Pradhan Mantri Krishi Sinchayee Yojana | प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना 2023

पीएम कृषि सिंचाई योजना 2023 ( Pradhan Mantri Krishi Sinchayee Yojana Benefit, Eligibility, Online Apply) PMKSY Scheme

Table of Contents show

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना माहिती ( Pradhan Mantri Krishi Sinchayee Yojana Information )

महाराष्ट्र राज्यातील शेतकरी आता पारंपारिक शेती कडून आधुनिक शेती कडे वाटचाल करीत आहेत. हल्ली शेती मध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करतांना अधिक दिसत आहेत. मात्र शेतकऱ्यांना शेती साठी जलसिंचन करणे हे खूप मोठे आव्हान झालेले आहे. Pradhan Mantri Krishi Sinchayee Yojana

पीएम कृषि सिंचाई योजना 2023 ( Pradhan Mantri Krishi Sinchayee Yojana Benefit, Eligibility, Online Apply) PMKSY Scheme

पारंपारिक पद्धतीने पाणी वागविल्यामुळे पैसा, वेळ आणि इंधनाचा खूप अपव्यव होत असतांना आपल्याला पाहायला मिळत आहे. हे टाळण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्यसरकार मिळून प्रयत्न करीत आहेत. त्याच अनुषंगाने Maha DBT Portal च्या माध्यमातून “प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना 2023” ही योजना राबविण्यात येत आहे.

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना 2023 ( Pradhan Mantri Krishi Sinchayee Yojana 2023 )

“प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना 2023” या योजनेअंतर्गत अनेक सिंचन पद्धती आहेत. त्यापैकी “ठिंबक सिंचन” हे खूप महत्त्वाचे सिंचन करण्याचे साधन आहे. ठिंबक सिंचन वापरण्यामध्ये महाराष्ट्र हा अग्रेसर आहे. भारतामध्ये जेवढे ठिंबक सिंचन वापरले जाते त्यापैकी 60 टक्के ठिंबक सिंचन हे एकट्या महाराष्ट्रात वापरले जाते. यामध्ये लहान लहान नळ्या या थेट झाडांच्या मुळाशी लावलेले असतात आणि झाडांना जेवढ्या पाण्याची आवश्यकता असते.

तेवढं च पाणी मुळांना दिलं जाते. त्यामुळे झाडे हे भरभराटीला लागतात आणि पाण्याचा अपव्यय सुद्धा टाळता येते. आता दुसरे म्हणजे “तुषार सिंचन” यामध्ये पंप, स्पिंकलर्स, वॉल्व्ह आणि पाईप्स द्वारे पाणी दिले जाते आणि मुख्य पाईप ला दाबून नोझल व्दारे झाडांवर चौफेर लहान पावसाप्रमाने पाणी शिंपडले जाते. त्यामुळे या सिंचन मुळे कमी कमी वेळात जास्तीत जास्त झाडांना पाणी मिळते आणि झाडे भरभराटीला लागतात.

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना 2023 साठी पात्रता ( Pradhan Mantri Krishi Sinchayee Yojana Eligibility )

  • शेतकऱ्याकडे स्व-मालकीची जमीन असणे आवश्यक आहे.
  • शेतकऱ्यांना 5 हेक्टरच्या मर्यादितच या योजनेचा लाभ घेता येईल.
  • शेतकऱ्याकडे विद्युत पाण्याच्या पंपासाठी वीज जोडणी असणे आवश्यक आहे. ते देखील वीज बिल पूर्ण वर्षाचा भरलेला असावा.
  • जर शेतकऱ्याने सन 2016 ते 17 च्या आधी जर अशा योजनेचा लाभ घेतला असेल तर त्याला पुढील 10 वर्ष तरी या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना 2023 योजनेअंतर्गत अनुदान ( Pradhan Mantri Krishi Sinchayee Yojana Subsidy )

अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत 55 टक्के अनुदान देण्यात येईल आणि इतर शेतकऱ्यांना 45 टक्के अनुदान देण्यात येईल.

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना 2023 आवश्यक कागदपत्रे ( Pradhan Mantri Krishi Sinchayee Yojana Documents )

  • सातबारा
  • आधार कार्ड
  • आठ अ दाखला
  • जातीचा दाखला
  • खरेदी केलेल्या सिंचन संचाचं बिल
  • स्वयं घोषणापत्र
  • पूर्वसंमती पत्र
  • वीज कनेक्शन च्या चालू बिल ची पावती

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना 2023 साठी ऑनलाईन अर्ज कसा करावा? ( how to apply for Pradhan Mantri Krishi Sinchayee Yojana )

महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना Maha DBT Portal द्वारे लाभ घेता येईल. त्यासाठी त्यांना Maha DBT Portal च्या https://mahadbtmahait.gov.in/ या अधिकृत वेबसाईट वर जाऊन आपला अर्ज सादर करावा लागेल. अर्ज करण्याची प्रक्रिया पुढील प्रमाणे:-

  1. सर्वप्रथम तुम्हाला वर दिलेल्या Maha DBT Portal च्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल.
  2. नंतर तुमच्यासमोर वेबसाईट चा मुख्यपृष्ठ ओपन होईल त्यात “New Registration” या पर्यायावर क्लिक करा.
  3. त्यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल त्यात तुम्हाला विचारली जाणारी माहिती जसे पूर्ण नाव, मोबाइल क्रमांक, ई-मेल, पासवर्ड भरावे लागेल.
  4. नंतर तुमचे registration पूर्ण होईल.
  5. Registration पूर्ण झाल्यानंतर “Login” या बटणावर क्लिक करून तुमचा user name आणि password टाकून लॉगिन करा.
  6. लॉगिन झाल्यानंतर “My Scheme” या पर्यायावर क्लिक करा.
  7. त्यानंतर खाली “प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना 2023” हा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
  8. त्यांनतर “Apply Now” या पर्यायावर क्लिक करा.
  9. त्यांनतर तुम्हाला ठिंबक सिंचन योजना हवी की तुषार सिंचन योजना हवी त्या पर्यायावर क्लिक करा.
  10. नंतर तुमच्या समोर एक अर्ज उघडेल त्यात हवी असलेली संपूर्ण माहिती भरून “Submit” बटणावर क्लिक करा.
  11. त्यानंतर तुम्हाला कोणत्या योजना आवश्यक आहे त्यानुसार प्राधान्य क्रम निवडा.
  12. नंतर तुम्ही भरलेल्या अर्जासाठी फी भरावी लागेल ती फी भरल्यानंतर तुमचा अर्ज हा यशस्वी रित्या सादर केला जाईल.
  13. नंतर तुमचा अर्ज हा “My Application” या बटणावर क्लिक केल्यानंतर दिसेल.
  14. तुम्ही केलेला अर्ज मंजूर झाल्यानंतर तुम्हाला तिथेच आवश्यक असलेले सर्व कागदपत्रे upload करावे लागतील. शेतकरी मित्रांनो जर तुम्ही केलेला अर्ज या चालू आर्थिक वर्षात जर मंजूर झाला नाही तर पुढल्या वर्षी तुम्हाला पुन्हा अर्ज करायची आवश्यकता नाही तुम्ही केलेला अर्ज हाच पुढील वर्षा साठी गृहीत धरला जाईल. आम्ही या लेख मध्ये “प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना 2023” याबद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे. त्यामुळे हा लेख संपूर्ण वाचा आणि तुम्ही या योजनेचा लाभ घ्या किव्वा तुमच्या जवळच्या किव्वा नातेवाईकांना याची गरज असेल तर त्यांनाही हा लेख नक्की शेअर करा.

तुम्ही हे वाचलात का ?

how to apply for Pradhan Mantri Krishi Sinchayee Yojana ?

महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना Maha DBT Portal द्वारे लाभ घेता येईल. त्यासाठी त्यांना Maha DBT Portal च्या https://mahadbtmahait.gov.in/ या अधिकृत वेबसाईट वर जाऊन आपला अर्ज सादर करावा लागेल.

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना 2023 आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत ?

सातबारा
आधार कार्ड
आठ अ दाखला
जातीचा दाखला
खरेदी केलेल्या सिंचन संचाचं बिल
स्वयं घोषणापत्र
पूर्वसंमती पत्र
वीज कनेक्शन च्या चालू बिल ची पावती

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना 2023 साठी पात्रता ?

शेतकऱ्याकडे स्व-मालकीची जमीन असणे आवश्यक आहे.
शेतकऱ्यांना 5 हेक्टरच्या मर्यादितच या योजनेचा लाभ घेता येईल.
शेतकऱ्याकडे विद्युत पाण्याच्या पंपासाठी वीज जोडणी असणे आवश्यक आहे. ते देखील वीज बिल पूर्ण वर्षाचा भरलेला असावा.
जर शेतकऱ्याने सन 2016 ते 17 च्या आधी जर अशा योजनेचा लाभ घेतला असेल तर त्याला पुढील 10 वर्ष तरी या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना काय आहे ?

महाराष्ट्र राज्यातील शेतकरी आता पारंपारिक शेती कडून आधुनिक शेती कडे वाटचाल करीत आहेत. हल्ली शेती मध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करतांना अधिक दिसत आहेत. मात्र शेतकऱ्यांना शेती साठी जलसिंचन करणे हे खूप मोठे आव्हान झालेले आहे.

पारंपारिक पद्धतीने पाणी वागविल्यामुळे पैसा, वेळ आणि इंधनाचा खूप अपव्यव होत असतांना आपल्याला पाहायला मिळत आहे. हे टाळण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्यसरकार मिळून प्रयत्न करीत आहेत. त्याच अनुषंगाने Maha DBT Portal च्या माध्यमातून “Pradhan Mantri Krishi Sinchayee Yojana 2023” ही योजना राबविण्यात येत आहे.

3 thoughts on “Pradhan Mantri Krishi Sinchayee Yojana | प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना 2023”

Leave a Reply

%d bloggers like this: