आपण इंग्रजी महिन्यानुसार 1जानेवारी हा दिवस नववर्ष म्हणुन साजरे करतो. त्याच्या स्वागतासाठी काय तर 31 डिसेंबरच्या रात्री नाच,गाणे,पिणे,खाणे हे सगळे. म्हणजे वाईट गोष्टींनीच सुरुवात आणि यांचा शेवट काय हे माहितच नसते. परिणामांची काळजी नाही. हेच सणांचे बदलते सैराट स्वरूप आहे. पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण म्हणावे लागेल.

सणांचे बदलते स्वरूप | Information on Festivals in Marathi

सणांचे बदलते स्वरूप by सौ.क्रांती तानाजी पाटील | Information on Festivals in Marathi 2024

२) आता मराठी दुसरा महिना वैशाख. मराठी वैशाख महिन्यात येणारा सण म्हणजे “अक्षयतृतीया”
आपल्या पुर्वजांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा केला जातो.
यादिवशी पाटावर मातीची ‘कर’ ठेवून त्याची पुजा केली जाते. वाडवडिलांना पुरणपोळी व आमरसाचा गोड नैवेद्य दाखवला जातो.

वाडवडिलांनविषयी आदर तर राहतोच. पण या सणानिमित्त त्यांच्या कर्तबगारीचे स्मरण करून देणारा दिवस. तसेच आरोग्यासाठी त्या ऋतुतील पिकलेले गोड रसाळ आमरसाचे सेवन होऊन शरीर धष्टपुष्ट राहते. हा फायदा.

सणांचे बदलते स्वरूप | Information on Festivals in Marathi

३) जेष्ठ हा मराठी तिसरा महिना. या महिन्यात “वटपौर्णिमा” हा सण साजरा केला जातो. यादिवशी वडाच्या झाडाची पूजा केली जाते. म्हणजे झाडां,वृक्षांविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते. कारण झाडांमुळे थंड सावली तर मिळतेच पण पाऊस ही पडण्यास मदत होते. व आरोग्याच्या दृष्टीने तर झाडे म्हणजे जीवनाची संजिवनी मानले जाते. कारण त्यामुळेच आपल्याला जगण्यासाठी लागणारा ऑक्सिजन मिळतो. आणि महत्त्वाचे म्हणजे वडाच्या झाडाखाली तर हा ऑक्सिजन मुबलक प्रमाणात मिळतो. याचे स्मरण राहावे. व या झाडाचे संवर्धन जास्त प्रमाणात व्हावे. यासाठी हा सण साजरा केला जातो.

सणांचे बदलते स्वरूप | Information on Festivals in Marathi

४) आषाढ महिन्यात साजरा होणारा सण म्हणजे “बैलपोळा” किंवा यालाच “बेंदुर” असे ही बोलले जाते. तसेच “गुरुपौर्णिमा” ही साजरी केली जाते.
पुर्वी शेतातील जमिनीची मशागत ही बैलांच्या साहाय्याने केली जात. त्यामुळे बैलाला व मालकाला ही कष्टाची कामे करुन घाम गाळावा लागत. तर या मुक जनावरांना बोलता येत नाही.पण खुप कष्ट पडतात. याची जाणीव राहावी. यासाठी हा बै’लपोळा ” बैलांच्या विश्रांतीचा दिवस. त्यांनाही धूवुन रंगरंगोटी,झुली,गोंडे यांनी सजवून त्यांची मिरवणुक काढली जाते. नैवेद्याला पुरणपोळी,खीचडा,कापण्या असतात. यानिमित्ताने शरीरात गुळ जास्त प्रमाणात जाऊन कॅल्शियम मिळावा. जनावरांचे व माणसांचे आरोग्य तंदुरुस्त रहावे. यासाठीच हा सण. पण आता काळ बदलला यांत्रिकीकरण आले.व शेतीची मशागत ही ट्रॅक्टर ने होऊ लागली. आता घाम गळत नाही. तर धुर निघतो. त्यामुळे फक्त प्रदुषण होते. शिवाय अनेक व्याधींना सामोरे जावे लागतयं. सणांचे हे बदलते स्वरुप खुप धोकादायक आहे.

सणांचे बदलते स्वरूप | Information on Festivals in Marathi

गुरुपौर्णिमेला गुरु विषयीं आदर व्यक्त केला जातो.
“गुरुविना कोण दाखविल वाट” आयुष्यातले अवघड चढउतार पार करायचे असतील. गुरुंचे चरण धरा. आपोआप मार्ग सापडतील. हा उदात्त संस्कार आपल्यावर या सणामुळे होतो.

५) मराठी पाचवा महिना म्हणजे श्रावण
या महिन्यात नागपंचमी, राखीपौर्णिमा व स्वातंत्र्यदिन साजरा केला जातो.
भारत हा कृषिप्रधान देश आहे. तर साप,नाग हे येथील शेतकऱ्यांचा मित्र मानला जातो. उंदीर,घुशी यांच्यामुळे शेतीची जी नासधूस होते. त्यांना हे साप,नाग गिळून टाकतात. व शेतीचे संरक्षण करतात. म्हणून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांचे पुजन केले जाते. यांना दुध , लाह्यांचा नैवेद्य दाखवला जातो. याला आरोग्याच्या दृष्टीने कारण म्हणजे या महिन्यात पुर्वी सतत भरपूर पाऊस त्यामुळे हालचाल कमी व पचनसंस्था त्यामुळे मंदावलेली असायची. मग पचनासाठी हलके म्हणून असे भाजलेले हलके पदार्थ जास्त खाल्ले जावेत.हा हेतू “राखीपौर्णिमा” हा सण भाऊ, बहिणींच्या पवित्र नात्यांचा सण. बहिणीच्या रक्षणासाठी भाऊ सदैव तयार असतो. असे हे अतुट नाते रेशमी धाग्यांत कायम घट्ट विणले गेले जाते.या सणामुळे, “स्वातंत्र्यदिन” हा तर प्रत्येकाच्या अभिमानाचा सण. राष्ट्रांविषयी प्रेम व निष्ठा व्यक्त करण्यासाठी व ज्यांनी या भारत देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले. त्यांचे स्मरण करणारा हा राष्ट्रीय सण साजरा केला जातो.

सणांचे बदलते स्वरूप | Information on Festivals in Marathi

६) सहावा मराठी महिना भाद्रपद. या महिन्यात प्रामुख्याने गणपती व गौरी यांचे पूजन करणारा “गौरी- गणपती”चा सण साजरा केला जातो. सगळ्या गणांचा नायक असणारा गणपती म्हणजेच सर्व कर्त्या पुरुषांचे व, अधिनायकांचे प्रती आदर व्यक्त करणारा सण तसेच पुरुषां बरोबरच स्त्रीसुध्दा सन्माननीय आहे. तिचं लक्ष्मी, सरस्वतीचे रुप आहे. तिचा मान राखून पुजा व्हावी,तिचा ही आदर राखावा. यासाठी गौरी-गणपतीचा सण साजरा केला जातो. खरंतर पुर्वी नागपंचमी पासून गौरी,गणपतीपर्यंत झिम्मा, फुगड्या खेळल्या जात. त्यानिमित्ताने स्त्रीला अनेक गोष्टींत व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य मिळत होते. खेळामुळे शारीरिक व मानसिक आरोग्य तिचे सुंदर राहण्यास मदत होत होती.

सणांचे बदलते स्वरूप | Information on Festivals in Marathi

७) त्यानंतर अश्विन महिन्यात लगेच येणारा सण म्हणजे नवरात्रोत्सव “घटस्थापना” व “दसरा”
यामध्ये देवापुढे मातीचा घट बसवून सभोवती माती घालून तिच्या भोवती पाच प्रकारचे धान्य पेरतात. या नवरात्रोत्सवात दुर्गा देवीने नवरात्रीत राक्षसांचा संहार केला. अशा स्त्रीशक्तीचा जागर व सृजनतेची पुजा या सणात होते.

स्त्री किती सक्षम असते. हे या सणातून समजून येते. पण या सणाचे बदलते रुप म्हणजे दांडिया किंवा गरबा यामध्ये स्त्री,पुरुष ,मुले,मुली एकत्र टिपऱ्या खेळतात. रासक्रिडाच म्हणा ना हवं तर याला. मघाशी सांगितले तसे. नागपंचमी पासून गौरींच्या सणापर्यंत खेळली जाणारी झिम्मा,फुगडी बंद होऊन तिची जागा या टिपऱ्यांनी घेतली. झिम्मा, फुगड्या शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले ठेवत. तर या दांडिया मुळे नको ते अश्लील प्रकार घडताना दिसतायेत.

सणांचे बदलते स्वरूप | Information on Festivals in Marathi

स्त्रीशक्तीचा पुजा करुन मान, सन्मान राखणे तर दूरच पण तिच्या बाह्य सौंदर्य यांचे प्रदर्शन आता बघायला मिळते.या सणात. हा बदल आपल्या संस्कृतीचे व संस्कारांचे हनन करणारा आहे. तर पारंपरिक रुढी नुसार दसऱ्या दिवशी शमीची पाने वाटून सोनं लुटण्याचा आनंद घेतला जातो. ‘सोन घ्या, सोन्यासारखं राहावां’ असं बोलून त्यामाध्यमातून माणुसकीचे दर्शन घडते.

सणांचे बदलते स्वरूप | Information on Festivals in Marathi

८) कार्तिक महिन्यात सर्वात मोठा सण म्हणजे दिवाळी किंवा दिपावली साजरी केली जाते. लक्ष,लक्ष दिव्यांची ओळ सजवून,रंगीत भलीमोठी रांगोळी काढून, रोषणाई, आतषबाजी यांनी घरदार सजलेले असते.पुर्वीची दिवाळी व आता साजरी होणारी दिवाळी यामध्ये खुप स्वरूप बदललेले आहे हे लक्षात येईल.

पहिले मोबाईल फोन, टेलिव्हिजन सेवा नव्हती तेंव्हा टाईमपास, करमणुकीसाठी मुले दिवाळी सुट्टीत मातीचे भलेमोठे किल्ले करायचे. त्यामुळे शुरवीरांचे विजयश्री चे रक्त त्यांच्या नसानसात धावत असे. अभिमानाने त्यांच्या माना ताठ होतं आणि आता मोबाईल मुळे मुलांच्या मना खाली वाकल्या. नजरा झुकल्या. किल्ले रेडिमेड तयार येऊ लागले. त्यामुळे मैत्रीची, एकोप्याची भावना संपली.पुरुषवर्ग पण आकाशकंदील घरीच बनवत. त्यात त्यांचा छान वेळ जात असे.आनंद ओसंडून वाहायचा. स्त्री वर्ग पण एकत्र येऊन एकमेकींची दिवाळी करत होत्या. त्यानिमित्ताने एकमेकींची सुख,दु:खे विभागली जायची. पण बदलत्या काळात स्त्री नोकरी करु लागली. व दिवाळीचे पदार्थ ही रेडिमेड घरी येऊ लागले. त्यामुळे सर्वांच्या दिवाळीचा आनंद दुकानातच राहिला.

पैसै देवून वस्तू घरी आल्या. पण आनंद ,सुख घरी नाही आले.

सणांचे बदलते स्वरूप | Information on Festivals in Marathi

९) मार्गशीर्ष महिन्यात येणारा सण म्हणजे “देवदीपावली” देवांच्या साठी कृतज्ञता म्हणून ही दिवाळी साजरी केली जाते. या सृष्टीत जी अदभुत शक्ती आहेत. त्यांना आपण देवता मानतो. व त्यांचे पुजन करतो.

सणांचे बदलते स्वरूप | Information on Festivals in Marathi

१०) यानंतर येतो तो पौष महिना. या महिन्यात “मकर संक्रांतीचा” सण साजरा केला जातो. सुर्य संक्रमणाचा काल. सुर्य कर्क राशीतुन मकर राशीत प्रवेश करतो. दिवस तिळा,तिळाप्रमाणे वाढत जातो. म्हणून याला मकर संक्रांत संबोधले जाते. या दिवशी “तिळगुळ घ्या गोडगोड बोला”असे म्हणून रुसवे,फुगवे विसरुन तिळा सारखा स्नेह व गुळासारखी गोडी वाढवून. परस्परांच्यात स्नेह भावना वृध्दींगत केली जाते. या काळात वारे असल्यामुळे पतंग उडवण्याची मजा लुटली जाते. आरोग्याच्या दृष्टीने शरीरात उष्णता निर्माण करण्यासाठी तिळगुळाचे सेवन केले जाते. तिळगुळामुळे थंडी तर कमी जाणवतेच. परंतु त्वचा सुध्दा मऊ, चमकदार होते. हाच हा सण साजरा करण्या मागचा हेतू.. पण आता याच महिन्यात पहिल्या आठवड्यात साजरे होत असतात.

अनेक ‘डे’ प्रपोज,डे पासून व्हॅलेन्टाईन डे पर्यंत ज्यामध्ये फक्त औपचारिकता दिसुन येते.
प्रेम वाढते ते गोड संवादाने ना की भेटवस्तू देण्याने हे लक्षात यायला हवं या बदलत्या सणाच्या स्वरूपाला

सणांचे बदलते स्वरूप | Information on Festivals in Marathi

११) माघ महिन्यात येणारा सण म्हणजे “नव्याची पौर्णिमा” या दिवशी गव्हाच्या पिठाचे म्हणजे कणकेचे दिवे करुन चंद्राला ओवळून त्याच्या विषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते. तर याच महिन्यात “रथसप्तमी”ही साजरी केली जाते. यामध्ये सुर्याची पुजा केली जाते. एकूण काय तर सुर्य,चंद्र,वृक्ष, पशु,प्राणी, राष्ट्र,देवी,देवता,स्त्री,पुरुष शक्ती,गुरु,भाऊ,बहिण,वाढ, वडिल या सर्वांसाठी आदर म्हणून आपण पिढ्यानपिढ्या सण साजरे करत आहोत.

सणांचे बदलते स्वरूप | Information on Festivals in Marathi

१२) मराठी महिन्यातील शेवटचा सण म्हणजे “होळी पौर्णिमा” अग्नीदेवते विषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा होतो. यामध्ये वाईट गुणांची होळी करुन एकमेकांच्यातील हेवेदावे विसरून चांगल्या सकारात्मक विचारांचा संकल्प करण्यासाठी होळी सण साजरा केला जातो.

किती सुंदर उद्देश आहे. पण आता होळी म्हणजे रंगाची उधळण केली जाते.वाईट गुणांची होळी करण्याऐवजी विद्रुप चेहेरे करुन त्याचा आनंद घेत बसतो. या डिजिटल युगात, तंत्रज्ञानाच्यायुगात , इंटरनेटच्या युगात जग जवळ आले. पण जवळचे लांब गेले. आपल्याच माणसांना ,आपल्याच रितीरिवाजांना आपण विसरलो. पण आज आपण सर्वांनी ठरवू या. सणांचे बदलते स्वरुप वेळीच होळीत जाळू या. आणि पुन्हा भारतीय परंपरेने सण साजरे करुन. आपली भारतीय संस्कृतीची या सणांच्या निमित्ताने जोपासना करुया.

सणांचे बदलते स्वरूप | Information on Festivals in Marathi

प्रत्येक महिन्यातील सणा़चा मनमुराद आनंद घेऊन माणुसकी व स्नेह या सणांच्या रुपात वृध्दींगत करु या.
विसरा साऱ्याआसवांना,विसरा साऱ्या वेदना
विसरा सारे धर्मपंथ आणि त्यांच्या वालगना
या घडीला बांधवांनो,हीच हृदयी भावना
या जपूया अभिमानाने संस्कृतीच्या पाऊलखुणा..!!

सौ.क्रांती तानाजी पाटील.
मु.पो.दुशेरे.
ता. कराड.जि.सातारा
🙏🙏🙏🙏

सणांचे बदलते स्वरूप | Information on Festivals in Marathi

समाप्त.

साहित्यबंध समूहाची माहिती आणि जाहिरात

दिवसेंदिवस मराठी भाषेवर इतर भाषेतील शब्दांचा अतिरेक होत आहे. कित्येक मराठी शब्द तर नवीन पिढीच्या कानावर देखील पडले नाहीत. यामुळे पुढे जाऊन मराठी भाषा हळू हळू लुप्त होईल अशी आम्हाला भीती आहे. लिहिणे, बोलणे, ऐकणे आणि वाचणे ह्यातूनच मराठी भाषा अनंत काल टिकू शकते.

marathi lekh katha nibandh

त्यामुळे नवनवीन साहित्यिक मराठी भाषेतून निर्माण होणे ही काळाची गरज आहे. तसेच लेखकांचा पुरेसा सन्मान मिळणे आणि त्यांना योग्य प्लॅटफॉर्म उपलब्ध होणे त्याचबरोबर साहित्य चोरी थांबवणे या उद्देशातून आम्ही हा समूह तयार केला आहे.

मराठी भाषेच्या प्रती आमचे जे कर्तव्य आहे ते पार पाडण्याचा हा छोटासा प्रयत्न. तुम्ही देखील मराठी भाषेप्रती आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी हा समूह जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आमची मदत करा.

लक्षात घ्या की ह्या समूहाची सभासद फी ५०₹ प्रती महिना आहे. सभासद फी 9146494879 या Gpay किंवा PhonePe नंबर वर टाकल्यानंतर ग्रुप मध्ये add केले जाईल. एकदाच वार्षिक सभासदत्व घेणाऱ्यांना फी मध्ये १०० ₹ सूट मिळेल.

या मासिक सभासदत्वामध्ये तुम्हाला मिळेल

१) साहित्यक्षेत्रातील प्रगतीसाठी ४ साप्ताहिक स्पर्धा

२) सहभागासाठी आकर्षक डिजिटल प्रमाणपत्रे

३) स्पर्धेतील तुमचे चार लेख सुप्रसिद्ध अशा मराठी टाईम वेबसाईटवर पब्लिश केले जातील. ज्याची लिंक तुम्ही कुठेही शेअर करू शकता.

४) तुमचा फोटो आणि लेखाच्या नावासहीत चार सुंदर वॉलपेपर.

५) लेख त्याच्या विषयाला अनुसरून छान वॉलपेपरसने सजविला जातील.

६) तुमचा लेख गुगल सर्च मध्ये आणण्यासाठी SEO techniques वापरल्या जातील.

तुमच्या एका लेखावर अंदाजे ५००₹ चे काम केले जाईल म्हणजे ५०₹ च्या सभासद फी मध्ये ४ लेखांवर होणारे २०००₹ चे फायदे तुम्हाला मिळणार आहेत

https://chat.whatsapp.com/JDA5qGHXn43IofHbacHWBd

9146494879 या Gpay/ PhonePe नंबरवर एका महिन्याची ५०₹ फी किंवा वर्षाची ५००₹ सभासद फी पाठवा. Payment कमेंट मध्ये स्वतःचे नाव टाका. आणि वरील ग्रुप लिंकला जॉईन व्हा.

आमच्या समूहातील कविता वाचण्यासाठी भेट द्या mazablog.online

सणांचे बदलते स्वरूप | Information on Festivals in Marathi

Hivala Information in Marathi

सणांचे बदलते स्वरूप | Information on Festivals in Marathi

Author

Leave a Reply