तंत्रज्ञानाची क्रांती by रवी आटे | Mobile Shrap Ki Vardan 2024

साहित्यबंध समूह आयोजित साप्ताहिक स्पर्धेत रवी आटे यांनी Mobile Shrap Ki Vardan या कीवर्ड वर आधारित “तंत्रज्ञानाची क्रांती” हा लेख लिहिला आहे. चला तर वाचूया.

तुम्ही वाचत आहात तंत्रज्ञानाची क्रांती | Mobile Shrap Ki Vardan

साहित्यबंध समूह आयोजित
साप्ताहिक उपक्रम क्रमांक ५
लेखाचा विषय-मोबाईल श्राप की वरदान
शीर्षक-तंत्रज्ञानाची क्रांती
दिनांक ७ ते ९ नोव्हेंबर २०२३

तुम्ही वाचत आहात तंत्रज्ञानाची क्रांती | Mobile Shrap Ki Vardan

तंत्रज्ञानाची क्रांती | Mobile Shrap Ki Vardan

हे युग तंत्रज्ञानाचे आहे. अलीकडील काही दशकात तंत्रज्ञानाने अभूतपूर्व क्रांतीचे शिखर गाठले आहे. मानवाच्या हाती मोबाईल आल्यापासून तर मानवाच्या जीवनात आमुलाग्र परिवर्तन झालेले आहे. अत्यंत चमत्कारिक असे हे सुटसुटीत यंत्र आहे. मोबाईल मुळे संपूर्ण जग व्यक्तीच्या जवळ आले आहे. मोबाईलचे अनेक लाभ मानव जातीला होत आहेत. पूर्वी फोन वरून संपर्क होत होता . त्यात भरपूर वेळ खर्ची पडायचा. खर्चही खूप व्हायचा. फार कमी संपर्क व्हायचा. त्यासाठी देखील रांग लावावी लागायची. त्याचप्रमाणे घरी देखील फोन घ्यावाच लागायचा. मोबाईल आल्यापासून हळूहळू फोन कमी होत गेलेत. फोनच्या तारांचे जाळे देखील त्यामुळे दिसून येत नाही. त्या तारांतून एक विशिष्ट प्रकारचा ध्वनी ऐकू यायचा हे सर्वांनाच आठवत असेल.

तुम्ही वाचत आहात तंत्रज्ञानाची क्रांती | Mobile Shrap Ki Vardan


विज्ञान तंत्रज्ञानात दैनंदिन प्रगती घडून येत आहे. अनेक वर्षांपासून संगणकाचे सर्व फायदे मोबाईल मध्ये मिळत आहेत. त्यामुळे अलीकडे तर मोबाईल व्यक्तीचा श्वास की प्राण झालेला आहे. मोबाईल मध्ये दिनदर्शिका, कॅल्क्युलेटर, घड्याळ, अलार्म, टॉर्च, नोटबुक इत्यादी सर्व सुविधा देण्यात आलेल्या आहेत. आणीबाणीच्या वेळी पोलीस, फायर ब्रिगेड किंवा डॉक्टरशी संपर्क साधण्यासाठी मोबाईलचा तातडीने उपयोग केला जातो. एवढेच नाही तर ऑफिसचे सर्व काम देखील मोबाईलवर केल्या जाऊ शकते. किंबहुना अलीकडे केले जाते. एकाच वेळी असंख्य व्यक्तींना सूचना देता येतात, महत्त्वाच्या बैठका आयोजित करता येतात.

मोबाईलवर वृत्तपत्र वाचता येते तसेच सर्व बातम्या तात्काळ कळतात. हरवलेल्या मित्रांना शोधता येते.आवडीच्या विषयांची माहिती तसेच चलचित्र बघता येते.आठवलेले एखादे गाणे लगेच युट्युब वर ऐकून आनंद घेता येतो. स्वतःच्या आवाजात गाणे रेकॉर्ड पण केल्या जाते. कराओके सिंगिंग करता येते.इतरांचाही आवाज रेकॉर्ड केला जातो. संग्रह करून ठेवता येतो. छायाचित्रे व चलचित्रे घेऊन आठवणी जपता येतात. प्रवास करताना जीपीएस द्वारे नेमका पत्ता व स्थान कळण्यास संपूर्णपणे सहाय्य मिळते.

तुम्ही वाचत आहात तंत्रज्ञानाची क्रांती | Mobile Shrap Ki Vardan

तंत्रज्ञानाची क्रांती by रवी आटे | Mobile Shrap Ki Vardan 2024

मोबाईलवर विशिष्ट ॲप डाऊनलोड करून पियानो सारखे वाद्य देखील वाजवता येते. मोबाईल वरच विविध भाषा ,गायन तसेच संगीत शिकता येते. व्हिडिओ कॉल करून प्रत्यक्ष घटना व व्यक्तींना बघता येते. ट्रेन ,फ्लाईट किंवा हॉटेलचे आरक्षण घरूनच करता येते. ऑनलाइन वेबसाईट वरून विविध वस्तूंची खरेदी करून पेमेंट ही त्यावर मोबाईल द्वारे करता येतो. इंटरनेटचा वापर करून शैक्षणिक, सामाजिक आर्थिक, वैद्यकीय अशा सर्व प्रकारच्या विषयांचे ज्ञान प्राप्त करून घेता येते. त्याचप्रमाणे प्राप्त असलेली माहिती खरी की खोटी ते देखील तपासण्याची मोबाईल मध्ये सुविधा असते. या सर्व वैशिष्ट्यांमुळे सर्वांच्याच हाती मोबाईल आढळून येतो.

मोबाईलवरच चित्र काढण्याचे समाधान घेता येते व त्यात रंगही भरता येतात. मोबाईल मुळे घड्याळ, टॉर्च ,कॅल्क्युलेटर, नोटबुक अशा बऱ्याच गोष्टी वापरण्याची फारशी आवश्यकता राहिलेली नाही. मोबाईल हे जगात संपर्काचे क्रांतिकारी साधन झालेले आहे. हजारो किलोमीटर वरील व्यक्तीशी क्षणात बोलता येते. मोबाईल येण्यापूर्वी या चमत्कारांची स्वप्नात देखील मानवाने कल्पना केलेली नव्हती.

तुम्ही वाचत आहात तंत्रज्ञानाची क्रांती | Mobile Shrap Ki Vardan


कीपॅड चे मोबाईल जाऊन टच स्क्रीन चे मोबाईल आलेले आहेत. लोकांना त्याची सवय पण झालेली आहे. सुरुवातीला अर्थातच मोबाईल वापरणे कठीण वाटत होते. आता लहान लहान मुले देखील मोबाईल शिकलेले आहेत. मोबाईलचे आकार देखील बदलत गेलेले आहेत. सुटसुटीत आकारात मोबाईल येऊ लागले आहेत. मोबाईल मुळे अर्थातच दैनंदिन जीवन खूपच सुखद झालेले आहे. शारीरिक श्रम ,वेळ व पैसा मोबाईल मुळे मोठ्या प्रमाणावर वाचतो यात शंकाच नाही. व्हॉइस टायपिंग च्या सुविधेमुळे कविता, लेख इत्यादी साहित्य तात्काळ तयार करणे व ते संबंधितांना पाठविणे सहज शक्य झालेले आहे. जगातील सर्वच विद्यापीठात हा अभ्यासक्रमाचा विषय झाल्याने भारतातील हजारोंच्या संख्येत विद्यार्थी अमेरिका व इतर देशात या तंत्रज्ञानाचे उच्च शिक्षण घेत आहेत. मात्र मोबाईलचे वाईट परिणाम देखील झालेले आहेत. त्याचाही आढावा घ्यावाच लागेल.

तुम्ही वाचत आहात तंत्रज्ञानाची क्रांती | Mobile Shrap Ki Vardan


माणूस हा सामाजिक प्राणी आहे. व हे सामाजिकीकरण त्याला प्रत्यक्षात हवे असते. मोबाईल यु गामुळे सामाजिकीकरणाची व्याख्याच बदलायला लागली. आभासी स्वरूपाचे सामाजिकीकरण समाजात दिसून येत आहे. हा एक अतिशय चिंतेचा विषय आहे. मोबाईलचे दुष्परिणाम दूर करण्यासाठी लोकांना विशिष्ट प्रकारचे प्रशिक्षण देण्याची आवश्यकता मोठ्या प्रमाणावर निर्माण झालेली आहे. लहान मुलांपासून मोठ्या व्यक्तींपर्यंत सर्वच लोक मोबाईलच्या संपूर्ण आहारी गेल्याचे चित्र दिसते. त्यामुळे शारीरिक व मानसिक प्रश्न उपस्थित झालेले आहेत. डोळे ,कान ,मेंदू, किडनी यावर तर परिणाम स्पष्टपणे दिसून येऊ लागले आहेत.

मोबाईल मुळे अपघाताचे प्रमाण देखील खूपच वाढलेले आहेत. तंत्रज्ञानाचा चुकीचा वापर करून बँकेच्या खात्यातून चोरी होण्याचे प्रमाण वाढलेले आहे. व्यक्तीची गोपनीय माहिती वाईट उद्देशाने मिळविली जाते. मोबाईलच्या रेडिओ किरणांचा शरीरावर अतिशय वाईट परिणाम होत आहे. झोपेचे प्रश्न निर्माण झालेले आहेत. कॅन्सरचे प्रमाण देखील वाढलेले आहे. गेमिंग मध्ये तरुण पिढी बरबाद होत आहे.

रवी आटे | Mobile Shrap Ki Vardan 2024

तुम्ही वाचत आहात तंत्रज्ञानाची क्रांती | Mobile Shrap Ki Vardan

इंटरनेट द्वारे मोठ्या प्रमाणावर अश्लील चलचित्रे बघितली जातात ही वस्तुस्थिती आहे. त्याचप्रमाणे व्यक्तीला संविधानाने जो वैयक्तिक गोपनीयतेचा अधिकार दिला त्याला या तंत्रज्ञानाच्या विकासामुळे काहीही अर्थ राहिलेला नाही. गोपनीयतेचा भंग होणे सहज सोपे झालेले आहे. त्यामुळे अप्रिय अशा अनेक घटना समाजात घडताना दिसून येतात. मोबाईलच्या वापरामुळे व्यक्तींची प्रत्यक्ष भेट घेतल्या जात नाही व पत्र पाठविण्याचा तर प्रश्नच निर्माण होत नाही. ते गोड विषय आता राहिलेले नाहीत.विविध प्रकारची अपराधी प्रवृत्ती वाढलेली आहे.

या पिढीची जशी मोबाईल मुळे प्रगती घडून आली तसे अहीत देखील मोठ्या प्रमाणावर घडून येत आहे. मात्र यात मोबाईलच्या शोधाला दोष देऊन चालणार नाही. मोबाईलचा योग्य प्रकारे वापर करणे शिकवल्या जाऊ शकते. शासनामार्फत यामध्ये लक्ष घातले जात आहे. विशिष्ट प्रकारचे व्हिडिओ पाहण्यास मनाई करण्यात आलेली आहे. सायबर गुन्हे ही शाखा विकसित झालेली आहे व होत आहे.

तुम्ही वाचत आहात तंत्रज्ञानाची क्रांती | Mobile Shrap Ki Vardan


मोबाईल मुळे मान दुखी ,खांदे दुखी असे शारीरिक परिणाम झालेले आहेत. मात्र मोबाईलचे फायदे आपण मोजू शकत नाही एवढे आहेत. मोबाईलचा योग्य प्रकारे वापर केला तर मोबाईल सारखे सुंदर साधन नाही. विज्ञान -तंत्रज्ञानाच्या कोणत्याही शोधामुळे माणसाचे सामाजिक जीवन धोक्यात येऊ नये. यासाठी स्वतंत्रपणे प्रयत्न करावे लागणार आहेत. व्यक्ती व समाज हे साध्य आहे तर विज्ञान व तंत्रज्ञान हे साधन आहे याचे भान समाजास व सत्ताधाऱ्यांना देखील असणे आवश्यक आहे. मात्र या सर्व बाबींचा विचार करता मोबाईल निश्चितपणे वरदान ठरलेले आहे यात मात्र शंका घेण्याचे कारण नाही. श्राप असण्याचा तर प्रश्नच उद्भवत नाही. मात्र त्याची कारणे दूर करावी लागतील.

रवी आटे सानपाडा
नवी मुंबई
९३२४७४५९७०

तुम्ही वाचत आहात तंत्रज्ञानाची क्रांती | Mobile Shrap Ki Vardan

समाप्त.

साहित्यबंध समूहाची माहिती आणि जाहिरात

दिवसेंदिवस मराठी भाषेवर इतर भाषेतील शब्दांचा अतिरेक होत आहे. कित्येक मराठी शब्द तर नवीन पिढीच्या कानावर देखील पडले नाहीत. यामुळे पुढे जाऊन मराठी भाषा हळू हळू लुप्त होईल अशी आम्हाला भीती आहे. लिहिणे, बोलणे, ऐकणे आणि वाचणे ह्यातूनच मराठी भाषा अनंत काल टिकू शकते.

marathi lekh katha nibandh

त्यामुळे नवनवीन साहित्यिक मराठी भाषेतून निर्माण होणे ही काळाची गरज आहे. तसेच लेखकांचा पुरेसा सन्मान मिळणे आणि त्यांना योग्य प्लॅटफॉर्म उपलब्ध होणे त्याचबरोबर साहित्य चोरी थांबवणे या उद्देशातून आम्ही हा समूह तयार केला आहे.

मराठी भाषेच्या प्रती आमचे जे कर्तव्य आहे ते पार पाडण्याचा हा छोटासा प्रयत्न. तुम्ही देखील मराठी भाषेप्रती आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी हा समूह जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आमची मदत करा.

लक्षात घ्या की ह्या समूहाची सभासद फी ५०₹ प्रती महिना आहे. सभासद फी 9146494879 या Gpay किंवा PhonePe नंबर वर टाकल्यानंतर ग्रुप मध्ये add केले जाईल. एकदाच वार्षिक सभासदत्व घेणाऱ्यांना फी मध्ये १०० ₹ सूट मिळेल.

या मासिक सभासदत्वामध्ये तुम्हाला मिळेल

१) साहित्यक्षेत्रातील प्रगतीसाठी ४ साप्ताहिक स्पर्धा

२) सहभागासाठी आकर्षक डिजिटल प्रमाणपत्रे

३) स्पर्धेतील तुमचे चार लेख सुप्रसिद्ध अशा मराठी टाईम वेबसाईटवर पब्लिश केले जातील. ज्याची लिंक तुम्ही कुठेही शेअर करू शकता.

४) तुमचा फोटो आणि लेखाच्या नावासहीत चार सुंदर वॉलपेपर.

५) लेख त्याच्या विषयाला अनुसरून छान वॉलपेपरसने सजविला जातील.

६) तुमचा लेख गुगल सर्च मध्ये आणण्यासाठी SEO techniques वापरल्या जातील.

तुमच्या एका लेखावर अंदाजे ५००₹ चे काम केले जाईल म्हणजे ५०₹ च्या सभासद फी मध्ये ४ लेखांवर होणारे २०००₹ चे फायदे तुम्हाला मिळणार आहेत

https://chat.whatsapp.com/JDA5qGHXn43IofHbacHWBd

9146494879 या Gpay/ PhonePe नंबरवर एका महिन्याची ५०₹ फी किंवा वर्षाची ५००₹ सभासद फी पाठवा. Payment कमेंट मध्ये स्वतःचे नाव टाका. आणि वरील ग्रुप लिंकला जॉईन व्हा.

आमच्या समूहातील कविता वाचण्यासाठी भेट द्या mazablog.online

तुम्ही वाचत आहात तंत्रज्ञानाची क्रांती | Mobile Shrap Ki Vardan

Veleche Mahtva Marathi Essay

तुम्ही वाचत आहात Mobile Shrap Ki Vardan | Mobile Shrap Ki Vardan

Leave a Reply

%d bloggers like this: