माझे गाव मराठी निबंध 500+ शब्द | Maze Gav Marathi Nibandh

Maze Gav Marathi Nibandh या पोस्टमध्ये आपण गावाचे वर्णन करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तुमच्या शैक्षणिक आयुष्यात हा निबंध नक्कीच उपयोगी पडेल.

मित्रांनो आपले गाव आपल्याला नेहमीच प्रिय असते, व आपल्या मनात आपल्या गावाविषयी एक वेगळीच आपुलकी निर्माण झालेली असते. आपण जरी शहरात राहायला गेलो असलो तरी गावाकडील आठवणी नेहमीच आपल्या सोबत असतात. आपल्याला आपल्या गावाची ओढ नेहमीच असते.

Maze Gav Marathi Nibandh

माझ्या गावाचे नाव श्रीरामपूर हे आहे हे गाव पाथरी शहरापासून 20 किमी अंतरावर आहे. माझे गाव निसर्गसौंदर्याने नटलेले आहे. तेथे राहणारे लोक खूपच दयाळू आणि मन मिळवून स्वभावाचे आहेत. गावातील शांत आणि प्रसन्न वातावरण मला खूप आवडते. त्यामुळे मला गावात राहायला खूप छान वाटते.

माझ्या गावातील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती हा आहे. त्यामुळे सकाळी लवकर उठून सर्व शेतकरी बांधव आपापल्या शेती कामासाठी शेतात जातात. व सर्व आपापली कामे आवडीने करतात. तसेच माझे गाव जास्त मोठे नाही 120 ते 130 एवढे कुटुंब माझ्या गावात राहत आहेत. तसेच माझ्या गावात गणपती दसरा, होळी, रामनवमी, कृष्णजन्माष्टमी असे सार्वजनिक सण मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. माझ्या गावातील सर्व बांधव मिळून मिसळून राहतात. व कधीही भांडण तंटा करत नाहीत.कधीही दुसऱ्या कोणाला त्रास देत नाहीत. सर्व गोडी गमतीने व एकजुटीने राहतात.

माझे गाव मराठी निबंध 500+ शब्द | Maze Gav Marathi Nibandh

तसेच माझ्या गावात प्राचीन काळातील श्रीराम मंदिर आहे त्यामुळे राम नवमीला आमच्या गावात यात्रा भरते. यात्रेनिमित्त बाहेरील गावातील खूप मोठ्या प्रमाणावर लोक तेथे दर्शन घेण्यासाठी येतात. रामनवमीला आमच्या गावात भजन, कीर्तन तसेच महाप्रसादाचा कार्यक्रम केला जातो.

माझ्या गावात प्राचीन काळातील भगवान रामाचे मंदिर असल्यामुळे मला वाटते की माझ्या गावाचे नाव श्रीरामपूर हे पडले असेल.

तसेच माझ्या गावातून गोदावरी नदी वाहते. नदीला बाराही महिने पाणी असते बाराही महिने ही नदी वाहत राहते. त्यामुळे आमच्या गावात पाण्याची कमतरता भासत नाही. व आमच्या गावातील शेतकरी मोठ्या प्रमाणात ऊसाचे तसेच इतर बागायती पिके घेतात. मोठ्या प्रमाणात फळबागा आहेत, तसेच फळभाज्या चे मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतले जाते. आमच्या गावात मोठ्या प्रमाणावर सर्व शेतकरी बांधवांकडे दुधाळ जनावरे आहेत. त्यामुळे आमच्या गावात दूध, दही, लोणी, तूप इत्यादी पदार्थाची कमतरता भासत नाही.

मला गावात राहायला खूप आवडते कारण तेथील शुद्ध व शांत वातावरण तसेच माझे बालपणीचे मित्र मैत्रिणी यांच्यासोबत खेळायला, मस्ती करायला व बालपणीच्या त्या जुन्या आठवणी त्या आठवणीच्या गप्पा गोष्टी करत करत त्यांच्यासोबत कसा वेळ निघून जातो हे समजत नाही.

माझे गाव मराठी निबंध

मी पुण्यावरून येतो तेव्हा पुण्यावरून पाथरी शहराचा प्रवास मी ट्रॅव्हल्स ने करतो, आणि नंतर तेथून बसणे गावाकडे येतो. पाथरी शहरातून गावाकडे येण्यासाठी साधारणता एक तासाचा वेळ लागतो. गावाकडे आल्यानंतर सर्वांच्या गाठीभेटी व नंतर सकाळी लवकर उठून नदीवर अंघोळीला जायचे. व मस्त पोहत बसायचे पोहण्याचा आनंद काही वेगळाच असतो. जो शहरांमध्ये पैसे देऊन मिळत नाही. तसेच रात्रीचे जेवण जेवणामध्ये ते विविध पदार्थ व पौष्टिक अन्न हे शहरांमध्ये कितीही पैसे दिले तरीही मिळत नाही…. नंतर गावभर फिरायचे सर्व मित्र मैत्रिणींना भेटायचे. व त्यांच्यासोबत जुन्या गप्पा गोष्टी यामध्ये कसा वेळ निघून जातो हे समजत नाही.

शिवाय गावातील सर्वच लोक खूप प्रेमळ असतात. शहरी भागात किती मोठ्या प्रमाणात प्रगती व तेथील जीवन मनोरंजक असले. तरी ते गावातील जीवना इतके समृद्ध असू शकत नाही.
गावात जरी शहराप्रमाणे प्रगत सुविधा नसल्या तरी गावातील निसर्ग सौंदर्य, तेथील सण उत्सव, रूढी परंपरा, जनजीवन सर्व काही नक्कीच व्यवस्थित असते. आणि मनाला कायम गावाची ओढ लागलेली असते. त्यामुळे मला शहरापेक्षा माझे खेडेगाव खूप आवडते.

Author :- Mr. Shankar Kashte

Shankar

माझे गाव मराठी निबंध 500+ शब्द | Maze Gav Marathi Nibandh

तर मित्रांनो तुम्हाला
माझे गाव मराठी निबंध | my village essay in marathi
हा निबंध तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका…

वरील निबंध मध्ये काही चुका असतील किंवा काही लिहायचं राहून गेलं असेल तर ते आम्हाला कमेंट द्वारे कळवा आम्ही त्यामध्ये सुधारणा करत राहू.

धन्यवाद

Mi Lavlele Jhad Nibandh Marathi

Sane Guruji Information In Marathi

तुम्हाला जर निबंध लेखन करण्याची आवड असेल तर आम्हाला जरूर कळवा. आम्ही नवनवीन लेखकांना हा प्रसिद्ध मंच उपलब्ध करून देत आहोत. ज्याने त्यांचे साहित्य क्षेत्रात प्रदार्पण होईल.

Leave a Reply

%d bloggers like this: