भावाने आपल्या बहिणीला पाठवण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत Best Raksha Bandhan Quotes In Marathi. पाठवा आणि आपल्या बहिणीला खुश करा.
Raksha bandhan Quotes In Marathi

लावून तिलक चंदनाचा
भावा बहिण्याच्या बंधनाचा
सण आलाय रक्षाबंधनाचा
बांधून राखी हातात माझ्या
उधळूया रंग प्रेममय नात्याचा
तुझे ते माझे सारेच दुःख
माझे ते तुझे सारेच सुख
तु बांध राखीचे बंधन
मी करेन आयुष्यभर तुझे रक्षण
तुझ्या जन्मावेळी च गं ताई
मी दिलेय स्वतःस एक वचन
करुनी तुझे सदाही रक्षण
गाईन तुझेच नमन
नोहेच हे केवळ एक रेशमी धागे
तुझ्या नी माझ्यातला हा विश्वास आहे
तुझ्यावर येणाऱ्या संकटांना सामोरे जाऊन
मी तुझे रक्षण करण्याचा हा ध्यास आहे…
कळत होते ना मजला काही
जवा होतो मी छोटंसं बाळ
साधी राखी बांधली म्हणून
होतो घेत डोक्यावर अख्खं आभाळ
राहिल्या त्या केवळ आठवणी
बदलून गेला तो काळ
किंमत कळता रक्षाबंधनाची जवा
साधा धागाही बांधायला करत नाही टाळाटाळ
56 इंचाची छाती ताई
तुझ्या राखी बांधल्याने झाली
तुझे रक्षण करायची
खूप मोठी जबाबदारी आली…
परंपरा म्हणून नाही ताई
मी तुझ प्रेम म्हणून करतोय
हे रक्षाबंधन चं सण
मी तुझ्यामुळे मानतोय
भाऊ बहिणीच्या नात्यातून
एक नवा गंध येतो
रक्षाबंधनाच्या या सणामुळे
एक नवा बंध होतो
नाते अनेक बांधली जातात
आणि अजूनही बांधली जातात
पण भाऊ बहिणीच्या या नात्यात
खूप काही वेगळेपण असतात…
ताई बालपणी या रक्षाबंधनाचा
मला खूप कंटाळा यायचा गं
तू सासरी निघून गेल्यावर कळलं
त्यातच खरं प्रेम असायचं गं….
तू सासरी निघून गेल्यापासून मी
दरवर्षी या दिवसाची वाट बघतो गं…
दारावरची घंटी कधी वाजते
अन् कधी तू एकदा येते
याचीच वाट बघत बसतो गं….
नकोशी वाटणारी राखी आज
हवीहवीशी वाटते मजला…
तुझं प्रेम आणि तुझी आपुलकी
आपसूकच तुझ्याकडे ओढत नेते मजला…

हा नुसता एक रेशमी धागा नाही
बहिण भावाच्या नात्याचा प्रतीक आहे…
सर्वच नात्यापेक्षा बहिण भावाचं हे नातं
लाखात नाही तर अनंतात एक आहे…
तुझं माझ्याशी भांडण्यात
आणि माझं तुला मारण्यात
काहितरी प्रेम असावा…
भावा बहिणीच्या या नात्यात
कसलाही नेम नसावा….
भाऊ बहिणीचं नातं
रक्ताचं असलं तर जेवढा गोडवा असते
रक्ताचं नसलं नातं
तरी तेवढाच गोडवा असते….
रक्ताचा नाही बहिण तू माझी
पण सख्ख्या बहिणीपेक्षाही
तुझं प्रेम कमी नाही
बहिण नाही म्हणून रडत होतो मी
पण तू येऊ दिली डोळ्यात माझ्या नमी नाही….
सख्ख्या बहिणीपेक्षाही भरभरून
प्रेम दिलस तू मला
बहिणीची कमी कधीच
पडू दिली नाहीस तू मला
कदाचित सख्खी बहिण ही करू शकली नसती
एवढं केली तू माझ्यासाठी
म्हणून की माझं अख्खं आयुष्य
अर्पण करतो तुझ्यासाठी….
रक्षाबंधनाची भेट म्हणून
या शब्दरूपी फुलांना तू स्वीकार करशील
याच माझ्या इच्छा आकांक्षा आहेत
ताई तुला रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा आहेत…
रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमेच्या तुला मनापासून शुभेच्छा ताई……..
Author:- आशु छाया प्रमोद (रावण)

Read More