दुःखी नदीचे आत्मवृत्त मराठी भाषेत | Best River Autobiography In Marathi 2023

नदी अतिशय दुःखी होती. आपली करुण कहाणी सांगताना तिला रडू आले. वाचा River Autobiography In Marathi मध्ये तिने आणखी काय सांगितले.

नदीच माणसाबद्दल असलेलं मत आणि तिच आत्मकथन काय असेल, आणि ती का रडत होती हे जाणून घेण्यासाठी संपूर्ण लेख वाचा.

River Autobiography In Marathi

दुःखी नदीचे आत्मवृत्त मराठी भाषेत | Best River Autobiography In Marathi 2023

जगाला माझे महत्त्व सांगण्यासाठी मी माझे आत्मचरित्र लिहित आहे. माझा जन्म हजारो वर्षांपूर्वी हिमालयात झाला होता. माझ्या जन्माच्या दिवसापासून मी कधीही एकाच ठिकाणी राहिलेली नाही परंतु वेगवेगळ्या अज्ञात प्रदेशांमधून मी प्रवास केला आहेत.

खडे, दगड ,माती, गोटे यांच्याकडून सतत प्रवास करणारी मी नदी! खरंतर माझ्यापेक्षा तुम्हा सर्वांना माझ्याविषयी जास्त माहिती आहे. माझे नाव गंगा नदी एका पवित्र स्थानावरून माझा उगम झाला. हजारो वर्षांपूर्वी हिमालयात झालेला माझा जन्म तुम्हा सर्वांसाठी एक पावन ठिकाण मानले जाते .आणि असं म्हटलं जातं की, माझ्या पाण्याने तुम्हा सर्वांचे दुःख पाप हे नष्ट होतात. हे जरी खरे असले तरी तुम्ही मला किती पवित्र ठेवल आहे, हे तुम्हा सर्वांना माहितीच आहे. माझे वाहते पाणी हे तुम्हा सर्वांच पाप, दुःख, कष्ट यांना वाहून तर घेऊन जाते.पण तुम्ही केलेल्या कचऱ्या मुळे मला किती त्रास होतो, याची कल्पना देखील तुम्हाला नाही.

दुःखी नदीचे आत्मवृत्त मराठी भाषेत | Best River Autobiography In Marathi 2023

मी ही नदी आहे माझा ही जीव आहे ,पण या जीवा ने कितीतरी लोकांची तहान भागवली, कितीतरी तहानलेल्याना पाणी पाजल. मग तुम्ही माझ्या अंतरंगाला खराब का करता. खरंतर मला मनापासून खूप वाईट वाटतं ,तरीही माझ्या अंगी आलेली सर्व रोगराई मी आत्मसात करते, तुमच्यावर कुठल्या प्रकारचे संकट येऊ देत नाही.
पण तरीसुद्धा तुम्ही केलेली घाण ,तुम्ही फेकलेला कचरा, तुम्ही मला दूषित केलेलं सर्व सहन करून घेते. पण याचा तुम्हाला जराही फरक पडत नाही.

दुःखी नदीचे आत्मवृत्त मराठी भाषेत | Best River Autobiography In Marathi 2023

कुठेही प्रवासात जाता आणि प्रवासात गेल्यानंतर जेव्हा तुम्ही मला भेटी देता आणि माझ्या निर्मळ या जलाने स्वतः स्वच्छ होता .स्नान करतात, आणि तेच तुम्ही वापरलेले प्लास्टिक बॅग आणि इतर कचरा हे तुम्ही माझ्या पाण्यात टाकून देता. तरीसुद्धा मी ते वाहून नेते रोगराई पासून तुमचे रक्षण करते. पण एक दिवस असा येईल की तुम्ही मला पवित्र करून टाकाल या गोष्टीचा मला खूप त्रास होतोय.

कुठेतरी वाईट वाटतं की ,आपण त्यांच्यासाठी सर्व काही करीत आहोत. मात्र तुम्हाला माझी थोडीही आवड नाही. मला स्वच्छ ठेवावं, माझ्यामध्ये असलेला घाण कचरा काढावा, असं तुम्हाला अजिबात वाटत नाही. प्लास्टिक मुळे जमा झालेलं माझ्या मध्ये असलेलं घाण, हे एक दिवस तुमच्या विनाशाचे कारण बनेल. माझा संताप तुम्ही बघितलेला नाही. पण ज्या दिवशी माझ्या सहनशक्तीच्या सर्व बाहेर होईल त्या दिवशी तुमच्या या मानव जातीचा विनाश निश्चित आहे. एका ठिकाणी तुम्ही मला पवित्र म्हणता! आणि दुसरे ठिकाणी तिथेच माझ्या पाण्याने कपडे धुता, घाण करता, कचरा टाकता काहीं न विचार करता.

दुःखी नदीचे आत्मवृत्त मराठी भाषेत | Best River Autobiography In Marathi 2023

दुःखी नदीचे आत्मवृत्त

पशुपक्षी ,प्राणी या सर्वांची तहान भागवणारी मी !जर मीच अपवित्र झाले ,तर या पशुंना आधार कोण देईल, डोळ्यांमध्ये आशा घेऊन येणारे आणि थकल्यानंतर स्वतःची तहान भागवण्यासाठी माझ्याकडे एका आशेने येणाऱ्या लोकांना मी माझं पाणी कसं पाजेल.
तुम्ही केलेल्या या घाणीमुळे मला स्वतःला श्वास घ्यायला त्रास होतोय. आत मधून मी घुटल्या जात आहे. त्या कचऱ्याचा वास माझ्या अंगून येत आहे. आणि त्यामुळे माझ्याजवळ कुठलाच प्राणी .पक्षी ,पशु येत नाही आहे. इतका निर्दयी हा माणूस असू तरी कसा शकतो ?हाच प्रश्न आज माझ्यापुढे उभा झाला आहे.

दुःखी नदीचे आत्मवृत्त मराठी भाषेत | Best River Autobiography In Marathi 2023

तुम्ही ज्या घरात राहता ते घर तुमचं स्वच्छ असते, मात्र जर तुमच्या घरी कोणी केर कचरा आणून फेकला तर तुम्ही आजारी होणार नाही का? त्याचप्रमाणे तुम्ही जेव्हा तो केअर कचरा माझ्या पाण्यात टाकता, ते पाणी प्रत्येक मनुष्य ,प्रत्येक प्राणी, पक्षी पित असतात.आणि या दूषित पाण्यामुळे मृत्युमुखी पडतो. कचरा टाकणारे तुम्ही, मला दूषित करणारे तुम्ही, आणि जेव्हा एखाद्याची मृत्यू माझ्या पाण्याने होतो ,तेव्हा दोष देणारे देखील तुम्हीच असता.

दुःखी नदीचे आत्मवृत्त मराठी भाषेत | Best River Autobiography In Marathi 2023

आज माझ्या डोळ्यातून खरच पाणी येत आहे. मला ढसाढसा रडावसं वाटत आहे .गुदमरलेला श्वास माझा दफन होतो आहे. पण मी ज्या प्रकारे तडफडत आहे ना! त्या प्रकारे माणूसही जर त्याने पाण्याची किंमत केली नाही. तर तोही याच प्रकारे तहानेने तडफडेल त्यासाठी हे मानवा तू आत्ता तरी सुधर रे!

दुःखी नदीचे आत्मवृत्त मराठी भाषेत | Best River Autobiography In Marathi 2023

Author :- मिस. प्रतिक्षा गजानन मांडवकर

Pratiksha

Kalpana Chawala Information in Marathi

Shiv Jayanti Information in Marathi 2023

2 thoughts on “दुःखी नदीचे आत्मवृत्त मराठी भाषेत | Best River Autobiography In Marathi 2023”

Leave a Reply

%d bloggers like this: