वाचा अयशस्वी प्रेमाची गोष्ट | Sad Love Story in Marathi on The Basis of Thoughts


प्रेम सर्वांच्या आयुष्यात आनंद घेऊन येईल असे नसते. Sad Love Story in Marathi मध्ये तुम्ही वाचणार आहात अशीच एक दुखद प्रेमाची गोष्ट, जी वाचून तुम्ही देखील प्रेम सावधानतेने कराल.

जगातील सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे प्रेम आहे. परंतु काळाच्या ओघात जशी मानले बदलली तशी प्रेमाची परिभाषा सुद्धा हळुवारपणे बदलत गेली. याला माझा विरोध मुळीच नाही उलट समर्थन आहे. काळाच्या ओघात जर सारं च काही बदलत गेलं असेल तर मग प्रेम त्याला अपवाद का ठरावं…! परंतु हल्ली असे म्हणतात की, आकर्षणातून झालेलं प्रेम खरं प्रेम नसून विचारांवर झालेलं प्रेम खरं आहे आणि तेच आयुष्यभर टिकतं. असेलही कदाचित परंतु मला नाही वाटत. आणि अयशस्वी प्रेमाची गोष्ट ही story वाचल्यानंतर तुमचे ही विचार कदाचित बदलतील. त्यामुळे ही story वेळ काढून एकदा नक्कीच वाचावी ही नम्र विनंती…

वाचा अयशस्वी प्रेमाची गोष्ट | Sad Love Story in Marathi on The Basis of Thoughts

Sad Love Story in Marathi on The Basis of Thoughts

रामायण महाभारतातील अनेक पात्रांना वाचून ज्या तरुण वयातील मुलाने रामायणातील एक पात्र रावण ज्याच्यावर अनेक विरोध झाले त्याच पात्राला न्याय मिळवून देण्यासाठी बुद्ध-शिवराय-शाहू-फुले-आंबेडकर ही विचारधारा डोळ्यासमोर ठेवून साहित्य क्षेत्रात आपले पहिले पाऊल ठेवले. त्याच मुलावर त्याच्या याच विद्रोही विचारांवर आकर्षित होऊन एक मुलगी प्रेम करायला लागली होती. आणि याचा त्याला थांग पत्ता सुद्धा न्हवता. तो मुलगा तर बिचारा एक चांगल्या मित्रासारखा तिच्याशी बोलत होता. ती जेव्हा जेव्हा एकटी पडली तेव्हा तेव्हा तो तिच्या मदतीला धावत होता.

मात्र काही दिवसाने त्या मुलीने तिच्याशी बोलणं जरा कमीच केलं होतं. हे जाणून घेण्यासाठी त्याने आपल्या दुसऱ्या मोबाईल नंबर ने तिला एक मुलगी म्हणून msg केलं तेव्हा त्याला कळलं की ती मुलगी त्याच्या प्रेमात पडली होती. खरं तर तो फक्त तिच्याशी चांगली निस्वार्थ मैत्री निभावत होता. परंतु तिचं मन राखण्यासाठी त्याने तिला प्रेमाचा होकार दिलं होतं. आणि त्यांच्या मैत्रीच्या नात्याचं प्रेमाच्या नात्यात रूपांतर झालं होतं.

त्या मुलाने होकार का दिला? हाच प्रश्न जसा तुमच्या मनात प्रथमदर्शनी पडला असेल तसा माझ्याही मनात पडला होता कारण तिच्या मनाला तो न दुखवता देखील तिला गोड नकार देऊन मैत्रीचं नातं आणखी प्रेमाने निभावता आलं असतं परंतु त्याकाळी त्याने एका मुलीवर प्रेम केलं होतं आणि ते त्याला मिळालं न्हवतं. म्हणून त्याने विचार केला की, “मला तर माझं प्रेम मिळू शकलं नाही परंतु माझ्यामुळे का होईना पण तिला तिचं प्रेम मिळालं तर एकार्थी मलाही समाधान वाटेल आणि ती मुलगी सुद्धा आनंदीत होईल.” शेवटी असं म्हणत च होते की आकर्षणातून झालेलं प्रेम खरं नसून विचारांवर झालेलं प्रेम खरं असतं आणि तेच आयुष्यभर टिकत असतं. म्हणून त्याने आपला विचार न करता तिला हसत हसत होकार दिलं.

वाचा अयशस्वी प्रेमाची गोष्ट | Sad Love Story in Marathi on The Basis of Thoughts

त्याला हळु हळू वाटायला लागलं की, आपलं खरं प्रेम हेच आहे आणि तेच आपण आयुष्यभर टिकवू म्हणून त्याने खूप काही स्वप्न सुद्धा पाहिले होते. शिवाय त्याने तिला ज्यावेळी विचारलं की, “कधी साथ तर सोडणार नाही ना….!” तर तिने देखील थेट लग्न करशील का? असं म्हटलं मग तर प्रेम तुटायचा प्रश्न च निर्माण होत न्हवता. परंतु नियतीला कदाचित काही वेगळंच मान्य होतं.

वाचा अयशस्वी प्रेमाची गोष्ट | Sad Love Story in Marathi on The Basis of Thoughts

वाचा अयशस्वी प्रेमाची गोष्ट | Sad Love Story in Marathi on The Basis of Thoughts

नियती समोर रे माणसा
तु मस्तक टेकीले
कुणास मिळाले प्रेम तर
कुणाचे अधुरेच राहिले

ती एका hospital ला काम करत होती रात्री आल्यानंतर थकलेली असायची तरी देखील थोडं बोलायची आणि मग झोपून जायची. याबद्दल त्याची काही तक्रार न्हवती की ती वेळ देत नाही वैगेरे कारण तो स्वतःच तिला म्हणायचा की, “बोलणं तर आयुष्यभर आहेच परंतु आधी आराम महत्वाचा आहे.” हळू हळू त्यांचं आणखी आणखी बोलणं वाढत गेलं आणि मग तिने तक्रार केली की, तू जेवली का? कशी आहेस? असं विचारत नाही. त्याने मग स्वतः msg करून तेही विचारायला सुरवात केली. तिला जे जे नाही आवडत ते टाळायला सुरवात केली.

वाचा अयशस्वी प्रेमाची गोष्ट | Sad Love Story in Marathi on The Basis of Thoughts

तिचं मन राखण्याचा पूर्ण प्रयत्न केलं. एकदा तिला मासिक पाळी मुळे खूप त्रास होत होता तर तो मुलगा तिच्यासाठी रात्रभर जागला होता. तरी देखील ति तक्रार करत राहिली की, तू प्रेम करीत नाही, तुला माझी काळजी च नाही वैगेरे वैगेरे. त्याने खूप समजूत घालण्याचा प्रयत्न केला परंतु शेवटी त्या दोघांचा ब्रेकअप झालाच.

त्या मुलाचं खरं तर तिच्यावर आधी प्रेम न्हवतंच पण हळू हळू त्याचं तिच्यावर प्रेम वाढू लागलं आणि त्यालाही तिच्याविना दुसरं काहीच दिसत नव्हतं. मग त्याने स्वतः जाऊन तिची समजून घातली आणि ती देखील परत त्याच्या प्रेमात पडली. आणि तिने सांगितलं की, “तुझ्या खूप साऱ्या gf झाल्या म्हणून मला वाटलं की, तुझं टाइमपास असेल.” म्हणून त्याने तिला समजवलं की तो माझा past होता. आता मी फक्त आणि फक्त तुझ्यावरच प्रेम करतो आणि शेवट पर्यंत करेन. ते परत एकत्र आले परंतु काही दिवसाने तिची आज्जी वारली त्यामुळे ती मामाच्या गावी गेली त्यावेळी ते कित्येक दिवस त्याचं बोलणं झालं नाही.

वाचा अयशस्वी प्रेमाची गोष्ट | Sad Love Story in Marathi on The Basis of Thoughts

ती पण online तर यायची परंतु त्याला साधा good morning चा msg देखील करायची नाही त्यामुळे त्याला राग आला आणि त्याने एकदा तिला कॉल केलं. परंतु तिने नंतर सांगितलं की आपलं सगळं मामाला माहिती झालं आहे, आज पासून मला call नको करू, माझं आयुष्य बरबाद केलास, वैगेरे वैगेरे आरोप तिने त्याच्यावर केलं. परंतु त्याला तिची खूप आठवण आली होती म्हणून तो तिला कॉल करीत होता. आणि परत त्या दोघांचं ब्रेकअप झालं.

त्या मुलाने तिची खूप माफी मागितली विनवणी केली तेव्हा ती मानली तर खरी मात्र यावेळी तिने खरचं त्याच्याकडे लक्ष दिलं न्हवतं फक्त नाममात्र girlfriend राहिलेली होती. त्यामुळे तो खूप डिस्टर्ब झालेला होता. कारण त्याचं यावेळी फक्त breakup न्हवतं झालं तर त्याच्यावर खूप मोठं संकट आलं होतं.

वाचा अयशस्वी प्रेमाची गोष्ट | Sad Love Story in Marathi on The Basis of Thoughts

प्रेमाची गोष्ट

त्याच्या जीवन मरण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यालाही वाटत होतं की Girlfriend म्हणून नाहीतर तर कमीत कमी एक मैत्रीण म्हणून तरी तिने त्याला साथ द्यावी कारण कधीतरी साधं मैत्रीचं नातं देखील न्हवतं त्यावेळी तिच्या एकटेपणात त्याने तिची साथ दिली होती. तो तिला समजावून सांगायला प्रथमतः धावला होता. आणि त्याच्यावर संकट आल्यावर तिच्याकडे थोडं बोलायला ही वेळ न्हवती. खरं तर तिचा hospital च जॉब सुटल्यानंतर त्यानेच तिला एक छोटं जॉब मिळवून दिलं होतं. एवढं करून ही त्या मुलाबद्दल तिला थोडं ही का वाटलं नसेल? हाच सर्वात मोठा प्रश्न निर्माण होतो.

मला नाही माहिती तिने त्याच्या विचारांवर प्रेम केलं होतं की आणखी काय बघून प्रेम केलं तर परंतु खरचं विचारांवर प्रेम केलं असतं तर तिलाही थोडं विचार करायला पाहिजे होतं की, ज्या मुलाने आपल्याला एवढी साथ दिली त्याला थोडी तरी साथ द्यायला हवी होती.

वाचा अयशस्वी प्रेमाची गोष्ट | Sad Love Story in Marathi on The Basis of Thoughts

आज तो मुलगा काय करतो? काहीच माहिती नाही पण हल्ली त्याचं लेख सुद्धा कुणाला वाचायला मिळत नाही कदाचित त्याला लिहिणं सुद्धा जमत नसेल हल्ली. नशा करून आपलं आयुष्य बरबाद करत आहे? की एकट्यात रडून आपला वेळ बरबाद करतोय तर….? काहीच कळत नाही. मात्र या story मधून मला एवढंच सांगणं आहे की, तुमचं खरं प्रेम असेल तरच तुम्ही ते व्यक्त करा. एखाद्याचा टाइमपास म्हणून वापर करून त्याचं आयुष्य बरबाद करू नका.

वाचा अयशस्वी प्रेमाची गोष्ट | Sad Love Story in Marathi on The Basis of Thoughts

Author:- आशु छाया प्रमोद (रावण)

कवी आशिष

वाचा अयशस्वी प्रेमाची गोष्ट | Sad Love Story in Marathi on The Basis of Thoughts

Sad Story in Marathi

Sad First Love Marathi Kavita

वाचा अयशस्वी प्रेमाची गोष्ट | Sad Love Story in Marathi on The Basis of Thoughts

Leave a Reply

%d bloggers like this: