साहित्यबंध समूह आयोजित साप्ताहिक स्पर्धेत सौ भक्ती केंजळे यांनी Society Information in Marathi या कीवर्ड वर आधारित “माझ्या आठवणीतील दसरा” हा लेख लिहिला आहे. चला तर वाचूया.
समाज | Society Information in Marathi
समाजात आपण राहतो नांदतो जगतो आणि हो मरतो ही, पण हा समाज खरंच आपल्याला स्वीकारतो का तर हो इथे आपण जनावरांनाही सांभाळतो मग माणसांना का नाही स्वीकारणार… माणूस हा समाजशील प्राणी आहे इथे आपण समाजाच देणे लागतो समाजाकडूनच शिकतो आपल्याला जन्म आपल्या मातेने दिलेला असतो पण जोपासलं पूर्णपणे समाजाने असतं कारण समाजातील घटक जर नसते तर आपल्या जगण्याला किंमतच नसती रूढी परंपरा संस्कृती नातीगोती धर्म सगळे काही समाजानेच तर निर्माण केलेले आहे….
तुम्ही वाचत आहात समाज | Society Information in Marathi
प्रत्येकाचा आपापला समाज असतो फक्त जातींचा नाही तर शाळा कॉलेजेस आणि ऑफिसमध्ये किंवा समवयस्कांमध्ये इक्वल कल्चरचा एक सेप्रेट समाज गोतावळा असतो आपल्या आपल्या लाईफस्टाईल नुसार हा निर्माण झालेला असतो कुणाकुणाचा गुणवत्तेनुसार सुद्धा असतो समाज गोतावळा आणि या समाजात आतले बाहेरचे हे दोन घटक असतात आतले नेहमी बाहेरच्या बद्दल चर्चा करताना दिसतात आणि बाहेरचे नेहमी आतल्यांबद्दल चर्चा करताना दिसतात, आतल्यांना आतच स्थिर व्हायचं असतं पण कधी कधी विसंगत कृत्यांमुळे किंवा काही युद्धजनक परिस्थितीमुळं कोणी कोणी आतले हे बाहेर फेकले जातात, तर बाहेरच्यांना आत कधी येऊन बसतो याचे वेध लागलेले असतात आपल्याला आत कधी जागा मिळेल आपण तिथे कसे वास्तव्य करू यावर बाहेरच्यांचा सतत अभ्यास चाल्लेला असतो….
तुम्ही वाचत आहात समाज | Society Information in Marathi

समाज हा डोळ्यांनी दिसतो तुमच्या आमच्यापासूनच बनलेला असतो तो काही लॉजिकली क्रिएट झालेला नाही पण आपण कधीतरी या समाजाच्या भीतीपोटी कितीतरी गोष्टी लपवून एक वेगळाच चेहरा समाजासमोर आणतो म्हणजे आपण भीतीपोटी दुसरा चेहरा समाजासमोर उभा करतो पण इथेच तर खोटं आहे…
तुम्ही वाचत आहात समाज | Society Information in Marathi
ही वेगळी दृष्टी कुठवर टिकणार तिला तडे गेले की खरे रूप समोर येणारच आणि मग आपल्यालाच मानसिक कुचंबनेचा सामना करावा लागणार , स्वतःसमोर जी व्यक्ती खरी नाही तिने समाजात कितीही नावलौकिक मिळवला तरी तो खोटा दिखावा कधीतरी मोडून पडणार आणि मग विकृत ही व्यक्ती परत दुसरा डोलारा उभा करायला सज्ज होणार परत तो डोलारा पडणार परत ती व्यक्ती दुसरा चेहरा निर्माण करणार जोपर्यंत या व्यक्तीचे तन मन धन तिला तसे कृत्य करायला भाग पाडत आहे
तुम्ही वाचत आहात समाज | Society Information in Marathi
कारण कधी कधी माणसेही फार निर्भीड असतात भिणे त्यांना माहीतही नसते ही लोक त्यांच्यापेक्षा खालच्या पातळी वरील म्हणजे भावना विश्वातील माणसांना सहज गोल करण्यात तरबेज होताना दिसतात आणि टीव्हीवरील मालिकांमध्ये याचे चित्र दिसते एकाची सत्य परिस्थिती आणि दुसऱ्याची खोटी आकृती यांचे सामने असतात, लोकांनाही जोवर भांडणे सामने हेवे दावे बघायला आवडते किंवा त्यांचा त्याच्यातच रस आहे तोवर समाजात कलह हेवेदावे राजकीय कुरघोडी बघायला मिळतील हे त्रिवार सत्य आहे….
सौ भक्ती संकेत केंजळे
करंजे,पुणे(9665479912)
तुम्ही वाचत आहात समाज | Society Information in Marathi
समाप्त.
साहित्यबंध समूहाची माहिती आणि जाहिरात
दिवसेंदिवस मराठी भाषेवर इतर भाषेतील शब्दांचा अतिरेक होत आहे. कित्येक मराठी शब्द तर नवीन पिढीच्या कानावर देखील पडले नाहीत. यामुळे पुढे जाऊन मराठी भाषा हळू हळू लुप्त होईल अशी आम्हाला भीती आहे. लिहिणे, बोलणे, ऐकणे आणि वाचणे ह्यातूनच मराठी भाषा अनंत काल टिकू शकते.

त्यामुळे नवनवीन साहित्यिक मराठी भाषेतून निर्माण होणे ही काळाची गरज आहे. तसेच लेखकांचा पुरेसा सन्मान मिळणे आणि त्यांना योग्य प्लॅटफॉर्म उपलब्ध होणे त्याचबरोबर साहित्य चोरी थांबवणे या उद्देशातून आम्ही हा समूह तयार केला आहे.
मराठी भाषेच्या प्रती आमचे जे कर्तव्य आहे ते पार पाडण्याचा हा छोटासा प्रयत्न. तुम्ही देखील मराठी भाषेप्रती आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी हा समूह जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आमची मदत करा.
लक्षात घ्या की ह्या समूहाची सभासद फी ५०₹ प्रती महिना आहे. सभासद फी 9146494879 या Gpay किंवा PhonePe नंबर वर टाकल्यानंतर ग्रुप मध्ये add केले जाईल. एकदाच वार्षिक सभासदत्व घेणाऱ्यांना फी मध्ये १०० ₹ सूट मिळेल.
या मासिक सभासदत्वामध्ये तुम्हाला मिळेल
१) साहित्यक्षेत्रातील प्रगतीसाठी ४ साप्ताहिक स्पर्धा
२) सहभागासाठी आकर्षक डिजिटल प्रमाणपत्रे
३) स्पर्धेतील तुमचे चार लेख सुप्रसिद्ध अशा मराठी टाईम वेबसाईटवर पब्लिश केले जातील. ज्याची लिंक तुम्ही कुठेही शेअर करू शकता.
४) तुमचा फोटो आणि लेखाच्या नावासहीत चार सुंदर वॉलपेपर.
५) लेख त्याच्या विषयाला अनुसरून छान वॉलपेपरसने सजविला जातील.
६) तुमचा लेख गुगल सर्च मध्ये आणण्यासाठी SEO techniques वापरल्या जातील.
तुमच्या एका लेखावर अंदाजे ५००₹ चे काम केले जाईल म्हणजे ५०₹ च्या सभासद फी मध्ये ४ लेखांवर होणारे २०००₹ चे फायदे तुम्हाला मिळणार आहेत
https://chat.whatsapp.com/JDA5qGHXn43IofHbacHWBd
9146494879 या Gpay/ PhonePe नंबरवर एका महिन्याची ५०₹ फी किंवा वर्षाची ५००₹ सभासद फी पाठवा. Payment कमेंट मध्ये स्वतःचे नाव टाका. आणि वरील ग्रुप लिंकला जॉईन व्हा.
आमच्या समूहातील कविता वाचण्यासाठी भेट द्या mazablog.online
तुम्ही वाचत आहात समाज | Society Information in Marathi