साहित्यबंध समूह मध्ये प्रेम वेदी मी यांनी NATE KASE ASAVE या कीवर्ड वर आधारित “नाते कसे असावे” हा लेख लिहिला आहे. चला तर वाचूया.
नाते कसे असावे | MARATHI ARTICLE NATE KASE ASAVE
व्यक्ती तितक्या प्रवृत्ती या उक्तीनुसार आलाच एखादा कटू अनुभव नात्यात तर त्याला विषारी उपमा देऊन आयुष्यातून हद्दपार करणे म्हणजे एखाद्या बिनविषारी जीवाला आपला पाय पडला म्हणून उगाच ठेचून मारण्या सारखे नाही का ठरणार? त्यापेक्षा अशा नात्यामध्ये पुढे जपून अंतर ठेवून वागले तर निदान एकमेकांबद्ल टोकाच्या तिरस्काराची
त्यापेक्षा अशा नात्यामध्ये पुढे जपून अंतर ठेवून वागले तर निदान एकमेकांबद्ल टोकाच्या तिरस्काराची भावना तरी जन्म नाही घेणार.
नाते कसे असावे | BEST MARATHI ARTICLE NATE KASE ASAVE 2024

काही नात्यांच्या आहारी जाऊ नये असे म्हणतात. म्हणजे अगदी सख्खी किंवा जवळची नाती सोडली तर इतर कोणाचाही प्रभाव आपल्या जगण्यावर इतका नक्कीच नसावा की समोरून झालेले थोडेसे बदलाव आपल्यालात्रासदायक ठरावे.
मुळात प्रत्येक व्यक्तीचे गुण विशेष आपल्याला सुरुवातीच्या काळापासून माहिती असतातच. जसे एखाद्याचा चिडखोरपणा, समोरच्याला कमी लेखण्याची कला, टोचून बोलण्याची पद्धत, बेफिकिरी, वरचढपणा, नकारात्मकता असले बरेच अवगुण आपणच सुरुवातीच्या काळात नजरअंदाज करत असतो. कारण आधीच्या गोडीगुलाबीच्या काळात बाकी आधीच्या गोडीगुलाबीच्या काळात बाकी चांगले गुण सरस ठरतात. खरा त्रास तेव्हा सुरू होतो जेव्हा अशा व्यक्तींचे मूळ स्वभाव काही काळानंतर वरचढ ठरतात आणि मग सुरू होते खटके उडण्याचे सत्र.
नाते कसे असावे | BEST MARATHI ARTICLE NATE KASE ASAVE 2024
आता वरील सारे अवगुण थोड्या फार प्रमाणात का असेना सगळ्यांमध्ये असतात. फक्त त्याचा समोरच्या नात्यात काय आणि किती प्रभाव पडतोय हे जाणून वेळीच अंतर जपले तर त्या नात्यांना विषारी नाती म्हणून तरी लेबल चिकटणार नाही.
बऱ्याचदा कोणतीही ओळख एखाद्या नात्यात बदले पर्यंत थोडा फार तरी काळ सरलाच असतो. सुरवातीच्या काळात नक्कीच काही गोडवा असतो, म्हणून तर त्याला एखाद्या नाते बंधाचं नाव जोडले जाते. पुढे जाऊन काही गणितं बदलतात.
याला कारण ठरतात त्या ‘अपेक्षा ‘
काही वेळेनुसार बदलत गेलेल्या .. तरकाही न बदललेल्या..
आता नात्यात परिपक्वता येण्याच्या काळात सगळ्याच अपेक्षा अगदी पूर्वीसारख्या पूर्ण व्हाव्यात ही अपेक्षाच मुळी अवास्तव ठरते. काही नात्यात ती काळानुरूप देखील जपली जाते किंबहुना अधिक फुलते, पण काही मध्ये अशा अपेक्षांचं ओझं बनत जातं. तिथूनच सुरू होतो अपेक्षाभंगाचा ससेमिरा आणि वाढत जाते नात्यातली कटुता..
नाते कसे असावे | BEST MARATHI ARTICLE NATE KASE ASAVE 2024

यावर उपाय म्हणजे कोणत्याही नात्यात अपेक्षा ठेवू नये असा नक्कीच नाही. इथे सर्व जण काही पूर्णत्वाला पोहोचलेले साधुजन नक्कीच नसतात. मनुष्याचा स्वभावाचा भागच आला तो – ‘ अपेक्षा ठेवणे’. काहीच अपेक्षा न जपता असलेली नाती ही काल्पनिक च असावी.(आई – वडील – भावंडं वा काही जवळची नाती यांना अपवाद असतात)
फक्त आपल्या अपेक्षा कोणासाठी ओझं बनत नाहीत ना याची काळजी घेऊन डोळस वृत्तीने नात्यांकडे पाहिले तर कुठे आणि कधी थांबावे याची जाणीव होऊ शकते.
आणि पुढे वाढून ठेवलेला त्रास नक्कीच कमी होऊ शकतो.
एखाद्या नात्याला Toxic पणाचे लेबल लागण्यापूर्वी पुलाखालून बरेच पाणी गेलेले असते. म्हणून त्या दलदलीत अडकण्यापूर्वीच नात्यात योग्य तो संयम
आणि अंतर वेळीच जपावे जेणेकरून त्या पासून सुटण्याचे चुकार मूलमंत्र नंतर शोधत बसावे लागू नयेत.
शेवटी इतकेच महत्त्वाचे की, नात्यात गुंतणे किंवा त्याला विषारी संबोधून झिडकारणे या दोन्ही गोष्टी दुसऱ्या कोणी आखून दिलेल्या साचेबद्ध नियमानुसार कधीच चालत नाहीत. स्वतःची योग्य समज प्रत्येक व्यक्तीला उपजतच असते, तिला फक्त चालना द्यावी आणि नात्यातली गोड गंमत अनुभवावी इतकंच.
प्रेमवेडी मी
नाते कसे असावे | BEST MARATHI ARTICLE NATE KASE ASAVE 2024
समाप्त.
साहित्यबंध समूहाची माहिती आणि जाहिरात
दिवसेंदिवस मराठी भाषेवर इतर भाषेतील शब्दांचा अतिरेक होत आहे. कित्येक मराठी शब्द तर नवीन पिढीच्या कानावर देखील पडले नाहीत. यामुळे पुढे जाऊन मराठी भाषा हळू हळू लुप्त होईल अशी आम्हाला भीती आहे. लिहिणे, बोलणे, ऐकणे आणि वाचणे ह्यातूनच मराठी भाषा अनंत काल टिकू शकते.

त्यामुळे नवनवीन साहित्यिक मराठी भाषेतून निर्माण होणे ही काळाची गरज आहे. तसेच लेखकांचा पुरेसा सन्मान मिळणे आणि त्यांना योग्य प्लॅटफॉर्म उपलब्ध होणे त्याचबरोबर साहित्य चोरी थांबवणे या उद्देशातून आम्ही हा समूह तयार केला आहे.
मराठी भाषेच्या प्रती आमचे जे कर्तव्य आहे ते पार पाडण्याचा हा छोटासा प्रयत्न. तुम्ही देखील मराठी भाषेप्रती आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी हा समूह जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आमची मदत करा.
लक्षात घ्या की ह्या समूहाची सभासद फी ५०₹ प्रती महिना आहे. सभासद फी 9146494879 या Gpay किंवा PhonePe नंबर वर टाकल्यानंतर ग्रुप मध्ये add केले जाईल. एकदाच वार्षिक सभासदत्व घेणाऱ्यांना फी मध्ये १०० ₹ सूट मिळेल.
या मासिक सभासदत्वामध्ये तुम्हाला मिळेल
१) साहित्यक्षेत्रातील प्रगतीसाठी ४ साप्ताहिक स्पर्धा
२) सहभागासाठी आकर्षक डिजिटल प्रमाणपत्रे
३) स्पर्धेतील तुमचे चार लेख सुप्रसिद्ध अशा मराठी टाईम वेबसाईटवर पब्लिश केले जातील. ज्याची लिंक तुम्ही कुठेही शेअर करू शकता.
४) तुमचा फोटो आणि लेखाच्या नावासहीत चार सुंदर वॉलपेपर.
५) लेख त्याच्या विषयाला अनुसरून छान वॉलपेपरसने सजविला जातील.
६) तुमचा लेख गुगल सर्च मध्ये आणण्यासाठी SEO techniques वापरल्या जातील.
तुमच्या एका लेखावर अंदाजे ५००₹ चे काम केले जाईल म्हणजे ५०₹ च्या सभासद फी मध्ये ४ लेखांवर होणारे २०००₹ चे फायदे तुम्हाला मिळणार आहेत
https://chat.whatsapp.com/JDA5qGHXn43IofHbacHWBd
9146494879 या Gpay/ PhonePe नंबरवर एका महिन्याची ५०₹ फी किंवा वर्षाची ५००₹ सभासद फी पाठवा. Payment कमेंट मध्ये स्वतःचे नाव टाका. आणि वरील ग्रुप लिंकला जॉईन व्हा.
आमच्या समूहातील कविता वाचण्यासाठी भेट द्या mazablog.online
नाते कसे असावे | BEST MARATHI ARTICLE NATE KASE ASAVE 2024
NAVARATRI INFORMATION IN MAHITI
नाते कसे असावे | BEST MARATHI ARTICLE NATE KASE ASAVE 2024