दादा… माझे पिता, गुरु व मित्र by अर्चना कुलकर्णी | My Father Story In Marathi Great for 2024

साहित्यबंध समूह आयोजित साप्ताहिक स्पर्धेत अर्चना कुलकर्णी यांनी My Father Story In Marathi या कीवर्ड वर आधारित “दादा..माझे पिता, गुरु, मित्र” हा लेख लिहिला आहे. चला तर वाचूया.

दादा… माझे पिता, गुरु व मित्र | My Father Story In Marathi

साहित्य बंध समूह आयोजित स्पर्धा
दिनांक: २९/११/२०२३

विषय: माझे बाबा

शीर्षक: दादा..माझे पिता, गुरु, मित्र

My Father Story In Marathi

दादा… माझे पिता, गुरु व मित्र | My Father Story In Marathi

के.रघुनाथ यशवंत कुलकर्णी, माझे वडिल. ते सगळ्यांचेच
दादा होते. देखणे,अतिशय आनंदी, उत्साही.दिवसभर काम, समाजसेवा हा त्यांचा दिनक्रम..!

मला आठवतंय, मी पाच वर्षांची होईपर्यंत आमच्या घरात आई, दादा, मी, दोन काका, दोन आत्या, आजोबा इतकी माणसं होती.आणि कमवणारे फक्त दादा..!

घरातली सर्व जबाबदारी आईची आणि नोकरी व घरातील खर्च ,भाजीपाला,कपडे ही सर्व जबाबदारी दादांची असायची. याशिवाय सण, पाहुणे नेहमी असायचे तथापि दादा सदैव हसतमुख, उत्साही, मृदुभाषी होते.मी एकटा कमावणारा ही भावना त्यांच्या वागण्यात, बोलण्यात कधीही नव्हती.आज या गोष्टीचे मला खूप अप्रूप वाटतेय. या शिवाय नात्यातील, मित्र परिवारातील, आमच्या समाजातील किती मुला मुलींच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत केली किंवा मिळवून दिली.प्रसंगी आमच्या घरी आसराही दिला. विशेष म्हणजे ही सर्व मंडळी त्यांच्या आयुष्यात स्थिरावले, त्यांची प्रगती झाली की त्यांनी आपली आठवण ठेवावी, उपकाराची फेड करावी ही अपेक्षा कधीच केली नाही. मला अशा पुष्कळ व्यक्ती आजही आठवतात ज्यांनी आपले काम झाल्यावर दादांची आठवणही ठेवली नाही.

दादा… माझे पिता, गुरु व मित्र | My Father Story In Marathi

दादा शाळेत शिक्षक होते . आपल्या संस्थेवर, व्यवसायावर त्यांचे कमालीचे प्रेम,निष्ठा होती . आपल्याला पगार किती आहे आणि आपण काम किती करतो याचा त्यांनी कधीही हिशोब केला नाही.आपल्या शाळेची स्वतःची मोठी इमारत, क्रीडांगण असावे हे त्यांचे स्वप्न होते . निवृत्तीनंतर तेवीस वर्षे त्यांनी निरपेक्ष भावनेने संस्थेचे कार्यवाह म्हणून काम केले, शाळेची स्वतःची भव्य इमारत व क्रीडांगणाचे उद्घाटन केल्यानंतर त्यांनी जगाचा निरोप घेतला. ते गेले तेव्हा त्यांच्या खात्यात फक्त दहा हजार रूपये होते..!

दोन ट्रस्टला त्यांनी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा स्थापन करण्यासाठी मदत व मार्गदर्शन केले.त्यासाठी कमालीचे कष्ट घेतले. काम पूर्ण झाल्यानंतर मात्र अलगद बाजूला झाले.

कौटुंबिक पातळीवर देखील त्यांनी आम्हा भावंडांवर सारखेच प्रेम केले. आम्ही पाच जणं पाच प्रकारचे होतो.त्यांनी मी सर्वात सर्वच बाबतीत कमी होते पण त्यांनी धाकटीच्या हुषारीचा, मधलीच्या सौंदर्याचा आम्हा बाकीच्यांना त्याचा दाखला देऊन हिणवले नाही. प्रत्येकाला त्याच्या मर्जीप्रमाणे शिक्षण घेऊ दिले व लग्न करू दिले.

दादा… माझे पिता, गुरु व मित्र | My Father Story In Marathi

दादा द्रष्टे होते.माझ्या बहिणीला मुंबईत सरकारी खात्यात नोकरी मिळाली होती. इंजिनिअरच्या चाळीस पदे भरली होती.त्यात एक बहीण होती. गुरूवारी पत्र मिळाले,रिपोर्टिंग शुक्रवार ते सोमवार होते. माझ्या बहिणीला दादांनी आग्रहाने, तिच्या मनाविरुद्ध शुक्रवारीच रूजू व्हायला लावले. त्या दिवशी फक्त तीच कामावर रुजू झाली.

वीस वर्षांनी जेव्हा एक पदोन्नती देण्याची वेळ आली तेव्हा माझ्या बहिणीला सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नती मिळाली …!

दादांनी आम्हाला कधी शब्दातून शिकवले नाही पण कृतीतून प्रेम व कर्तव्य कसे करावे हे प्रभावी पणे शिकवले. आमच्यावर शिस्तीचा बडगा त्यांनी कधीच उगारला नाही . ते आमच्याशी अगदी मित्रासारखे वागायचे.

या सर्व प्रवासात त्यांना आईची साथ खूपच मोलाची होती दादांना घरी येणार्यांना चांगले पदार्थ खाऊ घालणे फार आवडायचे तर आई प्रसन्न अन्नपूर्णा होती.

परमेश्वराच्या चरणी प्रार्थना की जन्मोजन्मी
हेच जन्मदाते असावे..!
?????

अर्चना कुलकर्णी ठाणे

दादा… माझे पिता, गुरु व मित्र | My Father Story In Marathi

Author Information –

अर्चना कुलकर्णी Archana Kulkarni

सौ.अर्चना अशोक कुलकर्णी ठाणे येथील रहिवासी आहेत. त्यांनी इंग्लिश मिडीयम मधून आपले शालेय शिक्षण घेतले असून त्यानंतर मेकॅनिकल इंजिनीअरिंगची पदविका देखील पूर्ण केले आहे. त्यांना 10 वर्षे मराठी भाषेत लेख लिहिण्याचा अनुभव असून त्यांनी 10 वर्षे मराठी कविता देखील लिहिल्या आहेत. तसेच त्यांना 20 वर्षापेक्षा जास्त मराठी भाषेची ओळख आहे. ते आठवड्यातून नियमितपणे 2-5 तास इतका वेळ मराठी भाषेत लिखाण करण्यास देतात. त्यांना मराठीतील लेख हा प्रकार आवडतो. त्यांना तुम्ही पुढील mail id किंवा फोन नंबर वर संपर्क करू शकता.

Mail id – [email protected]
फोन नंबर – 7506020990

तुम्हाला जर मराठी भाषेतील दर्जेदार साहित्य वाचायचे असेल तर तुम्ही आमच्या marathitime.in आणि mazablog.online या वेबसाईट ला भेट देऊ शकता.

The End.

दादा… माझे पिता, गुरु व मित्र | My Father Story In Marathi

अर्चना कुलकर्णी
अर्चना कुलकर्णी

Author Information - सौ.अर्चना अशोक कुलकर्णी , ठाणे येथील रहिवासी असून, तालुका ठाणे आणि जिल्हा ठाणे आहे. त्यांनी इंग्लिश मिडीयम मधून आपले शालेय शिक्षण घेतले असून त्यानंतर मेकॅनिकल इंजिनीअरिंगची पदविका देखील पूर्ण केले आहे. त्यांना 10 वर्षे मराठी भाषेतून लेख लिहिण्याचा अनुभव असून त्यांनी 10 वर्षे मराठी कविता देखील लिहिल्या आहेत. तसेच त्यांना 20 वर्षापेक्षा जास्त मराठी भाषेची ओळख आहे. ते आठवड्यातून नियमितपणे 2-5 तास इतका वेळ मराठी भाषेत लिखाण करण्यास देतात. त्यांना मराठीतील लेख हा प्रकार आवडतो. मराठी लिखाण करताना त्यांना नाही हे पुरस्कार प्राप्त झालेले आहे. त्यांना तुम्ही पुढील फोन नंबर वर संपर्क करू शकता. फोन नंबर - 7506020990

Leave a Reply