Netaji Subhash Chandra Bose Information In Marathi भारतीय स्वतंत्र संग्राम लढ्या मध्ये अनेक वीरांनी आपल्या जीवाची पर्वा न करता आपले प्राण अर्पण केले. इंग्रजांविरुद्ध लढा देत भारताला स्वतंत्र मिळवून देण्यासाठी अनेकांनी मोलाची भूमिका बजावली. या सर्व थोर विरारमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नाव आघाडीला येते. त्यांच्याविषयी आज आपण माहिती पाहणार आहोत.
Netaji Subhash Chandra Bose Information In Marathi
नेताजी सुभाष चंद्र बोस यांचा जन्म 23 जानेवारी 1897 रोजी ओरिसातील एका मोठ्या बंगाली कुटुंबात झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव जानकी नाथ तर त्यांची आई प्रभावती. असे त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची नावे आहेत. सुभाष चंद्र बोस यांचे वडील जानकीनाथ बोस हे घटक शहरातील एक नामांकित वकील होते तर त्यांची आई प्रभावती या गृहिणी होत्या. तसेच बंगालच्य विधानसभेत जानकी दास सदस्य देखील राहिलेले आहेत.
त्यांना इंग्रज सरकार करून रायबहादूर हा किताब देण्यात आला होता.प्रभावती देवींच्या वडिलांचे नाव गंगानारायण दत्त होते. दत्त घराणे हे कोलकात्त्यातील एक श्रीमंत घराणे होते.प्रभावती व जानकीनाथ बोस ह्यांना एकूण १४ मुले होती. त्यात ६ मुली व ८ मुले होती.सुभाषचंद्र त्यांचे सहावे अपत्य व पाचवे पुत्र होते.आपल्या सर्व भावांपैकी सुभाषला शरदचंद्र अधिक प्रिय होते.

Netaji Subhash Chandra Bose Information In Marathi
शिक्षण व विद्यार्थी जीवन
सुभाष चंद्र बोस यांनी आपली प्राथमिक शिक्षण रॅवेन्शॉ कॉलिजिएट हायस्कूल या शाळेतून पूर्ण केले.
त्या शाळेतील एक शिक्षिका होत्या त्यांचे नाव होते वेणी माधव दास त्या विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती जागृत करत असत. त्यांनी सुभाष चंद्र बोस मध्ये सुप्त देशभक्ती जागृत केली. व त्यांच्या अंतर्मनात एकच विचार राहिला फक्त देशभक्ती आणि देशभक्ती.
Netaji Subhash Chandra Bose Information In Marathi
नंतर त्यांनी वयाच्या15 व्या वर्षी सुभाष चंद्र बोस हे गुरूंच्या शोधात हिमालयामध्ये निघून गेले. त्यांचा गुरूंचा शोध आसफल राहिला. ते हिमालयामध्ये गुरूचा शोध घेऊन परत आले. व त्यानंतर त्यांनी स्वामी विवेकानंदांची साहित्य वाचायला सुरुवात केली आणि त्यांनी स्वामी विवेकानंद यांना आपले गुरु मानले.महाविद्यालयात शिकत असताना, अन्यायाविरूद्ध लढण्याची त्यांची प्रवृत्ती झाली.कोलकात्त्यातील प्रेसिडेंसी महाविद्यालयात इंग्रज प्राध्यापक ओटेन हे भारतीय विद्यार्थ्यांशी उर्मटपणे वागत असत.म्हणून सुभाषने महाविद्यालयात संप देखील पुकारला होता.
१९२१ साली इंग्लंडला जाऊन, सुभाष भारतीय नागरी सेवेच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले. परंतु इंग्रज सरकारची चाकरी करण्यास नकार देऊन त्यांनी राजीनामा दिला व ते मायदेशी परतले.
Netaji Subhash Chandra Bose Information In Marathi
नेताजी सुभाष चंद्र बोस महात्मा गांधी मतभेद
सुभाषचंद्र बोस व महात्मा गांधी यांच्यामध्ये विविध गोष्टींबद्दल मतभेद होत होते. गांधीजी हे अहिंसक व्यक्तिमत्व असून, त्यांना सुभाषचंद्र बोस यांच्या काही गोष्टी त्यांना पटत नव्हत्या, त्यामुळे त्यांच्यामध्ये मतभेद होत असत.
इसवी सन १९३७ च्या झालेल्या, निवडणुकीच्या कालावधीनंतर काँग्रेस पक्षाने सत्तेमध्ये त्यांचा सहभाग दर्शवू नये, असे नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे ठाम मत होते. परंतु, गांधीजींच्या तडजोडवादी धोरणांना नेताजींनी विविध प्रकारे सगळ्यांसमोर विरोध दर्शवला होता, व काँग्रेस मधील तरुण वर्ग यासाठी नेताजी सुभाषचंद्र बोस यांना पाठिंबा देत होते.
Netaji Subhash Chandra Bose Information In Marathi

आय.सी.एस. चा राजीनामा
आशुतोष मुखर्जी यांच्या शिफारसपत्रावरून दुसऱ्या वर्षी सुभाष चंद्र बोस यांना कोलकात्याच्या स्कॉटिश चर्च कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला. तत्त्वज्ञान हा विषय घेऊन त्यानी 1919 मध्ये पदवी परीक्षा प्रथमश्रेणीत उत्तीर्ण केली आणि एम.ए.चा अभ्यासही सुरु केला; पण त्यांच्या वडिलांना सारखे वाटे सुभाषने आय.सी.एस.ची परीक्षा उत्तीर्ण करावी.
केवळ वडिलांच्या इच्छेचा मान राखण्यासाठी बोस इंग्लंडला गेले. केवळ आठ महिन्यांच्या अभ्यासावर सुभाष चंद्र बोस आय.सी.एस.ची परीक्षा उत्तीर्ण झाले, एवढेच नव्हे तर ते त्या परीक्षेत गुणानुक्रमे चौथा क्रमांकावर उत्तीर्ण झाले. ब्रिटिश शासनात सनदी अधिकाऱ्याचे सर्वोच्च पद प्राप्त करून देणारी ती परीक्षा होती.
ब्रिटिशांच्या सेवेत प्रवेश करून एखाद्या सरंजामदारासारखे शाही जीवन जगणारे आय.सी.एस. अधिकारी अवतीभोवती होते; पण केवळ वडिलांच्या इच्छेखातर बोस यांनी ती परीक्षा दिली होती. सरकारी नोकरी ते कुठल्याही परिस्थितीत स्वीकारणार नव्हते. आजन्म अविवाहित राहून देशवासीयांची सेवा करायची, मातृभूमीला स्वातंत्र्य मिळवून द्यायचे, जातिभेद, अज्ञान, अंधश्रद्धा, गरिबी, अनारोग्य या ‘पंचासुरा’पासून देशाला मुक्त करायचे आणि ब्रिटिशांचे जालीम शासन देशातून हद्दपार करायचे, हा निश्चय सुभाषचंद्रांनी केव्हाच केला होता.
Netaji Subhash Chandra Bose Information In Marathi
इंग्लंडमधील वास्तव्यातच आय.सी.एस.चा राजीनामा देऊन सुभाषचंद्र बोस भारतात परतले. संपूर्ण सुखाचा, संपत्तीचा त्याग करून सुभाषचंद्रांनी हे सतीचे वाण बुद्धिपुरस्सर स्वीकारले आणि आयुष्याच्या अस्तापर्यंत ते जपले, किंबहुना स्वत:च्या संपूर्ण आयुष्याचाच होम केला.
Netaji Subhash Chandra Bose Information In Marathi
आझाद हिंद सेनेची स्थापना :
दुसऱ्या महायुद्धाच्या काळात नेताजी सुभाष चंद्र बोस यांना ब्रिटिशांनी कोलकत्ता येथे नजरकैदेत मध्ये ठेवले होते. या कैदेतून 17 जानेवारी 1941 रोजी नेताजी सुभाष चंद्र बोस निसटून अनेक समस्यांना तोंड देते जर्मनी येथे पोहोचले. जर्मनी देशामध्ये भारताबाहेरील भारतीयांची संघटना करून स्वतंत्र सेना उभारण्याचा त्यानी संकल्प हाती घेतला.
यासाठी त्यांनी जर्मनीमध्ये हिटलरची भेट घेऊन जर्मन सरकारची सहानुभूती मिळविली. त्यानंतर नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी जर मला शरण आलेल्या इंग्रजांच्या सैन्यातील हिंदी सैनिकांचे संघटन केले. त्यावेळी सर्व सैन्यांना प्रश्न आहेत काढण्यासाठी सुभाष चंद्र बोस यांनी भाषण केले होते सुभाष चंद्र बोस चे हे भाषण ऐकून सर्व हिंदी सैनिक भारावून गेले.
Netaji Subhash Chandra Bose Information In Marathi
एकीकडे जपानने सिंगापूरचा ब्रिटिशांचा आर मारी तळ काबीज केला होता. रस बिहारी बोस यांनी जपान मध्ये जपानच्या ताब्यातील हिंदी सैनिकांची एक सेना स्थापन केली. या सर्व सैनिकांची भेट घेण्याकरिता नेताजी सुभाषचंद्र बोस 90 दिवसाच्या पाणबुडीतील प्रवासाने अखेर जुलै 1943 मध्ये मृत्यूशी झुंज देत जपानची राजधानी टोकियो येथे सुरक्षित पोहोचले.
रस बिहारी बोस यांच्या विनंतीवरून जपानमधील हिंदी सैनिकांच्या सेनेचे नेतृत्व सुभाष चंद्र बोस यांनी केले. अखेर पाच जुलै 1943 ला सिंगापूर येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी ” आझाद हिंद सेनेची “ स्थापना केली. आणि याच वेळी त्यांनी “चलो दिल्ली” ही घोषणा देखील केली.
Netaji Subhash Chandra Bose Information In Marathi
जपानच्या कैदेतील भारतीय युद्धबंदी, भारतीय नागरिका आणि भारतीय स्त्रिया देखील स्वतः च्या इच्छेने या सेनेमध्ये दाखल झाल्या. व नेताजी सुभाषचंद्र बोस या सेनेचे सरसेनापती बनले यांच्या नेतृत्वाखाली ही सेना कार्यरत होती.
पूर्व आशिया भागातील लाखो भारतीयांचा या स्वातंत्र सेनेसाठी पाठिंबा मिळाला. या नंतर 21 ऑक्टोबर 1943 रोजी स्वतंत्र हिंदुस्थानचे आझाद हिंद सरकार स्थापन करण्यात आले.
Netaji Subhash Chandra Bose Information In Marathi
या सरकारला जपान, जर्मनी, इटली, चीन, ब्रह्मदेश, या सर्व देशांनी तात्काळ मान्यता दिली होती. या हंगामी सरकारचे आझाद हिंद सेना हे सर्वात महत्वाची लष्कर होते. लष्करी संघटने बरोबरच आझाद हिंदच्या हंगामी सरकारने नागरी शासन व्यवस्थे कडे देखील लक्ष केंद्रित केले होते. जनतेचे सहकार्य मिळावे म्हणून नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी अनेक सभा घेतल्या.
” कदम कदम बढाये जा “ या गीताशी एकजूट होऊन नेताजी सुभाषचंद्र बोस आणि त्यांचे लष्कर यांनी आझाद हिंदुस्तानचे आणि स्वतंत्र भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी विजयी वाटचाल सुरू केली.
जपानचे सत्ताधीश जनरल तोझो यांनी इंग्लंडकडून जिंकलेली अंदमान आणि निकोबार ही बेटे आझाद हिंद सेनेला समर्पित केली. यावेळी सुभाष चंद्र बोस यांनी अंदमान या बेटाला भेट दिली. आणि स्वतंत्र हिंदुस्थान चे प्रमुख नेते म्हणून त्यांनी अंदबार येते स्वतंत्र ध्वज देखील फडकावला. आझाद हिंद सेनेने भारताला मध्ये प्रवेश करून भारतातील इम्फाळ आणि कोहिमा याठिकाणी ब्रिटीशांच्या सेनेवर विजय मिळविला..
नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी दिल्ली येथील लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवण्यासाठी ” तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आजादी दूंगा” ही आजरामर घोषणा केली.
Netaji Subhash Chandra Bose Information In Marathi
आझाद हिंद सेनेचे भारत देशात इंग्रजांविरुद्ध लढाईत जोरा मध्ये चालू असताना जपानची मित्र राष्ट्रांच्या ताकती समोर पीछेहाट होऊ लागली. त्यामुळेच जपान कडून आझाद हिंद सेनेला मिळणारी मदत थांबली. यामुळे लढाई थांबवण्या शिवाय नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या पुढे कोणताही पर्याय उरला नाही.
त्यादरम्यानच ब्रिटिशांनी विमानातून पदका टाकून आझाद हिंद सेनेतील सैनिकांना ब्रिटिश श्रेणीमध्ये परत येण्याची लालसा दाखवली. परंतु आजाद हिंद सेनेतील एकही सैनिकाने ब्रिटिश सरकारचे लालसेचा स्वीकार केला नाही. परंतु जपान च्या हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांवर अनुबाम हल्ला झाल्याने जपानने शरणागती पत्करली. त्यामुळे आझाद हिंद सेना संपूर्णता संपुष्टात आली.
Netaji Subhash Chandra Bose Information In Marathi
भारतरत्न पुरस्कार
नेताजी सुभाष चंद्र बोस यांना 1992 मध्ये मरनोत्त्त्तर भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. परंतु सुभाष चंद्र बोस यांच्या मरणाचा पुरावा नसल्या कारणामुळे हा पुरस्कार देणे अयोग्य आहे असा युक्तिवाद करत सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने त्यांचा पुरस्कार वापस काढून घेण्यात आला.
मृत्यू:
सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू आजही एक गूढच आहे. काही अहवालांनुसार, 1945 मध्ये तैवानमध्ये विमान अपघातात त्याचा मृत्यू झाला. तथापि, त्याच्या मृत्यूबद्दल अनेक सिद्धांत आहेत आणि काही लोकांचा असा विश्वास आहे की तो अपघातात मरण पावला नाही तर त्याऐवजी त्याने आपले उर्वरित आयुष्य लपून जगले.
Author :- Mr. Shankar Kashte

तर मित्रांनो तुम्हाला Netaji Subhash Chandra Bose Information In Marathi नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या विषयी दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका…
वरील माहिती मध्ये काही चुका असतील किंवा काही लिहायचं राहून गेलं असेल तर ते आम्हाला कमेंट द्वारे कळवा आम्ही त्यामध्ये सुधारणा करत राहू.
धन्यवाद…
तर अशा या लेखातून आम्ही तुम्हाला जमेल तेवढी माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला जर आमचे काम आवडले असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा. तुम्हाला देखील लेख लिहायला आवडत असतील पण त्यासाठी व्यासपीठ मिळत नसेल तर आम्हाला कळवा.