Sharath Babu Biography In Marathi : अभिनेते शरथ बाबू अनंतात विलीन


Sharath Babu Biography In Marathi : दाक्षिणात्य अभिनेते शरथ बाबू हे काही महिन्या पूर्वी पासून “सेप्सिस” या आजाराने त्रस्त होते. या आजारात शरीरातील एक एक अवयव निकामी होत असतात. 20 एप्रिल ला त्यांची प्रकृती जास्तच खालावल्यामुळे त्यांना बंगळूर वरून हैद्राबाद मधील “एआयजी” रुग्णालयात दाखल केले गेले. 3 मे 2023 ला त्यांचा मृत्यु झाल्याची बातमी समोर आली मात्र त्यांच्या कुटुंबीयांनी ह्या फक्त अफवा आहेत त्यांचा उपचार सुरू आहे अशी पुष्टी केली आणि यासोबतच अशी अफवा पसरवू नका असे सुद्धा सांगितले.

Sharath Babu Biography In Marathi | शरद बाबू मराठी बायोग्राफी

नंतर 22 मे 2023 रोजी सोमवार ला सकाळी त्यांची प्रकृती आणखी जास्त बिघडल्यामुळे आणि त्यांचे अनेक अवयव पूर्णपणे निकामी झाल्यामुळे दुपारी त्यांच्या वयाच्या 72 व्या वर्षी दुःखद निधन झाले. याची पुष्टी त्यांच्या कुटुंबाने केली. त्यांची फॅन फोलोविंग केवळ भारतापर्यंत सिमीत नसून पूर्ण जगभरात पसरलेली आहे. त्यांच्या निधनानंतर Superstar Rajnikanth, Jr. NTR, प्रकाश राज अशा अनेक दिग्गज अभिनेत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली अर्पण केली.

Sharath Babu Biography In Marathi | शरथ बाबू मराठी बायोग्राफी

शरथ बाबू यांचे पूर्ण नाव सत्यम बाबू दिक्षिथुलू हे आहे. त्यांचा जन्म 31 जुलै 1951 रोजी आंध्र प्रदेशातील “अमदलावलसा” या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे एक हॉटेल होते आणि त्यांनी समोर त्यांचाच व्यवसाय सांभाळावे असी त्यांच्या वडिलांची अपेक्षा होती पण त्यांना पोलीस अधिकारी व्हायचे होते. महाविद्यालयीन काळात त्यांना अल्पदृष्टी विकसित झाली आणि त्यांचं स्वप्न भंग झालं कारण पोलीस अधिकारी होण्यासाठी स्पष्ट दृष्टी ची अट होती. लोकांनी त्यांच्या आईला सांगितले की, बाबू दिसायला खूप छान आहे त्यामुळे त्याने चित्रपट सृष्टी मध्ये यावे आणि तसं त्यांच्या प्राध्यापकांनीही त्यांना म्हटलं होतं. वडिलांचा त्यांना विरोध होता परंतु त्यांना त्यांच्या आईने साथ दिली आणि त्यांनी वर्तमानपत्रामध्ये आलेली ‘चित्रपटासाठी नाव चेहरा/कलाकार हवा’ ही जाहिरात पाहून त्यांनी आपल्या करीयर ची सुरवात केली.

Sharath Babu Biography In Marathi | शरद बाबू मराठी बायोग्राफी

त्यांच्या करियर ची सुरवात 1973 मध्ये त्यांचा पहिला वहिला चित्रपट “राम राज्यम” या चित्रपटामधून केले आणि नंतर उथिरी पुक्कल (1979), क्रिमिनल (1994) आणि शिर्डी साई (2012) अशा हिट सिनेमा मध्ये सुद्धा काम केले. मुख्यतः त्यांनी तेलगू आणि तामिळ मधील चित्रपट मध्ये काम केले. यासोबतच आपल्या करीयर मध्ये तेलगू, तामिळ, कन्नड, काही मल्याळम आणि काही हिंदी असे 233 पेक्षा अधिक चित्रपट मध्ये काम करून त्यांची लोकप्रियता फक्त भारता मध्येच नव्हे तर संपुर्ण जगभरामध्ये वाऱ्यासारखी पसरलेली आहे.

त्यांचा “वसंता मुल्लई” हा प्रदर्शित फेब्रुवारी 2023 मध्ये प्रदर्शित झालेला त्यांचा शेवटचा चित्रपट होता आणि त्यांचा शेवटचा चित्रपट “मल्ली पेल्ली” हा 2023 मध्ये तेलगू या भाषेमधील मरणोत्तर प्रदर्शित होणार आहे. त्यांना आठ राज्य नंदी पुरस्कार सुद्धा मिळाले आहेत. चित्रपट कारकिर्दीमधले “बालचंदर” हे त्यांचे गुरू होत. त्यांनी रजनीकांत, विजय, कमल हसन, चिरंजीवी अशा अनेक दिग्गज अभिनेत्यांसोबत काम केले आहे. यासोबतच ते “डबिंग आर्टिस्ट” सुद्धा होते.

Sharath Babu Biography In Marathi | शरद बाबू मराठी बायोग्राफी

Sharath Babu यांचं वयक्तिक जीवन

शरथ बाबू यांनी 1973 ला Film Industry मध्ये पदार्पण केल्यानंतर 1974 मध्ये तेलगू अभिनेत्री रमा प्रभा यांच्यासोबत 1974 पासून ते 1988 पर्यंत Live In Relationship मध्ये होते. नंतर त्यांनी वेगळे राहण्याचा निर्णय घेतला आणि बाबूने मला फसवून चेन्नई मधील तिची मालमत्ता हिसकावून घेतली असे आरोप सुद्धा केले. बाबू ने तिने केलेले आरोप नाकारून आमचे संबंध होते असे मान्य केले. या सोबतच त्यांनी असंही सांगितलं की मी तिच्यापेक्षा खूप लहान होतो तेव्हा पासून आमचे संबंध आहेत. त्यानंतर त्यांना 1990 मध्ये “स्नेहा नांबियार” सोबत लग्न केलं मात्र ते सुद्धा जास्त काळ टिकून न राहता 2011 मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला.

Sharath Babu यांचा मृत्यु

20 एप्रिल 2023 मध्ये त्यांना ग्रासलेल्या “सेप्सिस” या आजाराचा त्रास जास्त वाढल्यामुळे त्यांना बेंगळूर मधून हैद्राबाद येथील “एआयजी” या रुग्णालयात दाखल केले गेले. नंतर 3 मे 2023 ला त्यांचा मृत्यु झाल्याची बातमी समोर आली मात्र त्यांच्या कुटुंबीयांनी ह्या फक्त अफवा आहेत त्यांचा उपचार सुरू आहे अशी पुष्टी केली आणि यासोबतच अशी अफवा पसरवू नका असे सुद्धा सांगितले.
22 मे 2023 सोमवार ला सकाळी त्यांची प्रकृती जास्तच खालावली आणि सेप्सिस या आजारामुळे त्यांच्या शरीरातील अनेक अवयव निकामी पडले होते त्यामुळे त्यांचं दुपारी त्यांच्या वयाच्या 72 व्या वर्षी दुःखद निधन झाले. आणि याची पुष्टी स्वतः त्यांच्या कुटुंबीयांनी केली.

Sharath Babu Biography In Marathi | शरद बाबू मराठी बायोग्राफी

Sharath Babu Awards यांना मिळालेले पुरस्कार

नंदी पुरस्कार

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – सीथाकोका चिलाका (1981)

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – ओ भर्या कथा (1988)

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – नीरजनम (1989)

Sharath Babu यांना मिळालेले इतर पुरस्कार

2017 मध्ये मलायन चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट पात्र कलाकार (पुरुष) साठी तामिळनाडू राज्य चित्रपट पुरस्कार.

Sharath Babu Biography In Marathi | शरद बाबू मराठी बायोग्राफी

गान कोकिळा Lata Mangeshkar यांची बायोग्राफी वाचा

मराठी नटी तृप्ती राणे ची बायोग्राफी वाचा

शरथ बाबू यांचे वय किती होते?

Tollywood अभिनेता शरथ बाबू यांचे वय ७२ वर्षे होते.

5 thoughts on “Sharath Babu Biography In Marathi : अभिनेते शरथ बाबू अनंतात विलीन”

Leave a Reply

%d bloggers like this: