व्याकुऴलेल्या व्यथा.. | Best Sad Story in Marathi 2023

लेखिका सरिता भांड-खराद यांनी “व्याकुऴलेल्या व्यथा.. | Best Sad Story in Marathi” या कथेमध्ये असहाय्य विवाहित स्त्रीचे मनोगत अतिशय हृदयस्पर्शी शब्दात मांडले आहे.

व्याकुऴलेल्या व्यथा.. Sad Story in Marathi

व्याकुऴलेल्या व्यथा.. | Best Sad Story in Marathi 2023

घरातील खिडकीसमोर ती टक लावून बाहेर डोकवत होती बाहेर पाऊस धो -धो कोसळत होता तिच्या गालावर केसाची बट मंद वाऱ्याच्या झोतासह इकडून तिकडे डोलत होती, कसल्यातरी विचारात आज ती पहिल्यांदाच स्वतःमध्ये गुरफटलेली दिसत होती , कुठलीही संवेदना आज तिला खऱ्या अर्थाने जाणवत नसावी.. बोथट विचारांच्या भौऱ्याभोवती तिचं आयुष्य एखाद्या भ्रमरासारख गिरक्या घेत चाललं होतं, तिच्यासारख्या अशा कित्येक स्त्रिया होत्या त्यांच आयुष्य देखील आजच्या स्वातंत्र्य युगामध्ये अनेक बंधनाने जखडलेलं किंवा बांधलेलं होतं.

व्याकुऴलेल्या व्यथा.. | Best Sad Story in Marathi 2023

बांधणारा पुरुष नसून एक स्रीच स्रीला बंधनाच्या जाळ्यामध्ये घेरत होती आणि अनेक तऱ्हेने तिचा छळ करून तिला मानसिक रित्या जखमी करत होती.. त्या जखमा देखील अशा होत्या की त्याचा बोलबाला सुद्धा तिला कित्येकदा करता येत नाही,, तू कितीही सरळ वाग, मर्यादा रहा, जगण्याची प्रामाणिक राहा, पण तुला शिक्षा मात्र होणारच शिक्षा देणारी कोण तर एक स्त्रीच दुसऱ्या स्त्रीला घराघरात अनेक तऱ्हेने शिक्षा करत असते.. एका गीतांमध्ये म्हटल आहे ना अब हर घर मे रावण बैठा इतने राम मे कहासे लावू,, पण आत्ता मात्र भलतंच…. जगामध्ये होत चाललंय आता तर हर घर मे एक शूरपनखा, मंथरा बैठी हैं तो सिया का वनवास युगो -युगो मे तय हैं.

Sad Story in Marathi 2023

व्याकुऴलेल्या व्यथा.. | Best Sad Story in Marathi 2023

का नाही एक स्री दुसऱ्या स्त्रीला समजून घेऊ शकत .. पण दुसरीला चांगलं म्हटलं, पहिलीला कसंतरी होणार, आणि पहिली ला चांगलं म्हटलं तर दुसरीला कसंतरी होणार.. या खालच्या पातळीच्या मानसिकतेमुळे एकमेकांविषयी घराघरात द्वेष निर्माण होतात.. पण ती मात्र एकदम साधी ,सरळ असताना देखील तिला अनेक दुःखाचा सामना करावा लागत होता..

ती येणाऱ्या पावसाच्या थेंबाला जणू विचारत असावी तुझ्यासारखं मी रागारागाने तावातवाने एकदाच बरसाव आणि थेंबासहित धरेमध्ये मुरून जावं म्हणजे मला ह्या विनाकारण त्रासाचा आजार मला येऊन भिडणार नाही . एक वेळ आयुष्यामध्ये एखादे खूप मोठे पाहिलेले स्वप्न पूर्ण नाही झाले तरी चालेल पण प्रत्येक युगामध्ये माझी घुसमट आणि परीक्षा नको. भोवऱ्यात अडकवून श्वास थांबेपर्यंत तडफडं नको.. एखाद झाड देखील परोपकाराने सजून मायेची सावली देत ऑक्सिजन देत , पण स्वतःच्या चार भिंतीमध्ये सन्मानतेचा श्वास मिळत नाही तेव्हा मात्र तिच्या जीवाची फार घालमेल होते, मग मात्र तिला त्या धरेच्या मऊ मृदुलेत विसावा घेऊन तृप्ततेची तहान मिटावी वाटते..

व्याकुऴलेल्या व्यथा.. | Best Sad Story in Marathi 2023

लेखिका :- सरिता भांड -खराद🙏🏻😊 पैठण

सरिता भांड -खराद Sarita Bhand

The End

आमचे इतर लेख वाचा

Shikshak Din Bhashan Marathi

 River Autobiography In Marathi

Kalpana Chawala Information in Marathi

Shiv Jayanti Information in Marathi 2023

1 thought on “व्याकुऴलेल्या व्यथा.. | Best Sad Story in Marathi 2023”

Leave a Reply

%d bloggers like this: