KATHA LEKHAN MARATHI | चिमणीची गोष्ट | The story of the Sparrow 2023

KATHA LEKHAN MARATHI | चिमणीची गोष्ट | The story of the Sparrow 2023
खाली दिलेल्या मुद्द्यांवरून कथा लिहा. जंगल-आग-प्राण्यांचे घाबरणे-सैरावैरा पळणे-चिमणीचे चोचीतून पाणी आणणे-आगीवर टाकणे-इतर प्राण्यांचे अनुकरण-तात्पर्य

KATHA LEKHAN MARATHI | चिमणीची गोष्ट | The story of the Sparrow 2023

KATHA LEKHAN MARATHI | चिमणीची गोष्ट | The story of the Sparrow 2023

ही गोष्ट आहे एके काळची, एका नदीच्या काठी एक घनदाट जंगल होते. त्या जंगलामध्ये चिमणी, कावळा, मोर, माकड, वाघ, हरीण, सिंह, हत्ती असे अनेक प्राणी आणि पक्षी आनंदात राहत होते. ते जंगल नसून त्या सर्व प्राण्यांचे एक प्रकारचे जणू घर होते. मात्र प्राण्यांच्या या घरावर दुर्दैवाने एक खूप मोठे संकट येऊन पडले. एके दिवशी जंगलामध्ये खूप भयंकर आग लागली. ही आग लागल्यामुळे जंगलातील सर्व प्राणी घाबरले होते. The story of the Sparrow

त्यांना काय करावं हे कुणालाही काहीच कळत न्हवते त्यामुळे ते इकडे तिकडे सैरावैरा पळत सुटले होते. सर्व पक्षी देखील आप आपल्या झाडावरचे बांधलेले घरटे सोडून आकाशात उंच उडून पळायला लागले होते. ही आग आणखीच वाढत होती आणि संपूर्ण जंगल व्यापून आणखी आणखी पसरत होती. त्यामुळे एकही झाड उरलेला न्हवता. सगळी कडे आग आणि धूर झालेला होता आणि तो वाढतच होता. The story of the Sparrow

त्या जंगला मध्ये एका उंच झाडावर छोटासा घरटा बांधून एक चिमणी सुद्धा राहत होती. ती फार समजूतदार आणि चतुर सुद्धा होती. आग वेगाने पसरत असल्यामुळे ती घरटं बांधून राहत असलेल्या झाडाजवळ येत होती. हे चिमणीच्या लक्षात आलं. आणि ती विचार करू लागली की, ही आग विझवायला काय करायला पाहिजे? तेवढ्यात तिला जंगलामध्ये असलेली नदी दिसली आणि तिने लगेच एका क्षणाचाही विचार न करता नदीकडे धाव घेतली. The story of the Sparrow

चिमणी नदी मधून आपल्या चोची मध्ये जेवढं पाणी सामावून घेता येईल तेवढं पाणी घेतलं आणि आगीमध्ये येऊन टाकलं. ती तशीच करत होती. नदीकडे जायची आपल्या चोचीमध्ये पाणी पकडायची आणि तो पाणी आणून आग मध्ये टाकायची. त्या चिमणीचे हे कृत्य बघून सर्व प्राणी आणि पक्षी तिच्यावर हसत होते. यावर ती न चिडता त्यांना म्हटलं, तुम्हाला इथून पळून जायचं असेल तर नक्कीच जा परंतु मी मात्र इथून पळून जाणार नाही.

KATHA LEKHAN MARATHI | चिमणीची गोष्ट | The story of the Sparrow 2023

कारण हे माझं घर आहे आणि माझ्यापरीने जेवढं जमेल तेवढं मी ही आग विझविण्याचा प्रयत्न करेन. चिमणीचं हे वक्तव्य ऐकून त्यातील काही प्राण्यांनी सुद्धा तिला हातभार म्हणून आग विझविण्यासाठी नदी काठावर जाऊन पाणी आणून आग विझविण्याचा प्रयत्न करू लागले. बाकी इतर ही प्राण्यांनी मग त्या प्राण्यांचं अनुकरण केलं आणि असे करून सर्वच प्राणी नदी काठावर जाऊन पाणी आणून आग विझविण्याचा प्रयत्न करून लागले. The story of the Sparrow

सर्व प्राणी आज विझविण्यासाठी नदी काठावरून पाणी आणून आगी मध्ये टाकू लागले त्यामुळे थोडा उशिराने का होईल मात्र शेवटी आग विझलीच आणि अशांत झालेलं जंगल पुन्हा पूर्वीप्रमाणे शांत झालं. पुन्हा त्या जंगलातील प्राणी पक्षी एकत्र आनंदाने राहू लागले.

चिमणीची गोष्ट तात्पर्य:-

कितीही मोठे संकट आले तरी प्रयत्न न करता कधीही हार मानू नका.
एकत्र काम केल्याने हाती घेतलेले काम अधिक सोपे होते. एकीचे बळ सर्वश्रेष्ठ.

Read Also:-

3 thoughts on “KATHA LEKHAN MARATHI | चिमणीची गोष्ट | The story of the Sparrow 2023”

Leave a Reply

%d bloggers like this: