कर्ण मरण्यापूर्वी कृष्णास 10 प्रश्न| Karna Story in Marathi

महाभारतातील एक प्रसिद्ध पात्र म्हणजे महारथी दानवीर कर्ण. Karna Story in Marathi ऐकताना असे कळते कि सर्वात जास्त पिडा ह्या पात्राने सहन केल्या.

आयुष्याच्या प्रत्येक चरणावर अपमान, छळ आणि अपयशाची चव यांनी कर्णाची पाठ सोडलीच नाही. पण असे का झाले ? कर्णाला धर्म अधर्म कळत नव्हते का? नाही तो वेळोवेळी दुर्योधनाला धर्माधर्माची जाणीव करून देताना दिसतो. मग त्याचे परिश्रम कमी पडत होते का ? नाही त्याच्या परिश्रमांची आणि तपाची देखील यादी आपल्याला सहज मिळू शकेल. त्याचे पुण्या कमी होते ? असे म्हणत असाल तर तसेही नाही. लहानपणी पासून मानवतेचे महत्व जाणणारा तो मारताना देखील दान करून गेला म्हणून दानवीर कर्ण या नावाने प्रसिद्धच झाला हे आपल्याला माहिती आहे. मग त्याला हे सर्व का सहन करावे लागले ?

मारताना देखील त्याला छळ करून मारावे लागले. पण का ? ह्या सर्व प्रश्नाचे मरण्याआधी कर्णाला सुद्धा हवे होते. म्हणूनच त्याने भगवान श्रीकृष्णाला विचारलेले प्रश्न आपण खाली बघणार आहोत. आपल्या मानवी बुद्धीच्या तर्क वितर्कातून निघालेले उत्तर कदाचित चुकीचे असू शकते. त्यामुळे नको ते गैरसमज पसरून महाभारतातील थोर योध्यांचा अपमान झाल्या सारखेच होईल. त्यापेक्षा आपण प्रत्यक्ष कृष्ण आणि कर्ण यांच्यातील संवाद काय झाला आणि त्यात कर्णाला समाधान मिळाले का ते पाहूया.

who is karna in marathi | Karna Story in Marathi

Who is Karna in Marathi | Karna Story in Marathi

कर्णाला जरी समाधान मिळाले नसले तरी आपल्याला मिळाले आहे का हे बघणेही गरजेचे आहे. कारण जगात सर्वांना समाधान मिळेल अशी स्थिती कधीच येऊ शकत नाही हे भगवंताला देखील माहित आहे. जेव्हा एखाद्याची गोष्ट आपण वाचत असतो तेव्हआ आपण स्वतःला त्यात शोधत असतो. आपल्या आयुष्याच्या घटना उगाच त्या पत्रासोबत पडताळून बघत असतो. त्यामुळेच आपले देखील समाधान होणे गरजेचे आहे. तेव्हाच या योद्ध्यांना खरी श्रद्धांजली मिळेल असे मला वाटते. चला तर पाहूया महारथी दानवीर सूर्यपुत्र कर्ण आणि पूर्णावतारी जग्तुधारी भगवान श्रीकृष्ण यांच्यातील अंतिम संवाद.

या विषयावरील सर्वोत्कृष्ट पुस्तक तुम्ही विकत घेऊ शकता. त्यासाठी खाली दिलेल्या चित्रावर क्लिक करा. हि Amazon च्या वेबसाईट ची Affiliate Link आहे.

Karna Story in Marathi

महाभारताची एक स्थानिक आवृत्ती आहे. त्या नुसार कर्ण भगवान श्री कृष्णाला विचारतो – “माझी आई मला माझ्या जन्माच्या वेळी सोडून गेली. हा माझा दोष आहे का ? मला हे जग अवैध मूळ म्हणून हिणवत राहिले. असे का ?

मी क्षत्रिय आहे तरी परिस्थितीमुळे मला क्षत्रिय समजले गेले नाही. त्यामुळे मी योग्य शिक्षा घेण्यास पत्र ठरलो नाही. मला द्रोणाचार्यांकडे शिक्षण मिळाले नाही.

मृत्युंजय कर्णाने मरण्याआधी श्रीकृष्णाला काय विचारले ? | Karna Story in Marathi

भगवान परशुराम यांनी मला शिकवले पण जेव्हा त्यांना कळले कि मी सूतपुत्र आहे तेव्हा त्यांनी सुद्धा मला सर्व विद्या विसरण्याचा शाप देताना मागेपुढे पहिले नाही . मी कुंती पुत्र असल्याचा काय फायदा झाला?

शिकार समजून माझ्याकडून गायीला चुकून बाण मारला गेला आणि तिच्या मालकाने ते समजून न घेता माझी चूक म्हणून मला आणखी एक शाप दिला.

मृत्युंजय कर्णाने मरण्याआधी श्रीकृष्णाला काय विचारले ? | Karna Story in Marathi

द्रौपदीच्या स्वयंवरात ह्याच सूतपुत्र या शब्दाने माझी बदनामी करण्यात आली.

कुंतीने देखील आयुष्याच्या शेवटी मला ती माझी आई असल्याचे सत्य सांगितले. पण का ? कारण तिच्या इतर मुलांना जीवनदान हवे होते म्हणूनच.

मृत्युंजय कर्णाने मरण्याआधी श्रीकृष्णाला काय विचारले ? | Karna Story in Marathi

माझ्या दानवीर पणाचा लोक नेहमीच फायदा घेत आले. इंद्राने सुद्धा आपल्या पुत्राचा वध होऊ नये म्हणून माझ्या कडे बहुरूपी बनून येण्याचे आणि कवच कुंडल घेऊन जाण्याचा प्रपंच रचला.

इतके सर्व होऊन शेवटी आज असे वाटत आहे कि माझा मोठा बंधू यम धर्माने सुद्धा मला क्षत्रिय म्हणून मारण्याचे सुःख न देण्याचे ठरवले आहे. आणि माझा पिता सूर्य आकाशातून मला नि शस्त्र असताना मरणाच्या दारात पाहत आहे. मी जीवनात अर्जुनाशी फक्त एक निष्कपटी द्वंद पण खेळू शकत नाही ? असा माझा काय अपराध झाला श्रीकृष्णा ? मला जे मिळाले ते सर्व दुर्योधनाच्या मैत्रीतून. मग त्याची बाजू चुक कशी ? माझे काय चुकले?

मृत्युंजय कर्णाने मरण्याआधी श्रीकृष्णाला काय विचारले ? | Karna Story in Marathi

या सर्व अवघड प्रश्नांवर भगवान श्री कृष्ण उत्तर देतात,

“हे दानवीर कर्ण, तुझ्या प्रमाणेच मी देखील अनेक अवघड परिस्थिती माझ्या जन्मात झेलल्या. माझा जन्म आई वडील तुरुंगात असताना झाला. जन्मापूर्वीच मृत्यू माझ्यावर घात लावून बसला होता.

जन्मदात्या आई-वडिलांपासून जन्मदेणाऱ्या आई वडिलांपासून मी विभक्त झालो हे तुला माहित नाही का ?

लहानपणा पासून तू तरी तलवारी, हत्ती, रथ, घोडे, भाले, धनुष्य, बाण यांचा कानावर आवाज ऐकत मोठा झालेला आहेस.

मला फक्त गोकुळात गाई, गोठा, शेण, यांच्या शिवाय काय मिळाले ? मला तरी कुठे होते सैन्य, आणि कुठले शिक्षण ?

मृत्युंजय कर्णाने मरण्याआधी श्रीकृष्णाला काय विचारले ? | Karna Story in Marathi

या जन्मानंतर लोक असेच म्हणतील कि त्यांच्या सर्व समस्यां माझ्यामुळे आहे.

तुझ्या शौर्या बद्दल सर्व शिक्षक कौतुक करत होते तेव्हा मला शिक्षणही मिळाले नाही. मी १६ व्या वर्षी सांदीपनी ऋषी यांच्या गुरुकुलात गेलो. तु तुझ्या पसंतीने मुलीशी लग्न केले. मला जी आवडली ती मला नाही मिळाली. तिला मला चोरून आणावी लागली त्यामुळे तिचे घर तुटले. आणि मी राक्षसांपासून वाचवले त्यांना समाजात स्थान नव्हते तर त्यांच्याशी मला लग्न करावे लागले.

जरासंध पासून बलवान असताना देखील माझ्या संपूर्ण राज्याला यमुनेच्या किनार्‍यावरून दूर मला समुद्र किनार्‍याजवळ हलवावे लागले, त्यासाठी मला भित्रा म्हटले गेले.

मृत्युंजय कर्णाने मरण्याआधी श्रीकृष्णाला काय विचारले ? | Karna Story in Marathi

जर दुर्योधनाने युद्ध जिंकले तर तुला खूप श्रेय मिळेल. पण धर्मराज युद्ध जिंकला तर मला काय मिळणार?

फक्त युद्धाचा दोष ? सर्व समस्या तयार करणारा म्हणून लांच्छन ?…

एक गोष्ट लक्षात ठेव, मित्रा, प्रत्येकाच्या आयुष्यात आव्हाने हि येतच असतात. जीवन कोणासाठीही सोपे नाही आणि ते न्याय करून ठेवले आहे असेही नाही. पण आपला योग्य धर्म काय आहे हे तुझ्या विवेकबुद्धीला माहीत आहे. कितीही अन्याय झाला तरी, बदनामी झाली तरी , कितीही पडलो तरी , त्या वेळी तु काय प्रतिक्रिया करतो हे महत्त्वाचे आहे.

जर जीवनात अन्याय झाला आणि तू त्याचे कारण देऊन अधर्माचा मार्ग पकडणार असे असेल तर हे चुकीचे आहे.

लक्षात ठेव, आयुष्य काही ठिकाणी कठीण असेल, परंतु या कठीण वेळी तु कोण होता याने नाहीतर तू काय निर्णय घेतोस याने तुझे चरित्र आणि कीर्ती बनते.

मृत्युंजय कर्णाने मरण्याआधी श्रीकृष्णाला काय विचारले ? | Karna Story in Marathi

आयुष्यभर तुझ्या बळाचा आणि पराक्रमाचा वापर तू दुर्योधन आणि स्वतः साठी केला. पण जेव्हा तुला सुत जातीवर होणारे अत्याचार कळले त्यासाठी तू का पेटून उठला नाहीस? तुझे खरे वैरी कोण हेच तू विसरलास.

मित्रा धर्माचे आचरण करताना मित्राला अधर्मातून बाहेर काढण्याच्या ऐवजी तू मित्रासोबातच अधर्माच्या वाटेला लागलास. हे चुकीचे नाही काय?

तुझ्या या चुकीच्या वाटेचाच परिणाम म्हणून तुझी शेवटची निष्कपट द्वंद्व हि इच्छा देखील पूर्ण होऊ शकली नाही. कारण म्हणतात न कि “यतः धर्म ततः जयः”

मृत्युंजय कर्णाने मरण्याआधी श्रीकृष्णाला काय विचारले ? | Karna Story in Marathi

तुम्हाला आमचा लेख कसा वाटला या बद्दल नक्की कळवा. वरील लेखात काही तृती आढळल्यास त्या सुद्धा आम्हाला कमेंट करून तुम्ही सांगू शकता. तुमचा अभिप्राय फार महत्वाचा आहे. PLZ Share.

आमचे इतर छान मराठी साहित्य वाचा

प्रयत्न करायचं तू सोडू नको | प्रेरणादायी कविता मराठी वाचा

महाभारतावर उत्कृष पुस्तके कोणती ते वाचा

Avatar
Marathi Time

10 thoughts on “कर्ण मरण्यापूर्वी कृष्णास 10 प्रश्न| Karna Story in Marathi”

Leave a Reply