माझे गाव निबंध सुंदर मराठी लिखाण | My village essay in Marathi 500 Words

टोपीक वाचूनच मोठ्यांच्या आठवणी तर ताज्या झाल्या असतीलच पण परीक्षेत देखील My village essay in Marathi माझे गाव विषयवार निबंध मुलांना उपयोगी पडेल. चला बघूया.

माझे गाव निबंध My village essay in Marathi

पाखरे सारेच खेळतात अन्
किलबिलाट करतात गावाच्या वेशीत
आईच्या पदरात वाढतात मुले अन्
संस्कार घडतात आजीच्या कुशीत
दरवळतो सांजरातीला फुलांचा सुगंध
अन् खरा गंध येतो गावाच्या मातीत….

माझे गाव भंडारा जिल्ह्यातील साकोली वरून 7 km अंतरावर आहे. माझं बालपण माझ्या गावातच झालं. मी 1 ली ते 12 वी पर्यंत चे शिक्षण माझ्या गावातच पूर्ण केलो. माझे सर्व मित्र मैत्रीण या जास्त गावातच आहेत. नंतर शिक्षणासाठी मला बाहेर शहराच्या ठिकाणी जावं लागलं होतं परंतु गावाकडची ओढ मात्र कमी झाली नाही. कारण गावाकडचं जे वातावरण आहे तसं स्वच्छ, निर्मळ, शांत आणि आनंदी वातावरण शहरामध्ये मुळीच राहत नाही. त्यामुळे मी नेहमी दर उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये गावाकडे च येतो. कारण मला शहरामध्ये एवढे दिवस राहून ही तिडके कधीच रमलं नाही आणि तिकडचे वातावरण मला कधीच भावलं नाही. जिकडे तिकडे तो गाळ्यांचा धूर आणि मोठ मोठ्या कारखान्यांचा आवाज आणि ते अशुद्ध पाणी असल्यामुळे तिकडे कधीच निरोगी आयुष्य जगताच येत नाही.

माझे गाव निबंध सुंदर मराठी लिखाण | My village essay in Marathi

माझे गाव निबंध सुंदर मराठी लिखाण | My village essay in Marathi

आमच्या गावामध्ये रक्षाबंधन, दिवाळी, धुलिववंदन असे अनेक प्रकारचे अन सामुहिकरीत्या अगदी आनंदात साजरे केले जातात. रक्षाबंधन मध्ये कुणाला बहिण किव्वा कुणाला भाऊ नसला तरी देखील घराशेजराच्यांना भाऊ किव्वा बहिण बनवून रक्षाबंधन साजरे करतात. कुणाची परिस्थिती बरी नसली आणि त्यांनी दिवाळी मध्ये फराळ नाही बनवू शकले तर शेजारचे घरी आणून देतात. होळी ला सुद्धा सर्व एकमेकांच्या घरी जाऊन गुलाल लावून लहान मुले मोठ्यांचा आशिर्वाद घेतात. मात्र शहरामध्ये लोकं दारे लावून सर्व सण आप आपल्या घरामध्ये एकटे एकटेच साजरे करतात त्यामुळे जो सणांचा आनंद गावामध्ये येतो तो आनंद शहरा मध्ये येत नाही.

गावा मध्ये कुणाची मध्यरात्री जरी प्रकृती बिघडली तरी लोकं एका आवाजात जागे होतात आणि मदतीला धावून येतात. कुणाकडे वेळीच पैसे नसले तरी इकडून तिकडून जमा करून पैसे गोळा करून त्यांना दवाखान्यात दाखल करतात. आणि डब्या पासून तर औषधी पर्यंत सर्वच पुरवीत असतात मात्र शहरामध्ये भर दिवसा कुणी मरण ही पावला तरी देखील बाजूच्या घरी माहिती होत नाही अशी परिस्थिती आज शहराची झालेली आहे. गावामध्ये सुखात असो वा आनंदात असो सर्व एकजुटीने आणि आनंदाने राहतात. प्रत्येक सण आनंदात आणि उत्साहात साजरे करतात.

माझे गाव निबंध सुंदर मराठी लिखाण | My village essay in Marathi

गावामधली पहाट किती रम्य असते. सकाळची कोकिळेची कुहू कुहु आणि पक्षांचा किलबिलाट कानी पडल्यावर मन प्रसन्न वाटते. मग अंघोळ करून पूजा पाठ करून आज्जी च्या हातचं चहा नाष्टा केला की मग थेट दुपारचं जेवण करायचं आणि मग आज्जी आजोबांच्या कथा ऐकत बसायचं यातच दिवस कसा जातो हे कळतच नाही. नंतर सायंकाळी सुद्धा गावामध्ये जिकडे तिकडे हिरवळ बघायला मिळते आणि त्यासोबतच फुलांचा दरवळलेला सुगंध मनाला अगदी प्रसन्न करते. कधी लाईन अचानक गेली की गावाकडची सगळी मंडळी बाहेर बसून जेवणाची वेळ होई पर्यंत गप्पा गोष्टी सांगत बसतात…अशी मज्जा शहराकडे कधीच अनुभवयाला मिळत नाही. शहराकडची मंडळी आपली दारे खिडक्या बंद करून बंदिस्त राहतात त्यामुळे त्यांना हे अनुभव अनुभवायला मिळत नाही.

आमचे उन्हाळ्याची सुट्टी वर निबंध वाचा :- Marathi Essay on Summer Vacation

गायी बद्दल माहिती वाचा :- Cow Information In Marathi

माझे गाव निबंध सुंदर मराठी लिखाण | My village essay in Marathi

शहरामधले जीवन हे अत्यंत सुखदायी आणि आरामदायी असेल तरी देखील गावाकडच्या जिवनामधली जी समृद्धी असते ती शहरामध्ये राहूच शकत नाही. गावामधील निसर्ग सौंदर्य, इथे सामूहिक रित्या साजरे होणारे सण, उत्सव, रूढी, परंपरा, थोरा मोठ्यांचे अनुभव, गोष्टी, त्यांच्याकडून मिळालेले लहान मुलांमध्ये संस्कार या गोष्टी शहरामध्ये मिळत नाही. आज तर कित्येक शहरी माणसांना सुद्धा नोकरी मधून रिटायरमेंट मिळाल्या नंतर थेट गावाकडे यायची ओढ असते ते यामुळेच कारण गावाकडे जे शुद्ध आणि निर्मळ वातावरण मिळते ते कधीच मिळत नाही. त्यामुळे मला शहरामध्ये कधीच रमलं नाही आणि तिथलं वातावरण देखील कधीच माझ्या मनाला भावलं नाही.

Thank You…

1 thought on “माझे गाव निबंध सुंदर मराठी लिखाण | My village essay in Marathi 500 Words”

Leave a Reply

%d bloggers like this: