माझ्या आठवणीतला दसरा | Best Marathi Article On Dasara 2023

साहित्यबंध समूह आयोजित साप्ताहिक स्पर्धेत सौ.क्रांती तानाजी पाटील यांनी Marathi Article On Dasara या कीवर्ड वर आधारित “माझ्या आठवणीतील दसरा” हा लेख लिहिला आहे. चला तर वाचूया.

माझ्या आठवणीतला दसरा | Best Marathi Article On Dasara 2023

साहित्य बंद समूह आयोजित साप्ताहिक उपक्रम क्रमांक -१
दिनांक: ११- १०.२०२३

माझ्या आठवणीतला दसरा | Best Marathi Article On Dasara 2023

लेखिका

©®सौ.क्रांती तानाजी पाटील.
मु.पो.दुशेरे.
ता. कराड. जि.सातारा.

माझ्या आठवणीतला दसरा | Marathi Article On Dasara

गुलाबी थंड हवा. मनाला हवा हवासा वाटणारा तो सुखद थंड बोचरा स्पर्श. सगळचं कसे मनाला आनंदी व उल्लास दायक वाटणारे वातावरण. त्यातच दाट शुभ्र धुक्यांची दाटी.स्वर्गच धरतीवर उतरलेला असावा.असचं मनाला वाटतं होतं. त्यातुनच त्या धुक्याचा मंद सुवास, पानांपानावर जमलेले ते दवबिंदू अगदी हिऱ्यासम चमकून मनाला आकर्षित करणारे. मधूनच ओघळणारी ,टपकणारी ती घराची वळचण.

प्रभात समयी हा सुंदर नजारा पाहताना दाट धुक्याप्रमाणे, मनांत ही आठवांची दाटी होत होती. हे वातावरण असते ते अश्विन महिन्यातच आणि या महिन्यातच येणारा मोठा सण म्हणजे दसरा.

म्हणतात ना? “दसरा सण मोठा, आनंदाला नाही तोटा.”

माझ्या आठवणीतला दसरा | Best Marathi Article On Dasara 2023

Marathi Article On Dasara

हे अगदी खरं आहे. कारण खुप उल्लाहादायक वातावरण. तनामनाला आनंद देत असते.
दसरा सणाला वसुंधरा सुध्दा ,”सोनवर्खी शालू” नेसून , सर्वांना सुख, समृध्दी चे सोनं लुटण्यासाठी सजलेली असते.
‘सोनं घ्या,सोन्यासारखं राहावा.’ अशी सोन्याची उधळण करत दरवर्षी येणारा हा’ दसरा सण’ माझ्यासाठी माझ्या आठवणीतलाच दसरा असतो.

बालवयातील दसरा आठवला की,आठवते ते दसऱ्यादिवशी चे ‘पाटी पूजन. ‘ त्यालाच ‘सरस्वती पूजन’ असे देखील बोलले जाते. तर ‘दसऱ्याच्या’ आदल्या दिवशी ‘दगडी काळीभोर’ पाटी कोळसा ने घासून, घासून स्वच्छ करण्यात खुप गंमत वाटायची. नंतर मग अगदी पाटी ला सभोवती ज्या लाकडी पट्ट्या असत. त्यांना धरुन अलबद मग मोठ्या भावा कडून अथवा बहिणीकडून छान सरस्वतीचे वळणदार चित्र काढून. त्यावर मग सकाळी सगळं आवरुन लवकर शाळेत जाताना. त्यावर झेंडूच्या फुलांच्या पाकळ्या विस्कटून मग शाळेत सर्वांच्या पाट्या वर्गातील सरस्वतीच्या फोटो खाली ठेवून. मग तिथे हे पाटीपूजन अर्थातच सरस्वती पूजन होत.

पण हे सगळं अगदी आनंदाने व उत्साहाने करण्यात त्या बालवयात वेगळीच मजा असायची. ‘विद्या विनयेन शोभते.’ हा ‘नम्रभाव’ व विनयशीलतेचे पहिले बिज या दसऱ्याच्या मुहूर्तावरच प्रथम रुजले गेले होते. त्यामुळे या बालवयातील हा आठवणीतला दसरा कायमच मनपटलावर रेखाटला गेला.

त्यानंतर तरुण वयातला हा दसरा वेगळ्याच रंगा,ढंगात नटलेला असायचा. झेंडूच्या फुलां प्रमाणे अगदी टपोरा व टवटवीत.
दसऱ्या दिवशी लवकर उठून झाडलोट करुन स्वतः प्रमाणे अंगण ही सडा,रांगोळीने नटायचे. घराच्या चौकटी झेंडूच्या फुलांनी सजायच्या. गोडधोड पुरणपोळीचा स्वयंपाक खाताना ही आईच्या मायेचा गोडवा जणू त्यात उरलाय असं वाटायचे. येथेच्छ भोजनानंतर मग वेध लागायचे. ते म्हणजे सगळ्या मैत्रिणी मिळून साडी नेसूनच सोनं लुटायला बाहेर पडण्याचे. त्यावेळी फोन नव्हते. त्यामुळे दुपारच्या वेळेत एखाद्या मैत्रिणीच्या घरी जमा होऊन. तिथे साडी नेसून साजशृंगार करण्याची गडबड चालू होतं असे. या सगळ्यासाठी आरामात सायंकाळ होत. पण कुणालाच,कसलीही घाई नसायची. छान आटोपल्यावर मग ‘ग्रामदैवताची’ पालखी सिमोल्लंघणासाठी गावात यायची. प्रथम त्याचे दर्शन घेऊन. आम्ही मैत्रिणी ‘ सोने लुटण्यासाठी’ मग बाहेर पडत.

त्यानंतर लहान, थोरांना नमस्कार करुन, पुजन केलेली ती शमीची पाने त्यालाच आपट्यांची पाने सुध्दा म्हणतात. तर मग हृदयाचे आकार असलेले ते सोने. त्यादिवशी ह्दयापेक्षा ही किंमती वाटत असे. आणि मग, ‘सोनं घ्या सोन्यासारखं राहावा.’असे म्हणून ते सोनं लुटता,लुटता कधी अंधार पडला हे समजायचे सुध्दा नाही. गावात पायी,पायी सर्वांच्या घरात जाऊन.सोने लुटण्याचा कार्यक्रम होत असे. अगदी न थकता हे सगळं घडायचे. अगदी इथेच या तरुण वयात मग दसऱ्याच्या निमित्ताने मनात रुजले गेले ते माणुसकीचे बिज. हृदयाचा आकार असणाऱ्या या पानांनी हृदयात सोन्यासारख्या माणसांचे प्रेम दाखवून दिले. म्हणून या वयातील हा माझ्या आठवणीतला असाच हा दसरा.

त्यानंतर मग लग्नानंतरचा दसरा. नवख्या गावात, नवख्या माणसांच्यात जाऊन साजरा झालेला नवलाईचा दसरा. नववधू प्रमाणेच अगदी हसरा,नाचरा असा वाटला. त्यानंतर म्हणजे आता मुलं मोठी झाली. सुनबाई आल्या. अशा आयुष्याच्या या टप्प्यावरचा दसरा सुध्दा एक वेगळेपण देऊन गेला. कारण आता कुलाचाराप्रमाणे नवरात्रीचे देवीचे उपवास म्हणजेच नवरात्र पकडले. शेतातल्या वावरीत मृतिकेचा घट बसवून .त्या मातीत विविध बीज रोवून. एक सृजनशीलतेचे ते देवीचे रुप नऊ दिवस पाहताना. तिच्यापुढे अखंड जळणाऱ्या नंदादिपा प्रमाणे चेहरा उजळून गेला होता. नवरात्रीची ही देवीची नऊ रुपे म्हणजे स्त्री शक्तीची विविध रुपे आहेत. हे नव्याने समजून आले होते. वाईट गोष्टींचा नाश करून चांगल्या सोन्यासारख्या गुणांचा विजयोत्सव साजरा करणारा हा दिवस म्हणजे दसरा.

असा हा ” माझ्या आठवणीतला दसरा” नेहमीच मनोपटलावर अविस्मरणीय क्षणांची सुवर्ण उधळण करीत असणारा असाच असतो.

माझ्या आठवणीतला दसरा | Best Marathi Article On Dasara 2023

समाप्त.

साहित्यबंध समूहाची माहिती आणि जाहिरात

दिवसेंदिवस मराठी भाषेवर इतर भाषेतील शब्दांचा अतिरेक होत आहे. कित्येक मराठी शब्द तर नवीन पिढीच्या कानावर देखील पडले नाहीत. यामुळे पुढे जाऊन मराठी भाषा हळू हळू लुप्त होईल अशी आम्हाला भीती आहे. लिहिणे, बोलणे, ऐकणे आणि वाचणे ह्यातूनच मराठी भाषा अनंत काल टिकू शकते.

marathi lekh katha nibandh

त्यामुळे नवनवीन साहित्यिक मराठी भाषेतून निर्माण होणे ही काळाची गरज आहे. तसेच लेखकांचा पुरेसा सन्मान मिळणे आणि त्यांना योग्य प्लॅटफॉर्म उपलब्ध होणे त्याचबरोबर साहित्य चोरी थांबवणे या उद्देशातून आम्ही हा समूह तयार केला आहे.

मराठी भाषेच्या प्रती आमचे जे कर्तव्य आहे ते पार पाडण्याचा हा छोटासा प्रयत्न. तुम्ही देखील मराठी भाषेप्रती आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी हा समूह जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आमची मदत करा.

लक्षात घ्या की ह्या समूहाची सभासद फी ५०₹ प्रती महिना आहे. सभासद फी 9146494879 या Gpay किंवा PhonePe नंबर वर टाकल्यानंतर ग्रुप मध्ये add केले जाईल. एकदाच वार्षिक सभासदत्व घेणाऱ्यांना फी मध्ये १०० ₹ सूट मिळेल.

या मासिक सभासदत्वामध्ये तुम्हाला मिळेल

१) साहित्यक्षेत्रातील प्रगतीसाठी ४ साप्ताहिक स्पर्धा

२) सहभागासाठी आकर्षक डिजिटल प्रमाणपत्रे

३) स्पर्धेतील तुमचे चार लेख सुप्रसिद्ध अशा मराठी टाईम वेबसाईटवर पब्लिश केले जातील. ज्याची लिंक तुम्ही कुठेही शेअर करू शकता.

४) तुमचा फोटो आणि लेखाच्या नावासहीत चार सुंदर वॉलपेपर.

५) लेख त्याच्या विषयाला अनुसरून छान वॉलपेपरसने सजविला जातील.

६) तुमचा लेख गुगल सर्च मध्ये आणण्यासाठी SEO techniques वापरल्या जातील.

तुमच्या एका लेखावर अंदाजे ५००₹ चे काम केले जाईल म्हणजे ५०₹ च्या सभासद फी मध्ये ४ लेखांवर होणारे २०००₹ चे फायदे तुम्हाला मिळणार आहेत

https://chat.whatsapp.com/JDA5qGHXn43IofHbacHWBd

9146494879 या Gpay/ PhonePe नंबरवर एका महिन्याची ५०₹ फी किंवा वर्षाची ५००₹ सभासद फी पाठवा. Payment कमेंट मध्ये स्वतःचे नाव टाका. आणि वरील ग्रुप लिंकला जॉईन व्हा.

आमच्या समूहातील कविता वाचण्यासाठी भेट द्या mazablog.online

माझ्या आठवणीतला दसरा | Best Marathi Article On Dasara 2023

दसरा मराठी माहिती

माझ्या आठवणीतला दसरा | Best Marathi Article On Dasara 2023

Leave a Reply

%d bloggers like this: