दिवाळी – मनात मुरलेली (भाग १) by प्रेमवेडी मी | Marathi Diwali Celebration 2023

साहित्यबंध समूह आयोजित साप्ताहिक स्पर्धेत प्रेमवेडी मी यांनी Marathi Diwali Celebration या कीवर्ड वर आधारित “दिवाळी – मनात मुरलेली” हा लेख लिहिला आहे. चला तर वाचूया.

दिवाळी – मनात मुरलेली (भाग १) Marathi Diwali Celebration

दिवाळी म्हणजे सणांचा राजा च,सर्वत्र लखलखाट, आनंदी उच्छाही वातावरण, शाळेला सुट्टी, नवीन कपड्यापासून तयारी,सर्वच कशी गम्मत असायची, खर तर सणांची खरी मज्जा लहानपणीच जास्त घेतल्या जाते,कारण सर्व आपल्या लहनांसाठीच तर असतं,हो की नाही??☺️😊

दिवाळी आली की सर्वांना खूप आनंद होतो . सर्वात मोठा सण असतो ,मस्त चार-पाच दिवस चालणारा . फराळाचे वेगवेगळे पदार्थ , पक्वान्नांची रेलचेल, फटाक्यांची आतीशबाजी . सण साजरे करण्याच्या पद्धतीत बदल जरूर घडताहेत . पण आज ही ब-याच घरांमधे दिवाळी पारंपारिक पद्धतीनेच साजरी होते .

दिवाळी – मनात मुरलेली (भाग १) by प्रेमवेडी मी | Marathi Diwali Celebration 2023

दिवाळी - मनात मुरलेली (भाग १) by प्रेमवेडी मी | Marathi Diwali Celebration 2023

दिवाळी – मनात मुरलेली (भाग १) by प्रेमवेडी मी | Marathi Diwali Celebration 2023

मला आठवते ती मनात घर करून बसलेली लहानपणची दरवर्षीची दिवाळी . एकतर शाळेला चांगली दहा-पंधरा दिवसाची सुट्टी , फराळाचे जिन्नस (जे त्याकाळी क्वचितच वर्षभर केले जात) , फटाके आणि भावडांची भेट . आमच्या आजोबांनी १९३९ साली गावाबाहेर जागा घेऊन भरपूर मोठा बंगला बांधला – स्वतःची सर्व पूंजी लावून आणि गरज न भागल्याने आजीने आनंदाने स्वतःचं स्त्रीधन विकून . त्याकाळी वीज नाही , पाणी नाही , संध्याकाळ झाली की दारं लावून घरात बसणे कारण कोल्हे-लांडगे येत , अशा परिस्थितीत ते राहिले .पण या त्यांच्या त्यागाची रसाळ फळं आम्हां नातवंडाना चाखायला मिळाली . आमच्या घरी धनाची श्रीमंती नव्हती , पण मनाची श्रीमंती भरपूर होती . पैपाहूणा तर सतत असणारच . मग दिवाळीला तर विचारूच नका . उगाच उधळपट्टी आणि बडेजाव नाही , पण करायचं ते सर्वांसाठीच व्यवस्थित .

दिवाळी – मनात मुरलेली (भाग १) by प्रेमवेडी मी | Marathi Diwali Celebration 2023

दर दिवाळीत माझ्या दोन्ही आत्या , काका हे सहकुटुंब येत . त्यांची तशी पत्रे आली की जवळजवळ महिनाभर आधीच तयारी सुरू होत असे . आजी आणि आईचं खलबत होऊन त्या आठवड्याभराचं नियोजन ठरे . मग आजी महिनाभर आधी आमच्याकडे येणाऱ्या आचारीबुवांना पत्र पाठवत असे . हे राधाकृष्णअय्या (त्याकाळी हे सर्व स्वयंपाकी तेलंगण भागातून येत , आणि नागपूरला खोल्या घेऊन रहात , त्यांना “अय्या” म्हणत) साधारण दिवाळीच्या पंधरा दिवस आधी येत . मग त्यांच्यासोबत आजी आणि आई यांची चहाबैठक होत असे आणि फराळाचे जिन्नस प्रत्येकी किती करायचे ते ठरत असायचे . मग त्यांना लागणाऱ्या सामानाची यादी ते अय्या बनवून द्यायचे . आमच्या घरी पाडवा किंवा भाऊबीजेच्या दिवशी नागपूरला असणाऱ्या सर्व नातेवाईकांना जेवायला आमंत्रण होत होतं, फराळाची यादी झाली की त्या जेवणावळीचा बेत ठरे . त्यासाठी लागणाऱ्या सामानाची यादी वेगळी तयार होई .

दिवाळी – मनात मुरलेली (भाग १) by प्रेमवेडी मी | Marathi Diwali Celebration 2023

यानंतर घरातलं वातावरण एकदम उत्साही होत असे . सर्वात आधी घराची साफसफाई सुरू होई . यासाठी दोन रविवार राखीव . आमच्या घरात हक्काने येणारे “सिलारेमहाराज” या साफसफाईसाठी यायचे (हा चंदू या नावानी आमच्या सर्व नातेवाईकांना माहिती असलेला ,९-१० वर्षांचा मुलगा आजीला घरासमोरच्या भागात फिरतांना दोन-चारदा दिसला , तिने त्याला बोलावून चौकशी केली . तो परिस्थितीमुळे कामाच्या शोधात आहे कळल्यावर त्याला खाऊनपिऊन पगार देऊन बोलावून घेतलं . स्वतःच्या मुलासारखं त्याला वाढवून अगदी लग्न लावून संसार थाटून दिला .

दिवाळी – मनात मुरलेली (भाग १) by प्रेमवेडी मी | Marathi Diwali Celebration 2023

माझ्या वडिलांपेक्षा मोठे असल्यामुळे मी त्यांना महाराज म्हणत असे आणि ते ही माला परसनदादा म्हणत). रविवारी सकाळी साडेसातच्या सुमारास महाराज येत , मग त्यांना कॉफी व नाश्ता आणि मला चहा व नाश्ता , मग आम्ही कामाला लागत असू – अर्ध्या घराची साफसफाई एका रविवारी व उरलेल्या अर्ध्या घराची पुढच्या . याच कामात जास्तीच्या गाद्या , उशा , चादरी उन्हात तापवण्यासाठी गच्ची स्वच्छ करून तिथे पसरवणं . मधे साडेअकराच्या सुमारास कॉफीब्रेक व परत अडीच-तीन पर्यंत काम . त्यानंतर स्वच्छ होऊन आमची दोघांची जेवणं . जेवणाच्या वेळी आजी तिच्या या मुलाला कोणकोण पाहुणे केव्हा येणार , दिवाळीचं जेवण कोणत्या दिवशी ही इत्तंभूत बातमी देत असे आणि त्याला जेवणाचं निमंत्रणही .

दिवाळी – मनात मुरलेली (भाग १) by प्रेमवेडी मी | Marathi Diwali Celebration 2023

नात मुरलेली (भाग १) by प्रेमवेडी मी | Marathi Diwali Celebration 2023

दिवाळी – मनात मुरलेली (भाग १) by प्रेमवेडी मी | Marathi Diwali Celebration 2023

माझा सर्वात मोठा आतेभाऊ आमच्याकडेच शिकायला राहिला होता , तो स्टेटबँक मधे कामाला होता , त्याची ब्रांच कित्येक वर्ष ठोकबाजारात होती . दिवाळीच्या दोन-तीन दिवस आधी तो तिथून मोठ्ठा खोका भरून फटाके आणी . आम्ही पण आईच्या मागे भुणभुण करून खोकाभर फटाके आणत असू . याच वेळेस अय्यांचे फराळ बनवणेही चाले (अनरसे , करंज्या , चिरोटे मात्र आजी आणि आई बनवत). आमच्या सुट्टीची सुरूवात मग यांच्या मधे लुडबुड करण्यात जाई . फराळाचे डबे भारायला लागणे , मग ते कपाटात उचलून ठेवणे ही कामं करणे . आकाशकंदिल , दिव्यांची माळ लावणे .
साधारण दिवाळीच्या दोन दिवस आधी पाहूणे येत आणि दिवाळी सुरू होई . गप्पा , खेळ आणि त्यांनी आणलेला खाऊ हादडणे . आम्हां भावडांचे चार-पाच दिवसाचे प्लॕन्स तयार होत . त्यात मुख्यत्वे कोणते फटाके केव्हा लावणे .
वसुबारस , धनत्रयोदशी पासून सुरू झालेल्या दिवाळीची खरी रंगत येई ती नरकचतुर्दशी पासून .

दिवाळी – मनात मुरलेली (भाग १) by प्रेमवेडी मी | Marathi Diwali Celebration 2023

पहाटे साडेचार पासूनच घराला जाग येई . उठल्यावर आकाशकंदिल आणि माळ सुरू करणे व देवघरात आणि व्हरांड्यात पणत्या लावणे झाल्यावर चहा . हे होईपर्यंत सिलारेमहाराज येत . आजही मला या माणसाचं कौतुक वाटतं कारण जवळजवळ दहा किलोमीटर दुरून सायकल चालवत साठीच्या घरातला हा तरुण पहाटे पाच वाजता हजर , सगळ्या पुरुषांना तेल लावून द्यायला . छान पाट मांडून बाजूने रांगोळी काढून ठेवलेली असे . त्यावर बसून महाराजांच्या हातून मस्त तेल मालिश झालं की गरम पाण्यानी आंघोळ करण्यात मजा येई आणि हो खास दिवाळीसाठी आणलेला मोती साबण व उटणं लावून . प्रत्येकाच्या अंघोळीच्या वेळेस न्हाणीघराबाहेर फटाके लावणे हा कार्यक्रम , वकूबाप्रमाणे फटाका – मोठ्यांच्या वेळेला लक्ष्मीबाँब आणि पोरांच्या वेळेस सुतळी .

दिवाळी – मनात मुरलेली (भाग १) by प्रेमवेडी मी | Marathi Diwali Celebration 2023

हा सोहळा आटपेपर्यंत आजीची देवपूजा होऊन आईने फराळाचा नैवेद्य देवाला दाखवला असायचा . मग आजीच्या हस्ते महाराजांच्या कुटुंबासाठी फराळाचे डबे व कपडे देऊन त्यांचा मान केला जाई . तोपर्यंत घराच्या दारांना तोरणे बांधणे हे मुलांचं व अंगणात सडा टाकून रांगोळी घालणे हे मुलींचं काम . आमच्या घराच्या समोरच्या भागातल्या चार खोल्यांना मिळून बाहेरच्या दोन व्हरांड्यांमधे उघडणारी पाच दारं होती . या पाचही दारांसाठी तोरणं अदल्या दिवशी अंगणातल्या अंब्याची पानं काढून केली असायची . तसेच बागेतली फूलं काढून सर्व दारांना फूलांच्या माळाही केलेल्या असत . आणि हो देवघराला तोरण आणि माळ .

दिवाळी – मनात मुरलेली (भाग १) by प्रेमवेडी मी | Marathi Diwali Celebration 2023

आठच्या सुमारास फराळाच्या थाळ्या भरल्या जात व मग सगळ्यांचा चहाफराळ रंगे . आग्रहाने हादडलेले लाडूकरंज्या पचवायला आम्ही पळत असू अंगणात खेळायला . पण अंगणात जाण्याआधी माळीबुवा आणि कामवालीसाठी फराळ काढून द्यायला वरच्या कपाटातले डबे काढून देणे हा टॕक्स भरावा लागे . त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांसाठी फराळ व कपडे देणे हे ओघानीच येई .घराभोवती चारी बाजूंनी मोठे अंगण होते , भरपूर झाडं . चांगले तीनचार तास भरपूर खेळून दुपारच्या जेवणावर ताव मारायला तयार . दुपारी वडील मंडळी वामकुक्षी करत . आणि आम्ही अंगणात – पेरुच्या झाडांचे पेरु , सिताफळाच्या झाडांवरची पिकलेली सिताफळं तोडून खाणे हे उद्योग करत असू . एव्हढी भूक तेव्हा कशी लागायची याचं आश्चर्य वाटतं . याच्या आधीही एक टॕक्स आणखी द्यावा लागे . कामवाली बाई दुपारी परत येई त्यावेळेस तिला घरी पक्वान्न वगैरे देण्यासाठी टिफीनकॕरियर काढून द्यावे लागत.

भाग १) by प्रेमवेडी मी | Marathi Diwali Celebration 2023

दिवाळी – मनात मुरलेली (भाग १) by प्रेमवेडी मी | Marathi Diwali Celebration 2023

संध्याकाळी केव्हा एकदा अंधार होतो,नवीन कपडे घालून मिरवता येणार आणि फटाके लावायला मिळणार याची आतूरतेनी वाट पाहिली जायची . त्यासाठी आकाशकंदिल व दिव्यांची माळ सुरू करणे आणि पणत्या लावणे हे आनंदात केलं जायचं . अंधार पडला की व्हरांड्यात खूर्च्या मांडून मोठ्यांना नवीन कपडे घालून तयार होऊन बसलेलं खूप छान वाटायचं हे सर्व बघून,आणि ते आमचं कौतुक बघायचे, त्यांच्या देखरेखीखाली अंगणात फटाके लावणं हा दीड-दोन तासाचा कार्यक्रम . मोठ्यांचं दुर्लक्ष झालं की फूलबाज्यांचे आकोडे करून ते उंच झाडांवर फेकून लटकवणे , बाँब लावायला घेतलेली उदबत्ती संपत आली की तिच्या टोकाजवळ बाँबची वात बांधून अंगणात दूर ठेऊन देऊन टाईमबाँब करणं , हे भावांचे उगाच नसते उद्योग !

दिवाळी – मनात मुरलेली (भाग १) by प्रेमवेडी मी | Marathi Diwali Celebration 2023

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सर्वांच्या उपस्थितीत बाबा लक्ष्मीची साग्रसंगीत पूजा करायचे,आम्ही मागे मोठी सतरंजी वर बसून पूजेचा आनंद घेत असायचो, देवीनी कधी ही काही कमी पडू दिलं नाही .त्या वयात मात्र पूजा , आरती , प्रसाद हे फटाक्यांमधे अडथळाच वाटयाचं, . सर्व लक्ष बाहेर, अरे यार केव्हा सँपेल पूजा लवकर प्रसाद द्या,आणि फटाके फोडायला चला न,हीच भुणभुण हळूहळू सुरू असायची,आई हळूच डोळे मोठे करून बघायची,

दिवाळी – मनात मुरलेली (भाग १) by प्रेमवेडी मी | Marathi Diwali Celebration 2023

असेच दिवाळीचे 4 ही दिवस मजेत आनंदात जायचे,तेव्हा थँडी ही आपल्या जोमात पडायची जबरदस्त,अभंग्यस्नान म्हंटलं की अंगावर काटाच उभा राहायचा, पण आता सर्वच बदललंय,पहिलेसारखी थँडी पडत नाही, आज कालची मुलं सक्काळी अभंग्य स्नानाला उठायचा कंटाळा करतात, भाऊबीजेला भाऊबहिणींची वेगळीच गम्मत असते, सकाळ पासून भावाच्या मागे भुणभुण ओवाळणीत काय देणार,मग तो 5 पैसे दाखवायचा, त्यातही भांडभांडी, व्हायची,पण शेवटी छान ओवाळणी मिळायची बर का, अहो शेंडेफळ न मी लडोबा सर्वांची, आजही माझ्या माहेरी सर्व मिळून 57 मेंबर्स होतात, भाऊबीज पाडवा सतत बघिच्यात एकत्र मनवतात,ती एक वेगळीच मजा असते,फक्त मी प्रत्येकवेळी जाऊ शकत नाही,याचंच दुःख वाटत मनाला,

 प्रेमवेडी मी | Marathi Diwali Celebration 2023

दिवाळी – मनात मुरलेली (भाग १) by प्रेमवेडी मी | Marathi Diwali Celebration 2023

चारपाच दिवस कसे आले , कसे गेले समाजायचंच नाही . साधारण भाऊबीजेच्या दुसऱ्या दिवसापासून एक एक जण परत निघे . मानाला एक हुरहुर लागे . हसूआंसू अशा संगमात निरोप घेतले जात होते, पुढच्या दिवाळीत परत भेटण्यास वचने घेतली जात होती,मग मात्र रिकामं घर , मोकळं अंगण ! सर्वच सुनंसुनं हल्ली आता असं मोठी घरही उरली नाहीत , (फ्लॕटला अंगण ही नाही की झाडं ही नाहीत , भूक आपोआपच मंद झाली आहे , फटाके फोडणं दाटीवाटीनी फ्लॕट स्कीम्स झाल्याने बरेच वार्षांपासून बंद केलं – प्रदूशण वाढतं म्हणून), उच्छाहीआजीआजोबाही नाहीत , बरीच वडीलधारी मंडळी हयात नाहीत आणि आहेत त्यांना येववत नाही आणि ज्यांना यांवस वाटतं यांना वेळ नाही . आता दिवाळी त्रिकोणी-चौकोनी कुटूंबात . नातेवाईकांसोबत दिवाळी व्हाॕट्स्अॕप , फेसबुक , फोन किंवा फारचफार व्हिडीओकॉल यातच होत चाललीये,

पुन्हा एकदा जगावी पहिलेसारखी दिवाळी आनंदाने सर्वांच्या सोबतीने,

प्रेमवेडी मी

दिवाळी – मनात मुरलेली (भाग १) by प्रेमवेडी मी | Marathi Diwali Celebration 2023

Marathi Diwali Celebration 2023

समाप्त.

साहित्यबंध समूहाची माहिती आणि जाहिरात

दिवसेंदिवस मराठी भाषेवर इतर भाषेतील शब्दांचा अतिरेक होत आहे. कित्येक मराठी शब्द तर नवीन पिढीच्या कानावर देखील पडले नाहीत. यामुळे पुढे जाऊन मराठी भाषा हळू हळू लुप्त होईल अशी आम्हाला भीती आहे. लिहिणे, बोलणे, ऐकणे आणि वाचणे ह्यातूनच मराठी भाषा अनंत काल टिकू शकते.

marathi lekh katha nibandh

त्यामुळे नवनवीन साहित्यिक मराठी भाषेतून निर्माण होणे ही काळाची गरज आहे. तसेच लेखकांचा पुरेसा सन्मान मिळणे आणि त्यांना योग्य प्लॅटफॉर्म उपलब्ध होणे त्याचबरोबर साहित्य चोरी थांबवणे या उद्देशातून आम्ही हा समूह तयार केला आहे.

मराठी भाषेच्या प्रती आमचे जे कर्तव्य आहे ते पार पाडण्याचा हा छोटासा प्रयत्न. तुम्ही देखील मराठी भाषेप्रती आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी हा समूह जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आमची मदत करा.

लक्षात घ्या की ह्या समूहाची सभासद फी ५०₹ प्रती महिना आहे. सभासद फी 9146494879 या Gpay किंवा PhonePe नंबर वर टाकल्यानंतर ग्रुप मध्ये add केले जाईल. एकदाच वार्षिक सभासदत्व घेणाऱ्यांना फी मध्ये १०० ₹ सूट मिळेल.

या मासिक सभासदत्वामध्ये तुम्हाला मिळेल

१) साहित्यक्षेत्रातील प्रगतीसाठी ४ साप्ताहिक स्पर्धा

२) सहभागासाठी आकर्षक डिजिटल प्रमाणपत्रे

३) स्पर्धेतील तुमचे चार लेख सुप्रसिद्ध अशा मराठी टाईम वेबसाईटवर पब्लिश केले जातील. ज्याची लिंक तुम्ही कुठेही शेअर करू शकता.

४) तुमचा फोटो आणि लेखाच्या नावासहीत चार सुंदर वॉलपेपर.

५) लेख त्याच्या विषयाला अनुसरून छान वॉलपेपरसने सजविला जातील.

६) तुमचा लेख गुगल सर्च मध्ये आणण्यासाठी SEO techniques वापरल्या जातील.

तुमच्या एका लेखावर अंदाजे ५००₹ चे काम केले जाईल म्हणजे ५०₹ च्या सभासद फी मध्ये ४ लेखांवर होणारे २०००₹ चे फायदे तुम्हाला मिळणार आहेत

https://chat.whatsapp.com/JDA5qGHXn43IofHbacHWBd

9146494879 या Gpay/ PhonePe नंबरवर एका महिन्याची ५०₹ फी किंवा वर्षाची ५००₹ सभासद फी पाठवा. Payment कमेंट मध्ये स्वतःचे नाव टाका. आणि वरील ग्रुप लिंकला जॉईन व्हा.

आमच्या समूहातील कविता वाचण्यासाठी भेट द्या mazablog.online

दिवाळी – मनात मुरलेली (भाग १) by प्रेमवेडी मी | Marathi Diwali Celebration 2023

Amazon Diwali Offers in Marathi

Leave a Reply

%d bloggers like this: