राजमाता जिजाऊसाहेब यांची माहिती | Jijamata Information In Marathi 2023

नमस्कार वाचक मित्रांनो, आपण आजच्या Jijamata Information In Marathi या Article मध्ये जिजामाता यांचा जीवन परिचय, त्यांचा इतिहास, त्यांचे कार्य तसेच त्यांच्यावर आधारित पुस्तके आणि सोबतच त्यांच्यावर आधारित चित्रपट अशी संपुर्ण माहिती पाहणार आहोत. तरी तुम्हाला आमची विनंती आहे की, प्रस्तुत Article तुम्ही अगदी सुरवातीपासून ते शेवटपर्यंत नक्की वाचा.

जिजाऊ माता यांनी आपल्या स्वराज्याला लाभलेले कर्तृत्ववान राजे शिवाजी महाराज यांना जन्म दिलं आणि त्यांना घडवलं. यासोबतच त्यांनी आपल्या स्वराज्याचे दुसरे छत्रपती म्हणजेच छत्रपती संभाजी महाराज यांना सुद्धा घडवलं. त्यांना राजमाता, राष्ट्रमाता, जिजाऊ तसेच जिजाबाई अशा अनेक नावांनी ओळखले जाते.

Jijamata Information In Marathi | जिजाऊ माता माहिती मराठी

राजमाता जिजाऊसाहेब यांची माहिती

जिजामाता यांचा पूर्ण नाव “जिजाबाई शहाजीराजे भोसले” असे आहे. त्यांचा जन्म 12 जानेवारी इ. स. 1598 ला बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा जवळील देऊळगाव या ठिकाणी झाला. त्यांच्या आईचे नाव “म्हाळसाबाई जाधव” तर त्यांच्या वडिलांचे नाव “लखुजी जाधव” हे आहे. लखुजी राव जाधव हे यादव साम्राज्याचे महाराज होते. जिजामाता यांचा लग्न त्यांच्या लहान वयातच मालोजीराव भोसले यांचा मुलगा शहाजीराजे भोसले यांच्याशी करण्यात आला. नंतर त्यांना एक मुलगा झाला त्यांचं नाव त्यांच्या मृत पावलेल्या दिराच्या नावावर म्हणजे “संभाजी” ठेवले. व नंतर त्यांना 4 मुळे झाली मात्र ती दगावली गेली. 7 वर्षानंतर त्यांना आणखी एक मुलगा झाला त्यांचं नाव “शिवाजी” ठेवण्यात आले.

त्यावेळी निजामशाही आणि आदिलशाही यांची जुलमी सत्ता प्रस्थापित होती आणि शहाजी राजे भोसले हे आदिलशाही मध्ये “जहांगीर” होते. आणि त्यांचं स्वप्न होतं की, या जुलमी राजवटी विरुद्ध बंड पुकारून स्वराज्य स्थापन करावे. यासाठी शहाजीराज्यांनी संभाजी ला आपल्याकडे ठेवून “शिवाजींना” जिजामाता यांच्याजवळ त्यांना एक कर्तृत्ववान राजे घडविण्यासाठी ठेवले होते.

जिजामाता यांनी शिवाजींना पुणे मध्ये उत्तमरीत्या घडवून त्यांना एक कर्तुत्ववान राजे घडविले. आणि त्यांच्याच पुण्याई मुळे आपल्याला शिवाजी महाराज सारखे कर्तुत्ववान राजे बघायला मिळाले.

जिजामाता यांचे कार्य | Jijabai Information in Marathi

निजामशाही दरबारातील सर्व सरदार, जहागिरदार, मनसबदार आणि वतनदार मंडळी आपले काम करून घरी जाण्यास निघाले असता. महाद्वार येथे खूप गर्दी झाली होती आणि खंडागळ नावाच्या सरदाराचा एक हत्ती हा अनियंत्रित झाला होता आणि लोकांना पायी तुळवत होता. त्यावेळी लखुजीराव जाधव यांच्या मुलाने हत्तीवर बाण, तलवारी यांचा वार करत होता. त्यामुळे विठोजी राव भोसले यांचे दोन्ही पुत्र खेलोजी आणि संभाजी (शहाजीराजे यांचे चुलत भाऊ) यांनी दत्ताजिंना ठार मारले. हे कळताच लखुजीराव जाधव यांनी भोसले यांच्यावर स्वारी केली. आणि संभाजीला ठार मारले. व त्यांच्यामध्ये वैर निर्माण झाले. अशा प्रसंगात देखील जिजाऊ माता यांनी पती शी एकनिष्ठ राहून माहेराशी संबंध तोडले.

नात्यांना आणि भावनांना कर्तव्याच्या मधात आणून खंबीरपणे उभे राहिले. हे जिजाऊ माता यांचे गुण शिवाजी राज्यांमध्ये पूर्णपणे उतरले.

जिजाऊ माता माहिती मराठी


वाचा छत्रपति शिवाजी महाराज यांची पूर्ण माहिती :- Shivaji Maharaj Information In Marathi

वाचा खाशाबा जाधव यांची पूर्ण माहिती :- Khashaba Jadhav Information In Marathi


Jijamata Information In Marathi 2023

जिजामाता या सर्वगुण संपन्न होत्या, त्या शुर होत्या आणि यासोबतच त्यांच्याकडे दूरदृष्टी होती. शिवाय त्यांना कुशलतेने घोडेस्वार करता येत होते आणि सोबतच त्यांना कुशलतेने तलवार सुद्धा चालवता येत होते. हे सर्व गुण त्यांनी शिवाजी महाराजांना घडवतांनी त्यांना आत्मसात करून दिले होते.

पुणे येथील शहाजीराजांची जहांगीर जिजामाता यांना सोपवली गेली ती त्यांनी उत्तमरीत्या सांभाळून तिथला शाश्वत विकास केला. त्यांनी कसबा पेठ गणपती मंदिराची स्थापना केली तसेच केवरेश्वर मंदिर आणि तांबडी जोगेश्वरी मंदिर हे जीर्ण झाली होते त्यांना परत जीर्णोद्धार केला.

जिजाऊ माता यांच्याकडून प्रेरणा घेऊनच शिवाजी राज्यांनी तानाजी मालुसरे यांच्यासारख्या 600 तरुण सवंगड्यांना सोबत घेऊन रायरेश्वराच्या मंदिरात जाऊन स्वराज्य स्थापन करायची शप्पथ घेतली आणि जिजाऊ माता यांचा मार्गदर्शन घेऊन मोठया युक्तीने आणि अत्यंत मुत्सद्देगिरीने कित्येक किल्ले त्यांनी लढाई न करता जिंकले. त्यातला सर्वात आधी त्यांनी पहिला तोरणा किल्ला जिंकून आपल्या ताब्यात घेतला आणि असे कित्येक किल्ले त्यांनी जिजाऊ माता यांच्या मार्गदर्शनाखाली जिंकून घेतले.

जिजाऊ माता माहिती मराठी

अफजलखान ने जेव्हा त्यांचा मोठा मुलगा संभाजी यांना कपटाने मारलं होतं त्याचा प्रतिशोध घेण्यासाठी जिजाऊ माता यांनी शिवाजी महाराजांना प्रोत्साहित केलं होतं. ते त्यांनी यशस्वीरीत्या पार पाडलं.

शिवरायांच्या पहिल्या पत्नी सईबाई यांचे भाऊ बजाजी निंबाळकर यांचा बळजबरीने इतर धर्मामध्ये जाण्यास लावलं होतं. त्यांची परत हिंदू धर्मात परत यायची तीव्र इच्छा होती. शिवाजीराजांचा ही त्यांना पुर्ण पाठिंबा होता. या सर्व धर्म राजकारणात राजांच्या पाठीशी जिजामाता ह्या खंबीरपणे उभ्या होत्या. राज्यांची कन्या सखुबाई यांना बबाजी निंबाळकर यांना देऊन राज सोयरिक साधली आणि त्यांना पूर्णपणे हिंदू धर्मात घेतले. या सर्व प्रकरण मधून जिजामाता यांचा द्रष्टेपणा व सहिष्णूता दिसून येते.

शिवाजी राजे यांनी केलेल्या सर्व लढाया आणि स्वाऱ्या यांचा जिजामाता ह्या पूर्ण तपशील ठेवत होते. तसेच त्यांचे खलबते, सल्ला मसलती यांच्यात देखील ते स्वतः सहभागी व्हायचे. शिवाजी राजे यांच्या गैरहजेरीत जिजामाता या राज्याच्या कारभार बघत होते. शिवाजी राजे आग्र्याच्या कैदेत असतांना “रांगणा किल्ला” जिंकून त्यांनी स्वराज्याची सीमा वाढवली. आणि त्यांच्या उतारवयात देखील अगदी चांगल्या प्रकारे स्वराज्याचा कारभार सांभाळला.

जिजामाता यांचे निधन | Jijau Information in Marathi

गोर गरीबांचे कणव जाणणारा राजा व्हावा अशी जिजामाता यांची इच्छा होती त्यामुळे त्यांनी शेवटी शिवाजी राज्यांना म्हटलं की, शिवबा तुझे वडील हे स्वपराक्रमावर वजीर झाले आणि राज्यासारखे जगले परंतु ते राजे होऊ शकले नाही. तू आता राजा हो. मला तो सुखसोहळा आपल्या डोळ्यांनी बघायचा आहे.” असे सांगितले त्यामुळे शिवाजी महाराज यांचा 6 जून 1674 साली राज्यभिषेक झाला आणि नंतर अवघ्या 12 दिवसानंतर म्हणजेच 17 जून 1674 रोजी जिजामाता यांचा मृत्यू झाला.

जिजाऊ माता माहिती मराठी

Books On Jijamata । जिजामाता यांच्यावरील पुस्तके

जिजाऊ माहिती
  1. जिजाऊंची निष्ठा (काव्यसंग्रह, कवयित्री – मेधा टिळेकर
    जेधे शकावली
  2. शिवभारत
  3. जिजाऊ (डॉ प्रतिमा इंगोले )
  4. जिजाई : मंदा खापरे ट
  5. गाऊ जिजाऊस आम्ही : इंद्रजीत भालेराव
  6. अग्निरेखा

जिजाऊ माता माहिती मराठी

Movies On Jijamata । Jijamata यांच्यावरील चित्रपट

  1. राजमाता जिजाऊ
    दिग्दर्शक – यशवंत भालकर
  2. स्वराज्यजननी जिजामाता
    दूरचित्रवाणी मालिका, निर्माते : अमोल कोल्हे

Author :- आशु छाया प्रमोद (रावण)

ashu

3 thoughts on “राजमाता जिजाऊसाहेब यांची माहिती | Jijamata Information In Marathi 2023”

Leave a Reply

%d bloggers like this: