Majhi Aaji Nibandh in Marathi | माझी आजी निबंध 500 शब्द

एखाद्या व्यक्तीच्या उभ्या आयुष्यात स्त्री हि अनेक नात्यांनी जोडली जाते, त्यातले असेच एक नाते जे आयुष्यभर लक्षात राहते ते म्हणजे आज्जीचे नाते. माझ्या वाचक मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी Majhi Aaji Nibandh in Marathi या महत्वाच्या विषयावर निबंध तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. त्यामुळे हा निबंध अगदी शेवटपर्यंत वाचा आणि तुमचा अमूल्य अभिप्राय नक्की नोंदवा….

Majhi Aaji Nibandh in Marathi | Mazi Aaji Nibandh in Marathi | माझी आजी निबंध

माझी आज्जी आनंदीबाई. तशी तिने 75वी ओलांडली असली तरी आजही तरुण मंडळींना हमखासपणे लाजवेल अशी तिची शरीरयष्टी होती. सकाळी 5 ला उठून आई बाबांना उठवून फिरायला जाणे, तिकडून आल्यानंतर मला उठवून योगासने करवून सकाळचा न्याहारी साठी काहीतरी बनविणे आणि सर्वांना खावू घालणे, नंतर अंघोळ करून झाल्यानंतर पूजा पाठ करून दुपारच्या जेवणापर्यंत आपल्या पोथ्या वाचत बसणे, दुपारचं जेवण उरकलं की थोडा वेळ आराम करून सायंकाळी फिरायला जाणे, तिकडून आल्यानंतर मला हाथ पाय धुवायला लावून पूजा पाठ करवून रात्रीच्या जेवणापर्यंत परत पोथ्या वाचत बसणे आणि मग रात्रीचं जेवण उरकलं की रात्री मला खूप साऱ्या कथा सांगून झोपी जाणे जणू ही तिची रोजचीच दिनचर्या होती.

Majhi Aaji Nibandh in Marathi | Mazi Aaji Nibandh in Marathi | माझी आजी निबंध

माझी आज्जी तशी 4थी नापास होतो मात्र तिला वाचनाची फार आवड असल्यामुळे ती रोज नव नवीन पुस्तके वाचत होती आणि त्यामुळे तिने माझ्यावर देखील तसेच संस्कार करत होती. माझ्या 12 वी मधला पाठ जो मला समजत न्हवता तो तिला एकदा वाचल्यानंतर लगेच समजायचं आणि तिला समजलं की ती मला ही समजावून द्यायची. मला अभ्यासात वेळोवेळी मदत करायची, माझ्याकडून रोज अभ्यास करवून घ्यायची आणि रात्री वेग वेगळ्या कथा सांगून माझ्यावर चांगले संस्कार करायचा प्रयत्न करायची.

कधी माझ्याकडून काही चुका झाल्या की आईबाबा माझ्यावर खूप रागवायचे मात्र माझी आज्जी माझीच बाजू घ्यायची आणि त्यांना समजावून सांगायची तर प्रसंगी मी ती चूक पुन्हा करू नये अशा पद्धतीने मलाही समजावून सांगायची. प्रत्येक रविवार ला ती मला तिनेच लावलेल्या बागेत घेऊन जायची आणि वेग वेगळ्या वनस्पतींची ओळख करून द्यायची. तिला कोणते वनस्पती कोणत्या रोगावर उपचार करतात याची ही पुरेपूर माहिती होती ती सुद्धा मला करवून द्यायची. तिच्यामुळे मला सुद्धा बऱ्यापैकी आयुर्वेदाची माहिती झालेली होती.

Majhi Aaji Nibandh in Marathi | Mazi Aaji Nibandh in Marathi | माझी आजी निबंध

आमच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या की ती मला गावाकडे फिरायला न्यायची. गावाकडची रम्य पहाट, जिकडे तिकडे हिरवळ मला माझ्या आज्जी मुळेच अनुभवायला मिळालं. खरच शहरात राहून जणू मी गावाला विसरून च गेलो होतो मात्र आज्जी मुळे ते मला परत अनुभवायला मिळालं होतं. मात्र देवाला ही कदाचित माझं हे सुख पहावलं नसेल म्हणून एकदा गावाकडे जातांनी आमच्या गाडीचा अचानक अपघात झाला त्यामधून मी तर वाचलो मात्र माझी आज्जी चा मृत्यू झाला आणि सर्वच संपलं. खरच ती होती तेव्हा सगळं जग मला माझं च वाटायचं मात्र ती गेल्यापासून मला पोरकं वाटायला लागलं.

Majhi Aaji Nibandh in Marathi | Mazi Aaji Nibandh in Marathi | माझी आजी निबंध

माझी आज्जी खरच खूप ग्रेट होती. आईपेक्षा जास्त प्रेम करणारी आणि वडीलांपेक्षा जास्त काळजी घेणारी माझी आजी माझी खूप चांगली मैत्रीण होती. तिच्याजवळ मी आपल्या मनातलं सर्व गुपित बोलून दाखवत होतो. 100 पुस्तकं वाचून सुद्धा जर ज्ञान मला मिळत न्हवतं ते ज्ञान मला एकट्या आज्जी मुळे मिळत होतं. हल्ली खूप कमी लोकांकडे त्यांची आज्जी आहे आणि ज्यांच्याकडे आहे ते खरच खूप नशीबवान आहेत. म्हणून मी तुम्हाला नक्कीच सांगेन की तुमच्याकडे जर तुमची आज्जी आहे तर तुम्ही खील नशीबवान आहात त्यामुळे तुम्ही तिची खूप काळजी घ्या. ती असेल तर तुम्हाला कुठल्याही पुस्तका वाचायची गरज पडणार नाही कारण ती स्वतःच एक चालतं फिरतं ग्रंथालय आहे.

मी आजही माझ्या आज्जीला खूप Miss करतो. कारण तिच्यामुळे च मला खऱ्या अर्थाने जग बघायला मिळालं. मी आज जे काही आहे तिचं सर्व श्रेय माझ्या आज्जीला च जाते.

  तर मित्रांनो, तुम्हाला आमचा majhi aaji nibandh in marathi या विषयावरील निबंध कसा वाटला ते आम्हाला Comment Box मध्ये नक्कीच कळवा आणि आवडल्यास share करायला विसरू नका.

माझी आई निबंध वाचण्यासाठी येथे क्लिक करा

MPSC Book List :- तहसीलदार कडून शिका परीक्षेची तयारी.

Avatar
Marathi Time

9 thoughts on “Majhi Aaji Nibandh in Marathi | माझी आजी निबंध 500 शब्द”

Leave a Reply