सणांचे बदलते स्वरूप BY आशु छाया प्रमोद (रावण) | Marathi San Mahiti 2024

साहित्यबंध समूह आयोजित साप्ताहिक स्पर्धेत आशु छाया प्रमोद (रावण) यांनी Marathi San Mahiti या कीवर्ड वर आधारित “सणांचे बदलते स्वरूप” हा लेख लिहिला आहे. चला तर वाचूया.

सणांचे बदलते स्वरूप | Marathi San Mahiti

साहित्यबंध समूह
उपक्रम क्रमांक -४
लेख विषय – सणांचे बदलते स्वरूप

सणांचे बदलते स्वरूप | Marathi San Mahiti

आपला भारत देश हा विविधतेने नटलेला आहे म्हणतात त्यामुळे आपल्या देशात विविध प्रकारचे सण साजरे केले जातात. विशेषतः आपल्या महाराष्ट्रामध्ये अनादी काळापासून विविध प्रकारचे सण उत्सव साजरे केले जातात हे आपल्याला वेगळं सांगायची गरज नाही. मात्र काळानुसार जशी माणसे बदलत गेली तशीच संस्कृती सुद्धा हळुवारपणे बदलत गेली त्यास आपले सण उत्सव तरी का अपवाद ठरावे? गेल्या काही वर्षात आपण बारकाईने सण उत्सव साजरे करण्याच्या पद्धती मध्ये लक्ष दिलं तर आपल्या लक्षात येईल की काळानुसार सण उत्सव साजरे करण्याचे स्वरूप सुद्धा बदलत गेले. त्यामुळे मी तुम्हाला याच बदलत्या सणांचे स्वरूप तुमच्या समोर लेखणी च्या माध्यमातून मांडणार आहे.

सणांचे बदलते स्वरूप | Marathi San Mahiti

आपल्या महाराष्ट्रात काही प्रमुख सण आपण मोठ्या उत्साहाने साजरे करत आहोत जसे की होळी-रंगपंचमी, गणपती, नवरात्री तसेच केवळ आपल्या महाराष्ट्रापुरताच मर्यादित नसून संपूर्ण भारतात साजरा होणारा सर्वात मोठ्ठा आणि विशेष करून लहान मुलांना आवडणारा सण म्हणजे दिवाळी. हे सर्व सण आजचे नसून अनादी काळापासून मोठ्या हर्ष आणि उत्साहाने साजरा होत आहे परंतु गेल्या काही वर्षात या सणांचे स्वरूप च पूर्णतः बदलत गेले. यात नाही धार्मिकता दिसून येत आणि नाही लोकांमध्ये पूर्वी सारखा उत्साह दिसून येत. त्यांच्या या पद्धतींना आनंद म्हणून बघितलं तर आपल्याला त्यांच्या आनंदाची व्याख्या देखील बदलतांना आढळून येईल. आपल्या पूर्वजांनी प्रत्येक सण साजरे केले त्यामागे धार्मिक हेतू सोबतच शास्त्रीय कारणे सुद्धा दडलेले आहेत. याचा सुद्धा हल्ली विचार केला जात नाही. फक्त पिढी दर पिढी चालत आलेली परंपरा आणि आनंद म्हणून सण साजरे केले जातात. त्याबद्दल देखील आपल्याला विचार करणे गरजेचे आहे असं मला वाटते

सणांचे बदलते स्वरूप | Marathi San Mahiti

सणांचे बदलते स्वरूप BY आशु छाया प्रमोद (रावण) | Marathi San Mahiti 2024

आता सर्वात प्रथम आपण होळी आणि रंगपंचमी चा विचार केला तर या सणामागील धार्मिक कारण तर सर्वांना ज्ञात आहेच यात काडीमात्र शंका नाही परंतु यामागे काही शास्त्रीय कारणे सुद्धा दडलेले आहेत. परंतु हे न जाणून घेता अती शिकलेली लोकं या सणाकडे अंधश्रद्धा म्हणून कानाडोळा करतात. आपण पाहिलं तर ह्या सणाच्या काळात लोकं आणि विशेष करून आपले शेतकरी बांधव हे नुकतेच आपली काम संपवून थकलेली असतात शिवाय या वेळी नुकतीच थंडी संपून उन्हं वाढायची सुरवात झालेली असते. हा शेतकऱ्यांचा थकवा आणि नुकतीच सुरवात झालेली उन्हं घालविण्यासाठी एक मेकांना रंग लावून आणि पाणी उडवून साजरी केली जाते. तसेच होळी पेटवून त्यातून निघणाऱ्या आगीच्या तापमानामुळे आपल्या शरीरातील तसेच पर्यावरणातील जंतूंचा नाहीनाट होतो त्यामुळे शरीर आणि पर्यावरण शुद्ध केला जातो. परंतु लोकं हे शास्त्रीय कारण माहिती न करता अंधश्रद्धा म्हणून याकडे दुर्लक्ष करतात. शिवाय रंगपंचमी मध्ये प्रतिशोध म्हणून किंवा एक आनंद म्हणून अनैसर्गिक रसायन युक्त आणि एकाएकी न निघणारे रंग लावतात त्यामुळे शरीराला खूप मोठी इजा होण्याची शक्यता असते.

सणांचे बदलते स्वरूप | Marathi San Mahiti

आता आपण गणेशोत्सव आणि नवरात्री या सणांचा विचार केला तर लोकं या सणांची आतुरतेने वाट बघत असतात. गणेशोत्सव या सणाची सुरवात लोकमान्य टिळक यांनी केली होती ते स्वातंत्र्यपूर्व काळात जनजागृती करण्यासाठी तसेच सर्व समाजाने एकत्रित येऊन समोर असलेल्या समस्येला एकोप्याने तोंड देण्यासाठी तसेच गावा-गावातील मुलांमध्ये जन्मजात असलेल्या कलांना वाव मिळावा यासाठी परंतु आज असं दिसून येते की गणपती नवरात्री उत्सव मध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांच्या नावाने नुसता धांगडधिंगा चालतो. गावातील लहान मुलांना संधी न देता बाहेरच्या लावण्या डान्स हे हजारो पैसे देऊन ठेवला जातो. आणि नुसती पैशाची उधळण केली जाते. त्यात धार्मिकता सुद्धा हल्ली दिसून येत नाही कारण गणपती आणि नवरात्रीचे तेच 7 ते 8 दिवस मोठ्या भक्तिभावाने पूजा केली जाते आणि शेवटच्या दिवसी आनंद या नावाने दारू पिऊन नाचतात. काही मंडळ वाले गणेशोत्सव आणि नवरात्री मध्ये लहान मुलांना संधी देतात तसेच त्यांना प्रोत्साहनपर बक्षिसे देतात पण असे लोकं बोटावर मोजण्या एवढेच शिल्लक राहिलेली आहेत.

सणांचे बदलते स्वरूप | Marathi San Mahiti

आता फक्त महाराष्ट्रापुरताच मर्यादित नसून संपूर्ण देशात साजरा होणारा तसेच मुलांना आवडणारा सर्वात मोठ्ठा सण म्हणजे दिवाळी. ज्याला दिपावली असे सुद्धा म्हणतात. हा दिपावली सण दिप आणि आवली या दोन शब्दांपासून तयार झालेला आहे. त्यातला दिप म्हणजे दिवा आणि आवली म्हणजे पणती म्हणजेच रांग. याचाच अर्थ दिव्यांच्या पणती करून साजरा करणारा हा सण आहे. त्यामागे हेतू असा आहे की, दिप प्रज्वलन करून आपल्या अंधारलेल्या आयुष्यात काळोख संपवून प्रकाश आणुया असा आहे. ज्यामध्ये आई, आज्जी यांच्या हाताने चकल्या चिवळा अशी वेगवेगळी फराळे तयार करून सर्व कुटुंबासोबत हा सण साजरा केला जात होता

सणांचे बदलते स्वरूप | Marathi San Mahiti

तसेच या सणामध्ये फटाक्यांची आतिषबाजी सुद्धा केली जात होती. मात्र हल्ली फराळ सुद्धा रेडिमेड घेऊन आणलं जाते तसेच मोठ मोठी आणि मोठ्या प्रमाणात फटाक्यांच्या आतिषबाजी केली जाते. ज्यामुळे पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात र्हास होत आहे. याकडे दुर्लक्ष न करता दिवाळी फक्त फटाक्यांची आहे म्हणून मोठ मोठी फटाके फोडली जातात ज्यामुळे ध्वनी प्रदुषण तसेच हवा प्रदुषण सुद्धा मोठ्या प्रमाणात होत आहे. शिवाय वृद्ध लोकांना त्याचा सर्वात जास्त त्रास होतो याकडे ही कानाडोळा केला जातो. मला असं म्हणायचं नाही आहे की तुम्ही फटाक्यांची आतिषबाजी करू नका परंतु मोठ मोठी फटाके न घेता छोटी छोटी आणि कुणाला त्रास होणार नाही याची काळजी करून फटाक्यांची आतिषबाजी केला आणि जास्तीत जास्त दिप प्रज्वलन केला तर मला वाटते दिवाळी हा सण सार्थकी लागेल.

सणांचे बदलते स्वरूप | Marathi San Mahiti

आता तुमच्या नक्कीच लक्षात आलं असेल की मला नेमकं काय म्हणायचं आहे. आपण संस्कृतीच्या नावाने तर खूप ओरडतो आणि लोकांना सांगतो की आपली संस्कृती जपा म्हणून परंतु वास्तविक पाहता आपण स्वतःच त्यानुसार चालत नाही. आपल्या रूढी परंपरा का चालू झाल्या, त्यांचा महत्व नेमका काय आहे हे जाणून न घेता केवळ आणि केवळ असुरी आनंद मिळविण्यासाठी आपण सण साजरे करत आलोय आणि त्यामुळेच हल्ली सणांचे स्वरूप बदलत चालले आहे. हे वेळीच थांबविण्यासाठी आपले बंद झालेले डोळे वेळीच उघडा आणि तर्कशुद्ध पद्धतीने सणांकडे बघा आणि त्यामागील शास्त्रीय कारणे शोधून त्यानुसार सण साजरे करा त्यामुळे नक्कीच तुमचा लाभ होईल या काडीमात्र शंका नाही.

सणांचे बदलते स्वरूप | Marathi San Mahiti

धन्यवाद….

लेखक
आशु छाया प्रमोद (रावण)
उमरी/लवारी
ता. साकोली
जिल्हा:- भंडारा
7820994118

सणांचे बदलते स्वरूप | Marathi San Mahiti

समाप्त.

साहित्यबंध समूहाची माहिती आणि जाहिरात

दिवसेंदिवस मराठी भाषेवर इतर भाषेतील शब्दांचा अतिरेक होत आहे. कित्येक मराठी शब्द तर नवीन पिढीच्या कानावर देखील पडले नाहीत. यामुळे पुढे जाऊन मराठी भाषा हळू हळू लुप्त होईल अशी आम्हाला भीती आहे. लिहिणे, बोलणे, ऐकणे आणि वाचणे ह्यातूनच मराठी भाषा अनंत काल टिकू शकते.

marathi lekh katha nibandh

त्यामुळे नवनवीन साहित्यिक मराठी भाषेतून निर्माण होणे ही काळाची गरज आहे. तसेच लेखकांचा पुरेसा सन्मान मिळणे आणि त्यांना योग्य प्लॅटफॉर्म उपलब्ध होणे त्याचबरोबर साहित्य चोरी थांबवणे या उद्देशातून आम्ही हा समूह तयार केला आहे.

मराठी भाषेच्या प्रती आमचे जे कर्तव्य आहे ते पार पाडण्याचा हा छोटासा प्रयत्न. तुम्ही देखील मराठी भाषेप्रती आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी हा समूह जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आमची मदत करा.

लक्षात घ्या की ह्या समूहाची सभासद फी ५०₹ प्रती महिना आहे. सभासद फी 9146494879 या Gpay किंवा PhonePe नंबर वर टाकल्यानंतर ग्रुप मध्ये add केले जाईल. एकदाच वार्षिक सभासदत्व घेणाऱ्यांना फी मध्ये १०० ₹ सूट मिळेल.

या मासिक सभासदत्वामध्ये तुम्हाला मिळेल

१) साहित्यक्षेत्रातील प्रगतीसाठी ४ साप्ताहिक स्पर्धा

२) सहभागासाठी आकर्षक डिजिटल प्रमाणपत्रे

३) स्पर्धेतील तुमचे चार लेख सुप्रसिद्ध अशा मराठी टाईम वेबसाईटवर पब्लिश केले जातील. ज्याची लिंक तुम्ही कुठेही शेअर करू शकता.

४) तुमचा फोटो आणि लेखाच्या नावासहीत चार सुंदर वॉलपेपर.

५) लेख त्याच्या विषयाला अनुसरून छान वॉलपेपरसने सजविला जातील.

६) तुमचा लेख गुगल सर्च मध्ये आणण्यासाठी SEO techniques वापरल्या जातील.

तुमच्या एका लेखावर अंदाजे ५००₹ चे काम केले जाईल म्हणजे ५०₹ च्या सभासद फी मध्ये ४ लेखांवर होणारे २०००₹ चे फायदे तुम्हाला मिळणार आहेत

https://chat.whatsapp.com/JDA5qGHXn43IofHbacHWBd

9146494879 या Gpay/ PhonePe नंबरवर एका महिन्याची ५०₹ फी किंवा वर्षाची ५००₹ सभासद फी पाठवा. Payment कमेंट मध्ये स्वतःचे नाव टाका. आणि वरील ग्रुप लिंकला जॉईन व्हा.

आमच्या समूहातील कविता वाचण्यासाठी भेट द्या mazablog.online

सणांचे बदलते स्वरूप | Marathi San Mahiti

Navratri Information in Marathi

सणांचे बदलते स्वरूप | Marathi San Mahiti

Leave a Reply

%d bloggers like this: