पाहुणचार : अंधाऱ्या रात्री निर्जन रस्त्यात अडकलेल्या कुटुंबाची गोष्ट | Best Marathi Thriller Story 2023

साहित्यबंध समूहात केशवराव चेरकु यांनी Marathi Thriller Story या कीवर्ड वर आधारित “पाहुणचार” हा लेख लिहिला आहे. चला तर वाचूया.

पाहुणचार | Marathi Thriller Story

आम्ही सहकुटुंब नेहमी अमरावतीला आलो की तोंडगावला आत्या आणि मामांना भेटण्यासाठी हमखास जात असे. यावेळी अकोल्याला एक कार्यक्रम असल्याने मी, बायको आणि दोन वर्षाची मुलगी (मयुरी) मुबंईहून ट्रेनने अकोला येथे उतरलो. कार्यक्रमात सहभागी झालो. संध्याकाळी एक नाते वाईकाना भेटून सहाची परतवाडा बस पकडायची म्हणजे परतवाड्याहून तोंडगावला जाणारी साडेनऊची शेवटची बस मिळेल असे ठरवून निघालो.

तुम्ही वाचत आहात पाहुणचार | Best Marathi Thriller Story 2023

प्रथेनुसार नातेवाईक म्हणाले डेपो पर्यंत मी ही तुमच्या बरोबर येतो. तुम्हाला बस मध्ये बसवून मी परत जाईल. आम्हाला पण बर वाटल. डेपो पासुन जवळच त्यांच घर असल्यामुळे आम्ही पायीच जाणार होतो. बॅग पकडायला सोबत कोणी असेल तर बर होईल हे म्हणायच्या अगोदर, ते येतो म्हणाले त्यामुळे देवच पावला.

पाहुणचार : अंधाऱ्या रात्री निर्जन रस्त्यात अडकलेल्या कुटुंबाची गोष्ट | Best Marathi Thriller Story 2023

तुम्ही वाचत आहात पाहुणचार | Best Marathi Thriller Story 2023

बॅग त्यांच्या स्वाधीन करुन मी मुलीला उचलून घेतले. दहा मिनिटाच अंतर आहे. सहज पोहचू अस वाटत असताना पाच मिनिटे चालल्यावर पाहुण्याने काहीतरी पुटपुटत बॅग खाली ठेवली आणि माझ्याकडे वळून म्हणाला,” इथेच जवळ माझी बहीण राहते. तिने तुम्हाला बोलावल होत.” आपण तिला भेटून पाच मिनीटात निघु आणि मी बस मध्ये तुम्हाला बसवतो. मी ही मान डोलावली आणि पाहुण्यांच्या मागे निघालो. गावकऱ्या़ंचे पाच मिनीट म्हणजे काय असते हे तर आपल्याला माहीती आहे पण तरी ही परिस्थिती पुढे माणसाला गप्प राहाव लागतो. पाहुण्यांच्या बहिणीकडे जायला पंधरा मिनिटे लागले.

तुम्ही वाचत आहात पाहुणचार | Best Marathi Thriller Story 2023

या बसा चहा करते म्हणून पाहुण्यांची बहीण आत गेली. गेल्यानंतर वीस मिनिटे झालीत तरी बाई बाहेर येईना. वेळ जसजसा जात होता तसतसा मी अस्वस्थ होत होतो. शेवटी मी पाहुण्यांना म्हणालो, “अहो बघा जरा त्या ताई काय करतात ते”. पाहुणा रिलॅक्स मुड मध्ये होता म्हणाला “चहा करत असेल येईलच थांबा” म्हणत परत गप्पा मारायला सुरु झाला. माझा राग अनावर होत होता. बायको कडे बघितले तर तिच्या चेहऱ्यावर वेगळाच भाव, घेण तुझेच नातेवाईकांना! कळल आता कसे आहेत ते? तुमचे सगळे नातेवाईक असेच! त्यांना आणि तुम्हालाही काळवेळ नाही. केव्हा ही काही करतात. तुम्हाला मोठा पुळका घ्या आता. आता काय म्हणावे तेच कळेना.

तुम्ही वाचत आहात पाहुणचार | Best Marathi Thriller Story 2023

शेवटी अर्धा तासानी बाई बाहेर आल्या आणि म्हणाल्या अहो यांची नाईट शिफ्ट आहेना त्याचा डब्बा करत होते त्यात थोड वाढवून तुमच पण जेवण तयार केल दोन मिनिटात ताट वाढते. आता मात्र कहरच झाला. काय बोलावे या बाईला हेच कळेना. आता मात्र बायको कडे बघण्याची हिम्मत होत नव्हती. मी पाहुण्याकडे लाचारी ने बघत म्हणालो अहो हे काय? तो म्हणाला अहो लवकर आटपून मी बसमध्ये बसवतोयना तुम्हाला. मी डोक्यावर हात मारून घेतला.

तुम्ही वाचत आहात पाहुणचार | Best Marathi Thriller Story 2023

आली या भोगाशी असावे सादर युक्ती प्रमाणे कसे तरी दोन घास खाललेत आणि धावत पळत येऊन बस पकडली आणि एकदा कधी बस सुटते आणि या पाहुण्यांचा चेहरा समोरुन नाहीसा होतो. असे वाटत होते. बस सुरु झाली नाटकी धन्यवाद आणि टाटा बाय करत एकदा हूश.. झाल. एकदाचा प्रवास सुरु. विंडो सिटवर पहिले बायकोने जम बसवला होता. थंड वारा ऐवढ्या उकाड्यानंतर आल्हाददायक वाटत होता पण त्याची मजा बायकोला जास्त. मी तिसऱ्या सिटवर गर्दी मुळे चेंगराचेंगरीत उभा आहे असा भास होत होता. मुलगी आणि बायको दोघेही छान खिडकीतून बाहेरील दृष्य एन्जॉय करत होते. कारण त्यांना पुढची कल्पना नव्हती. पण मी मात्र टेंशन मध्ये कारण आता शेवटची बस मिळेल की नाही. याची शाश्वती नव्हती.

तुम्ही वाचत आहात पाहुणचार | Best Marathi Thriller Story 2023

कंडक्टर तिकीटसाठी आला तेव्हा त्याला विचारले की शेवटची बस मिळेल की नाही? तो म्हणाला “साहेब हे तुमच्या नशिबावर आहे साहेब. काही सांगता येत नाही. नशीब आताच आपण आजमावले म्हणून मी ही शांत बसलो म्हटलं आता बघु काय होईल तेव्हा बघु. बस अंजनगाव आली ती हळूहळू डेपोत शिरली आणि थांबली. लगेच उतरणाऱ्या आणि बसणाऱ्या सर्व पॅसेंजराची एकच झुंबड उडाली. मी आता जागेवर बसून बघत होतो.

तुम्ही वाचत आहात पाहुणचार | Best Marathi Thriller Story 2023

आता जवळजवळ सर्व पॅसेंजर आप आपल्या जागेवर बसले होते मात्र ड्रायव्हर आणि कंडक्टर दोघे ही बस मध्ये नाही. मग चौकशी केल्यावर कळलं की गाडी ब्रेक डाऊन झाली. दोघे मिळून स्टेफनी लावत होते. बराच वेळ लागणार होता. मी आता चिंतेत आपली तोंडगावची शेवटची बस निघून जाणार. आता पुढे तोंडगाव ला कसं जायचं चिंता मला सतावत होती. तसं परतवाडा नवीन नव्हतं बहीण माझी तिथेच राहत होती पण ती भाड्याने रहात असल्याने नेहमी ती ठिकाण बदलत असायची. आता ती परतवाड्यात कुठे राहते माहीती नव्हते. तेव्हा मोबाईल वगैरे नव्हती आणि एवढ्या रात्री कुठे, कस शोधायच. असा विचार करत असताना बस परतवाडा डेपो मध्ये शिरली. तेव्हा डेपोतील सर्व लाइट्स बंद फक्त सुपरवाईजरच्या ऑफीसचा तेवढा लाईट चालू होता.

याच बसची वाट बघत ते थांबले होते. बस आल्या बरोबर सर्व पॅसेंजर आणि ड्रायव्हर कंडक्टर पटापट उतरुन निघुन गेलो. डेपोत आता पुर्ण अंधार झाला होता. आम्ही तिघे डेपोच्या बाहेर रोड वर आलो. एक ही रिक्षा,आटो नाही. जवळजवळ सन्नाटाच होता. दुर दुरवर फक्त स्ट्रीट लाईट दिसत होते. आम्ही तिघेच रोडवर उभे. आता काय करायचं.

तुम्ही वाचत आहात पाहुणचार | Best Marathi Thriller Story 2023

ऐवढ्या वेळ बायको गप्प बसली होती. आता ती पण घाबरली होती. आता कसं हो. असं म्हणत रडायलाच लागली. तिला बघून मयुरी पण रडायला लागली. आता काय करायचं सुचेना. तेव्हा परतवाडा डेपो समोर राहण्यासाठी हाॅटेलस् पण नव्हती. मी बायकोवर ओरडलोच. अग गप्प बस रडु नकोस, आपण शहरात आहोत. जंगलात आहोत का ? वाघोबा येईल अशी परिस्थिती आहे का आपल्याला रडायला अन् घाबरायला ? मी डिस्टर्ब होतो घाबरलो नव्हतो. कारण की परतवाडा मला अगदीच काही नवीन नव्हत. पण रात्र खुप झाल्यामुळे मार्ग सापडत नव्हता. कुठे कसं जायचं हा मोठा प्रश्न होता. तोंडगाव पंधरा सोळा किलोमीटर वर होत. साधन कुठलच नाही.

पंधरा वीस मिनिटे आम्ही तिथेच उभे रात्रीचे बारा वाजले होते. शेवटचा शो सुटल्यावर सिनेमाला गेलेले लोक यावेळेस परत जात असतात. अशी शक्यता होती त्यामुळे मी त्या आशेवर इकडे तिकडे बघत होतो. तेवढ्यात एक ऑटो येताना दिसला. मी मनात थोडा सुखावलो. आता काहीतरी मार्ग मिळेल.

गोष्ट | Best Marathi Thriller Story 2023

तुम्ही वाचत आहात पाहुणचार | Best Marathi Thriller Story 2023

ऑटो पण आमच्या जवळ येऊन उभा राहिला मी आत बघितलं तर टिपीकल मुस्लिम दाढीवाला ड्रायव्हर होता. कहा जाना है? साहाब, त्यानं विचारलं, मी म्हटलं तोंडगाव चलोगे? तो पण ऐकुन थोडा चपापला इतने रात में. माणूस वयस्कर होता पण समजुतदार होता. साहाब यही कोई रिश्तेदार के यहाँ रुक जावं. मैं उनके यहाँ छोड देता हूं. सुबह चले जाना. मी त्याला परिस्थिती सांगितली मला कोणाचाच ऍड्रेस माहिती नाही. तो पर्यंत मी परतवाडा आणि अचलपूर बद्दल बरंच माहिती दिली त्यामुळे त्याच्याही लक्षात आलं होतं याला इथली सर्व माहिती आहे. मग तो म्हणाला मेरे ऑटो मे तोंडगाव जाने और आने इतना पेट्रोल नहीं है.

तुम्ही वाचत आहात पाहुणचार | Best Marathi Thriller Story 2023

आमची एकंदरीत परिस्थिती बघून त्याला ही माणुसकी म्हणून आमच्या बद्दल सिंपती दिसत होती. तो म्हणाला एक काम करते है. हम पेट्रोल पंप पर जाते है अगर पेट्रोल मिल गया तो मैं अभी एक मेरे साथीको लेकर आपको तोंडगाव छोड देता हूं. बायको फूसफूस करत होती. अहो एका अननोन व्यक्ती वर एवढा भरवसा का ठेवता. मी म्हणालो शांत रहा. सध्या आपल्या कडे कुठलाच पर्याय नाही. काही होत नाही मी आहे ना. आम्ही रिक्षात बसुन पेट्रोल पंपावर गेलो, पेट्रोल भरले. तिथेच त्याला एक दुसरा रिक्षावाला भेटला. त्याला त्यानं सांगितलं इनको छोडकर आऐंगे. तु तेरा रिक्षा यही पर रख दे. मग तो रिक्षावाला म्हणाला साहिब तोंडगाव छोड दूंगा लेकीन ३००/- रुपये लुंगा.

तुम्ही वाचत आहात पाहुणचार | Best Marathi Thriller Story 2023

मी पण एक सेकंद न दवडता हो म्हणालो. रिक्षा परतवाडयांच्या बाहेर आलो सरवी कडे अंधार, रोडवर आमचाच रिक्षा आणि त्याचाच कर्कश आवाज, दोन्ही रिक्षा वाल्यांच्या गप्पा सुरु होत्या. मी पण सुनसान रस्ता असल्याने थोडा शांत होतो. रस्त्याच्या दोन्ही बाजूला शेती, पीक जवळजवळ कापणीला आलं होतं. पिकांची उंची बऱ्यापैकी होती त्यामुळे हवेमुळे त्याचा विशिष्ट आवाज येत होता. त्यामुळे परिस्थिती आणखी भयावह होत होती. कधी एकदा हा प्रवास संपतो असं वाटतं होतं. बायको मयुरीला पक्कं पकडून मनात जप करत होती. मी ही ड्रायव्हरच्या गप्पांवर आणि हालचाली वर लक्ष ठेवून होतो. कुठला प्रसंग ओढवेल सांगता येत नव्हतं. बायकोच्या अंगावर दागिने होते.

तुम्ही वाचत आहात पाहुणचार | Best Marathi Thriller Story 2023

ह्या सगळ्या भानगडी करत आम्ही तोंडगावला पोहोचलो तेव्हा रात्रीचे अडीच वाजले होते. रिक्षा वाल्याला पन्नास रुपये आणखी देऊन त्यांचे धन्यवाद मानले.

आत्या मामांनी माझी चांगलीच बिनपाण्याची हजामत केली फॅमिली असताना त्यांच्या अंगावर ऐवढे दागिने वगैरे असताना ऐवढी रिस्क का घेतलीस. एवढ्या रात्री तू का आलास? परतवाड्यालाच कोणाकडे तरी थांबायचं. काही बरेवाईट झाले असते तर. मग मी सर्व कहाणी आणि पाहुणचार कसा महाग पडला हे त्यांना सांगितले तेव्हा कुठे ते शांत झाले.

केशवराव चेरकु

तुम्ही वाचत आहात पाहुणचार | Best Marathi Thriller Story 2023

समाप्त.

साहित्यबंध समूहाची माहिती आणि जाहिरात

दिवसेंदिवस मराठी भाषेवर इतर भाषेतील शब्दांचा अतिरेक होत आहे. कित्येक मराठी शब्द तर नवीन पिढीच्या कानावर देखील पडले नाहीत. यामुळे पुढे जाऊन मराठी भाषा हळू हळू लुप्त होईल अशी आम्हाला भीती आहे. लिहिणे, बोलणे, ऐकणे आणि वाचणे ह्यातूनच मराठी भाषा अनंत काल टिकू शकते.

marathi lekh katha nibandh

त्यामुळे नवनवीन साहित्यिक मराठी भाषेतून निर्माण होणे ही काळाची गरज आहे. तसेच लेखकांचा पुरेसा सन्मान मिळणे आणि त्यांना योग्य प्लॅटफॉर्म उपलब्ध होणे त्याचबरोबर साहित्य चोरी थांबवणे या उद्देशातून आम्ही हा समूह तयार केला आहे.

मराठी भाषेच्या प्रती आमचे जे कर्तव्य आहे ते पार पाडण्याचा हा छोटासा प्रयत्न. तुम्ही देखील मराठी भाषेप्रती आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी हा समूह जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आमची मदत करा.

लक्षात घ्या की ह्या समूहाची सभासद फी ५०₹ प्रती महिना आहे. सभासद फी 9146494879 या Gpay किंवा PhonePe नंबर वर टाकल्यानंतर ग्रुप मध्ये add केले जाईल. एकदाच वार्षिक सभासदत्व घेणाऱ्यांना फी मध्ये १०० ₹ सूट मिळेल.

या मासिक सभासदत्वामध्ये तुम्हाला मिळेल

१) साहित्यक्षेत्रातील प्रगतीसाठी ४ साप्ताहिक स्पर्धा

२) सहभागासाठी आकर्षक डिजिटल प्रमाणपत्रे

३) स्पर्धेतील तुमचे चार लेख सुप्रसिद्ध अशा मराठी टाईम वेबसाईटवर पब्लिश केले जातील. ज्याची लिंक तुम्ही कुठेही शेअर करू शकता.

४) तुमचा फोटो आणि लेखाच्या नावासहीत चार सुंदर वॉलपेपर.

५) लेख त्याच्या विषयाला अनुसरून छान वॉलपेपरसने सजविला जातील.

६) तुमचा लेख गुगल सर्च मध्ये आणण्यासाठी SEO techniques वापरल्या जातील.

तुमच्या एका लेखावर अंदाजे ५००₹ चे काम केले जाईल म्हणजे ५०₹ च्या सभासद फी मध्ये ४ लेखांवर होणारे २०००₹ चे फायदे तुम्हाला मिळणार आहेत

https://chat.whatsapp.com/JDA5qGHXn43IofHbacHWBd

9146494879 या Gpay/ PhonePe नंबरवर एका महिन्याची ५०₹ फी किंवा वर्षाची ५००₹ सभासद फी पाठवा. Payment कमेंट मध्ये स्वतःचे नाव टाका. आणि वरील ग्रुप लिंकला जॉईन व्हा.

आमच्या समूहातील कविता वाचण्यासाठी भेट द्या

mazablog.online

नवीन लेख वाचण्यासाठी भेट द्या

https://marathitime.in/

तुम्ही वाचत आहात पाहुणचार | Best Marathi Thriller Story 2023

Ghost Marathi Story

तुम्ही वाचत आहात पाहुणचार | Best Marathi Thriller Story 2023

Avatar
Marathi Time

1 thought on “पाहुणचार : अंधाऱ्या रात्री निर्जन रस्त्यात अडकलेल्या कुटुंबाची गोष्ट | Best Marathi Thriller Story 2023”

Leave a Reply