एनएसएसची संपूर्ण माहिती | NSS Information In Marathi 2023

NSS Information In Marathi ही एक सेवा योजना आहे. एनएसएस उमेदवार पर्यावरण संरक्षण, आरोग्य, स्वच्छता, आणि नैसर्गिक आपत्ती किंवा आपत्कालीन वेळी पीडित लोकांना मदत करणे, हे NSS उमेदवाराचे कार्य असते.
एनएसएस मध्ये सामील होण्यासाठी उमेदवारांनी विद्यालयात नावनोंदणी करणे आवश्यक आहे. त्याविषयी सविस्तर माहिती आपण पुढे पाहूयात.

NSS Information In Marathi

NSS म्हणजे काय? (What is NSS in Marathi?)

NSS ही एक सेवा योजना आहे. ही योजना भारताच्या युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाद्वारे प्रसारित केली जाते. NSS ची स्थापना १९६९ मध्ये झाली.राष्ट्रीय सेवा योजना (NSS) हा भारतातील सरकारी प्रायोजित सार्वजनिक सेवा कार्यक्रम आहे. हा कार्यक्रम गांधीजींच्या जन्मशताब्दी वर्षात सुरू करण्यात आला आहे. विविध सामुदायिक सेवा द्वारे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय सेवा योजना (NSS) या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

NSS Information In Marathi

राष्ट्रीय सेवा योजनेचे मुख्य उद्दिष्ट महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीयत्वाची जाणीव त्यांच्या मनात निर्माण करून त्यांना सामाजिक कार्याचा सराव करण्यास भाग पाडणे, हे आहे. महाविद्यालयाचा परिसर स्वच्छ करणे, क्रीडांगणे तयार करणे, ग्रामीण विभागातील रस्ते बांधणे, प्रौढ शिक्षण, गलिच्छ वस्त्यांची सफाई, प्रथमोपचार, नागरी संरक्षण इत्यादी. कार्यक्रमांचा या योजनेत समावेश आहे. १९७६-७७ पासून ग्रामीण विभागाची सुधारणा, तसेच आर्थिक व सामाजिक दृष्ट्या कमजोर असलेल्या लोकांच्या विकासाची कामे यांवर भर देण्यात आला. या दृष्टीने ग्रामीण भागातील परिसराची सुधारणा व आरोग्य तथा कुटुंबनियोजन हे कार्यक्रम हाती घेण्यात आले. त्याचप्रमाणे उत्पादनविषयक कार्यक्रम, आणीबाणी, प्रौढ शिक्षण, मनोरंजन, बालकांसाठी उपक्रम इ. कामेही सुरू करण्यात आली आहेत. १९८५ च्या युवक वर्षामध्ये या कार्यक्रमांना विशेष उजाळा देण्यात आला.

NSS ची स्थापना 1961 मध्ये सुरू करण्यात आली. आणि स्थापना करण्याच्या वेळी महाराष्ट्रातील एकूण 37 विद्यापीठातून चाळीस हजार विद्यार्थी या योजनेचे जोडले गेले.

NSS चे आता जगभरातील २९८ संस्था आणि ४२ वरिष्ठ माध्यमिक परिषद आणि व्यावसायिक शिक्षण संचालनालयात ३.२ दशलक्ष विद्यार्थी आहेत. विद्यार्थी स्वयंसेवकांच्या NSS प्रयत्नांमुळे महाविद्यालये, विद्यापीठे आणि विशेष शिक्षण संस्थांमधील ३.७२ कोटी विद्यार्थ्यांना फायदा झाला आहे.

NSS Information In Marathi

NSS फुल फॉर्म (NSS Full Form in Marathi)

चला तर पाहूया NSS फुल फॉर्म माहिती.
NSS फुल फॉर्म : (national service scheme) नॅशनल सर्व्हिस स्कीम.
मराठी नाव : राष्ट्रीय सेवा योजना
राष्ट्रीय सेवा योजना हा उपक्रम भारत सरकार द्वारा प्रायोजित केला जातो.
नव पिढी युवकांना त्यांच्या मनामध्ये समाजसेवेचे भावना निर्माण करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय समाज सेवा या योजनेची 1961 मध्ये स्थापना करण्यात आली.

NSS Information In Marathi

NSS ची प्राथमिक उद्दिष्टे (Primary Objectives of NSS in Marathi)

कोणतीही शाखा संस्था योजना सुरू करण्या अगोदर ते सुरू करण्याचे उद्देश समोर ठेवले जातात. तसेच NSS राष्ट्रीय सेवा योजनेचे देखील काही उद्देश आहेत ते आपण पुढे पाहुयात.

• तरुणांमध्ये सामाजिक आणि नागरी जबाबदारीची भावना निर्माण करणे.

• राष्ट्रीय सेवा योजना मुळे विद्यार्थ्यांमध्ये समाजसेवा करण्याची जनजागृती निर्माण झाली.

• राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून वेळोवेळी पर्यावरण आणि कुटुंब निसर्ग कल्याणासाठी जनजागृती कार्यक्रम राबवले जातात.

• NSS भारताच्या आणि जगातील सामाजिक आणि आर्थिक आव्हानांबद्दल विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता वाढवण्याचे काम करते.

• समाजसेवेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करणे.
विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जबाबदारी आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना निर्माण करणे.
विद्यार्थ्यांना समाजाच्या उन्नतीसाठी काम करण्याची संधी उपलब्ध करून देणे.

NSS Information In Marathi

मी NSS मध्ये कसे सामील होऊ? (NSS information in Marathi)

प्रत्येक विद्यार्थ्यांच्या आणि तरुणाच्या मनात प्रश्न येतो की मी NSS मध्ये कसे सामील होऊ? असा प्रश्न देखील तुमच्या मनात असेल तर त्याचे उत्तर आम्ही पुढे दिलेले आहे.

सर्वप्रथम तुम्ही शाळा, महाविद्यालयातील NSS प्रमुखाशी बोलून राष्ट्रीय सेवा योजनेत सहभागी होण्यासाठी NSS स्वयंसेवक फॉर्म भरला पाहिजे. आणि फॉर्म भरल्या नंतर सर्व प्रोसेस पूर्ण झाल्यावर तुम्ही एनएसएस स्वयंसेवक व्हाल.
त्यानंतर, तुम्ही दोन वर्षांच्या कालावधीत किमान २४० तास समाजसेवा केली पाहिजे, तुमचे कर्तव्य पूर्ण झाल्यानंतर, तुम्हाला राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रमाणपत्र दिले जाईल, जे तुम्हाला नजीकच्या भविष्यात पुढील शिक्षण घेण्यास अनुमती देईल.

एनएसएसची माहिती | NSS Information In Marathi

NSS Information In Marathi

NSS चा फॉर्म कसा भरायचा? (How to fill the form of NSS?)

तुम्हाला देखील राष्ट्रीय सेवा योजना NSS स्वयंसेवक होण्यासाठी फॉर्म भरायचा असेल तर पुढे दिलेली संपूर्ण माहिती वाचा. जेणेकरून तुम्हाला फॉर्म सबमिट करतांना काही अडचणी येणार नाहीत.

(१) प्रथम अधिकृत वेबसाइट nsd.gov.in ओपन करा.
(२) प्रवेश लिंक उघडण्यासाठी,nsd.gov.in वर क्लिक करा.
(३) नंतर “नोंदणी करा” वर क्लिक केल्यानंतर सर्व आवश्यक माहिती भरा.
(४) व जेवढे आवश्यक कागदपत्रे आहेत. ते स्कॅन करून अपलोड करा.
(५) ऑनलाइन फी भरणे (उमेदवारांना NSS मध्ये अर्ज करण्यासाठी 50 रुपये शुल्क भरावे लागेल) ते भरून घ्या.
(६) एकदा फॉर्मचे पुनरावलोकन केल्यानंतर, सबमिट बटण वापरा.
(७) भविष्यातील संदर्भासाठी (STATUS), प्रिंटआउट काढा.

NSS Information In Marathi

NSS द्वारे स्वयंसेवकांना दिले जाणारे पुरस्कार (Awards given to volunteers by NSS in Marathi)

(NSS program officers) एन एस एस युनिट्स (PO) आणि युनिव्हर्सिटी द्वारे दिले जाणारे पुरस्कार पुढील प्रमाणे आहेत.

(१) राज्यस्तरीय पुरस्कार
(२) विद्यापीठ स्तरावरील पुरस्कार

(३) NSS राष्ट्रीय पुरस्कार
(४) जिल्हास्तरीय पुरस्कार
(५) महाविद्यालयीन स्तरावरील पुरस्कार

Author :- Mr. Shankar Kashte

Shankar

तर मित्रांनो तुम्हाला NSS information in Marathi या लेखात एनएसएस बद्दल संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे.
तर माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका…

वरील माहिती मध्ये काही चुका असतील किंवा काही लिहायचं राहून गेलं असेल तर ते आम्हाला कमेंट द्वारे कळवा आम्ही त्यामध्ये सुधारणा करत राहू.

धन्यवाद…

तर अशा या लेखातून आम्ही तुम्हाला जमेल तेवढी माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला जर आमचे काम आवडले असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा. तुम्हाला देखील लेख लिहायला आवडत असतील पण त्यासाठी व्यासपीठ मिळत नसेल तर आम्हाला कळवा.

Maze Gav Marathi Nibandh

Raksha Bandhan Nibandh In Marathi

ESSAY ON OUR FESTIVAL

Leave a Reply

%d bloggers like this: