कुणबी मराठा माहिती मराठी Kunbi Maratha Information In Marathi 2023

कुणबी मराठा माहिती मराठी Kunbi Maratha Information In Marathi छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जे मराठे शेती करत होते. त्यांना कुणबी असे म्हटले जात असे. मराठा साम्राज्यातील घोरपडे शिंदे पवार व भोसले मुळात कुणबी वंशाचे आहेत. त्याविषयी संपूर्ण माहिती आपण आहोत.

Kunbi Maratha Information In Marathi

तुमच्या मनात प्रश्न पडला असेल की कुणबी म्हणजे कोण.? छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठा साम्राज्यात सेवा करणारे बहुतेक मराठे हे रत्नागिरी, कोल्हापूर, सोलापूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, पालघर मराठवाडा व विदर्भातील होते. ते मुळात शेती करत असल्यामुळे शेतकरी होते. व ते शेतकरी असल्यामुळे त्यांना कुणबी हे नाव देण्यात आले.

मराठवाड्यातील मराठी समाज शांततेच्या काळात शेती करत होता. पण कालांतराने भारतातील इंग्रज व ब्रिटिश आले. त्यानंतर मराठी समाजाला शेती बरोबरच तलवार घेऊन लढाई करण्याची गरज पडली. आणि लढाई करत करत छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले हिंदवी स्वराज्य निर्माण केले.शिवाजी महाराजांचे स्वराज्य आणि नंतरचे साम्राज्य या काळातील कुणबी मराठ्यांचा लष्करीपेशा वाढत जाऊन त्यांच्या उत्पन्नात लक्षणीय भर पडली.

मोगलांच्या मुलखातून मिळणाऱ्या चौथाईच्या हक्काने महाराष्ट्रात आर्थिक समृद्धी आली. 1818 साली इंग्रजांनी मराठ्यांचे राज्य बुडवले. त्यानंतर महसूलाच्या स्वरुपात मिळणारे उत्पन्न बंद झाल्यानंतर हा समाज पूर्णपणे शेतीवर विसंबून राहू लागला.

कुणबी मराठा माहिती मराठी Kunbi Maratha Information In Marathi 2023

Kunbi Maratha Information In Marathi

संत तुकाराम महाराज त्याच्या अभंग मध्ये असे म्हणतात की’बरें देवा कुणबी केलों, नाही तरि दंभे असतो मेलो’ या अभंगाचा संदर्भ देऊन तुकोबा हे शेतकरी कुणबी होते असं म्हटलं आहे.त्यामुळे मराठा समाज आणि कुणबी समाज हे वेगळे आहेत. असं म्हणता येत नाही. कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात. जे जमीनदार आहेत व जे शेतकरी शेती करतात. त्या सर्वांना कुणबी असे संबोधले जात होते. त्यामुळे सर्व मराठी समाजाला कुणबी असे म्हणू शकतो.

.ब्रिटिश प्रशासकीय अधिकारी रॉबर्ट व्हेन रसेल यांनी त्यांच्या ‘द ट्राइब्स अॅंड कास्ट्स ऑफ द सेंट्रल प्रोव्हिन्सेस ऑफ इंडिया’ या पुस्तकात कुणबी हा समाजच मराठा असल्याचं म्हटलं आहे.”मराठा समाज हा लष्करी सेवेत होता पण त्यांचा उदय हा श्रमिक कुणबी या वर्गातूनच झाला असण्याची शक्यता आहे. नेमकं कोणत्या काळात मराठा आणि कुणबी हे दोन समाज वेगळे समजायला सुरुवात झाली हे अद्याप निश्चित समजले नाही,” असं या पुस्तकात म्हटलं आहे.

Kunbi Maratha Information In Marathi

तत्कालीन ब्रिटिश सरकार आणि हैदराबाद संस्थानाने 1931मध्ये जातनिहाय जनगणना केली होती. सध्याच्या महाराष्ट्राच्या भौगोलिक क्षेत्रातील मराठा आणि कुणबी समाजाची लोकसंख्या अनुक्रमे 16.29 टक्के आणि 7.34 टक्के होते. 1931 ते 1945 या कालावधीत बहुतांश कुणबी समाजाने स्वतःला कुणबी म्हणणे बंद करून मराठा असे संबोधण्यास सुरुवात केली.समितीनं केलेल्या सर्वेक्षणाच्या आधारावर मराठा समाजाची लोकसंख्या 32.14 टक्के असल्याचं म्हटलं आहे. मराठा समाज आणि कुणबी समाज हा एकच आहे आणि कुणबी समाज इतर मागासवर्गीय आहे, त्या आधारावर मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे अशी शिफारस केली.

Kunbi Maratha Information In Marathi

९६ कुळी मराठा कुणबी मराठा आहेत का.?तर त्या प्रश्नाचे उत्तर आहे. 96 कुळी मराठा आहे कुणबी मराठा आहेत. कारण 96 कुळी हे महाराजांच्या काळात जमीनदार होते. त्यामुळे त्यांच्याकडे खूप मोठ्या प्रमाणात जमिनी होत्या व त्यातील काही जमीनदार हे शेती करत होते. त्यामुळे त्यांना सुद्धा कुनबी असे म्हटले जात असे.

Kunbi Maratha Information In Marathi

कुणबी मराठा माहिती मराठी

आठव्या शतकापासून ९६ कुळी ह्या संकल्पनेचे स्वरूप लक्षात घेण्यास सुरुवात झाली. सैन्यात नसलेली मराठे शेती करत व ज्यांना शेती करायची नाही. ते सैन्यात भरती होऊन क्षत्रिय अशी पदवी त्यांना मिळत होती. पण क्षत्रिय आणि शेती करणारे हे दोन्ही कुणबीच आहेत कारण क्षत्रिय आणि शेतकरी हे दोन्ही एकच आहेत.

फक्त त्यांनी वेगवेगळी शाखा निवडली.त्यामुळे त्यांचा व्यवसाय वेगळा झाला. त्या व्यवसायावरून त्यांचं वर्गीकरण कुणबी क्षत्रिय मराठा व कुणबी मराठा शेतकरी असं वर्गीकरण करण्यात आलं. असे इतिहासाचे अभ्यासक व लेखक इंद्रजीत सावंत म्हणतात.

Kunbi Maratha Information In Marathi

पण 96 कुळी मराठा यांच्या नोंदी इतिहासात जरी असल्या तरी सरकारच्या दप्तरांमध्ये त्याचा उल्लेख कुठेही केला जात नाही. शाळेच्या दाखल्यामध्ये पण प्रत्येक जण मराठा असाच उल्लेख करतो. 96 कुळी मराठी हे सुद्धा कुणबी असल्याचे मत डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केल.

जे शेती करतात ते कुणबी मराठा आणि 96 कुळी मराठा यामध्ये काहीही फरक नसून ते दोन्ही एकच आहेत. वरील माहितीनुसार असे स्पष्ट होते की प्रत्येक मराठा कुणबी आहे.

Author :- Mr. Shankar Kashte

Shankar

तर मित्रांनो तुम्हाला कुणबी मराठा माहिती मराठीKunbi Maratha inflammation Marathi ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका…वरील निबंध मध्ये काही चुका असतील किंवा काही लिहायचं राहून गेलं असेल तर ते आम्हाला कमेंट द्वारे कळवा आम्ही त्यामध्ये सुधारणा करत राहू.

धन्यवाद…

तर अशा या लेखातून आम्ही तुम्हाला जमेल तेवढी माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला जर आमचे काम आवडले असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा. तुम्हाला देखील लेख लिहायला आवडत असतील पण त्यासाठी व्यासपीठ मिळत नसेल तर आम्हाला कळवा.

Maze Gav Marathi Nibandh

Raksha Bandhan Nibandh In Marathi

ESSAY ON OUR FESTIVAL

Leave a Reply

%d bloggers like this: