जादुई यंत्र by केशवराव चेरकु | Mobile Good or Bad in Marathi 2024

साहित्यबंध समूह आयोजित साप्ताहिक स्पर्धेत केशवराव चेरकु यांनी Mobile Good or Bad in Marathi या कीवर्ड वर आधारित “जादुई यंत्र” हा लेख लिहिला आहे. चला तर वाचूया.

“जादुई यंत्र” | Mobile Good or Bad in Marathi

साहित्य बंध समूह
साप्ताहिक उपक्रम क्र – ५
विषय :- मोबाईल शाप की वरदान
शिर्षक :- जादुई यंत्र
दिनांक :- ७ नोव्हेंबर ते
९ नोव्हेंबर २०२३ रात्री ११.५९ पर्यंत.

“जादुई यंत्र” | Mobile Good or Bad in Marathi

पुर्वी दुर गावी असणारे नातेवाईक, मित्र यांच्याशी संपर्क साधण्यासाठी पत्र पाठवण्याची पद्धत होती. त्यानंतर दूरध्वनी यंत्राचा (टेलिफोन) अलेक्झांडर ग्रॅहम बेल ने २ जून १८७५ मध्ये शोध लावला. त्यांच्या माध्यमातून प्रत्यक्ष बोलणं होऊ लागले. हालहवाल कळू लागले. माहितीच आदानप्रदान होऊ लागलं. तंत्रज्ञान युगात नवनवीन शोध सुरुच असतात.

“जादुई यंत्र” | Mobile Good or Bad in Marathi

त्यानुसार मोबाईल (Mobile – Modified operation byte integration limited energy ) याचा शोध
३ एप्रिल १९७३ यावर्षी श्री मार्टिन कूपर यांनी लावला. मराठीत त्याला फिरते दूरभाष/दूरध्वनी यंत्र असे म्हणतात. जे आपण कुठे‌ ही घेऊन फिरु शकतो आणि आपण दुसऱ्या दुरभाष किंवा फिरते दूरभाष यंत्राशी संपर्क करुन बोलू शकतो. मोबाईल मुळे आपण प्रत्यक्ष कुठूनही बोलू शकतो आणि त्या व्यक्तीला बोलताना बघू पण शक्यतो. संशोधन इथेच थांबले नाही तर या दशकात छोट्याशा यंत्रात तंत्रज्ञानाने इतके सुधारणा केल्या आहेत की काॅम्प्युटरचे सर्व काम आपण त्या छोट्याश्या फिरते दूरध्वनी यंत्रातून करु शकतो. संपूर्ण जगाशी आपण घरात बसल्या बसल्या जोडल्या जाऊ शकतो.

“जादुई यंत्र” | Mobile Good or Bad in Marathi

आज माहिती तंत्रज्ञानाच्या युगात होणाऱ्या संशोधनात मोबाईल मध्ये इतक्या सोई दिलेल्या आहेत. असं कुठलच काम नाही जे तुम्ही मोबाईल वरुन करु शकत नाही. त्यामुळे माहिती युगातील ही एक मोठी क्रांतीच आहे. पण त्यांच्या फायद्या बरोबर नुकसान पण खुप आहेत. त्यामुळे मोबाईल एक वरदान की शाप हा प्रश्न निर्माण झाला आहे. मोबाईल आपल्या समोर आभासी जग निर्माण करत. जस की तुमचे हजारो जुने, नवीन मित्र नेट वर आहेत. रोज तुमच बोलन होत मोबाईलच्या फिचर्सच्या माध्यमातून पण प्रत्यक्षात तुम्हाला गरज भासल्यास कोणीच नसतं.

“जादुई यंत्र” | Mobile Good or Bad in Marathi

जादुई यंत्र by केशवराव चेरकु | Mobile Good or Bad in Marathi 2024

उदाहरणच द्यायचं झाल्यास समजा तुम्ही आजारी पडलात. तुम्ही मोबाईल मध्ये मॅसेज पाठवला तर हजारो मॅसेज तुम्हाला येतील गेट वेल सून, काळजी घे, वगैरे वगैरे पण प्रत्यक्षात तुम्हाला दवाखान्यात न्यायला किंवा बघायला कोणी ही येणार नाही. हजारो लोकांशी तुम्ही जोडल्या गेलात पण ते आभासीपणे आभासी दुनियेत पण प्रत्यक्षात नाही तुम्ही एकटेच असता. हे एक मायाजाल आहे. ज्यात तुम्ही अडकत जाता ,एडीक्ट होता. तेव्हा प्रश्न निर्माण होतो मोबाईल वरदान आहे की शाप.

“जादुई यंत्र” | Mobile Good or Bad in Marathi

वरदान आणि शाप या दोन्ही नाण्याच्या दोन बाजू आहेत. वरदान मिळाले म्हणजे आपल्या मना सारखं घडणाऱ ज्या प्रमाणे आपली गरज असते. जेव्हा हे आपल्या मनासारखं घडत असतं, नेमकं त्याच वेळी त्याच घडणाऱ्या गोष्टींमुळे काही प्रमाणात वाईट परिणाम पण दिसुन येतात. तीच नाण्याची दुसरी बाजू असते. जे आपल्या नकळत घडत असतं. त्यालाच लोक शाप असे ही म्हणतात. ज्याची अपेक्षा कोणी ही केलेली नसते. वरदाना बरोबर शाप हा येतच असतो. फक्त ते आपल्याला मिळालेल्या वरदानाच भूत उतरल्यानंतर कळत. अरेच्चा यांचे दुष्परिणाम पण आहेत. ही गोष्ट सर्वत्रच आढळते. प्रत्येक संशोधना नंतर आपल्याला त्याचे फायदे सांगुन आपल्यासमोर ते एक वरदान आहे असंच ठेवलं जातं पण कालांतराने त्यांची दुसरी बाजू आपल्याला कळते. ते हेच वरदान आपल्याला शाप वाटायला लागलं. नुसतं वाटायला लागत नाही अनुभव येतो दुष्परिणामामुळे तेव्हा तीच वस्तू शाप वाटायला लागते .

“जादुई यंत्र” | Mobile Good or Bad in Marathi

एक गोष्ट मला आणखी येथे नमुद करावीशी वाटते की कुठल्याही गोष्टीचा अतिरेक झाला तरी त्याचं शापात रुपांतर होतं. अती तिथं माती हे माहिती तंत्रज्ञान युग आहे. नवं नविन गोष्टींचा शोध लावला जातो. मोबाईल यांचे दैनंदिन जीवनात किती फायदे आहेत इथे आपण बघणारच आहोत. त्यांचे दुष्परिणाम पण बघू ज्याला आपण शाप संबोधतो.

मोबाईल हे माहिती तंत्रज्ञानाच एक असं जादुई यंत्र आहे की ज्याला चमत्कार म्हटलं तरी वावगं होणार नाही. असं कुठलच काम नाही जे तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून तुम्ही करु शकत नाही. मोबाईल नसेल तर माणूस शारीरिक तथा मानसिक अपंग झाल्यासारखा होतो. त्याच कारण आपल्याला मोबाईल ची एवढी सवय जडली असते त्या शिवाय जगणेच शक्य नाही. असं वाटायला लागत. सकाळी मोबाईलच्या आलार्म ने उठल्यानंतर गुड मॉर्निंग पासुन सुरुवात होते ते रात्री झोपताना गुडनाईट म्हणे पर्यंत आपण मोबाईलचा वापर सर्वत्र करतो. रात्री जाग जरी आली तरी लोक मोबाईल मध्ये डोकावतात.
मोबाईल आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे.

“जादुई यंत्र” | Mobile Good or Bad in Marathi

मोबाईल मुळे घरी बसुन सर्व काही करु शकतो. ऑफिसच काम, शिक्षण, खरेदीविक्री, बस, रेल्वे, विमानाचं रिझर्व्हेशन, पैशाची देवाणघेवाण, वर्क फार्म होम, व्यसायासंबधी महत्वाच्या बैठका घेणे. आणीबाणीच्या परिस्थितीत पोलीस, फायर ब्रिगेड किंवा डॉक्टरशी संपर्क साधता येतो. मोबाईल मध्ये असंख्य ऍप आहेत त्यांच्या माध्यमातून आपण घड्याळ, दिनदर्शिका, कॅल्क्युलेटर, अलार्म, टॉर्च, नोटबुक इत्यादी सर्व सुविधांचा वापर करु शकतो. त्याच प्रमाणे इंटरटेंमेटसाठी युट्यूब सारखे ऍप वरुन गाणे , टीव्ही सिरीयल, कराओके सिंगिंग करता येते, सिनेमा बघता येतो. लाइव्ह मॅच पण बघता येते. मोबाईलवरच वृत्तपत्र वाचता येतो. जगात घडणाऱ्या सर्व घटनाचे अवलोकन करता येत. त्यावर आपल मत ही मांडता येत. तसेच बातम्या पण बघता येतात.

“जादुई यंत्र” | Mobile Good or Bad in Marathi

जगातील कुठल्याही विषयांची सर्व माहिती मिळवता येते, फोटो, ऑडिओ, व्हिडिओ घेऊन आठवणी जपता येतात. प्रवास करताना जीपीएस द्वारे नेमका पत्ता व स्थान कळण्यास संपूर्णपणे सहाय्यता घेता येते. मोबाईलवर विशिष्ट ॲप डाऊनलोड करून सर्व वाद्य देखील वाजवता येतात. विविध भाषेच शिक्षण घेता येत. व्हिडिओ कॉल करून प्रत्यक्ष समोरासमोर बोलता येत व व्यक्तींना बघता येते. इंटरनेटचा वापर करून शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, वैद्यकीय अशा सर्व प्रकारच्या विषयांचे ज्ञान प्राप्त करून घेता येते. त्याच प्रमाणे प्राप्त असलेली माहिती खरी की खोटी हे देखील आपणास ऍपद्वारे मोबाईल मध्ये तपासता येते. असे एक नाही अनेक गोष्टी आपण मोबाईल द्वारे करु शकतो.

“जादुई यंत्र” | Mobile Good or Bad in Marathi

लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच मोबाईल हवाहवासा वाटतो आहे किंबहूना सवय झाली आहे. दैनंदिन काम खुप सुरळीत झाले आहे. मोबाईल मुळेच वेळ, श्रम आणि पैसा वाचतो. याच प्रात्यक्षिक आपण लाॅकडाऊनच्या वेळेत संपूर्ण जगाने अनुभवलं. घरात बसून सर्व काही सुरळीत चालू होत. काम, मुलांचं आँनलाईन शिक्षण जे शाळेच्या स्थरावरच असो किंवा जगातील विविध विद्यापीठातील उंच शिक्षण असो ते आपण पूर्ण करु शकलो. सरकारी सुचने नुसार आरोग्याची काळजी, इंटरटेंमेंट, व्यायाम करु शकलो हे फक्त म्हणजे फक्त मोबाईल मुळे शक्य झालं. म्हणून संशोधकांनी दिलेलं एक मोठं वरदानच आहे.

“जादुई यंत्र” | Mobile Good or Bad in Marathi

सामाजिकदृष्ट्या बघितलं तर आपण फार दुरावलेले आहोत. माणसांच्या भावना, ऋणानुबंध, प्रेम, संबंध, नातं यांच्यापासून दुर जात आहोत. फक्त आभासी जगात वावरतो आहे. प्रत्यक्षात आपल्याला कोणाची गरज राहिलेली नाही अशी मानसिकता बनत चाललेली आहे. म्हणून आम्ही एकमेकांपासून दूर जातानाच चित्र दिसते आहे. ही फार महत्त्वाची आणि चिंतेची बाब आहे. आपण मोबाईलचा फक्त उपयोग घेत नसुन आपणच त्यांच्या आहारी जातो आहे. त्यामुळे शारीरिक आणि मानसिक दुष्परिणाम दिसून येत आहेत.

“जादुई यंत्र” | Mobile Good or Bad in Marathi

शरीराचे अवयव निकामी होणे जसे खांदे दुखणे, मान दुःखाने, स्पांडेलिसीसचा त्रास, डोळे, कान, मेंदू सुध्दा मोबाईलमुळे निकामी होत आहे. त्याच मुळे अपघाताचे, आत्महत्येचे प्रकार वाढलेले आहे. मोबाईलच्या अती वापरामुळे त्यांच्या पासून उत्पन्न होणाऱ्या रेडिओ लहरींमुळे कॅन्सर सारखे रोगाचं प्रमाण खुप वाढत आहे. आपण मोबाईलच्या आहारी जास्तच गेल्यामुळे हे होतं आहे. यालाच अती तिथे माती म्हणतात.

“जादुई यंत्र” | Mobile Good or Bad in Marathi

मोबाईल मुळेच आँनलाईन फ्राॅड, तंत्रज्ञानाचा दूर उपयोग करुन कुणाच्या बॅंक खात्यातून पैसे काढून घेणं, व्यक्तीगत माहीती मिळवून ब्लॅक मेल करुन पैसे उकळणे, हल्लीच्या काळात सेक्स एक्सटार्शन हा नवीन प्रकार आला आहे. मोबाईलचा दुरुपयोग करून तुम्हाला अश्लील व्हिडिओ पाठवून त्यात तुमचा चेहरा टाकून ब्लॅक मेल केल जात. ऑनलाईन गेम मुळे एक पिढी बरबाद होते आहे. हे सर्व बघता मोबाईल हा एक शाप आहे की काय असा प्रश्न उपस्थित होतो.

“जादुई यंत्र” | Mobile Good or Bad in Marathi

पण शेवटी प्रत्येक गोष्ट बघितली तर सर्वांच गोष्टीचे फायदे, तोटे असतातच पण सर्वसाधारण पणे विचार केला तर फायदे जास्त आणि तोटे कमी आहेत.

असलेले दुष्परिणाम हे तंत्रज्ञानाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवणे आणि त्याची काळजी कशी घ्यायची याच शिक्षण लोकांना दिलं पाहिजे. त्याच भान आपण सर्वांनीच ठेवायला पाहिजे. आपण फक्त सरकारी यंत्रणा वर अवलंबून राहून चालणार नाही. दुष्परिणाम आपण पुर्णपुणे निकामी करु शकत नाही मात्र कमी करु शकतो.
दुष्परिणाम कमी झाले अन् आणि मोबाईलचा अतिरेक टाळला तर मोबाईल आपल्या साठी एक वरदानच आहे.

केशवराव चेरकु
कोपरखैरणे, नवीमुंबई

“जादुई यंत्र” | Mobile Good or Bad in Marathi

समाप्त.

साहित्यबंध समूहाची माहिती आणि जाहिरात

दिवसेंदिवस मराठी भाषेवर इतर भाषेतील शब्दांचा अतिरेक होत आहे. कित्येक मराठी शब्द तर नवीन पिढीच्या कानावर देखील पडले नाहीत. यामुळे पुढे जाऊन मराठी भाषा हळू हळू लुप्त होईल अशी आम्हाला भीती आहे. लिहिणे, बोलणे, ऐकणे आणि वाचणे ह्यातूनच मराठी भाषा अनंत काल टिकू शकते.

marathi lekh katha nibandh

त्यामुळे नवनवीन साहित्यिक मराठी भाषेतून निर्माण होणे ही काळाची गरज आहे. तसेच लेखकांचा पुरेसा सन्मान मिळणे आणि त्यांना योग्य प्लॅटफॉर्म उपलब्ध होणे त्याचबरोबर साहित्य चोरी थांबवणे या उद्देशातून आम्ही हा समूह तयार केला आहे.

मराठी भाषेच्या प्रती आमचे जे कर्तव्य आहे ते पार पाडण्याचा हा छोटासा प्रयत्न. तुम्ही देखील मराठी भाषेप्रती आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी हा समूह जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आमची मदत करा.

लक्षात घ्या की ह्या समूहाची सभासद फी ५०₹ प्रती महिना आहे. सभासद फी 9146494879 या Gpay किंवा PhonePe नंबर वर टाकल्यानंतर ग्रुप मध्ये add केले जाईल. एकदाच वार्षिक सभासदत्व घेणाऱ्यांना फी मध्ये १०० ₹ सूट मिळेल.

या मासिक सभासदत्वामध्ये तुम्हाला मिळेल

१) साहित्यक्षेत्रातील प्रगतीसाठी ४ साप्ताहिक स्पर्धा

२) सहभागासाठी आकर्षक डिजिटल प्रमाणपत्रे

३) स्पर्धेतील तुमचे चार लेख सुप्रसिद्ध अशा मराठी टाईम वेबसाईटवर पब्लिश केले जातील. ज्याची लिंक तुम्ही कुठेही शेअर करू शकता.

४) तुमचा फोटो आणि लेखाच्या नावासहीत चार सुंदर वॉलपेपर.

५) लेख त्याच्या विषयाला अनुसरून छान वॉलपेपरसने सजविला जातील.

६) तुमचा लेख गुगल सर्च मध्ये आणण्यासाठी SEO techniques वापरल्या जातील.

तुमच्या एका लेखावर अंदाजे ५००₹ चे काम केले जाईल म्हणजे ५०₹ च्या सभासद फी मध्ये ४ लेखांवर होणारे २०००₹ चे फायदे तुम्हाला मिळणार आहेत

https://chat.whatsapp.com/JDA5qGHXn43IofHbacHWBd

9146494879 या Gpay/ PhonePe नंबरवर एका महिन्याची ५०₹ फी किंवा वर्षाची ५००₹ सभासद फी पाठवा. Payment कमेंट मध्ये स्वतःचे नाव टाका. आणि वरील ग्रुप लिंकला जॉईन व्हा.

आमच्या समूहातील कविता वाचण्यासाठी भेट द्या mazablog.online

“जादुई यंत्र” | Mobile Good or Bad in Marathi

“जादुई यंत्र” | Mobile Good or Bad in Marathi

Good morning suvichar in marathi

“जादुई यंत्र” | Mobile Good or Bad in Marathi

Leave a Reply

%d bloggers like this: