भावनांना रफू करून पहावे | Best 3 Small Story in Marathi

शितल बाविस्कर राणेराजपूत अतिशय सुंदर अशा ३ छोट्या Best Small Story in Marathi लिहिल्या आहेत. कथा छोट्या आहेत पण त्यातून फार मोठा बोध तुम्हाला मिळेल हे नक्की.

भावनांना रफू करून पहावे | Small Story in Marathi Language

अनिकेत ऑफिस सुटल्यावर घरी आला. घरात आल्यावर निधीला आवाज दिला. निधीने अनिकेत प्यायला पाणी दिले आणि चहा ठेवण्यासाठी स्वयंपाकघरात गेली. निधीने चहा दिला त्याच्या जवळ येऊन बसली. अनिकेतने निधीला विचारले, “आई कुठे आहे?”

निधीने सासूबाई मंदिरात गेल्या आहेत. असे सांगितले आणि हळूच आपले डोळे टिपले. अनिकेतच्या लक्षात आले. दोघांमध्ये काहीतरी बिनसले आहे. निधीच्या डोळयांतील निरागस भाव बघून अनिकेतला काय घडले असावे याचा अंदाज आला होता.

अनिकेत आणि निधीच्या लग्नाला पंधरा वर्ष झाली होती ;परंतु अजूनही पाळणा हलला नव्हता. दोघांचेही रिपोर्ट नॉर्मल होते. तरी देखील निधीला दिवस राहत नव्हते. सर्व उपचार करून झाले पण हाती यश आले नव्हते. आज सासूबाई पुन्हा निधीला यावरून बोलल्या आणि निधीची मनःस्थिती पुन्हा ढासळली. अनिकेत पण काहीच करू शकत नव्हता. असेच काही दिवस गेल्यानंतर अनिकेतला त्याच्या मित्राने समजावून सांगितले किती दिवस तुम्ही आशा ठेवणार? आणि कोणी बोललं तर परत तुमची मनस्थिती ढासळणार? यातून तू आणि वहिनींनी बाहेर पडायला हवं.

दुःख हृदयात नं साठवता
त्यातून अलगद बाहेर पडावे
थोडासा प्रयत्न करून आपण
भावनांना रफू करून पहावे

अनिकेतला हा मुद्दा पटला आणि त्याने बाळ दत्तक घेण्याचे ठरवले. अनिकेतने मेघना नावाची पाच वर्षाची चुणचुणीत मुलगी दत्तक घेतली. आणि अनिकेतचे घर पुन्हा नव्या आनंदात न्हाऊन निघालं…
अशा कितीतरी गोष्टी आपल्या आयुष्यात घडत असतात ज्यांना आपण खतपाणी घालून कुरवा ळत असतो. व्यवस्थित विचार करून मार्ग शोधला तर जीवनाला नवी दिशा नक्कीच मिळते.

भावनांना रफू करून पहावे | Best 3 Small Story in Marathi


जीवन आहे क्षणभंगुर
आनंद पेरीत रहावा
प्रत्येक क्षण उत्साहाने
नव्या आशेने जगावा

आज धावपळीच्या जगामध्ये प्रत्येक जण आपापल्या कामात व्यस्त असतात. विविध ताणतणावाला सामोरे जात आहेत. प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा वाढल्यामुळे स्वतःला सिद्ध करण्याच्या नादात यंत्रवत काम करीत आहेत. माणसांना या गोष्टीचा विसर पडत चालला आहे कि यंत्रांना भावना नसतात. परंतु माणसांना भावना असतात. स्वतःसाठी वेळ देऊन आपण स्वतः आपल्या भावना समजून घेतल्या पाहिजेत. तरच आपण निरोगी जीवन जगू शकतो.

दिव्या ‘सिन्हा इंडस्ट्रिसचे’ मालक पुरुजीत सिन्हा यांची एकुलती एक मुलगी होती.. दिव्याने एम. बी. ए पुर्ण केले. पुरुजीत ने तिला आपली कंपनी जॉईंट करण्यास सांगितले. दिव्या एक स्वाभिमानी मुलगी होती. तिला स्वतःच्या बळावर यश मिळवायचे होते. स्वतःची वेगळी ओळख निर्माण करायची होती पण पुरुजीत सिन्हा यांना आपल्या मुलीच्या भावना जाणून घ्यायला वेळच कुठे होता. बिना आईच्या मायेने वाढलेल्या दिव्याच्या नशिबी वडिलांचे दोन प्रेमाचे शब्द आणि त्यांच्या प्रेमाचा सहवास कधीच मिळाला नव्हता. त्यामुळे दिव्या तिच्या भावना कधीच मनमोकळेपणाने मांडू शकत नव्हती.

भावनांना रफू करून पहावे | Small Story in Marathi

भाव तिचे हृदयाच्या
कप्प्यात दडलेले
दुःखाच्या सागरात
शब्द जणू गोठलेले…

एवढी हुशार मुलगी होती दिव्या पण आतल्या आत तिच्या उमलत्या भावना साठवून ठेवायची. फक्त वडील सांगतील त्याप्रमाणे हेच जणू तिच्या आयुष्याचे ध्येय होते. याचा विपरीत जो व्हायला हवा तोच झाला. दिव्या हळूहळू एकलकोंडी होतं गेली आणि भावनांचा कोंडमारा असह्य झाल्यामुळे दिव्याचे मानसिक संतुलन बिघडले. डॉक्टरांनी जेव्हा पुरुजीतला दिव्याच्या मनःस्थिती विषयी सांगितले तेव्हा त्यांना खुप मोठा झटका बसला आणि आपल्या वागण्याचा पश्चाताप होऊ लागला. जर मी दिव्याला वेळ दिला असता आणि तिच्या भावना समजून घेतल्या असत्या तर आज माझ्या मुलीवर ही वेळ आली नसती. परंतु एकदाची वेळ निघून गेल्यानंतर मागे फिरणे कुणाला शक्य होते.

यासाठी जेवढा वेळ आपण आपल्या कामासाठी देत असतो तेवढाच वेळ आपल्या जवळच्या व्यक्तीसाठी दिला पाहिजे. पुरुजीतने दिव्याच्या भावना समजून घेतल्या असत्या. तिला प्रेम आणि मायेने समजून घेतले असते तर तिच्यावर ही वेळ आली नसती…

पूर्वीच्या काळी एकत्रित कुटुंब पद्धती असल्यामुळे घरात जवळची मायेची खुप माणसे होती.मुलांना आजी बाबा, काका काकू यांच निर्मळ प्रेम संस्कार मिळायचे. परंतु आज परिस्थिती बदलली आहे. विभक्त कुटुंब पद्धतीमुळे मुलं आपल्या आजी आजोबांच्या प्रेमाला पारखी होतं आहेत. त्यातही आईवडील दोघेही नोकरीनिमित्त घराबाहेर पडत असल्यामुळे मुले एकलकोंडी बनत चालली आहेत. त्यांचे भावविश्व कुठेतरी सीमित होतं आहे. या गोष्टीचा सर्वांनी विचार केला पाहिजे. आईवडिलांनी जास्तीत जास्त वेळ मुलांच्या सहवासात घालवला पाहिजे. त्यांच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत. सुट्टीच्या दिवशी मुलांना बाहेर फिरावयास नेणे. त्यांना सामाजिक गोष्टींची जाणीव करून देणे. या गोष्टींचे पालन काटेकोरपणे केले पाहिजे.

भावना या सरितेसम प्रवाही असतात. मनी दाटलेल्या भावना मोकळ्या करून नवी ध्येये नवी आशा जागवली पाहिजे.

भावनांना रफू करून पहावे | Best 3 Small Story in Marathi


सौरभ खुपच हुशार आणि सर्वगुणसंपन्न मुलगा होता. तो बी. एस .स्सी . च्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत होता. स्वभावाने अतिशय सालस आणि मनमिळाऊ. त्यामुळे महाविदयालयात देखील तो सर्वांचा लाडका होता.स्नेहा त्याची बालपणाची मैत्रीण होती. स्नेहा सौरभला खुप आवडायची. त्याच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट तो स्नेहाला सांगत असे. त्याचे मन मोकळे करत असे.

माझ्या आयुष्यातील प्रत्येक
क्षण तुझ्या सोबत मी जगावा
नित्य सोबत तुझी लाभून
आपल्या मैत्रीला अर्थ मिळावा

सौरभ च्या मनात तिच्या विषयी प्रेमाचे विचार येऊ लागले. स्नेहाने ही होकार दिला. सौरभला खुप आनंद झाला. परंतु त्याचा आनंद जास्त काळ टिकला नाही. त्यांच्याच वर्गात शिकणाऱ्या मुकुंद नावाच्या श्रीमंत मुलाने स्नेहाला लग्नाची मागणी घातली. तिने लग्नाला होकार दिला. सौरभ चे भावाविश्व नष्ट झाले.

भावना माझ्या मनातील
तुला कळल्या नाहीत
स्वप्न मोडली सारी
तुझ्या पायदळी तुडवीत..

भावनांना रफू करून पहावे | Best 3 Small Story in Marathi

सौरभचे निरागस मन तिचा दुरावा सहन करू शकला नाही आणि त्याने त्याचे आयुष्य संपवले. आपण कुणाला आनंद देऊ शकत नसाल तर कमीत कमी कुणाच्या भावनांशी खेळू नका.भावना समजून घेऊन त्या व्यक्तीच्या स्वप्नांना नवीन आकार दिला पाहिजे. नाती न तोडता जोडून ठेवली पाहिजेत. कितीही वाईट प्रसंग आले तरीही भावनांना रफू करून पहावे.

भावनांना रफू करून पहावे | Best 3 Small Story in Marathi

( स्वलिखित )
शितल बाविस्कर राणेराजपूत जळगांव
मोबाईल नं :- 7020938073

शितल बाविस्कर राणेराजपूत

भावनांना रफू करून पहावे | Best 3 Small Story in Marathi

तर अशा या लेखातून आम्ही तुम्हाला जमेल तेवढी माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला जर आमचे काम आवडले असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा. तुम्हाला देखील लेख लिहायला आवडत असतील पण त्यासाठी व्यासपीठ मिळत नसेल तर आम्हाला कळवा.

Maze Gav Marathi Nibandh

Raksha Bandhan Nibandh In Marathi

ESSAY ON OUR FESTIVAL

Leave a Reply

%d bloggers like this: