प्रिय ताई | Best Poem on Sister in Marathi 2023

कवी अंगुलिमाल मायाबाई उराडे यांची बहिणीसाठी असलेली “प्रिय ताई | Poem on Sister in Marathi” कविता भावाच्या आयुष्यातले तिचे महत्व वर्णन करते.

प्रिय ताई - Poem on Sister in Marathi

प्रिय ताई | Best Poem on Sister in Marathi 2023

✍🏻विद्रोही कवी
अंगुलिमाल मायाबाई उराडे
मु. + पोष्ट :- बेंबाळ
ता.- मुल , जिल्हा :- चंद्रपूर
मो. 9689058439

प्रिय ताई | Best Poem on Sister in Marathi 2023

प्रिय ताई – Poem on Sister in Marathi

माझं जीवन जगण्याची “आशा” आहेस तू
माझ्या नाजूक हृदयाची “दिलाशा” आहेस तू


आयुष्यातील माझ्या “प्रेरणा” स्थान आहेस तू
माझ्या शिक्षणातील “विद्या” आहेस तू


जीवनाची “रचना” करण्याची “कल्पना” आहेस तू
मनातील भाष्य व्यक्त करणारी “भावना” आहेस तू


विचार करून मार्गदर्शन देणारी विचार “प्रणाली” आहेस तू
माझ्या अंतर्मनातील “मनिषा” आहेस तू


सर्वांना आपलंसं करणारी दयाळू “माया” आहेस तू
माझ्या ओठावरील “स्मित” हास्य आहेस तू


जीवनाची माझ्या “कोमल” गरज आहेस तू
आपलं बहीण-भावाचं नातं फुलविणारी माझी “प्रिय ताई” आहेस तू


माझ्या प्रयत्नांना साध्य करणारी “साधना” आहेस तू
सुख-दुःखात साथ देणारी मायाळू “ममता” आहेस तू


माझ्या जीवन प्रवासातील प्रकाशमय “रोशनी” आहेस तू
सुखाच्या पाठीमागील “केतकी” आहेस तू


जीवनाच्या गजऱ्यात खुलणारी “चमेली” आहेस तू
माझ्या हसर्‍या मुखातील “प्राजक्ता” आहेस तू


आयुष्यातील दुःख वाहून नेणारी “सरिता” आहेस तू
गुप्त विचारांना पालवी फोडणारी “पल्लवी” आहेस तू


जीवनात गंध दळवळविणारी “सुगंधा” आहेस तू
माझ्या आयुष्यातील महत्त्वाची “भूमिका” आहेस तू


जीवनात आदर्श माननारी “प्रतिमा” आहेस तू
नम्रतेने जीवन जगायला शिकविणारी “नम्रता” आहेस तू


माझं कल्याण करणारी “कल्याणी” आहेस तू
अंधारात उजेड शोधणारी “उज्वला” आहेस तू


माझ्या “गीता” च्या सुरातील “सरगम” आहेस तू
जीवन प्रवासातील तहान मिटविणारी “तृप्ती” आहेस तू


“प्रगती” करण्यास प्रवृत्त करणारी “प्रतीक्षा” आहेस तू
मला जिंकण्याचं स्वप्न दाखविणारी “सपना” आहेस तू


माझे भाग्य उजाडणारी “भाग्यश्री” आहेस तू
सर्व सजीव “सृष्टी” वर दया करायला लावणारी “करूणा” आहेस तू


मला वेळोवेळी जागृत करणारी “जागृती” आहेस तू
आयुष्यभर “शितल छाया” देणारी माझी “सावली” आहेस तू


संकट काळात हृदय शांतचित्त ठेवायला लावणारी “शांती” आहेस तू
ह्या कवी अंगुलिमाल ची जीवन “संजीवनी” आहेस तू


मला विशिष्ट अशा बंधनात बंदीस्त ठेवणारी “सीमा” आहेस तू
दुःखी जीवनाला तेजोमय करणारी “ज्योती” आहेस तू


साहित्य लिखाणात मला सदैव साथ देणारी “लेखणी” आहेस तू
माझ्या “आनंदी” मय जीवनात रिपरिपनारी “वर्षा” आहेस तू


माझे कवी मन व्यथित करणारी “कविता” आहेस तू
माझ्या विचारापेक्षाही सुंदर आहेस गं “सुकेशनी ताई” तू

प्रिय ताई | Best Poem on Sister in Marathi 2023

………………………………समाप्त………………………………………

प्रकाशवाटाच्या अधिकृत सभासदांसाठी खुशखबर.

साप्ताहिक प्रकाशवाटा🧾 वार्षिक सभासदत्व कसे घ्यावे❓

साप्ताहिक प्रकाश वाटा हे स्व निर्मित साहित्यिकांचे साहित्य यामध्ये कथा, कविता,गाणी सर्व काही प्रसिद्ध करण्यासाठी साप्ताहिकाचे वार्षिक सदस्यत्व फक्त 250/- रुपये इतके माफक दर निश्चित करण्यात आले आहे. वार्षिक सदस्यत्व घेण्यासाठी साप्ताहिकाच्या संपादिका प्रतिक्षा मांडवकर – +918308684865 यांच्याशी संपर्क करावा. तसेच +918308684865 या क्रमांकावर फोन पे अमाऊंट पाठवून वार्षिक सभासदत्व घ्यावे.
दर महा आपले दर्जेदार साहित्य प्रकाशित केले जाईल.

शिवाय

आता तुमचे लेख ऑफलाइनच नाही राहणार तर ते जातील ऑनलाइन

प्रकाशवाटा आणि मराठी टाईम यांच्या संयुक्त विद्यमाने तुमचे साहित्य होईल जगप्रसिद्ध ते देखील एकच सभासद फी मध्ये.

तुम्ही बरोबर वाचले आहे. प्रकाशवाटाच्या सभासद फी (250) मध्ये तुम्हाला मिळेल marathitime.in या सुप्रसिद्ध वेबसाईटचे सभासदत्व. ज्यात प्रत्येक महिन्याला तुमचे चार लेख/ कथा/ निबंध/ प्रवासवर्णन वेबसाईट वर टाकले जातील.

त्वरित या ऑफरचा फायदा घ्या. ऑफर पहिल्या 50 साहित्यिकांसाठी लिमिटेड.

prakashvata marathi saptahik

संपादिका
प्रतिक्षा मांडवकर
8308684865

मराठी टाईमच्या इतर गोष्टी वाचा

Marathi story

Katha lekhan in marathi

प्रिय ताई | Best Poem on Sister in Marathi 2023

Leave a Reply

%d bloggers like this: