MHADA Lottery Mumbai 2023 In Marathi:- मुंबई सारख्या शहरांमध्ये कमी वेतन असणाऱ्या कामगार लोकांना आपल्या स्वप्नातलं घर बांधणं न परवडण्यासारखे असते.
त्यांच्या घरांची आवश्यकता “महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण” (म्हाडा) पूर्ण करते. नऊ प्रादेशिक मंडळाचा समावेश असलेले म्हाडा प्राधिकरण हे नेहमी विविध प्रकारच्या म्हाडा लॉटरी जाहीर करीत असते. कोरोना काळापासून पहिल्यांदाच मुंबई म्हाडा बोर्डाने म्हाडा लॉटरी 2023 योजना जाहीर केलेली आहे. म्हाडा प्राधिकरण सामाजिक गृहनिर्माण क्षेत्रामध्ये आघाडीवर आहे. आज आपण या लेख मध्ये याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

म्हाडा लॉटरी मुंबई 2023 New Update in Marathi
मुंबई म्हाडा लॉटरी 2023 अंतर्गत मुंबईतील खाजगी रिअल इस्टेट डेव्हलपर्सद्वारे भव्य फ्लॅट्ससह आकर्षक प्रकल्प ऑफर जाहीर केलेले आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल विभाग (EWS) आणि अल्प उत्पन्न गट (LIG) श्रेणींसाठी सदनिका बांधत असले तरी, MHADA लॉटरी घरे मध्यम उत्पन्न गट (MIG) आणि उच्च उत्पन्न गट (HIG) यांच्यासाठी देखील घरे आहेत. म्हाडाच्या मुंबईतील फ्लॅटची किंमत 34 लाख ते 4 कोटी रुपयांच्या दरम्यान आहे. उच्च उत्पन्न गटांसाठी सुरू केलेली म्हाडाची लॉटरी मुंबईतील निवासी युनिट्स दादर, जुहू आणि तारदेव सारख्या पॉश भागात उपलब्ध आहेत आणि या युनिट्सच्या किमती रु.2.39 कोटी ते रु.7.58 कोटींच्या दरम्यान आहेत.
MHADA Lottery Mumbai 2023 | म्हाडा डेट, pdf आणि लिस्ट
MHADA Lottery Mumbai 2023 Location
अशोकवन
चांदिवली
पवई
शंकर नगर चेंबूर
शास्त्रीनगर
MHADA Lottery Mumbai 2023 Date
म्हाडा लॉटरी प्राधिकरण ने म्हाडा लॉटरी मुंबई 2023 साठी अर्ज प्रक्रिया 22 मे 2023 ला दुपारी 3 वाजे पासून सुरू झालेली आहे. म्हाडा प्राधिकरणाने ही जाहिरात 4083 फ्लॅटसाठी सुरू केलेली आहे. संपूर्ण लॉटरी प्रक्रिया अधिक पारदर्शक, जलद आणि पात्र अर्जदारांसाठी सुरक्षित करण्यासाठी हे बदल करण्यात आले आहेत. आणि यात सर्वात महत्वाची आणि फायद्याची बाब म्हणजे नोंदणी, पात्रता निश्चिती, दस्तऐवज सादर करणे, पेमेंट, लकी ड्रॉ, लॉटरी वितरण इत्यादींसह सर्व सहभागाचे टप्पे ऑनलाइन पार पाडले जातील. या प्राधिकरणाने आपलं “म्हाडा हाउसिंग लॉटरी सिस्टीम” नावाचं ॲप सुद्धा लाँच केलेलं आहे. जे Google Play Store वर उपलब्ध आहे. त्याची लिंक लेख च्या सर्वात शेवटी दिलेली आहे.
MHADA Lottery Mumbai 2023 | म्हाडा डेट, pdf आणि लिस्ट
म्हाडा लॉटरी मुंबई 2023: महत्त्वाच्या तारखा in Marathi
अर्ज सुरू होण्याची तारीख = 22 मे 2023
अर्ज समाप्ती तारीख = 22 मे 2023
पेमेंट सुरू होण्याची तारीख = 26 जून 2023
पेमेंट समाप्ती तारीख = 26 जून 2023
NEFT पेमेंटची शेवटची तारीख = 28 जून 2023
मसुदा अर्ज यादी तारीख = 04 जुलै 2023
म्हाडाची मुंबई लॉटरी यादी स्वीकारली = 12 जुलै 2023
म्हाडा लॉटरी मुंबई 2023 लकी ड्रॉची तारीख = 18 जुलै 2023
म्हाडा लॉटरी मुंबई 2023 लकी ड्रॉ रिफंड तारीख = 19 जुलै 2023
म्हाडा लॉटरी मुंबई 2023: घर वाटप In Marathi
म्हाडा लॉटरी मुंबई 2023 अंतर्गत 204 चौरस फूट ते 1500 चौरस फूट दरम्यान असलेल्या क्षेत्रफळाचे 24 लाख ते रु. 7.52 कोटी किंमतीच्या 4083 घरांची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. वेगवेगळ्या उत्पन्न नुसार त्यांची पुढीलप्रमाणे विभागणी केलेली आहे.
1) EWS (आर्थिकदृष्ट्या कमकुवत विभाग) – 2788 युनिट्स ⏬
PMAY पहाडी गोरेगाव = 1947 युनिट्स
कन्नमवार नगर, विक्रोळी = 424 युनिट्स
अँटॉप हिल = 417 युनिट्स
MHADA Lottery Mumbai 2023 | म्हाडा डेट, pdf आणि लिस्ट
2) LIG (कमी उत्पन्न गट) – 1022 युनिट वाटप⏬
गोरेगाव = 736 युनिट्स
पत्राचल, दादर, साकेत सोसायटी (गोरेगाव), गायकवाड नगर (मालाड), चारकोप, कन्नमवार नगर, जुने मागाठाणे (बोरिवली), विक्रांत सोसायटी (विक्रोळी), गव्हाणपाड = 286 युनिट्स
3) एमआयजी (मध्यम उत्पन्न गट)⏬
सहकार नगर (चेंबूर), दादर, कांदिवली, टिळक नगर (चेंबूर) = 132 युनिट्स
4) HIG (उच्च उत्पन्न गट)⏬
सायन, शिंपोली, लोअर परळ, तारदेव, तुंगा पवई. = 39 युनिट्स
म्हाडा लॉटरी मुंबई 2023 पात्रता निकष In Marathi
1) अर्जदाराचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. लहान मुलांच्या नावाने कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही
2) अधिवास प्रमाणपत्र
3) LIG सदनिकांसाठी, अर्जदाराचे मासिक उत्पन्न ₹ 25,001 ते ₹ 50,000 असल्यास, अर्ज करू शकतो.
4) MIG सदनिकांसाठी, अर्जदाराचे मासिक उत्पन्न ₹ 50,001 ते ₹ 75,000 असल्यास, अर्ज करू शकतो.
5) HIG सदनिकांसाठी, अर्जदाराचे मासिक उत्पन्न ₹ 75,001 किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास, अर्ज करू शकतो.
MHADA Lottery Mumbai 2023 | म्हाडा डेट, pdf आणि लिस्ट
म्हाडा लॉटरी मुंबई 2023 साठी आवश्यक कागदपत्रे In Marathi
आधार कार्ड
पॅन कार्ड
अधिवास प्रमाणपत्र
शाळा सोडल्याचा दाखला
चालक परवाना
मतदार ओळखपत्र
पासपोर्ट
जन्म प्रमाणपत्र
MHADA Lottery Mumbai 2023 Registration Fee
1) आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक = ₹ 5,560
2)अल्प उत्पन्न गट = ₹ 10,560
3) मध्यम उत्पन्न गट = ₹ 15,560
म्हाडा लॉटरी मुंबई 2023 ऑनलाईन अर्ज प्रक्रिया in Marathi
- म्हाडा लॉटरी मुंबई 2023 या योजनेसाठी अर्ज करण्याकरिता तुम्हाला म्हाडा च्या housing.mhada.gov.in या वेबसाईट वर किव्वा म्हाडा च्या ॲप वर जावं लागेल. ॲप download करायची लिंक खाली दिलेली आहे.
- ईथे नोंदणी करण्यासाठी तुम्हाला आधी Login I’d तयार करावी लागेल त्यासाठी विचारलेली सर्व माहिती भरून तुमची लॉगिन आयडी तयार होईल.
- त्यानंतर लॉगिन आयडी व्दारे लॉगिन करून नंतर तुम्हाला आवश्यक असलेली सर्व माहिती भरावी लागेल आणि यासोबतच तुम्हाला तुमच्या योजनेचा कोड सुद्धा प्रविष्ट करावा लागेल. योजनेचा कोड तुम्हाला माहिती पुस्तकात मिळेल. माहिती पुस्तक download करायची लिंक खाली दिलेली आहे.
- संपूर्ण माहिती भरून झाल्यानंतर पुन्हा पुष्टी करून ऑनलाईन पद्धतीने शुल्क भरावं लागेल. शुल्क भरल्यानंतर तुमचा अर्ज यशस्वीरीत्या भरला जाईल.
- वरील सर्व प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर तुम्ही अर्जाची प्रिंट काढून घ्या.
म्हाडा लॉटरी मुंबई 2023 निकालाची प्रक्रिया in Marathi
म्हाडा लॉटरी मुंबई 2023 या योजनेचा निकाल बघण्यासाठी housing.mhada.gov.in या वेबसाईट वर गेल्यानंतर “लॉटरी चा निकाल” या लिंक वर तुम्हाला निकाल बघता येईल.
म्हाडा लॉटरी मुंबई 2023 परतावा स्थितीची प्रक्रिया in Marathi
म्हाडा म्हाडा लॉटरी मुंबई 2023 परतावा स्थितीची माहिती बघण्यासाठी housing.mhada.gov.in तुम्हाला या लिंक वर क्लिक करावे लागेल. ईथे लॉगिन करून तुम्ही परतावा स्थिती पाहू शकता.
MHADA Lottery Mumbai 2023 | म्हाडा डेट, pdf आणि लिस्ट
म्हाडा लॉटरी मुंबई २०२३: तुम्हाला परताव्याची रक्कम न मिळाल्यास काय करावे? In Marathi
म्हाडा लॉटरी मुंबई परतावा तुम्हाला वेळेत न मिळाल्यास खाली दिलेल्या हेल्पलाईन क्रमांकावर कॉल करून तुम्ही अधिकाऱ्यांशी बोलून याबद्दल माहिती द्यावी लागेल नंतर तुम्हाला 10 दिवसात परतावा मिळेल.
MHADA Lottery Mumbai 2023 | म्हाडा रेजीष्टर, डेट आणि लिस्ट
Official Website
Mhada Housing Lottery System App
https://play.google.com/store/apps/details?id=com.mhada.ihlms
माहिती पुस्तिका download करण्यासाठी इथे क्लिक करा
MHADA Lottery 2023 Helpline Number
02269468100
9869988000
022-26592692
022-26592693
पत्ता
MHADA, Grihanirman Bhavan Kalanagar, Bandra (E)
Mumbai 400051