50 Love Quotes In Marathi | या प्रेमाच्या चारोळ्या मूड फ्रेश करून टाकतील

पिढ्यान पिढ्या ज्यांच्या प्रेमाची ग्वाही दिले जाते असे प्रेम मग्न असणारे राधाकृष्ण यांच्या प्रेमा ची गाथा ही युगे युगे चालत राहील. माणुस प्रेमात पडला की त्याला शब्द सुचतात आणि या शब्दाचा रूपांतर शायरी मध्ये होते आणि अशाच प्रकारच्या प्रेमरंग Love Quotes In Marathi आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

Love Quotes In Marathi

50 Love Quotes In Marathi | प्रेमाच्या चारोळ्या

तुझ्या प्रेमात सारखं बेधुंद होऊन जगायचे मला
हातात तुझ्या हात घेऊन फिरायचे मला

तु जीव आहेस सर्वांना सांगायचे मला

_____________________________________________

तुझ्या डोळ्यात मला माझ विश्व दिसते
तुझा हात हाती घेतल्यावर
जगण्याची एक उम्मीद जागते
तुझ्यात मी माझा फक्त कृष्णच नाही
महादेव शिवशंभू बघते

_____________________________________________

आज तिला पाहिल आणि पाहतच राहिलो
डोळ्यात गुंतून मी बेधुंद झालो
जवळ येता हृदय माझे असे धडधडले
काहीच सुचेना मला मी शायर झालो

_____________________________________________

तिला बघून असं वाटलं
आयुष्यात मी सर्वच मिळवलं
ती जवळ येताच
मन मात्र असं धडधडलं
ती दूर गेल्यास मात्र मन कळवळल

_____________________________________________

तू दूर असली तर काय झालं
मनात तर तु नेहमी असशील ना
तू दुसऱ्याच्या बंधना त असली तर काय झालं
तुझं मन तर माझंच असेल ना

_____________________________________________

Love Quotes In Marathi | प्रेमाच्या चारोळ्या

वाचा Quotes On Life In Marathi

वाचा Romantic Marathi Prem Kavita

_____________________________________________

50 Love Quotes In Marathi | या प्रेमाच्या चारोळ्या मूड फ्रेश करून टाकतील

तिला भिजत्या पावसात पाहिल
आणि बस पाहतच राहिलो
ओल्या सरेनी तिला ओल चिंब केलं
आणि तिचं वर्णन मी करतच राहिलो

_____________________________________________

हात देईल हाती तुझ्या
तु जाती प्रथेला मोडशील का
बनेल तुझी सावित्री मी
तू माझा क्रांतीज्योती होशील का

_____________________________________________

मला तुझ्याशी बोलायचं
मनातलं सर्व तुला सांगायचं आहे
मी तुझी राधा तर नाही
पण पार्वती मात्र नक्कीच व्हायचं आहे

_____________________________________________

तुला पाहिल्यानंतर कळलं
की प्रेम काय असतं
तू समोर आल्यावर कळल की
तो आभास काय असतो
आजकाल दिवस रात्र
स्वप्न मी तुझेच बघतो
आज मला कळलं की प्रत्येकाला
त्याचा प्रियकर खास का असतो

Love Quotes In Marathi | या प्रेमाच्या चारोळ्या मूड फ्रेश करून टाकतील

50 Love Quotes In Marathi | या प्रेमाच्या चारोळ्या मूड फ्रेश करून टाकतील

_____________________________________________

तु जेव्हा बोलतो ना
तेव्हा ऐकतच राहवस वाटत
तुझ्या बोलण्यामध्ये बेधुंद रहावस वाटतं
तुला कधी कळेल ग माझ प्रेम
तुझ्याकडे पाहून बस लिहतच राहावंसं वाटतं

_____________________________________________

मला तुला गर्लफ्रेंड म्हणून नाही
तर माझी बायको म्हणून बघायचंय
तुझ्या नावासोबत माझं
नाव जोडायच आहे

_____________________________________________

आज काय रिमझिम पावसावर
पण लिहायला लागले
त्या ओल्या सरींवर पण लिहायला लागले
तुला पाहताच सख्या
मला प्रेम कळायला लागले

_____________________________________________

तू माझा होशील का
सांग ना तू माझा होशील का
तुझे प्रेम आहे असं
साऱ्या जगाला सांगशील का

_____________________________________________

तू माझ्याशी भांडलास ना तरी चालेल मला
बस मला सोडून जाऊ नकोस
तु मला रागवलास तरी चालेल मला
पण मला तुझ्यापासून दूर करू नकोस

_____________________________________________

कधी इतकं प्रेम झालं काही कळलंच नाही,
कधी इतकं वेड लावलं काही कळलंच नाही,
पहिल्यांदा कधी आवडलीस हे खरंच आठवत नाही,
पण आठवण काढल्याशिवाय आता खरंच राहवत नाही.

Love Quotes In Marathi | या प्रेमाच्या चारोळ्या मूड फ्रेश करून टाकतील

50 Love Quotes

_____________________________________________

कधी मी इतकं तुझ्या प्रेमात गुंतून गेले कळलंच नाही
कधी मला तुझ इतक वेळ लागला
कळलंच नाही
तुला पाहताच कधी प्रेम झालं कळलंच नाही
पण आठवण
काढल्याशिवाय आता खरच राहवत नाही

_____________________________________________

प्रेम काय असतं हे तू दिसल्यावर कळलं
तुला पाहून मी खरोखरच बेधुंद झालो
आणि नकळत
तुझ्या आठवणीत गुंतून गेलो
कधी कुणासाठी न रडणार मी
आज तुझ्यासाठी रडून गेलो

_____________________________________________

तू माझ्या प्रेमाला कधी जाणलेच नाही
तुझेही माझ्यावर प्रेम होतं
तुला हे कधी समजलेच नाही
मी फिरत होते तुझ्या मागे वेड्यासारखे
आता मात्र कधी मी दूर निघून गेले तुला मात्र
हे कधी कळलेच नाही

_____________________________________________

मी खूप करत होते प्रेम तुझ्यावर
तुझ्याकडे पाहायचे बसून मागच्या बाकावर
कधी नजरेला नजर भिडली ना तुझी
झोपही लागायची नाही रात्रभर

_____________________________________________

Love Quotes In Marathi | या प्रेमाच्या चारोळ्या मूड फ्रेश करून टाकतील

_____________________________________________

तुझ्याशी बोलायला मन माझं झुरत होतं
माझ्या डोळ्यातलं पाणी
प्रेम तुझं सांगत होत
तू किती निरहृदयी हृदयाचा रे
पाहून मला इग्नोर सारखा तू करत होता

तुझ्यासोबत बोलण्यासाठी
मी माझी सायकल तुझ्या सायकल जवळ लावायचे
तुझ्याच गोष्टी मी सर्वांना सांगायचे
तुझ्याच नावाने मला सर्वच चिडवायचे
माझा हे अबोल प्रेम सांग ना तुला कधी कळायचे

_____________________________________________

प्रेमाची किंमत आजतुला कळणार आज तरी तुझी नजर माझ्याकडे वळणार

जेव्हा हवी असेल ना मी तुला
तेव्हाच मी तुझ्याजवळ नसणार

_____________________________________________

तुझ्यात मी माझा सार जग पाहिलं होतं
पण तू तर माझ्याशी खेळत राहिलास
खेळत होता तू सारखा माझ्याशी
सारखं खोटं बोलून तू माझा विश्वास जिंकलास

_____________________________________________

तुझ्या प्रेमात पागल होते ना
म्हणून तु मला पागल समजलं
हृदय तोडून माझं
सांग ना सख्या तुला काय भेटलं

_____________________________________________

Love Quotes In Marathi | या प्रेमाच्या चारोळ्या मूड फ्रेश करून टाकतील

कुणीतरी असावं
गालातल्या गालात हसणार
भरलेच आसवांनी,
तर डोळे पुसणारं
कुणीतरी असावं,
आपलं म्हणता येणारं..
केलं परकं जगानं
तरी आपलं करून घेणारं.

_____________________________________________

जी सोबत असताना खूप हसवते ना ती सोबत नसताना खूप रडवते

एकदा प्रेमात माझ्या सारे विश्व मी तुझ्या हाती देईन
कितीही संकटे आली ना आपल्यावर
नेहमीच तुला साथ देईन

_____________________________________________

जगायचे मला तुझ्या सोबत
शेवटचा क्षणही मला तुझ्या सोबतच घालवायचे
प्रेम करतो मी तुझ्यावर
अख्या जगाला सांगायचे

_____________________________________________

मी तुझा कृष्णा तर कधी होऊ शकलो नाही
पण तू माझी राधा नेहमीच राहशील
तुम्हाला कधीच समजू शकली नाही
पण वेळ पडल्यावर मी नक्कीच
धावून येईल

_____________________________________________

आयुष्याच्या सुखदुखात
साथ मला तुझी हवी आहे
मी पैशाने श्रीमंत तर नाही
पण तू माझी कविता आणि मी तुझा कवी आहे

_____________________________________________

पैशाची किमतीने तू मला तोलू नकोस
जरा माझ्या हृदयात झाकून बघ
तिथे देखील प्रतिबिंब तुला तुझं दिसेल
एकदा मनातलं सांगून बघ

_____________________________________________

ओळखलं मला
मी तुला कधीच रडवणार नाही
विश्वास तर करून बघ एकदा
आयुष्यात कधीच तुझी साथ सोडणार नाही

_____________________________________________

हातात हात घेऊन
आयुष्याचा प्रत्येक वळणावर जाऊया
साथ असेल ना तुझी मला
तर प्रेम गाणी गाऊया

_____________________________________________

तुला सोडून जाण्याचा विचार
मी मरताना देखील करणार नाही
मृत्यू जरी असेल ना दारात
तुझी साथ कधीच सोडणार नाही.

_____________________________________________

तू सोबत असशील ना
तर प्रत्येक संकटाला उत्तर देण्याचा धाडस माझ्यात आहे
पण तू सोबत नसेल ना
तर मी फक्त एक खचलेला माणूस आहे
आपण मनापासुन प्रेम केलेल्या व्यक्ती आपल्याला
सोडुन जाताना ह्रदयात घर करुन जातात …
पण जाताना त्याच घराचे दरवाजे बंद करुन जातात.

_____________________________________________

आयुष्याची दोरी कुणाच्या तरी हातात देऊन बघा
खुप वेळ असेल तुमचाकडे.
आयुष्यातील दोन क्षण कुणाला तरी देऊन बघा
कविता नुसत्याच नाही सुचणार
त्या साठी तरी एकदा प्रेम करून बघा

_____________________________________________

जेव्हा तुम्ही कोणावर प्रेम करता,
आणि ती व्यक्ती तुम्हाला भेटावी म्हणून,
देवाकडे त्या व्यक्तीला रोज मागता,
पण ती तुम्हाला भेटत नाही,
तेव्हा समजून घ्या की दुसरे कोणीतरी
तुमच्यावर जास्त प्रेम करतंय,
आणि रोज तुम्हाला देवाकडे मागतंय.

_____________________________________________

देवाला मी जे काही मागितलं ना ते मला लगेच मिळालं
पण देवाला मी जेव्हा तुला मागितलं ना
तेव्हा मात्र त्याला तुला देता आला नाही

_____________________________________________

देवानेही तुला माझ्यासाठीच बनवले
हे आता तू समजून घे
सात फेरे घेऊन मी अग्नि कुंडा भवती
घरच्यांना मात्र तू आता सांगून दे

_____________________________________________

प्रेम आहे का माझं तुझ्यावर
असं मी तुला कधीच विचारणार नाही
साथ देशील का तू मला आयुष्यभर
बस हेच म्हणून साथ मी तुझी कधी सोडणार नाही

_____________________________________________

प्रत्येकच व्यक्तीला कोणी ना कोणी आवडलेला असतो
पण ते त्याच व्यक्तीला सांगतात जी त्याला कधी समजून घेत नाही

_____________________________________________

प्रेम म्हणजे नेमकं काय ग
असं जेव्हा त्यांनी मला विचारलं
मी हसून उत्तर दिल त्याला
जितू माझ्या डोळ्यात बघून कधी केलच नाही

_____________________________________________

एक सारखा एका नजरेने तो माझ्याकडे पाहत होता
प्रेम आहे त्याच माझ्यावर त्याच्या नजरेने सांगत होता
घाबरले मी त्याच्या त्या कटाक्ष नजरेला
पण डोळ्यातले अश्रू त्याचे खरं प्रेम मला सांगत होता

_____________________________________________

नक्कीच तू माझ्यासाठी बनलेली नसेल
पण माझं मन तर तुझ्यासाठी झुरतय ना
नक्कीच तुला माझी अबोल भाषा कळली नसेल
अख्ख्या जगाला तर ती कळते ना

_____________________________________________

का दूर जातेस तू माझ्या
आणि सारखी माझ्यावर चिडते
प्रेम प्रेम म्हणून सारखं
का माझ्याशी खेळतेस

_____________________________________________

मी तुला पाहिलं होतं
तेव्हाच मी तुझ्या प्रेमात पडले
आज तर तुझी खुप आठवण येते मला
का असे आणि का घडले

Love Quotes In Marathi | या प्रेमाच्या चारोळ्या मूड फ्रेश करून टाकतील

_____________________________________________

तुझ्यासाठी मी देवाकडे गेलो आणि तुझ्याविषयी सांगून गेलो
आता तर परावरची लोक सुद्धा मला पागलच म्हणतात
लहान लहान पोर सुद्धा
तुझ्या नावाने चिडवतात

_____________________________________________

मी कधी कवी नव्हतो ग
पण आता शायार झालोय
मला कधी शब्दाची बांध बांधता येत नव्हती
पण आता तरी पूर्ण कविता झालेय

_____________________________________________

तुझी आठवण आली की मन तळपतं
लोक तुझ्या नावाने चिडवतात
तू दिसली ना मला वाटेवर
मन उगाच कळवळतं

Author :- मिस. प्रतिक्षा गजानन मांडवकर

Related Videos :-

Avatar
Marathi Time

2 thoughts on “50 Love Quotes In Marathi | या प्रेमाच्या चारोळ्या मूड फ्रेश करून टाकतील”

Leave a Reply