समग्र शिक्षा अभियान 2.0 महाराष्ट्र | Samagra Shiksha Abhiyan

माणसाला जीवन जगण्यासाठी अन्न, वस्त्र आणि निवारा याची गरज पडते. परंतु, जीवन सन्मानाने जगायचं असेल तर शिक्षणाची फार गरज पडते. आज माहिती घेऊया समग्र शिक्षा अभियान महाराष्ट्र | Samagra Shiksha Abhiyan 2023 . शिक्षण हा मानवी जीवनातील अत्यंत महत्वाचा मुद्दा मानला जातो. शिक्षण म्हणजे विद्यार्थ्यांच्या जीवनात होणार ईस्ट बदल होय. शिक्षणाने माणसाला विचार करण्याची क्षमता प्राप्त होते आणि त्यामुळे तो आपले विचार स्पष्टपणे जगासमोर मांडू शकतो. शिवाय शिक्षणाने दर्जा वाढते आणि समजात सन्मानाने जगता येते. त्यासाठी विद्यार्थ्यांना वर्ग 1 ते 12 वू पर्यंत शाळेत जावे लागते. आणि याच शाळेची परिणामकारकता वाढविण्यासाठी केंद्र सरकारने “समग्र शिक्षा अभियान” ही योजना आखलेली आहे.

समग्र शिक्षा अभियान 2.0 महाराष्ट्र | Samagra Shiksha Abhiyan

समग्र शिक्षा अभियान 2.0 महाराष्ट्र | Samagra Shiksha Abhiyan 2023

सोप्या शब्दात शिक्षणाचे महत्व सांगायचे झाल्यास शिक्षणामुळे आपल्याला सन्मान मिळतो आणि यासाठी भारत सरकारने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची क्षमता वाढविण्यासाठी “समग्र शिक्षा अभियान 2.0” ही योजना सुरू केलेली आहे. या योजनेअंतर्गत प्राथमिक शाळेपासून म्हणजे इयत्ता पहिली पासून ते इयत्ता 12 वी पर्यंतचे शिक्षण या योजनेमध्ये समावेश केलेले आहे. स्मार्ट क्लास, प्रशिक्षित शिक्षक, बाल वाटिका, आणि डिजिटल बोर्ड यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या सुविधा या योजनेअंतर्गत उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांना 200 रुपये दरमहा देण्यात येईल. याव्यतिरिक्त इयत्ता पाचवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना 5,000 रुपये, दहावीच्या विद्यार्थ्यांना 10,000 रुपये तर इयत्ता 12वी च्या विद्यार्थ्यांना 15,000 रुपये देण्यात येणार आहे.

समग्र शिक्षा अभियान-2.0 2023 ची नवीन माहिती

समग्र शिक्षा अभियान 2.0 ही योजना नवीन शैक्षणिक धोरण 2020 साठी 4 ऑगस्ट 2021 पासून सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेद्वारे मुलांच्या शिक्षणाचा विकास वाढावा यासाठी कार्य करीत असून शाळेमधील सुविधा, व्यावसायिक शिक्षण तसेच शिक्षणाचा विकास व्हावा आणि त्यांना प्रशिक्षण द्यावे याकडे जास्त लक्ष दिले जाणार आहे. यासाठी देशातील प्राथमिक पासून 12 वी पर्यंत शाळांमधील ग्रेड स्तरांचे हस्तांतरण दर सुधारले जातील. ही योजना पुढील पाच वर्षासाठी म्हणजे 2020-21 ते 2025-26 या कालावधी साठी सुरू राहणार आहे.

या योजनेच्या माध्यमातून सुमारे 11.6 लाख शाळा, 15.6 कोटी मुले आणि 57 लाख शिक्षकांना लाभ दिला जाणार आहे. या योजनेसाठी 2,94,283 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. त्यामधून केंद्र सरकार कडून 1,85,398 कोटी रूपये खर्च करण्यात येणार आहे. तसेच या योजनेच्या माध्यमातून कस्तुरबा गांधी विद्यापीठातील विद्यार्थिनींचा बारावीपर्यंत विस्तार, अंगणवाडी सेविकांचे प्रशिक्षण आणि मुलींना सॅनिटरी पॅड सुविधा अशा तरतुदींचा समावेश करण्यात आला आहे.

Samagra Shiksha Abhiyan 2.0 चे उद्दिष्ट

  1. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ची अंमलबजावणी करणे.
  2. बालकांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण करणे.
  3. बाल संगोपन व काळजी आणि शिक्षणावर लक्ष केंद्रित करणे
  4. साक्षरतेवर भर देणे.
  5. विद्यार्थ्यांचे 21 व्या शतकातील कौशल्य विकसित करणे.
  6. शिक्षणीक शिक्षणातील सामाजिक आणि लैंगिक अंतर दूर करणे.
  7. शालेय शिक्षणाचा दर्जा वाढवणे व त्यास आणखी परिणामकारक करणे.

समग्र शिक्षा अभियान 2.0 चे लाभ

  1. या योजनेअंतर्गत पुढील 5 वर्षात देशातील संपूर्ण शाळांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या सुविधा पुरविल्या जातील.
  2. या योजनेअंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्यांना 500 रुपयाची रक्कम निश्चित केलेली आहे.
  3. वाहतूक भत्ता म्हणून विद्यार्थ्यांना दरवर्षी 6000 रुपये दिले जातील.
  4. या योजनेअंतर्गत इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके दिले जाणार आहेत.
  5. या योजनेचा लाभ 15 करोड मुले, 11.6 लाख शाळा आणि 57 लाख शिक्षकांना मिळणार आहे.

समग्र शिक्षा अभियान वेबसाईटवर लॉग इन करण्याची प्रक्रिया

1. समग्र शिक्षा अभियान मध्ये लॉग इन करण्यासाठी तुम्हाला http://samagrashiksha.in/UserLogin1.aspx?AspxAutoDetectCookieSupport=1# या वेबसाईट वर जावं लागेल.
2. तिथं गेल्यानंतर तुम्हाला मुख्यपृष्ठ वर एक रकाना दिसेल त्यात तुम्हाला लॉगिन आयडी, पासवर्ड आणि कॅपचा कोड प्रविष्ट करून लॉगिन बटणावर क्लिक करावे लागेल.

3. लॉगिन आयडी आणि पासवर्ड माहिती करण्यासाठी खाली दिलेल्या PDF file मध्ये तुमच्या जिल्हा नुसार आयडी आणि पासवर्ड बदल माहिती दिलेली आहे.

Samagra Shiksha Abhiyan अधिकृत वेबसाईट

https://samagra.education.gov.in/

Samagra Shiksha Abhiyan मुख्य कार्यालयाचा पत्ता

Address- Department of School Education & Literacy,, Ministry of Education, Shastri Bhawan, New Delhi. Email- prabandh.edu[at]gmail[dot]com

हेल्पलाईन क्रमांक
+91-11-23765609

लॉगिन आयडी आणि पासवर्ड बद्दल माहिती

https://samagra.education.gov.in/

आमचे इतर महत्व पूर्ण ब्लॉग वाचा आणि तुमचे अभिप्राय कळवा. मराठी वाचकांपर्यंत चांगले मराठी साहित्य पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

सर्व सरकारी योजना बद्दल वाचा

कृषी सिंचन सरकारी योजना बद्दल वाचा

Leave a Reply

%d bloggers like this: