सेवानिवृत्ती साठी हे भाषण पाठ करूनच जा | Best Retired Speech in Marathi 500 words

सेवानिवृत्ती हा फारच भावनिक क्षण. मी कितीही विचार केला तरी काय Retired Speech in Marathi देणार ते काही सुचत नव्हते. शेवटी पेन घेवून कागदावरच उतरवून काढले .

निरोप हा शब्द सर्वांच्या जीवनाशी निगडित आहे, तरी या शब्दाशी भावना जोडलेले आहेत. एखादा व्यक्ती सेवानिवृत्ती घेवून सोडून जाणं ही काही मोठी गोष्ट नाही , पण त्या व्यक्ती सोबत जोडलेलं ते आपुलकीचं नातं प्रेम भावना त्यांच्यासोबत घालवलेले ते क्षण कधीच विसरू शकत नाही. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असा प्रसंग एकदा तरी येतोच.

Best Retired Speech in Marathi 500 words सेवानिवृत्ती भाषण

सेवानिवृत्ती भाषण मराठी

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर,
तुमच्या आयुष्यात आनंद यावा,
यापुढचा प्रवासही हसरा अन,
सुख आनंद देणारा व्हावा…

मंचावर उपस्थित आपल्या शाळेचे मुख्याध्यापक संपूर्ण शिक्षक वर्ग आणि माझ्या मित्र-मैत्रिणींन्नो.आज आपण येथे कशासाठी जमलो आहोत , हे तर सर्वांनाच माहिती आहे खरंतर आजचा दिवस मनातून नकोस वाटतं, पण म्हणतात ना की कोणीच कुठे थांबण्यासाठी जन्माला येत नाही. एक दिवस प्रत्येकाला त्याच्या जीवनाच्या प्रवासात निघून जायचं असतं खरं तर आज आपल्या शाळेचे सर्वात वरिष्ठ आणि जुने शिक्षक यांचा निरोप समारंभ .

Best Retired Speech in Marathi 500 words

Retirement Speech in Marathi

सरांविषयी काय बोलायचे खरच काही सुचत नाहीये. कारण सर मराठी विषयात जेवढे प्राविण्य संपन्न आहेत ,तेवढेच ते प्रत्येकाच्या मनावर राज्य करायला देखील आहेत. मराठी विषयाबद्दल त्यांची असलेली ती गोडी पुस्तक वाचण्याची त्यांची नियमित सवय विद्यार्थ्यांना दिलेली ती त्यांची अनमोल देणगी एकच नाही तर त्यांच्याविषयी बोलायला माझ्याकडे शब्दच कमी पडतात.

आज या निरोप समारंभात त्यांच्याविषयी बोलताना मी त्यांच्या आयुष्यातील एक प्रसंग तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो.
एकदा सर आम्हा सर्वांना स्वर्गात शिकवत होते ते जेव्हा शिकवतात तेव्हा पूर्ण क्लास त्यांच्यामध्ये मग्न होतो त्यांची कविता शिकवण्याची ती आवड आम्हा सर्वांच्या मनात घर करून गेली. जेव्हा शिकवायचे तेव्हा आम्ही सर्व मुले त्यांच्यात मग्न होऊन जात असे. सर नुसती कविता शिकवत नव्हते तर काल्पनिक दुनियेत नेऊन कल्पनेच्या जोरावर अख्ख ब्रम्हांड फिरून आणणल्यायसारखं वाटायचं.

Best Retired Speech in Marathi 500 words

सरांनी कविता शिकवणे सुरू केले, सर्व मुले त्यांच्यामध्ये मग्न झाले होते ,सर कविता शिकवताना अचानक शांत झाले ,त्यांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत होत्या .आणि त्यांचा श्वास अडकलेला होता. कवितेवर इतके प्रेम करणारे आज कवितेमुळेच रडायला लागले आम्हा सर्वांना आश्चर्य वाटले. कवितेचे नाव होतं “माय”

आम्हा सर्वांना थोडा अंदाज आला होता की, सरांना नेमक काय झाले असेल, पण त्यांच्या गेलेल्या आयुष्याबद्दल आम्हा सर्वांना कुठलीच कल्पना नव्हती. सर डोळ्यातले पाणी पुसताना म्हणाले , मुलांनो आयुष्यात खूप मोठे व्हा आणि आई-बाबांचं नाव कमवा, कारण आयुष्यामध्ये तेच तुमचे असतात. आणि तुमच्यासाठी आयुष्यभर झटतात . आज मी जे काही आहे ना ते फक्त माझ्या “आई-बाबांमुळे “!.

Best Retired Speech in Marathi 500 words

Retired Speech in Marathi

त्यांचा तो गहिवरलेला चेहरा पाहून आम्हा सर्वांना खूप वाईट वाटले होते.पण नंतर आम्हा सर्वांना इतके हसवले की आम्ही त्या गोष्टीला लगेच विसरून गेलो. खूप ग्रेट व्यक्तिमत्व असलेले, आपल्या सर्वांचे लाडके राठोड सर यांना निरोप म्हणून आपण देणार नाहीच आहोत .कारण त्यांची जागा हे आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये आहे.

सरांच्या बऱ्याचशा गोष्टी आहेत, जे मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. त्यांनी सांगितलेल्या त्या सर्व गोष्टी प्रत्येक विद्यार्थी आत्मसात करतो .कुठलाही पाठ किंवा कविता शिकवताना त्यांच्या चेहऱ्यावरील एक्सप्रेशन त्यांचे त्या कवितेमध्ये गुंतून जाणं आणि आम्हा सर्व मुलांना देखील गुंतून टाकन त्यांचा तो प्रेमळ स्वभाव कधीच विसरू शकत नाही.

Best Retired Speech in Marathi 500 words

जसे वाळवंटात पाण्याचा झरा निर्माण झालं असं वाटतं, आसपासचा निसर्ग आनंदी झाला असं वाटतं, त्याचप्रमाणे तुम्ही या शाळेच्या छोट्या वृक्षाचे वटवृक्षात रूपांतर केले इतकच नाही, तर ज्ञानाबरोबर दिनदलित, गोरगरीब ,समाजासाठी झटला तुमच्या या सर्व गोष्टी आम्ही कधीच विसरू शकणार नाही .तुम्ही आम्हा सर्वांना संकटावर मात कसे करायचे हे शिकवले, इतकच नाही तर आम्हाला शिकवता शिकवता सहज दाखवून दिले की, जग आणि जगाचे नियम किती वेगळे आहेत आणि आपण त्यावर उत्तर कसे द्यायचे.

तुम्हाला आम्ही कधीच निरोप देऊ शकत नाही, कारण तुम्ही आमच्या हृदयात आहात. तुमची शिकवण आम्हा सर्वांच्या सोबत आहे .नकळत एखाद्याचे मन दुखवले असल्यास मला तुम्ही मोठ्या मनाने माफ करावी ही विनंती आणि माझ्या शब्दाला मी इथेच विराम देते धन्यवाद.

महिला दिनाबद्दल भाषण Womens day in Marathi

२६ जानेवारीसाठी भाषण 26 January Speech in Marathi

Avatar
Marathi Time

1 thought on “सेवानिवृत्ती साठी हे भाषण पाठ करूनच जा | Best Retired Speech in Marathi 500 words”

Leave a Reply