गोष्टी देवाच्या… कथा पालखीची by सौ भक्ति केंजळे | Palakhi Marathi Story 2024

साहित्यबंध समूह आयोजित साप्ताहिक स्पर्धेत सौ भक्ति केंजळे यांनी Palakhi Marathi Story या कीवर्ड वर आधारित “गोष्टी देवाच्या… कथा पालखीची” हा लेख लिहिला आहे. चला तर वाचूया.

गोष्टी देवाच्या… कथा पालखीची Palakhi Marathi Story

पावसाळा चालू होतो आणि वेध लागतात पंढरपुरच्या विठोबा भेटीचे असंख्य पालख्या विठोबाच्या दर्शनाला आपापल्या गावाहून पायी मजल दरमजल करीत पंढरपूरात येतात आणि परत आपल्या गावाला मार्गस्थ होतात या सगळ्या संताच्या पालख्या गावकरी पायी करतात व त्या त्या गावातील लोकांना पावन करतात ही अखंड चालणारी परंपरा याने अगदी आपल्या महाराष्ट्राला समृद्ध केलय ही दिर्घ परंपरा माझ्या मनातील त्या कप्प्याचा ठाव घेते ज्यात आमच्या गावाला लाभलेली निवृत्तीनाथाची पालखी परंपरा विशद करते.

गोष्टी देवाच्या… कथा पालखीची by सौ भक्ति केंजळे | Palakhi Marathi Story 2024

गोष्टी देवाच्या… कथा पालखीची by सौ भक्ति केंजळे | Palakhi Marathi Story 2024

हो ते दिवस होते माझ्या लहानपणीचे, कळत्या वयापासून आमच्या गावातील पालखी सोहळा माझ्या नजरेसमोर यायचा…. निवृत्तीनाथांची पालखी नाशीकहून पंढरपूर यायची त्यात वाटेत लागणा-या गावात विश्रांतीसाठी थांबून परत मार्गस्थ होत असे…… तीच मुक्कामी वारीची कथा आज आपल्यापुढे मांडत आहे.

पालखी म्हटल की उत्साहाच अन चैतन्याच वातावरण गावात आहे, पिंपळनेर या गावात हनुमान मंदिरात पालखी -निवृत्तीनाथाची विसावते अन गावातील लोकांच्या मनोभावे भक्तीला जागृत करते त्या वेळचे दिवस म्हणजे खरीप हंगामाचे असतात, ठिकठिकाणी पेरण्या झालेल्या असतात. पावसाळा चालू झालेला असतो अशा निसर्गमय वातावरणात देवही भेटायला येतो. याच कोण कौतुक गावक-यांच्या चेह-यावरही दिसते, संताचे असलेले महत्व, त्यांचा गावक-यांवर झालेला पूर्वपरंपरीत बदल याची साक्ष देतो की आजही ही सारी मंडळी गावात आलेलया पालखीचे दिमाखात स्वागत करतात,

गोष्टी देवाच्या… कथा पालखीची by सौ भक्ति केंजळे | Palakhi Marathi Story 2024

कथा पालखीची by सौ भक्ति केंजळे | Palakhi Marathi Story 2024

गावात ही पालखी साधारण ७ च्या सुमारास येते, जरा टेकली की ८,८.३० च्या सुमारास आरती केली जाते, नैविद्य दाखवला जातो अन मग आमच्या घरी म्हणजे श्री हरी त्रिंबक भिडे यांच्या घरी काही लोकं साधारण १५, २० असे महाराजांसमवेत जेवायला येतात आणि आमच्या घरातील भक्तीमय वातावरणला समृद्ध करतात.

पालखी येणार म्हणून त्याची तयारी ही दरवर्षी वर्षभर आधीच केली जाते, या वेळी कोणते पक्वान्न ठेवू वगैरे इथपासून चर्चा सूरु अन ती थांबते प्रत्यक्ष पालखी येऊन गेल्यावरच माझ्या लहानपणी ही वारी भिडयांच्या जुन्या वाडयात येत असे आणि नंतर नंतर माझ्या आईने ती आमच्या शेतातील घरी आणली साधारण १० वर्ष शेतातील घरी महाराज आणि भक्तगण, काही डॉक्टर हे यायचे पण त्या नंतर वडीलांच्या प्रकृती कारणामुळे आम्हाला जेवायला घालयाचा अन् पाद्यपूजेचा मानही सोडावा लागला…

गोष्टी देवाच्या… कथा पालखीची by सौ भक्ति केंजळे | Palakhi Marathi Story 2024

आठवतात आजही ते दिवस पालखी साठी ठरलेला मेनू असायचा, जिलेबी किंवा बुंदी अन पोळी, बटाटयाची रस्सा भाजी, कोशींबीर, चटनी, मठठा, वरण-भात असा तो असायचा. वाडयातल्या घराची डाकडूजी ही त्यावेळी केली जायची, त्या वाड्यातील आमचे शेजारी म्हणजे माझे सख्खे काका त्यांचा मुलगा हा राहत असे व त्या पलीकडे आमच चूलत काका यांचे घर राहत असे व मधले घर वडीलांचे होते आणि ही तीन घरे मिळून वारक-यांची पंगत वाढण्यासाठी मदत करायची एकूणच पालखी गावात येणार म्हटल की गावात संघठीत वातावरण तयार व्हायच, सगळे मिळून या पालखीची जोरदार तयारी करायच्या नादात असायचे, ज्यांच्या घरी जेवणे असायची त्यांना गावातील लोक आपणहून मदतीला यायची… असे संघटीत वातावरण अन, दनानून उत्साह बघायला मिळायचा यावेळी….

गोष्टी देवाच्या… कथा पालखीची by सौ भक्ति केंजळे | Palakhi Marathi Story 2024

पालखीच्या जेवणाचा सगळा प्रसाद घरी करायचा अन मग तो गावातल्या घरी पोहोचवायचा असा खास शिरस्ता होता वडीलांचा अन बैलगाडीतून हा सगळा प्रसाद पाठवला जायचा, रस्सा भाजीचे पातीले एका घरगड्याच्या डोक्यावर पाठवीले जायचे, अन गावातल्या घरी मग तोपर्यंत सगळी व्यवस्था केली जायची….पाने वाढायची, रांगोळ्या, सतरंजी वगैरे, बरोबर ७.३० च्या सुमारास नैवेद्याचा डबा पाहोचता केला जायचा आणि पालखीला नैविद्य दाखविला जायचा, आरती व्हायची मग पायी येणारे वारकरी त्यापैकी काहींना प्रसादाला बोलावले जायचे….

Palakhi Marathi Story 2024

गोष्टी देवाच्या… कथा पालखीची by सौ भक्ति केंजळे | Palakhi Marathi Story 2024

पालखी वाहक, महाराज यांचे पाय घराला अन सगळ्या गावालाच लागणार, आपले गाव ,घरही पावन होणार ,आपले काम यशस्वी होणार, अन आपले पुढचे पूर्ण वर्ष सुखासमाधानात जाणार यावर गावक-यांचा कोण विश्वास असायचा त्यापैकीच एक आमचे कुटुंब असायचे, अन आपल्या वडीलांना हा पालखीच्या पाद्यपुजेचा मान मिळतोय याचे फारच कौतुक आम्हा भावंडामध्ये असायचे, नंतर नंतर या भक्तगणांना घेउन आमच्या रानातल्यासुद्धा घरी जिप याचची….

गोष्टी देवाच्या… कथा पालखीची by सौ भक्ति केंजळे | Palakhi Marathi Story 2024

त्यावेळी जेवणाचा घाट, सगळी तयारी, नंतरची आवराआवर, पंगत वाढणे, पादयपुजेची तयारी, यामध्ये खुप मजा यायची सोबत तितके परीश्रमही करावे लागायचे तरच हे सगळे व्यवस्थीत पार पाडले जायचे, माझी तर खास श्रद्धा होती की पालखीचे दर्शन घेणे म्हणजे आपले ते वर्ष सार्थकी लाणार. त्यांनतर दुस-या दिवशी चार लाच उठून पाद्यपूजेची तयारी करायला लागायची, पुजेचा प्रसाद, पूजेची तयारी, अन आंघोळी यात ६ वाजायचे बरोबर ६.१५ ला पाद्यपूजा होत असे अन मग पालखी पुढच्या प्रवासाला जायला मोकळी असायची….

गोष्टी देवाच्या… कथा पालखीची by सौ भक्ति केंजळे | Palakhi Marathi Story 2024

त्यावेळी या सगळ्या भक्तगणांच्या नाष्ट्याची जबाबदारी गावातील कोणा घराने घेतलेली असायची. अन त्या कांदेपोह्याचा वास दरवळाचा तिथल्या आसमंतात…

पाद्यपूजेला आम्ही महाराजांसोबत स्थानापन्न व्हायचो, अभिषेक वडीलांच्या हस्ते सपत्नीक व्हायचा अन आम्ही भावंडेही गोलाकार करून बसायचो हे सगळे चित्र असंख्य गावकरी बघायचे अन आम्हाला धन्य झाल्यासारखे वाटायचे, तो वडीलांना मिळालेला मानाचा गौरव त्यावेळी व्हायचा अन आमचे वडील हे फार मोठे कोणीतरी व्यक्ती आहे असे त्या बालवयात वाटायचे.. आणि ते गावक-यासांठी होतेही मोठे, शेतकरी, मास्तर वडीलअसणारे, घरची वडीलांची परिस्थती ही बेताची होती कारण बहीण भावंडांचा मोठा गोतावळा होता त्यातच वडीलांनी शिक्षण घेऊन आपले ग्रॅज्युएशन चे शिक्षण सरकारी अनुदानातुन पुर्ण करुन त्यावेळचे ते क्लासवन ऑफीसर होते अन ही सगळ्या गावक-यासांठी फार अभिमानाची गोष्ट होती. अशा या हुरहुन्नरी व्यक्तीने स्वबळावर घेतलेले शिक्षण, अग्रीकल्चर मध्ये मिळवलेली पदवी, अत्यंत अभ्यासू व्यक्तीमत्व याचा कोण अभिमान त्या वेळी वाटायचा…

गोष्टी देवाच्या… कथा पालखीची by सौ भक्ति केंजळे | Palakhi Marathi Story 2024

तर अशा प्रकारे पाद्यजूजा झाली की पालखी पुढच्या प्रवासासाठी मार्गस्थ व्हायची, गावकरी आपल्या वेशीपर्यंत या पालखीला निरोप द्यायला जायचे, देवाचे नामस्मरण करण्याचा, अन त्यानिमित्ताने एकत्र येउन काम करण्याचा हा सोहळा इथेच संपन्न व्हायचा

तर मग पाद्यपूजेनंतर आमची स्वारी वाडयातल्या वडीलांनी त्या काळी बांधलेल्या पिंपळाच्या पारावर असलेले नरसोबाचे देऊळ या ठिकाणी पोहोचते अन् मग दर्शन घेउन वाडयात सगळ्यांना भेटूनच पुढे प्रयाण करतो… अशा प्रकारे भक्तीत तल्लीन होउन अन गावच्या परंपरेत सामील होउन ख-या अर्थाने लीन व्हायला मजा यायची.

सौ. भक्ती केंजळे,

करंजे, पुणे.

गोष्टी देवाच्या… कथा पालखीची by सौ भक्ति केंजळे | Palakhi Marathi Story 2024

समाप्त.

साहित्यबंध समूहाची माहिती आणि जाहिरात

दिवसेंदिवस मराठी भाषेवर इतर भाषेतील शब्दांचा अतिरेक होत आहे. कित्येक मराठी शब्द तर नवीन पिढीच्या कानावर देखील पडले नाहीत. यामुळे पुढे जाऊन मराठी भाषा हळू हळू लुप्त होईल अशी आम्हाला भीती आहे. लिहिणे, बोलणे, ऐकणे आणि वाचणे ह्यातूनच मराठी भाषा अनंत काल टिकू शकते.

marathi lekh katha nibandh

त्यामुळे नवनवीन साहित्यिक मराठी भाषेतून निर्माण होणे ही काळाची गरज आहे. तसेच लेखकांचा पुरेसा सन्मान मिळणे आणि त्यांना योग्य प्लॅटफॉर्म उपलब्ध होणे त्याचबरोबर साहित्य चोरी थांबवणे या उद्देशातून आम्ही हा समूह तयार केला आहे.

मराठी भाषेच्या प्रती आमचे जे कर्तव्य आहे ते पार पाडण्याचा हा छोटासा प्रयत्न. तुम्ही देखील मराठी भाषेप्रती आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी हा समूह जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आमची मदत करा.

लक्षात घ्या की ह्या समूहाची सभासद फी ५०₹ प्रती महिना आहे. सभासद फी 9146494879 या Gpay किंवा PhonePe नंबर वर टाकल्यानंतर ग्रुप मध्ये add केले जाईल. एकदाच वार्षिक सभासदत्व घेणाऱ्यांना फी मध्ये १०० ₹ सूट मिळेल.

या मासिक सभासदत्वामध्ये तुम्हाला मिळेल

१) साहित्यक्षेत्रातील प्रगतीसाठी ४ साप्ताहिक स्पर्धा

२) सहभागासाठी आकर्षक डिजिटल प्रमाणपत्रे

३) स्पर्धेतील तुमचे चार लेख सुप्रसिद्ध अशा मराठी टाईम वेबसाईटवर पब्लिश केले जातील. ज्याची लिंक तुम्ही कुठेही शेअर करू शकता.

४) तुमचा फोटो आणि लेखाच्या नावासहीत चार सुंदर वॉलपेपर.

५) लेख त्याच्या विषयाला अनुसरून छान वॉलपेपरसने सजविला जातील.

६) तुमचा लेख गुगल सर्च मध्ये आणण्यासाठी SEO techniques वापरल्या जातील.

तुमच्या एका लेखावर अंदाजे ५००₹ चे काम केले जाईल म्हणजे ५०₹ च्या सभासद फी मध्ये ४ लेखांवर होणारे २०००₹ चे फायदे तुम्हाला मिळणार आहेत

https://chat.whatsapp.com/JDA5qGHXn43IofHbacHWBd

9146494879 या Gpay/ PhonePe नंबरवर एका महिन्याची ५०₹ फी किंवा वर्षाची ५००₹ सभासद फी पाठवा. Payment कमेंट मध्ये स्वतःचे नाव टाका. आणि वरील ग्रुप लिंकला जॉईन व्हा.

आमच्या समूहातील कविता वाचण्यासाठी भेट द्या mazablog.online

गोष्टी देवाच्या… कथा पालखीची by सौ भक्ति केंजळे | Palakhi Marathi Story 2024

Titanic Story in Marathi

गोष्टी देवाच्या… कथा पालखीची by सौ भक्ति केंजळे | Palakhi Marathi Story 2024

Leave a Reply

%d bloggers like this: