Petrol Sample Tar Marathi Nibandh 2023|पेट्रोल संपले तर निबंध

पेट्रोल संपले तर हा परीक्षेत निबंधासाठी विचारला जाणारा नेहमीचा प्रश्न. Petrol Sample Tar Marathi Nibandh याचे योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न आम्ही ह्या लेखात केला आहे.

Petrol Sample Tar Marathi Nibandh

मित्रांनो, तुम्हाला मला आणि आपल्या सर्वांनाच पेट्रोल चं आपल्या जीवनात किती महत्व आहे हे वेगळं सांगायची मला तर मुळीच आवश्यकता वाटत नाही. कारण सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत आपल्याला पेट्रोल शिवाय जीवन जगताच येत नाही. घरचा किराणा आणायचा असेल, एका गावावरून दुसऱ्या गावी जायचं असेल, इतर काही सामान घ्यायला जायचं असेल किव्वा साधं आपल्याला जवळच फिरायला जायचं असे तरी देखील आपण वाहन शिवाय जात नाही. आणि वाहनाला पेट्रोल सारख्या इंधनाची अती आवश्यकता असते. मात्र तुम्ही कधी विचार केलाय का, आपल्या पृथ्वी वरचं पेट्रोल संपलं तर आपण काय करणार?

पेट्रोल संपले तर निबंध इन मराठी

आपल्या पृथ्वी तलावावर ऊर्जेचे अनेक स्त्रोत अस्तित्वात आहेत. त्यापैकी पेट्रोल सुद्धा आपल्या पृथ्वी तलावावर मिळणारे एक स्त्रोत आहेत ज्याच्या मदतीने आपण वाहने चालवून एका गावावरून दुसऱ्या गावी प्रवास करीत असतो आणि आपला अमूल्य वेळ सुद्धा वाचवत असतो. एवढंच नव्हे देश विदेशात देवाण घेवाण करण्यासाठी जे ट्रॅक, विमान, जहाज सारखे वाहतूक वापरतो यांना सुद्धा पेट्रोल डिझेल ची आवश्यकता असते. परंतु जगातील पेट्रोल आणि डिझेल चां साठा संपला तर मात्र हे वाहन चालणार नाहीत आणि देश परदेशात चालणारे व्यापार सुद्धा बंद पडतील आणि यामुळे आपल्या देशाची अर्थव्यवस्था सुद्धा खालावली जाईल. पेट्रोल डिझेल हे पृथ्वी तलावावरचे पारंपारिक स्त्रोत आहेत त्यामुळे ते कधीना कधी संपणार नक्कीच आहे.

Petrol Sample Tar Marathi Nibandh | पेट्रोल संपले तर कल्पनाप्रधान निबंध

Jagatil Petrol Sample Tar Nibandh in Marathi | पेट्रोल संपले तर काय होईल

शास्त्रज्ञांनुसार तर सन 2080 पर्यंत आपल्या पृथ्वी तलावावरचा पेट्रोल आणि डिझेल चा साठा पूर्णपणे संपणार आहे. पेट्रोल आणि डिझेल आजच्या काळात मानवाच्या जीवनाचा एक अविभाज्य घटक बनलेला आहे. पेट्रोल आणि डिझेल शिवाय तर सरल जीवनाची व्याख्या सुद्धा करता येणार नाही. परिणामी आपल्याला एका गावावरून दुसऱ्या गावी प्रवास करता येणार नाही किव्वा एका देशांमधून दुसऱ्या देशामध्ये सुद्धा प्रवास करता येणार नाही. ज्यामुळे परदेशी व्यापार सुद्धा ठप्प पडेल. आणि देशाची अर्थव्यवस्था दिवसेंदिवस ढासळत जाईल. याची जबाबदारी फक्त शासनाची नसून देशातील प्रत्येक नागरिकांची सुद्धा आहे.

Petrol Sample Tar Marathi Nibandh | पेट्रोल संपले तर कल्पनाप्रधान निबंध

पेट्रोल संपले तर फक्त दुष्परिणाम च होतील असं मुळीच नाही तर पेट्रोल संपले तर आपण परत आधीच्या काळात जाऊन आणि प्रवासासाठी आपल्याला बैलगाडी, घोडागाडी याचा वापर आपल्याला करावं लागेल ज्यामुळे वाहनांमधून निघणाऱ्या धुरामुळे जो प्रदूषण होत होता त्याला आता कुठंतरी आळा बसेल. आणि आपली पृथ्वी परत प्रदूषणमुक्त होण्याच्या मार्गी लागेल. पायी चालल्यामुळे व्यायाम जास्त प्रमाणात होईल त्यामुळे आपलं आरोग्य देखील सुरळीत राहील.
पेट्रोल संपले तर…….? याचा विचार आधीच केल्यामुळे भविष्यामध्ये उद्भवणाऱ्या समस्या आधीच जाणून घेऊन शास्त्रज्ञांनी विद्युत ऊर्जेवर चालणाऱ्या वाहनांचा शोध लावला आहे. ज्यामुळे पेट्रोल सारख्या इंधनाची बचत करता येईल.

शासनासोबतच ही आपली देखील जबाबदारी आहे पेट्रोल बचतीच्या कार्यात सहकार्य करायची. खाजगी वाहनांचा उपयोग न करता शक्य होईल तेवढं सार्वजनिक वाहनांचाच उपयोग करा. जेणे करून भविष्यात पेट्रोल सारख्या इंधनाचा साठा अबाधित राहील.

Petrol Sample Tar Marathi Nibandh | जगातील पेट्रोल संपले तर निबंध

        तर मित्रांनो आजचा आमचा “पेट्रोल संपले तर....?” हा निबंध कसा वाटला ते नक्कीच कळवा आणि आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि असेच निबंध वाचण्यासाठी आमच्या वेबसाईट ला visit करत रहा.

धन्यवाद….

आमच्या वेबसाईट वर अनेक उपयोगी निबंध सापडतील

वाचा माझा आवडता खेळ मराठी निबंध

वाचा Majhi Aai Nibandh In Marathi

वाचा Vastushastra Tips In Marathi

वाचा कथालेखन in मराठी मध्ये एका चिमणीची गोष्ट

वाचा पत्र लेखन कसे करतात . Patra lekhan in Marathi.

https://www.youtube.com/watch?v=suM3y5VN1fw

3 thoughts on “Petrol Sample Tar Marathi Nibandh 2023|पेट्रोल संपले तर निबंध”

Leave a Reply

%d bloggers like this: