मी पाहिलेला अपघात 500+ शब्दात मराठी निबंध | Mi Pahilela Apghat

आपल्या दैनंदिन जीवनात अनेक प्रसंग आठवणीत राहतात. ज्यात काही चांगले प्रसंग तर काही वाईट असतात. Mi Pahilela Apghat हि अशीच घटना आहे.

नमस्कार मित्रांनो आजच्या या पोस्ट मध्ये आपण मी पाहिलेला अपघात मराठी निबंध या विषयावर निबंध लिहिलेला आहे. ते तुम्हाला शैक्षणिक आयुष्यात विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरेल.

आपल्या दैनंदिन जीवनात वावरत असताना काही प्रसंग असे घडतात की ते प्रसंग कायम आठवणीत राहतात. माझ्याही आयुष्यात माझ्या डोळ्यासमोर असाच एक प्रसंग घडला होता.

Mi Pahilela Apghat Marathi Nibandh

मी पाहिलेला अपघात 500+ शब्दात मराठी निबंध | Mi Pahilela Apghat

मित्रांनो मी साधारणता तेव्हा दहा वर्षाचा असेल, मला तेव्हा चांगले आठवते की उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये मला मामाच्या गावी जायचे होते. सुट्टी असल्यामुळे मी आई व बाबांकडे हट्ट धरला की मला उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मामाच्या गावी जायचे आहे. पण माझ्या बाबांना सुट्टी नसल्या कारणामुळे त्यांना आमच्या सोबत मामाच्या गावी यायला जमत नव्हते. त्यामुळे माझ्या आईने मामाला कॉल करून मला व माझ्या भावनांना घेऊन जाण्यासाठी बोलावले, माझे मामा दुसऱ्या दिवशी आम्हाला घेऊन जाण्यासाठी आले.

दुसऱ्या दिवशी मी व माझे भावंड मामाच्या गावाला जाण्यासाठी निघालो, प्रवास खूप लांबचा होता आम्ही सकाळी लवकरच निघालो. पण उन्हाळा दिवस होता व मामाची गाडी जुनी असल्या कारणामुळे ती गरम झाली, त्यामुळे आम्ही दुपारची वेळ असल्यामुळे गाडी रस्त्याच्या कडेला लावून एका मोठ्या झाडाचा आसरा घेत थोडा वेळ आराम करण्यासाठी थांबलो.

दुपारची वेळ असल्यामुळे सगळीकडे एकदम शांतता होती तेवढ्यात कर्र.. असा जोरात ब्रेक चा आवाज कानी पडला. तो आवाज एवढा कर्कश होता की माझ्या मनात त्या आवाजाने भीती निर्माण झाली. व माझ्या काळजात एकदम धडधड करायला लागले. आम्ही सर्व त्या आवाजाकडे पाहत होतो. आम्हाला वाटले की नक्कीच तिथे काहीतरी वाईट घडले असावे.

मी पाहिलेला अपघात

तो आवाज होता का एका ट्रकचा एक मोटर सायकल आणि ट्रकचा मोठा अपघात तेथे झाला होता. पूर्वेकडून येणाऱ्या ट्रकचा आणि मोटरसायकलचा समोरासमोर धडक झाली होती. ट्रकचा ब्रेक फेल झाल्यामुळे ट्रक बेसावध झाले व ट्रक चालकाचा ताबा सुटल्यामुळे ट्रक मोटर सायकला ला जाऊन धडकले.

त्यामुळे सर्व लोक त्या ब्रेकच्या आवाजाच्या दिशेने धावली. त्या स्थळी लोकांची मोठी गर्दी जमली. आम्ही पण त्या दिशेने धावलो. व लोकांची गर्दी सावरत अपघात स्थळी पोहोचलो. व समोर पाहिले की ट्रक आणि मोटरसायकलचा मोठा अपघात आमच्या समोर झालेला होता.

धडक एवढी मोठी होती की मोटर सायकल वरून दोन व्यक्ती जात होत्या, त्या दोघांनाही आपण त्यांच्याकडे पाहू शकत नव्हतो, एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांच्या शरीरावर जखमा झालेल्या होत्या. व ट्रक चालक त्यालाही मोठ्या प्रमाणात त्याच्या हाता पायाला व त्याच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत होता. मोटरसायकल ट्रकच्या चाकाखाली आल्यामुळे ती पण मोठ्या प्रमाणात चिडली गेली होती. मोटरसायकल वरील दोन व्यक्तींची हालत जास्तच खराब होत चाललेली होती गर्दीतील कोणीतरी पोलिसांना व ॲम्बुलन्स ला कॉल करून अपघाताची माहिती दिली.

थोड्याच वेळात त्या ठिकाणी सर्वप्रथम ॲम्बुलन्स आली नंतर लगेच पोलिसांची गाडी तिथे आली. पोलिसांनी हा सर्व प्रकार पाहिला. त्यांनी लगेच अपघात झालेल्या व्यक्तीना ॲम्बुलन्स मध्ये दवाखान्यात घेऊन गेले. व अपघात झाल्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात ट्राफिक निर्माण झाली होती. त्यांनी त्या रस्त्यावरील मोटर सायकल व ट्रक रस्त्याच्या कडेला घेत वाहतूक सुरळीत केली.

पण हा सर्व प्रकार पाहून माझ्या मनात चांगलीच भीती निर्माण झाली. हा सर्व प्रकार पाहून मला तर थरकाप होत होता. मी मामाच्या गावाला पोहोचेपर्यंत मामाला खूप प्रश्न केले आता ती अपघात झालेले व्यक्ती ठीक तर असतील ना, त्यांच्या घरचे त्या व्यक्तींकडे आले असतील ना, आता त्यांचे पुढे कसे होणार, असे खूप प्रश्न मी मामाला केले. व मामाला सारखे हळू गाडी चालव, हळू गाडी चालू असे म्हणत राहिलो.

मी मामाच्या गावाला पोहोचल्यानंतर ही सर्व हकीकत माझ्या परिवारातील व्यक्तींना सांगितली स. व त्यांना बजावून सांगितले की हळूच स्पीड मध्ये गाडी चालवा जेणेकरून आपल्या व इतरांच्या जीवाला धोका निर्माण होणार नाही. मित्रांनो अशा प्रकारे मी जो माझ्या आयुष्यातील पहिला अपघात पाहिलं त्याचे वर्णन या निबंध द्वारे केले आहे.

Author :- Mr. Shankar Kashte

Shankar

तर मित्रांनो तुम्हाला मी पाहिलेला अपघात मराठी निबंध mi pahilela apghat marathi nibandh
हा निबंध तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका…

वरील निबंध मध्ये काही चुका असतील किंवा काही लिहायचं राहून गेलं असेल तर ते आम्हाला कमेंट द्वारे कळवा आम्ही त्यामध्ये सुधारणा करत राहू.

धन्यवाद

Raksha Bandhan Nibandh In Marathi

ESSAY ON OUR FESTIVAL

Leave a Reply

%d bloggers like this: