भारताची पहिली अंतराळ परी | Kalpana Chawla Information In Marathi 2023

आपण आजच्या Kalpana Chawla Information In Marathi या article मध्ये प्रत्येक भारतीयाच्या मनातील अंतराळ परी कल्पना चावला यांच्या बद्दल संपूर्ण माहिती मराठी भाषेत पाहणार आहोत.

Kalpana Chawla Information In Marathi

भारताची पहिली अंतराळ परी | Kalpana Chawla Information In Marathi 2023 कल्पना चावला

Kalpana Chawla यांचं पूर्ण नाव “कल्पना बनारसीलाल चावला” असे आहे. त्यांच्या जन्म 17 मार्च 1962 रोजी हरियाणातील कर्नाल येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव “बनारसीलाल चावला” आहे आणि त्यांच्या आईचे नाव “संयोजीता चावला” आहे. त्यांना एक भाऊ व एक बहिण आहे.

कल्पना यांचं बालपण हरियाणातील कर्नाल या ठिकाणी च गेले. त्यांना मुलांच्या धांगडधिंगण्यात आवड होती. नटने थटने, घरकाम करणे यापेक्षा त्यांना सायकल ने मित्रांसोबत ट्रीप ला जाणे जास्त आवडत होते. त्यांना बाहेरच्या जगात जाणे फार आवडायचे. दंगा मस्ती करणे आवडायचे. ते त्यांचा मोठा भाऊ संजय यांच्या सोबत खूप मस्ती करायचे. लहानपणी संजय म्हणजेच त्यांचा मोठा भाऊ हा त्यांच्या आदर्श होता. कल्पना या घरातील सर्वात लहान आणि सर्वांच्या लाडक्या होत्या. त्यांना लहानपणी लाडाने “मोन्टो” असे म्हणत होते.

Kalpana Chawla यांचं प्राथमिक शिक्षण हे हरियाणातील कर्नाल या गावातीलच टागोर बाल निकेतन विद्यालय मध्ये पूर्ण झाले. कल्पना चावला या अभ्यासात खूप हुशार होत्या आणि नेहमी पहिल्या पाच क्रमांकावर येत होत्या. त्यामुळे शिक्षकांच्या देखील खूप लाडक्या होत्या. कल्पना यांचा स्वभाव फार साहसी होता ते कराटे, भरतनाट्यम अशा कला मध्ये सुद्धा पारंगत झाले होते. त्यांच्या मोठा भाऊ संजय हा फ्लाईंग क्लब मध्ये जात होता त्यामुळे कल्पना ला देखील तिथे जायची इच्छा झाली. त्यामुळे त्यांच्या वडिलांनी तेथील अधिकाऱ्यांना नोंदणी अर्ज केला परंतु कल्पना ही एक स्त्री आहे त्यामुळे ती वैमानिक होण्या योग्य नाही असे त्या अधिकाऱ्यांनी सांगून त्यांचा नोंदणी अर्ज फेटाळून लावला.

तेव्हाच त्यांच्या वडिलांनी कल्पना ला या वेडपासून परावृत्त होण्यास भाग पाडले. पुढे कल्पना ने सन 1982 साली पंजाब विद्यापीठातून एरोनॉटिकल अभियांत्रिकी ची पदवी घेतली. आणि सन 1984 साली त्यांनी अर्लिंगटन टेक्सास विद्यापीठातून एरोनॉटिकल उच्च अभियांत्रिकी शिक्षण घेऊन पुढे त्यांना सन 1988 साली कॉलोरॅडो विद्यापीठातून एरोस्पेस अभियांत्रिकी विभागातून डॉक्टरेट मिळविली.

शिक्षण शिकत असतांनाच्या काळातच Kalpana Chawla यांची ओळख जीन पियरे टॅरिसन (जेपी) या युवकाशी झाली. ते विमानाचे प्रशिक्षण देण्याचा व्यवसाय करीत होते. त्यांच्यामुळेच Kalpana Chawla यांना विमान शिकता आले आणि यासोबतच त्यांना स्कुबा डायव्हिंग सारखा खेळ सुद्धा जेपी यांच्याकडूनच शिकता आला. लहानपणापासून विमान शिकण्याचे त्यांचे स्वप्न जेपी मुळे अमेरिकेत पूर्ण झाले. जेपी हे मुळचे फ्रेंच देशातील होते. जेपी आणि Kalpana Chawla यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यामुळे दोघांनी सन 1884 साली विवाह केला. लग्नानंतर च त्यांना विमान नीट उडवता येऊ लागले आणि यासोबतच त्यांची संगीतात सुद्धा आवड वाढू लागली.

हरिणायाची मुलगी ते नासाची अंतराळवीर कल्पना चावला

प्रत्येक भारतीयाच्या मनातील अंतराळ परी Kalpana Chawla यांनी सन 1988 साली कॉलोरॅडो विद्यापीठातून एरोस्पेस अभियांत्रिकी विभागातून PHD केल्यानंतर अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था The National Aeronautics and Space Administration (NASA) इथे फ्लुड डायनॅमिक्स मध्ये संशोधनाला सुरवात केली. त्यांनतर त्यांची ओवरसेट मेथड्स या कंपनी मध्ये उपप्रमुख म्हणून नेमणूक करण्यात आली. तिथे त्यांनी एरोडायनॅमिक्स मध्ये महत्वपूर्ण संशोधन केले. त्यांचे reasearch paper नेहमी चर्चेत राहिले.

नंतर NASA या संस्थेने अंतराळवीरांची संभाव्य यादी काढली त्यामध्ये Kalpana Chawla यांचा देखील समावेश केला होता. त्यांचं मार्च 1995 रोजी NASA ने अंतराळ क्षेत्राचा विशेष अभ्यास करण्यासाठी NASA च्या जॉन्सन एरोनॉटिक्स सेंटर मध्ये प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आले. त्या दरम्यान Kalpana Chawla यांना अंतराळवीरांच्या 15 व्या फळीत ठेवण्यात आले आणि 1 वर्षानंतर त्यांचं प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर अंतराळयानाच्या नियंत्रण कक्षाच्या देखभालीसाठी त्यांना ठेवण्यात आले.

शेवटी तो दिवस उजाडला ज्या दिवशी हरियाणातील एका छोट्याशा गावातील मुलगी Kalpana Chawla यांनी अंतराळात झेप घेतली. ATS-87 च्या मिशनची संपूर्ण जबाबदारी Kalpana Chawla यांना देण्यात आली. याची घोषणा नोव्हेंबर 1996 मध्ये NASA ने केली होती. आणि 19 नोव्हेंबर 1997 रोजी पहिल्यांदा अंतराळात जाऊन भारताची पहिली महिला अंतराळवीर ठरली. त्यांनी तिथे 376 तास आणि 34 मिनिटं अंतराळात घालवलं. त्यात त्यांनी पृथ्वी च्या 252 फेऱ्या मारून 1 कोटी 46 हजार km हून अधिक प्रवास केला.


ह्या पाकिस्तानी व्यक्तीचा कुणीही द्वेष करू शकणार नाही

उभ्या बाईकचा आरसा वाकडा करून तुम्ही देखील तोंड पहात असता ? संजयसोबत काय झाले वाचा

अपघातापासून वाचवणारी परी | Best Story on Road Safety in Marathi 2023


Kalpana Chawla यांचा शेवटचा प्रवास (मृत्यू)

जानेवारी 2003 च्या मिशन ची घोषणा करून NASA ने 7 अनुभवी सदस्यांची नेमणूक केली आणि महत्वाची जबाबदारी Kalpana Chawla यांना देऊन अंतराळात केले जाणारे सर्व प्रयोग त्यांच्या च नियंत्रणाखाली करण्यात आले. नंतर 1 फेब्रुवारी 2003 रोजी कोलंबिया अंतराळ यानाने पृथ्वी कडे येण्यासाठी अमेरिका जवळच्या पॅसिफिक समुद्राकडे झेप घेण्यासाठी तयारी केली. सर्व अंतराळवीरांनी स्पेस सुट घातला तोपर्यंत सर्व सुरळीत होते. तो यान 22 मिनिटात पृथ्वीवर उतरणार एवढ्यात अंतराळ यान चा आणि नियंत्रण कक्षाचा संपर्क तुटला आणि काहीच वेळात कोलंबिया यान चा अपघात झाला. त्यातच 1 फेब्रुवारी 2003 रोजी कल्पना चावला यांचा निधन झाला.

कल्पना चावला विज्ञान केंद्र

कल्पना चावला यांच्या मृत्यूनंतर व्यथित झालेल्या कराड मधील टिळक हायस्कूल चे विज्ञानाचे शिक्षक संजय पुजारी यांनी कल्पना चावला यांचे वडील बनारसीलाल यांची परवानगी घेऊन लहान मुलांना पडणाऱ्या प्रश्नांचे उत्तर प्रत्यक्ष कृतीतून शोधता आले पाहिजेत, त्यांना विज्ञानाच्या निकषाच्या दृष्टिकोनातून विचार करता आला पाहिजे, त्यांना प्रयोग करता आला पाहिजे हे उद्दिष्ट समोर ठेवून 1 जुलै 2006 रोजी कल्पना चावला विज्ञान केंद्राची स्थापना केली. कल्पना चावला यांचे वडील बनारसीलाल यांनी नंतर कल्पना चावला विज्ञान केंद्रात भेट दिली आणि त्यांचे काम पाहून मोठी देणगी सुद्धा दिली. यासोबतच भारतात या नावाचे हे एकमेव केंद्र असेल अशी ग्वाही सुद्धा दिली.

कल्पना चावला विज्ञान केंद्राचे एक स्वतंत्र ग्रंथालय सुद्धा होते त्यासाठी कल्पना चावला यांची ताई सुनीता ताई यांनी 50हजाराची पुस्तकं भेट दिली. ग्रंथालयात निसर्ग, पर्यावरण, विज्ञानाच्या विविध मूलभूत शाखा यांविषयीची अनेक पुस्तके, विश्वकोश, चरित्रे, विज्ञानाशी संबंधित सीडी आणि डीव्हीडी असा मोठा संग्रह मुलांना संदर्भासाठी उपलब्ध करून दिला जातो.

कल्पना चावला यांच्यावरील ग्रंथ

 1. भारतकन्या कल्पना चावला
  मूळ लेखक :- पंकज किशोर
  मराठी अनुवाद :- डॉ. कमलेश मेटकर
 2. महान स्त्रिया
  लेखिका :- अनुराधा पोतदार
  (परी प्रकाशन कोल्हापूर)

FAQ’s

 1. भारतातील पहिली महिला अंतराळवीर कोण आहे?
  कल्पना ही भारतीय वंशातील एकदा नव्हे तर दोनदा अंतराळात जाणारी पहिली अंतराळवीर आहे.
 2. कल्पना चावलाला अंतराळवीर बनण्याची प्रेरणा कशामुळे मिळाली?
  कल्पना यांना अंतराळवीर होण्यासाठी प्रेरित करणारे जेआरडी टाटा हे आहेत.
 3. कल्पना चावला यांनी परदेशातून काय आणि कोणासाठी पाठवला होता संदेश?
  कल्पना चावला यांनी स्पेस शटल कोलंबिया येथून चंदिगढ मधील तिच्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना एक संदेश पाठविला होता तो असा की, “स्वप्नांपासून यशापर्यंतचा मार्ग अस्तित्वात आहे. तुम्हाला ते शोधण्याची दृष्टी मिळो, त्यावर जाण्याची हिंमत असू द्या…..”
 4. कल्पना चावलाचा जन्म कुठे झाला तिला भारतीय का म्हणतात?
  कारण कल्पना चावला यांचा जन्म भारतातीलच हरियाणातील कर्नाल येथे झाला म्हणून ते एक भारतीय आहे परंतु त्यांनी एका अमेरिकन व्यक्तीशी विवाह केला त्यामुळे तिला अमेरिकेची नैसर्गिक नागरिकता प्राप्त झाली त्यामुळे त्यांना भारतीय-अमेरिकन असे म्हणतात.

Author :- मिस. प्रतिक्षा गजानन मांडवकर

Pratiksha

9 thoughts on “भारताची पहिली अंतराळ परी | Kalpana Chawla Information In Marathi 2023”

Leave a Reply

%d bloggers like this: