Warning: Undefined array key "@type" in /www/wwwroot/marathitime.in/wp-content/plugins/seo-by-rank-math/includes/modules/schema/class-frontend.php on line 107

Warning: Undefined array key "@type" in /www/wwwroot/marathitime.in/wp-content/plugins/seo-by-rank-math/includes/modules/schema/class-frontend.php on line 180

पन्हाळा 1200 वर्षापेक्षा जुना इतिहास | Panhala Fort Information in Marathi

पन्हाळा किल्ल्याबद्दल माहिती गोळा करताय? तर Panhala Fort Information in Marathi लेख तुमच्यासाठी अति महत्त्वाचा ठरेल .

या लेखांमध्ये पन्हाळा किल्ल्याचा इतिहास ,पन्हाळा किल्ल्याला दिलेले नाव ,पन्हाळा किल्ल्याच भौगोलिक स्थान ,पन्हाळा किल्ल्याला जाण्याचा योग्य मार्ग . सर्व गोष्टीबाबत तुम्हाला पुरेपूर माहिती मिळेल.

Panhala Fort Information in Marathi

Panhala Fort Information in Marathi

पन्हाळगड हा किल्ला कोल्हापूर जिल्ह्यात डोंगरावर असून याला डोंगरी किल्ला असे देखील म्हणतात. आणि हा किल्ला डोंगरी किल्ल्यांमध्ये मोडला जातो. समुद्रसपाटीपासून 977.2 मीटर उंचीवर असलेला हा पन्हाळा किल्ला अतिशय पुराणिक आणि प्रेक्षणीय स्थळ आहे. हा किल्ला राजा भोज यांनी ११७८-१२०९ बांधला आहे. डेक्कन किल्ल्यांमध्ये पन्हाळा किल्ला हा सर्वात मोठा किल्ला म्हणून मानला जातो.

पन्हाळा किल्ल्याचा इतिहास

असं म्हटलं जाते की हा किल्ला सर्वप्रथम नाग जमातीतील लोकांकडे होता. याचे पहिले नाव पन्नाग्णालय होते. व पाली भाषेतील हा किल्ला आहे. येथून सम्राट अशोकाने शिक्षणाचा प्रसार सुरू केला. इतिहासकार यांच्यानुसार पन्हाळ्याला साधारण एक हजार दोनशे वर्षाचा खूप जुना इतिहास आहे. हा किल्ला सर्वप्रथम शीलाहार भोज राजा नृर्सिंग यांच्या कारकिर्दीत बांधण्यात आला.

Panhala Fort Information in Marathi

पन्हाळा किल्ल्याचा भौगोलिक स्थान

पन्हाळगड हे ठिकाण उत्तर अक्षांश १६.४८° व पूर्व रेखांश ७४.८° यावर वसलेले आहे. पन्हाळा किल्ला हा कोल्हापूर जिल्ह्याच्या वायव्येस 21 कि .मीटर अंतरावर आहे. याची कोल्हापूर जिल्ह्यापासून असलेले उंची ७०० फूट आहे. पन्हाळा किल्ल्याच्या पायथ्यापासून ची उंची 275 कि.मी आहे. या गळ्याचा आजूबाजूचा घेर हा ४२मैल आहे. कुठल्याही प्रकारचा किल्ला बांधायचा असेल तर सर्वप्रथम तिथे पाण्याची सोय आहे का ?हे पाहिलं जाते. जिथे पाण्याची सोय असते तिथेच किल्ला उभारण्यात किंवा बांधण्यात येतो.

पन्हाळा गडाच्या आजूबाजूला पाण्याची कमी नाही म्हणून हा किल्ला या ठिकाणी उभारण्यात आला असेल. या गडाच्या दक्षिणेस कासारी आणि उत्तरेस वारना नदी आहे. आणि पन्हाळा किल्ला हा भोगावती नदीने वेढलेला आहे. पन्हाळा किल्ल्यावरच सादोबा आणि सोमाला नावाचे दोन तलाव आहे. हे तलाव आदिलशहाच्या काळात बांधण्यात आले होते.

पन्हाळगडाची विविध नावे कोणती?

पन्हाळगडावर विविध राजाने आपले राज्य गाजवले त्यामुळे तिथे ज्यांची राजवट होते त्या राजाने वेगवेगळे नाव ठेवले.
पन्हाळा गळाला ब्रह्मगीरी असे देखील म्हणत होते. ब्रह्मगिरी नावाचा इतिहास जाणून घेत असताना असं माहिती पडतं की ब्रह्मदेवाने मानसशाशी निर्माण करण्यासाठी इथे असलेले सोमेश्वर लिंग आणि सोमेश्वर सरोवरे निर्माण करून तपश्चर्या केली. या तपा वरूनच मानव सृष्टी निर्माण झाली अशी लोकांची समजूत आहे असे लोक सांगत आलेले आहे ,म्हणून या पन्हाळा गडाचे नाव ब्रह्मगिरी असे देखील होते.

पन्हाळगडाचे नाव प्रणालक किंवा पद्मनाल असे आले आहे. हा गड विजापूरकरांच्या ताब्यात आल्यानंतर ही या किल्ल्याचे नाव बदलण्यात आले होते. तेव्हा या किल्ल्याचे नाव बदलून शहानबी दुर्ग असे ठेवण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ताब्यात आल्यानंतर या गडाचे पुन्हा नामकरण झालं तेव्हा या गडाचे नाव पन्हाळा असं ठेवण्यात आलं. आणि शिवाजी महाराजांच्या काळात हा किल्ला पन्हाळगड म्हणून ओळखला जात होता.


घनगड किल्ल्याची माहिती | Ghangad Fort Information in Marathi

Fort of Maharashtra – Manjarsumbha Fort


पन्हाळगडावर जाण्याचा मार्ग

कोल्हापूर शहरातून जाण्यासाठी तुम्हाला बस, एसटी उपलब्ध आहेत. किंवा तुम्ही खाजगी वाहण्याने देखील जाऊ शकता येथे चार मार्ग आहे. ही वाट चार दरवाज्यामार्गे प्रवेश करते. तीन दरवाजा मार्गे जाण्याचा रस्ता देखील आहे या मार्गे जाण्यासाठी दुसरा महत्त्वाचा मार्ग तीन दरवाजातून जातो.

या गडावर पाहण्यासारखी कोणती ठिकाणी आहेत?

पन्हाळा गडावर गेल्यानंतर तुम्हाला अतिशय सुंदर आणि ऐतिहासिक स्थळे पाहायला मिळतील. ज्या स्थळांची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. आणि त्यांचा इतिहास देखील तुम्हाला माहिती नसेल, पण तिथे गेल्यानंतर आणि त्या स्थळांना भेटी दिल्यानंतर तुम्हाला खरा इतिहास माहिती पडेल. मुलांसाठी खूप महत्त्वाचे पर्यटन स्थळ म्हणून हे स्थळ ओळखल्या जाते. त्यामध्ये राजवाडा सज्ज कोटी,राजदिंडी, अंबरखाना ,चार दरवाजा, सोमाळे तलाव, रामचंद्रपंत अमात्य यांची समाधी , धर्म कोठी, संभाजी मंदिर. अंदरबाव ,महालक्ष्मी मंदिर, बाजीप्रभूंचा पुतळा. या सर्व ठिकाणांचा समावेश होतो.

पन्हाळगडावर राहण्याची सोय आहे का?

होय, पन्हाळगडावर गेल्यानंतर तुम्हाला तिथे अनेक निवासस्थाने आणि हॉटेल्स उपलब्ध आहेत. पर्यटकांसाठी ते उत्तम स्थळे आहेत.

पन्हाळगडावर खाण्याची सोय आहे का?

होय , पन्हाळगडावर निवासस्थानामध्येच तुम्हाला जाग्यावर “झुणका भाकर” दिली जाते तिथे झुणका भाकर हे सुप्रसिद्ध खाद्य आहे.

Author :- मिस. प्रतिक्षा गजानन मांडवकर

Pratiksha

Author

Marathi Time

4 thoughts on “पन्हाळा 1200 वर्षापेक्षा जुना इतिहास | Panhala Fort Information in Marathi”

Leave a Reply