पाऊस जसा कवी, लेखक यांना आवडणारा ऋतू आहे तसाच तो सजीव सृष्टी टिकून ठेवणारा अतिशय महत्वाचा काळ आहे. पाऊस पडला नाही तर | Paus Padla Nahi Tar हि कल्पना सुद्धा करवत नाही.
Paus Padla Nahi Tar
“येरे येरे पावसा तुला देतो पैसा”
“पैसा झाला खोटा आणि पाऊस आला मोठा”.
या ओळी लहानपणी खूपदा ऐकले असतील ही कविता खूप सुंदर आहे. “पावसाचे वर्णन” आणि पावसामुळे लहान मुलांना येणारी मज्जा एका कवीने कवितेतून स्पष्ट केली आहे.
खरंतर सर्वांना आवडणारा “पाऊस” कधी कधी मनाला स्पर्श करून जातो. इतकच नाही तर पहिल्या पावसाची ती पहिली मज्जा वेगळीच असते पाऊस आला की बेधुंद होऊन त्यामध्ये भिजलं ,नाचणं , जानेमन आणि चिंब होऊन घरात आल्यानंतर आईने रागावल्यानंतर रुसून पुसून बसणं ही मज्जा आजच्या काळातील मुलांना कधीच कळणार नाही. पाऊस म्हणजे आनंद पाऊस पडला की जसा मोरांना आनंद होतो तसाच देखिल लहान मुलांच्या चेहऱ्यावर ही आनंद येतो नकळत हसू येत . त्या आनंदाला मर्यादा राहत नाही. तसेच हा जर पाऊस येणं बंद झाला तर काय होईल हा विचार करणे देखील कल्पनेच्या बाहेर आहे…

पाऊस पडला नाही तर मराठी निबंध 500 शब्द | Paus Padla Nahi Tar
पावसाची वाट पाहणारा शेतकरी, लहानच नाही तर मोठी व्यक्ती सुद्धा पावसाची वाट पाहत असतात बंद झाला तर काय होईल याचा परिणाम काय होईल?
पावसाचे येणे अचानक बंद झाले तर आयुष्य कोरडे होऊन जाणार, जसे एका आईला तिच्या बाळाची काळजी असते त्याच प्रकारे शेतकऱ्याला येणाऱ्या पावसाची काळजी असते, इतकच नाही तर उष्णतेने तपत असलेली पृथ्वी तिला थंड होण्यासाठी पावसाची गरज असते, आणि पाऊस येणे अचानक बंद झालं तर पृथ्वीवरील सजीवांची जगण्याची इच्छा नष्ट होणार . जसे की पावसावर अवलंबून राहणारा झाड पाऊस न आल्याने मरून जाणार मोर कधीच आनंदाने नाचू शकणार नाही , शेतकरी आत्महत्या करेल इतकच नाही तर अशा अनेक गोष्टी घडतील ज्यामुळे मानव सृष्टीवर याचा घातक परिणाम होईल.
पाऊस पडला नाही तर मराठी निबंध 500 शब्द | Paus Padla Nahi Tar
_______________________________________
Majhi Aaji Nibandh In Marathi वाचा
Fathers Day Kavita In Marathi वाचा
_______________________________________
पाऊस पृथ्वीवर पडलाच नाही ही गोष्ट करणे म्हणजेच कल्पनेच्या बाहेर आहे. आणि आयुष्याची खरी मज्जा पावसातच आहे. पावसाच्या न येन्याने आयुष्य बेरंग होऊन जाणार. पावसात खेळण्याची जी मज्जा आहे ती कधीच उन्हाळ्यात पूर्ण होऊ शकत नाही. कारण जेव्हा पावसाचे थेंब हे पृथ्वीवर पडतो आणि त्यात थेंबाने त्या थेंबात मग्न होऊन पावसात ओल चिंब होऊन आणि त्या स्पर्शाने जीवनाचा आनंद लुटता येतो आणि पाऊस न आल्याने या सर्व गोष्टीची कल्पना करणे देखील अशक्य आहे. पाऊस पडलाच नाही तर सर्वत्र रोगराई पसरले. इतकच नाही हिरवगार रान आपण आपल्या डोळ्यांनी बघतो ते कधी पाहायला मिळणारच नाही.
नदी, नाले, कोरडे पडतील त्याला पाणी मिळणार नाही. प्राणी , पक्षी पाणी न मिळाल्याने मरून जातील कुठल्या सचिवाला पाणी मिळणार नाही . हीच परिस्थिती प्रत्येक सजीवांवर येणार इतकाच नाही तर पृथ्वीवरील गारवा हरवून जाणार. पृथ्वीवर पाऊस पडला नाही तर पृथ्वी ही मंगळ ग्रहासारखी झाली असती, अनेक सजीवांचा इथे नाश झाला असता ,कधीच सजीव सृष्टी निर्माण झाली नसती. या सर्वांना उत्तरे आपण सजीवांनाच द्यावे लागले असते.
पाऊस पडला नाही तर मराठी निबंध 500 शब्द | Paus Padla Nahi Tar
पावसामुळे वित्तहानी होते हे जरी खरी असले तरीही आपणच याला जबाबदार आहोत. भरमसाठ जंगल तोड केल्यामुळे पावसाला जमिनीत मुरायला वेळ लागते. इतकच नाही तर काही वेळा पाऊसही येत नाही असं सुरू राहिलं तर एक दिवस संपूर्ण जंगलांचा नाश होईल आणि काल्पनिक गोष्ट खरी व्हायला वेळ लागणार नाही.
पाऊस पडला नाही तर मराठी निबंध 500 शब्द | Paus Padla Nahi Tar
सजीवांच्या आयुष्यामध्ये पाण्याला अनन्य साधारण महत्त्व आहे. माणसाच्या शरीरात 70 टक्के पाणी आहे. माणूस जे काही द्रव पदार्थ खातो किंवा पितो त्यामध्ये पाण्याचा समावेश असतो. झाडे जगण्यासाठी सुद्धा पाण्याची आवश्यकता असते परजीवी सजीव हे झाडांवर अवलंबून असते आणि झाडांना जगण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते जर पृथ्वीवर पाणीच पडलं नाही, तर झाडे जगणार नाही ,आणि झाडे जगणार नाही तर झाडांवर अवलंबून असणारे सजीव मरून जातील आणि सजीवांचं अस्तित्व संपुष्टात येईल.

पाऊस पडला नाही तर मराठी निबंध 500 शब्द | Paus Padla Nahi Tar
निष्कर्ष
पाण्याशिवाय माणसाचे जीवन अपूर्ण आहे पाणी हे माणसाच्या जीवनातील सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. पाण्याशिवाय कुठल्याच सजीवाचं अस्तित्व नाही म्हणून भरमसाठ जी जंगल तोड होत आहे त्यावर उपाय काढला पाहिजे झाडे वाचवले पाहिजे तेव्हाच माणसाचे जीवन सुरक्षित आहे नाहीतर त्याचं अस्तित्व संपुष्टात यायला वेळ लागणार. नाही.
पाऊस पडला नाही तर मराठी निबंध 500 शब्द | Paus Padla Nahi Tar
Author :- मिस. प्रतिक्षा गजानन मांडवकर