MARATHI KAVITA ON MARRIAGE | लग्न marathi poem on marriage
लग्न म्हणजे काय असते, लग्न म्हणजे बंधन असते
शब्दांचा मांडून खेळ, होता दोन जीवांचा मेळ
हृदयाशी हृदय मिळते, मनाशी मन जुळते
यातून एक बंधन निर्माण होते, हे बंधन म्हणजेच लग्न असते

जीवाला जीव लावणारे, एक जीव मिळते
मनाला आधार द्यायला, एक साथ मिळते
एका हाताला आणखी, एक हात मिळते
यातून एक बंधन निर्माण होते, हे बंधन म्हणजेच लग्न असते
एका जीवाशी एक जीव जुळता, एका कुटुंबाशी एक कुटुंब ही जुळते
अनोळखी हे नाते क्षणार्धात, ओळखीचे वाटू लागते…
अन् सुख असो वा असो दुःख, सारेच पेलायचे बळ येत
यातून एक बंधन निर्माण होते, हे बंधन म्हणजेच लग्न असते
दुःखास वाटेकरी होण्यास येते, अश्रू पुसण्या गळ्यात पडते
अन् दुखमय चेहऱ्यालाही, हसण्यास भाग पाडते
साता जन्माची रेशीमगाठ, एकाच जन्मी बांधून घेते
यातून एक बंधन निर्माण होते, हे बंधन म्हणजेच लग्न असते
बांधून साता जन्माची रेशीमगाठ, कैक वचने मागून घेते
पूर्ण कराया दिलेली वचने, आपुले प्राण पणाला लावते
तरीही संसाराची ज्योत, निरंतर पेटती राहते
यातून एक बंधन निर्माण होते, हे बंधन म्हणजेच लग्न असते
संसाराची ही पेटती ज्योत, खंड न पडणारी अखंड असते
आले कितीही जरी वादळे, ती मनी सामावून घेत असते
अन् एकमेकांच्या साथीने, सर्वांना सोबत धरून असते
यातून एक बंधन निर्माण होते, हे बंधन म्हणजेच लग्न असते
लग्न म्हणजे काय असते, एका शब्दात सांगणे शक्य नसते
लग्न म्हणजे काही नसते, दोन जीवांचा मेळ असते
जणू भातुकलीचा खेळ असते, एक रडते तर दुसरा हसवते
एक रुसते तर दुसरा मनवते, अन् सुख दुःखाच्या या संसारात
असेच निरंतरपणे चालत असते, यातून एक बंधन निर्माण होते
हे बंधन म्हणजेच लग्न असते, हे बंधन म्हणजेच लग्न असते
MARATHI KAVITA ON MARRIAGE | लग्न मराठी कविता | marathi poem on marriage समाप्त
अशा प्रकारचा नवीन नवीन मराठी साहित्याचा खजाना आम्ही घेऊन येण्याचा नेहमी प्रयत्न करत असतो. तुम्हाला आमचा प्रयत्न आवडल्यास नक्की कळवा.
आमचे इतर मराठी कविता ब्लॉग
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह
कवी आशु छाया प्रमोद (रावण)

बाप कविता | माझा बाप | Baap Kavita Marathi
11 thoughts on “MARATHI KAVITA ON MARRIAGE | लग्न म्हणजे काय असते ? 8 कविता”