Sant dnyaneshwar information in marathi | ज्ञानेश्वर महाराजांविषयी थोडक्यात पण महत्वाचे

Sant dnyaneshwar information in marathi | संतश्रेष्ठ माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज यांचे थोर जीवन चरित्र
संत ज्ञानेश्वर यांचा पूर्ण नाव ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी असे होते. त्यांचा जन्म 22 ऑगस्ट 1275 रोजी गुरुवारी छत्रपती संभाजी महाराज नगर जिल्ह्यातील पैठण जवळील आपेगाव या ठिकाणी झाला. आणि त्यांनी 02 डिसेंबर 1296 रोजी रविवारी आळंदी येथे स्व:समाधी घेतली. संत ज्ञानेश्वर हे 13 व्या शतकातील प्रसिद्ध संत आणि कवी होऊन गेले. त्यांच्या अभंग रचना आजही वारकरी संप्रदायात आनंदाने गायल्या जातात.

Sant dnyaneshwar information in marathi | संतश्रेष्ठ माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज यांचे थोर जीवन चरित्र

त्यांनी अवघ्या 16 व्या वर्षी असतांना “ज्ञानेश्वरी” नावाचा एक प्रसिद्ध ग्रंथ आणि “अमृतानुभव” नावाचा ग्रंथ रचला होता. तसेच त्यांना एका प्रसिद्ध चांगदेव महाराज यांनी कोरा पत्र पाठवला होता तेंव्हा त्यांनी त्या पत्राच्या उत्तर मध्ये 65 ओव्या लिहून पाठवल्या होत्या तोच “चांगदेव पासष्टी” ग्रंथ म्हणून प्रसिद्ध झाला.

जीवन परिचय

संत ज्ञानेश्वर यांच्या वडिलांचे नाव विठ्ठलपंत. ते गोदावरी नदीच्या काठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण जवळील आपेगाव या ठिकाणचे कुलकर्णी होते. कुलकर्णी हे वंशपरंपरागत लेखापाल असतात जे गावातील जमीन आणि कर याच्या नोंदी ठेवत असत. कुलकर्णी हे सहसा ब्राम्हण असत. नंतर त्यांचा विवाह आळंदी येथील कुलकर्णी ची कन्या रुक्मिणीबाई सोबत झालं.

Sant dnyaneshwar information in marathi | संतश्रेष्ठ माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज यांचे थोर जीवन चरित्र

त्यांनी विवाहित असतांनाच संन्यास घेऊन काशीला गेले होते. तिथे त्यांच्या गुरुंना समजलं की ते विवाहित आहेत. तेव्हा त्यांच्या गुरूंनी त्यांना परत गृहस्थाश्रमात जायला सांगितलं. ते परत गृहस्थाश्रमात आल्यानंतर त्यांना 4 अपत्य झाली. निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, सोपानदेव आणि मुक्ताबाई. निवृत्तीनाथ हे ज्ञानेश्वरांचे थोरले बंधू तर बंधू सोपानदेव आणि बहीण मुक्ताबाई ही त्यांची धाकटी भावंडे होती.

Sant dnyaneshwar information in marathi | संतश्रेष्ठ माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज यांचे थोर जीवन चरित्र

विठ्ठलपंत हे तीर्थयात्रा करत आळंदीला गेले आणि नंतर तिथेच आपल्या कुटुंबासोबत स्थायिक झाले. त्या काळी ब्राम्हणांच्या मते संन्यासी लोकांना परत गृहस्थाश्रमात प्रवेश करता येत नाही. त्यामुळे समाजाने त्यांना व त्यांच्या कुटुंबाला वाळीत टाकले. त्या चारही भावंडांना संन्यास्यांची मुले म्हणून समाज त्यांची हेटाळणी करू लागले. आणि ज्ञानेश्वर यांच्यासोबत त्यांच्या भावंडांची मुंज करण्याचे आळंदी येतील ब्राम्हणांनी नकार दिला. त्यामुळे विठ्ठलपंतांनी धर्मशास्त्रींना यावर उपाय विचारलं. त्यावर उपाय म्हणून त्यांनी देहदंडाची शिक्षा सांगितली. विठ्ठलपंत आणि रुक्मिणी यांनी आपली अपत्य संस्कारांपासून वंचित राहू नये आणि त्यांचं भविष्य चांगले व्हावे यासाठी त्यांनी दोघांनी देहदंडाची शिक्षा स्वीकारली आणि आत्महत्या केली.

Sant dnyaneshwar information in marathi | संतश्रेष्ठ माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज यांचे थोर जीवन चरित्र

आई वडिलांच्या मृत्यूनंतर देखील समजाने या चार भावंडांना स्वीकारलं नाही आणि आणि कायम त्रास च देत राहिले. संत ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांना अन्न आणि पाणी अशा मूलभूत गरजांपासून सुद्धा वंचित ठेवलं गेलं. त्यामुळे ते पुढे पैठण ला आले. आणि तिथे भिक्षा मागून आपले जीवन निर्वाह करू लागले. ज्ञानेश्वरांनी अत्यंत रसाळ भाषेत शब्दरचना केली. भिक्षा मागून जीवन निर्वाह करणाऱ्या या भावंडांची कुशाग्र बुद्धी आणि शास्त्र ज्ञान पाहून पैठण मधील ब्राम्हण दुःखी झाले. आई वडीलांच्या अपराधाची शिक्षा त्यांच्या अपत्यांना देणे हे अन्याय आहे असा विचार करून तेथील ब्राम्हणांनी शेवटी इ. स. १२८८ मध्ये चार ही भावंडांना शुद्ध करून पुन्हा आपल्या समाजात समाविष्ट करून घेतलं.

Sant dnyaneshwar information in marathi | संतश्रेष्ठ माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज यांचे थोर जीवन चरित्र

संत ज्ञानेश्वर यांचा प्रवास

संत ज्ञानेश्वरांनी अमृतानुभव हा ग्रंथ लिहिला त्यांनतर ते आपल्या भावंडांसहित पंढरपूर ला गेली. तिथेच त्यांची भेट संत नामदेव यांच्याशी झाली आणि संत नामदेव हे त्यांचे मित्र बनले. संत ज्ञानेश्वर आणि संत नामदेव यांनी सोबत भारतामधील विविध पवित्र तीर्थक्षेत्राची यात्रा केली. त्यांनी अनेक लोकांना वारकरी संप्रदायाची दीक्षा दिली. असे मानतात की, संत ज्ञानेश्वर यांच्या अभंगाच्या भक्ती रचना सुद्धा याच काळात रचल्या गेल्या.

Sant dnyaneshwar information in marathi | संतश्रेष्ठ माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज यांचे थोर जीवन चरित्र

पवित्र तीर्थक्षेत्राची यात्रा संपवून जेव्हा संत ज्ञानेश्वर आणि संत नामदेव हे पंढरपूर ला परत आले तेव्हा यांना मेजवानी देऊन सन्मानित करण्यात आले होते. ज्यामध्ये बहिरात यांच्यानुसार “गोरोबा कुंभार, सावता माळी, अस्पृश्य असलेले संत चोखोबा आणि पारिसा (भागवत ब्राह्मण)” यांसारखे अनेक समकालीन संत सहभागी झाले होते. काही विद्वान संत ज्ञानेश्वर आणि संत नामदेव हे समकालीन होते असे मान्य करतात तर काही विद्वान जसे डब्ल्यू.बी. पटवर्धन, आर.जी. भांडारकर आणि आर. भारद्वाज यांच्यासारखी लोकं या मताशी सहमत आहेत. त्यांच्या मते संत नामदेव हे १४ व्या शतकातील उत्तरार्धातील होते.

Sant dnyaneshwar information in marathi समाधी

पंढरपूर मध्ये संत ज्ञानेश्वर आणि संत नामदेव यांचा सन्मान म्हणून ठेवलेली मेजवानी झाल्यानंतर संत ज्ञानेश्वरांनी संजीवन समाधी मध्ये जाण्याची इच्छा व्यक्त केली. हि प्रथा म्हणजे प्राचीन भारतातील अष्टांग योगामध्ये प्रचलित केलेली, खोल ध्यानस्थ अवस्थेत प्रवेश केल्यानंतर स्वेच्छेने नश्वर शरीर सोडण्याची होय. संजीवन समाधीची संपूर्ण तयारी संत नामदेव यांच्या मुलांनी केली. आणि संत ज्ञानेश्वर यांनी ०२ डिसेंबर १२९६ रविवार ला आळंदी येथे आपल्या आयुष्याच्या २१ व्या वर्षी संजीवन समाधी मध्ये प्रवेश केला आणि आपला जीवन त्याग केला. त्यांच्या निधनाने संत नामदेव आणि उपस्थित असलेले सर्वांनी शोक व्यक्त केला.

Sant dnyaneshwar information in marathi | संतश्रेष्ठ माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज यांचे थोर जीवन चरित्र

संत ज्ञानेश्र्वर यांच्या बाबतीत अशी मान्यता आहे की, संत नामदेवांनी विठोबाकडे संत ज्ञानेश्वरांना परत आणण्यासाठी प्रार्थना केली होती. त्यामुळे संत नामदेवांना भेटण्यासाठी संत ज्ञानेश्वरांना परत जिवंत करण्यात आले होते. या प्रसंगावर लेखक डॅलमायर असे लिहितात की, हे “खऱ्या मैत्रीच्या अमरत्वाची आणि उदात्त आणि प्रेमळ अंतःकरणाच्या सहवासाची” साक्ष देते. अनेक वारकरी भक्तांचा असा दृढ विश्वास आहे की, संत ज्ञानेश्वर महाराज अजूनही जिवंत आहेत.

संत ज्ञानेश्वरांचे कार्य

ज्ञानेश्वरांचे सद्गुरू त्यांचे मोठे बंधू संत निवृत्तीनाथ हे होते. त्यांनी आपल्या गुरूंच्या कृपाशीर्वादाने नेवासा या क्षेत्रात गीतेवर प्रख्यात टिका केली. आणि त्यालाच “ज्ञानेश्वरी किव्वा भावार्थदीपिका” असेही म्हणतात. हे मराठी वाङ्मयाचे देशीकार लेणे झाले. ज्ञानेश्वरी या ग्रंथाच्या माध्यमातून संस्कृत मधील ज्ञान प्राकृत भाषेत आणले.
माझा मराठाचि बोलू कौतुके। परि अमृतातेहि पैजासी जिंके।
ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।।(ज्ञानेश्वरी – ६.१४)

Sant dnyaneshwar information in marathi | संतश्रेष्ठ माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज यांचे थोर जीवन चरित्र

असे म्हणून त्यांनी मराठी भाषेबद्दल अभिमान आणि मराठीची महती मात्र त्यांना काय लिहायचं तेच सुचलं मही त्यामुळे त्यांनी संत ज्ञानेश्र्वर यांना कोराच पत्र पाठविले होते. त्या पत्राचे प्रतिउत्तर म्हणून 65 ओव्यांचे पत्र पाठविले त्यालाच “चांगदेव पासष्टी” म्हणतात. या सोबतच त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले जसे, “हरिपाठ” हे ग्रंथ 28 अभंगाचे असून यात हरिपाठाचे महत्व सांगितलेले आहे.

‘जो जे वांछील, तो ते लाहो’ असे म्हणत जणू त्यांना संपूर्ण जगाची काळजी आहे. अशा संत ज्ञानेश्वर यांना वारकरी संप्रदायासह सर्वच भक्त प्रेमाने “माउली” म्हणतात. त्यांनी धर्मातील क्लिष्ट बाबी वगळून धर्माला कर्तव्याचा एक वेगळा अर्थ दिला. वाङ्मय निर्मिती बरोबरच आध्यात्मिक लोकशाहीचे बीजे रोवली. भागवत धर्माचे आणि वारकरी संप्रदायाचा अभूतपूर्व कार्य त्यांनी केले. ज्ञानेश्वर महाराजांनी भगवत गीता मराठी मधून लिहिली होती.

Sant dnyaneshwar information in marathi | संतश्रेष्ठ माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज यांचे थोर जीवन चरित्र

ज्ञानेश्वरांनी लिहिलेले ग्रंथ

१) अमृतानुभव
२) चांगदेव पासष्टी
३) भावार्थदीपिका (किंवा ज्ञानेश्वरी) – या ग्रंथाचा शेवट पसायदान या नावाने ओळखला जातो.
४) स्फुटकाव्ये (अभंग, विराण्या, आदि.)
५) हरिपाठ (श्री ज्ञानदेव हरिपाठ)

Sant dnyaneshwar information in marathi | संतश्रेष्ठ माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज यांचे थोर जीवन चरित्र

संत ज्ञानेश्वरांवर सरश्री यांनी लिहिलेले पुस्तक वाचा

छत्रपती शिवाजी महाराजांविषयी माहिती वाचा

Avatar
ashutosh

3 thoughts on “Sant dnyaneshwar information in marathi | ज्ञानेश्वर महाराजांविषयी थोडक्यात पण महत्वाचे”

Leave a Reply