पोलीस भरतीचा अभ्यास करताय? Police Bharti Information in Marathi हि माहिती तुमच्यासाठी अति महत्त्वाची ठरेल.
Police Bharti Information in Marathi

पोलीस भरती ही विविध देशातील कायद्यांची महत्त्वपूर्ण अंमलबजावणी करणारी एक एजन्सी असून पोलीस विभागा द्वारे ही आयोजित करण्यात येत असलेली एक महत्त्वपूर्ण भरती प्रक्रिया आहे. सार्वजनिक सुरक्षा गुन्हेगारी रोखणे, सुव्यवस्था राखणे ,नियुक्त कायदा ,कायद्याचे पालन करणे, इत्यादी गोष्टी पात्र उमेदवारांमध्ये असणे आवश्यक असते.
पोलीस भरतीचा इतिहास
पोलीस यंत्रणे शिवाय देश चालत नाही. कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित करण्याचे काम राजाकडे किंवा केंद्र शासनाकडे असायचे. उमराव , मोठे जमीनदार, नगरपालिका व इतर स्थानिक स्वराज्य संस्था काही महत्त्वाच्या निर्णयांना पार पाडायचे ,यामध्ये मूलभूत भेद असल्याने दोन वेगवेगळ्या प्रकारच्या पोलीस यंत्रणा उभारण्यात आल्या होत्या. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी राज्याची पोलीस दल उभा करण्याची पाश्चात्य कल्पना होती. पण देशातील काही लोकांनाही कल्पना सहनच झाली नाही.
शैक्षणिक पात्रता काय?
पोलीस भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही त्या विभागवार अवलंबून असते.
तसं पाहिलं तर पोलीस भरतीसाठी किमान दहावी पास विद्यार्थी देखील चालतो. शिवाय पदवीधर, डिप्लोमा यांना देखील यामध्ये संधी असते. डिप्लोमा झालेला विद्यार्थी किंवा डिग्री मिळवलेला विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करू शकतो.
10वी इयत्ता
काही पोलीस विभागांसाठी पात्र असलेला विद्यार्थी हा किमान दहावी इयत्ता मान्यता प्राप्त बोर्डातून उत्तीर्ण झालेला असावा.
12वी इयत्ता (HSC) काही पोलीस भरतीसाठी विद्यार्थ्यांची पात्रता बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
डिप्लोमा
काही विशिष्ट पदांसाठी विद्यार्थ्यांची पात्रता ही डिप्लोमा प्राप्त असने गरजेचे आहे.
पदवी:
पोलीस विभागातील काही अतिउच्च पदांसाठी किंवा अतिशय महत्त्वाच्या शाखांसाठी विद्यार्थी हा मान्यताप्राप्त पदवीतून पदवीधर असावा लागतो.
शारीरिक पात्रता – पुरुष उमेदवारांसाठी
उंची
पुरुषांसाठी उंचीचा विचार केला तर पाच फूट पाच इंच असणे आवश्यक आहे.म्हणजेच 165 सेमी “एसटी कॅटेगिरी” चा विचार केला तर उंची ही पाच फूट तीन इंच असणे आवश्यक आहे.
वजन
वैद्यकीय माणकानुसार उमेदवाराची उंचीच्या बरोबरच त्यानुसार त्याचं वजन असणे आवश्यक आहे .त्याची कुठल्याही प्रकारची नोंद केली जात नाही. ठराविक वजन असणे महत्त्वाचे नाही.
शारीरिक तंदुरुस्ती
१)मान्यताप्राप्त असलेला उमेदवार ह्याची कुठल्याही प्रकारची शस्त्रक्रिया झालेली नसावी.
२)तो शारीरिक दृष्ट्या आणि मानसिक दृष्ट्या मजबूत असायला हवा.
३)त्याला लांब उडी ,जवळची उडी, उंच झेप घेता आली पाहिजे.
तो कुठल्याही प्रकारच्या आजाराने ग्रस्त नसावा.
दहावी नंतर करियरचे उपलब्ध पर्याय | Career After 10th in Maharashtra
शारीरिक पात्रता – महिला उमेदवारांसाठी
उंची
१)महिला उमेदवारांसाठी उंची ही पाच फूट एक इंच असायला हवी.
२) एस टी कॅटेगिरी चा विचार केला तर उंची चार फूट अकरा इंच.
वजन
वजन हे तिच्या उंचीनुसार आणि वैद्यकीय मान्यतेनुसार असाव.
शारीरिक तंदुरुस्ती
शारीरिक तंदुरुस्ती मध्ये कुठल्याही प्रकारची लांब उडी ,जवळची उडी ,दूरवर धावणे आणि तक धरून ठेवणे महत्त्वाचे ठरते. उमेदवार महिलेची शारीरिक क्षमता असणे अति महत्त्वाचे ठरते.
यामध्येच सर्वात महत्त्वाचा मुद्दा असतो “सहनशक्ती चाचणी” पोलीस भरतीच्या वेळी सहनशक्ती चाचणी देखील केली जाते.
या चाचणीमध्ये महिलेला दूरवर धावणे, उंच उडी मारणे, या सर्व गोष्टीचा समावेश असू शकतो ,आणि या गोष्टींमध्ये प्राविण्य मिळवलेली स्त्री ही सहनशक्ती चाचणीमध्ये पास होऊ शकते.
पोलीस भरतीमध्ये लेखी परीक्षा होते का?
होय यामध्ये लेखी परीक्षा होते. यामध्ये उमेदवाराचं तर्क ज्ञान आणि बुद्धिमत्तेची क्षमता ओळखली जाते आणि ही अति महत्त्वाची ठरते यावरूनच उमेदवाराला निवडले जाते.
परीक्षेचे स्वरूप कसे आहे?
काही वेळा परीक्षेत आलेले प्रश्न हे निबंधात्मक असू शकतात, ज्याचे अगदी लांबलचक उत्तर लिहायचे असते .तर काही वेळा ऑप्शनल असतात .म्हणजे त्यामध्ये तुम्हाला चार प्रकारचे ऑप्शन दिले असता आणि योग्य ते उत्तर तुम्हाला निवडायचे असते.
कोण कोणत्या विषयाचा अभ्यास करावा लागतो?
सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी
तर्क आणि तार्किक क्षमता
गणित आणि संख्यात्मक क्षमता
इंग्रजी भाषा आणि आकलन
प्रादेशिक भाषा (लागू असल्यास)
वरील दिलेल्या विषयांचा अभ्यास हा विद्यार्थ्यांना करावा लागतो, यामध्ये विद्यार्थ्यांच तर्कज्ञान, विज्ञान आणि बुद्धिमत्ता लक्षात घेण्यात येते.
पोलीस भरतीसाठी कुठले आवश्यक कागदपत्रे असणे गरजेचे आहे?.
१)विद्यार्थ्यांना त्यांच्या दहावीची म्हणजेच एसएससी गुणपत्रिका असणे आवश्यक आहे. त्यामध्ये तो उत्तीर्ण असायला हवा.
२) इयत्ता बारावीची गुणपत्रिका आणि उत्तीर्ण प्रमाणपत्र देखील आवश्यक आहे.
३) कुठल्याही प्रकारचा डिप्लोमा कोर्स झालेला असल्यास त्या संबंधित कागदपत्रे आवश्यक असतात.
यासाठी ओळख पुरावा म्हणून कोणते कागदपत्रे लागतात?
१)यासाठी तुमच्याजवळ अति महत्त्वाचं म्हणजे आधार कार्ड असणे आवश्यक आहे.
२) सोबतच पॅन कार्ड देखील आवश्यक आहे.
३) मतदान कार्ड आणि चालक परवाना असणे आवश्यक आहे. सोबतच तुमचे फोटो.
Author :- मिस. प्रतिक्षा गजानन मांडवकर

1 thought on “2023 पोलीस भरती वाचा काय आहे पात्रता | Best Police Bharti Information in Marathi”