साहित्यबंध समूह आयोजित साप्ताहिक स्पर्धेत सौ.मोहिनी संजय डंगर यांनी Information on San in Marathi या कीवर्ड वर आधारित “सणांचे बदलते स्वरुप” हा लेख लिहिला आहे. चला तर वाचूया.
सणांचे बदलते स्वरुप | Information on San in Marathi
साहित्य बंध समूह
साप्ताहिक उपक्रम 4
लेख विषय =सणांचे बदलते स्वरुप
सणांचे बदलते स्वरुप | Information on San in Marathi
लहानपणी चे तेवढे नाहीत पण शालेय जीवनातील दिवस आठवतात. डिसेंबर च्या शेवटच्या आठवड्यात कॅलेंडर हातात आला की सुट्ट्या कधी आहेत ते पाहायचो..अर्थातच सुट्ट्या एकतर सणाला किंवा दिन विशेष असतिल तर..त्यातल्या त्यात श्रावण महिना माझ्या आवडीचा..खूप सण अणि सुट्ट्या मग गणपती अणि दिवाळी….
शाळा संपली तशी ती ओढही कमी झाली…कॉलेज ला सुट्ट्या तशा कमीच अणि असल्या तरी अभ्यासात त्या आल्यासारख्या निघून जायच्या अणि आता मोठे होऊन लग्न झाल्यावर तर जबाबदार्या अणि कर्तव्य पार पाडता पाडता आम्ही संस्कृति जपतोय…
सणांचे बदलते स्वरुप | Information on San in Marathi
पूर्वी आज्जी पंजी होती,आजोबा होते जे तिथीनुसार सण लक्षात ठेवत. प्रत्येक सणाला एक स्वतःचे असे महत्त्व होते.एका विशिष्ट पद्धतीने षोडशोपचार केले जायचे.निसर्गातील पाने, फुले, फळे, प्राणी, पक्षी,पंचतत्व सर्वांना त्या त्या सणांनुसार मह्त्व दिलेले होते.अणि ते जपलेही जायचे एक परंपरा किंवा देवाचा कोप नको व्हायला म्हणून. अंधश्रद्धा नाही म्हणून जमणार त्या भोळ्या भाबड्या लोकांच्या विश्वासाला कारण पूर्वजांनी फार विचार करून सण अणि ते कसे साजरे करायचे हा मेळ घालून दिला आहे.शारीरिक मानसिक गोष्टींचा प्रत्येक सणाशी काही ना काही कनेक्शन आहे म्हणून कदाचित ते थोड्या थोडक्या प्रमाणात आपल्या पिढीपर्यंत पोहोचले…
सणांचे बदलते स्वरुप | Information on San in Marathi
जस जशी प्रगति होत गेली,माणसाने विविध गोष्टीचा शोध लावला,श्रद्धेला अंधश्रद्धा ठरविण्यात यश आले तसे सणांचे मह्त्व कमी झाले..टोपडं घातलेल्या बाळाला हुडी घालावी,संरक्षण सारखेच मिळते असा विचार करणाऱ्या आधुनिक पिढीने सणांचा पुरता बाजार केला.सण म्हणजे एक चान्स झाला मोबाइल मधे वीडियो बनवून अपलोड करण्यासाठी बाकी त्याच मह्त्व काय,साजरा करण्या मागच् कारण काय काहीही घेण देण् नसते. फक्त मौज मजा करण्यासाठी सणांची वाट पाहिली जाते.
सणांचे बदलते स्वरुप | Information on San in Marathi

पूर्वी सण म्हंटले की साफसफाई,शेणाने सारवलेले घर ,अंगण, खरेदी,निसर्गातून मिळणार्या वस्तूंची जमवाजमव असायची.गुण्यागोविंदाने सण साजरे व्हायचे,मोठीच्या मोठी कुटुंबव्यवस्था असायची पण कोणाची रडगाणी नसत.घरातल्या स्त्रिया हसतखेळत माजघरात निरनिराळे जिन्नस बनवत,पुरुष मंडळी अणि लहान मुले वर्षातून एकदाच हा पदार्थ खायला मिळतो म्हणून आवडीने ताव मारत..म्हणजे मोदक हे फक्त गणपतीला, चिवडा,करंजी,शंकरपाळी,लाडू है जिन्नस दिवाळीला आणि पुरणपोळी चा नैवेद्य होळी ला असे ठरलेल असायच. पण हल्ली तस नाही हे सर्व जिन्नस बाराही महिने दुकानात, हॉटेलात किंवा घरीं केंव्हाही बनवले जातात.आणि जे सहज उपलब्ध असत त्याला किम्मत नसते.म्हणून कदाचित तेवढे सणाचे अप्रूप आपल्याला हल्ली वाटत नाही.संयुक्त परिवारा मुळे जो तो चार भिंतीत सण साजरे केले जातात.त्यामूळे एकोप्याने राहणे काय हे आमच्या मुलांना माहीत नाही,अहो त्यांना अंकल आंटी शिवाय दूसरी नातीही समजत नाहीत. असो हा वाटोळा आपणच आधुनिकतेच्या नावाने केला.
सणांचे बदलते स्वरुप | Information on San in Marathi
पूर्वी देवाणघेवाण व्हायची वस्तूंची,जिन्नसांची त्यामुळे चवीत बदल घडवला जाऊ शकत होता.चांगल्या गोष्टीं केल्या जायच्या जसे की अभ्यंगस्नान,गोवरी पूजन,पिठोरी,ऋषिपंचमी ला नदीत आंघोळ,वटपौर्णिमा ,केसांना खोबरं लावणे,बैल पोळा,वसूबरस,गौरी पूजन,दसर्याला आंब्यांची अन झेंडूची तोरणे लावणे वैगरे वैगरे….त्यामुळे सामाजिक बांधिलकी सोबत मानसिक,शारीरिक आरोग्य जपले जायचे शिवाय निसर्गाला धन्यवाद म्हंटल जायचे.हल्ली सर्व गोष्टी रेडी मेड मिळतात. तोरण प्लास्टिक चे,दिवे लाइटि चे,प्राण्या ऐवजी त्यांच्या मूर्ति, शिवाय निसर्गाची हानि करतो ती वेगळी..
सणांचे बदलते स्वरुप | Information on San in Marathi
नवरात्रात,गणपतीत पूर्वी शांत पणे गरबा खेळला जायचा, पारंपरिक गाणी गायली जायची जेणेकरून शरीराचा व्यायाम होईल अणि मनाला आनंद मिळेल. आताच्या सणांचा नुसता बाजार,अंगप्रदर्शन करत केला जाणारा गरबा,गणपति मध्ये विसर्जन समयी वाजणारे dj सर्व काही अधोगती चीच लक्षणे.
सणांचे बदलते स्वरुप | Information on San in Marathi
मुळात प्रश्न आहे तो संस्कृति जपण्याचा,आम्हाला वाटत आम्ही 5 दिवसाचा गणपती 10 दिवस ठेवला,नवरात्रीत मोठ मोठे मंडळ स्थापन करून गरबा खेळलो,होळीला पारंपरिक महत्व न देता फ़क्त रंगांची होळी एवढच लक्षात ठेवल,वटपौर्णिमेला वडाची फांदी कुंडीत लावून 7 फेर्या मारल्या,गौरी ला पार्लर वाले आणून नटवली,मकरसंक्रांतिला काळ्या साड्या लावून नटून फोटो काढले,दिवाळीला सगळ रेडीमेड आणून लक्ष्मीला नैवेद्य दाखवला,लाखो रुपयाची खरेदी केली, भाऊबीज,रक्षाबंधन ला कॅडबरी celebration दिला एकमेकाला म्हणजे सण साजरे केले…त्यामागे ना कुठले शास्त्र जपले ना कुठले षोडशोपचार. करायच म्हणून करत आहोत आपण सण साजरे…आपणच आपली संस्कृती जपली नाही तर ती डायनॉसोर प्रमाणे संपायला उशीर लागणार नाही..अणि फक्त यू ट्यूब च्या video’s मधे आपल्या पुढचा पिढ्या सण कसे साजरे केले जायचे याचा अभ्यास करतील…
सौ.मोहिनी संजय डंगर
रायगड
सणांचे बदलते स्वरुप | Information on San in Marathi
समाप्त.
साहित्यबंध समूहाची माहिती आणि जाहिरात
दिवसेंदिवस मराठी भाषेवर इतर भाषेतील शब्दांचा अतिरेक होत आहे. कित्येक मराठी शब्द तर नवीन पिढीच्या कानावर देखील पडले नाहीत. यामुळे पुढे जाऊन मराठी भाषा हळू हळू लुप्त होईल अशी आम्हाला भीती आहे. लिहिणे, बोलणे, ऐकणे आणि वाचणे ह्यातूनच मराठी भाषा अनंत काल टिकू शकते.

त्यामुळे नवनवीन साहित्यिक मराठी भाषेतून निर्माण होणे ही काळाची गरज आहे. तसेच लेखकांचा पुरेसा सन्मान मिळणे आणि त्यांना योग्य प्लॅटफॉर्म उपलब्ध होणे त्याचबरोबर साहित्य चोरी थांबवणे या उद्देशातून आम्ही हा समूह तयार केला आहे.
मराठी भाषेच्या प्रती आमचे जे कर्तव्य आहे ते पार पाडण्याचा हा छोटासा प्रयत्न. तुम्ही देखील मराठी भाषेप्रती आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी हा समूह जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आमची मदत करा.
लक्षात घ्या की ह्या समूहाची सभासद फी ५०₹ प्रती महिना आहे. सभासद फी 9146494879 या Gpay किंवा PhonePe नंबर वर टाकल्यानंतर ग्रुप मध्ये add केले जाईल. एकदाच वार्षिक सभासदत्व घेणाऱ्यांना फी मध्ये १०० ₹ सूट मिळेल.
या मासिक सभासदत्वामध्ये तुम्हाला मिळेल
१) साहित्यक्षेत्रातील प्रगतीसाठी ४ साप्ताहिक स्पर्धा
२) सहभागासाठी आकर्षक डिजिटल प्रमाणपत्रे
३) स्पर्धेतील तुमचे चार लेख सुप्रसिद्ध अशा मराठी टाईम वेबसाईटवर पब्लिश केले जातील. ज्याची लिंक तुम्ही कुठेही शेअर करू शकता.
४) तुमचा फोटो आणि लेखाच्या नावासहीत चार सुंदर वॉलपेपर.
५) लेख त्याच्या विषयाला अनुसरून छान वॉलपेपरसने सजविला जातील.
६) तुमचा लेख गुगल सर्च मध्ये आणण्यासाठी SEO techniques वापरल्या जातील.
तुमच्या एका लेखावर अंदाजे ५००₹ चे काम केले जाईल म्हणजे ५०₹ च्या सभासद फी मध्ये ४ लेखांवर होणारे २०००₹ चे फायदे तुम्हाला मिळणार आहेत
https://chat.whatsapp.com/JDA5qGHXn43IofHbacHWBd
9146494879 या Gpay/ PhonePe नंबरवर एका महिन्याची ५०₹ फी किंवा वर्षाची ५००₹ सभासद फी पाठवा. Payment कमेंट मध्ये स्वतःचे नाव टाका. आणि वरील ग्रुप लिंकला जॉईन व्हा.
आमच्या समूहातील कविता वाचण्यासाठी भेट द्या mazablog.online
सणांचे बदलते स्वरुप | Information on San in Marathi
सणांचे बदलते स्वरुप | Information on San in Marathi