सैनिकाचे आत्मवृत्त 1000 शब्द | Best Soldier Autobiography in Marathi

आज समाज फक्त स्वतःविषयी विचार करतो, पण एका सैन्याला आपल्या देशाविषयी काय वाटतं त्याच संपूर्ण आत्मकथन या Soldier Autobiography in Marathi मध्ये सांगितले गेल आहे.

असे विविध प्रकारच्या आत्मकथन तुम्हाला आमच्या वेबसाईटवर सहज मिळून जाईल त्यासाठी आमच्या वेबसाईटला सबस्क्राईब करा.

सैनिकाचे आत्मवृत्त 1000 शब्द | Best Soldier Autobiography in Marathi

सैनिकाचे आत्मवृत्त 1000 शब्द | Best Soldier Autobiography in Marathi

Soldier Autobiography in Marathi

मी एक सैनिक आहे आणि कठीण परिश्रमातून मी ही वर्दी परिधान केली आहे. लहानपणापासून सैनिक बनून शत्रुंपासून देशाची सेवा करणे ,हे माझे स्वप्न होते. आणि म्हणूनच मी रात्रंदिवस कष्ट केले. परिस्थिती हालाखीची असतानाही मी हार स्वीकारले नाही. मी माझे ध्येय ठरलेले होते, की मला सैनिक बनायचे आहे. व यासाठी मी सर्व प्रकारच्या परिस्थितीवर मात करायचे ठरवले होते.

रात्र दिवस एक करून मिळवलेली ही वरदी मी आज माझ्या परिश्रमाने परिधान केलीआहे. मला सांगताना खूप गर्व होतो की मी एक सैनिक आहे लहानपणापासूनच माझे एक स्वप्न होते. त्या स्वप्नामध्ये मला देशाची बॉर्डर दिसायची ,त्या बॉर्डरवर मी हातामध्ये बंदूक घेऊन शत्रूंशी लढा देताना दिसायचो ,हे स्वप्न साकार करण्यासाठी मी अहोरात्र मेहनत घेतली .आणि ठरवलं की मला बनायचे तर सैनिकच आहे .

सैनिकाचे आत्मवृत्त 1000 शब्द | Best Soldier Autobiography in Marathi

घरच्यांचा विरोध होता . सैनिक नको अस त्यांचं म्हणणं होतं.पण मी माझ्या निर्णयावर ठाम होतो. आणि मी ठरवलं की मला बनायचे तर सैनिकच आहे. त्यासाठी मी हालकीच्या परिस्थितीला नेहमीच तोंड देत आलो. माझ्या बाबांचा मला पाठिंबा नव्हता मात्र माझ्या आईचा मला पाठिंबा होता. ती माझ्या स्वप्नांसाठी आणि मला सैनिक बघण्यासाठी रात्र दिवस तिच्या कष्टाने भिजत होती. वडिलांनाही ही गोष्ट काही काळानंतर समजायला आली की, माझा मुलगा सैनिक बनण्यासाठी खूप मेहनत घेतोय .आणि त्याच्या स्वप्नांच्या आपण आड यायला नको. पण आहेत तर ते वडीलच ना! त्यांना असे वाटायचे की ,एकच मुलगा आहे. तोही आपल्या दूर जाणार तर आपण कोणाकडे बघणार.

पण जेव्हा माझ्या आईने त्यांना समजावून सांगितले की, तो आपलाच मुलगा नाही तर आपल्या भारत भूमीचा मुलगा आहे. तो आपल्यासाठी जगेल हे, हे आपल्यालाच माहीत असेल. आणि आपल्या दोघांच्या सुखासाठी तो ही झटेल. पण जेव्हा तो देशासाठी लढले प्रत्येकच आईचा मुलगा बनेल, प्रत्येक बहिणीचा भाऊ बनेल, तेव्हा तुमची छाती गर्वाने फुगेल ,आणि तो रात्र दिवस मेहनतही घेतोय. माझी बारावी झाली मी रोज सकाळी उठून मैदानावर धावण्याची आणि सकाळी उठूनच व्यायाम करण्याची सवय पाडली. शरीराला अगदीच मजबूत केले .माझी उंचीही सैन्यात भरती होण्यात इतकी पुरेशी होती. मनामध्ये असलेली जिद्द आणि कष्टाने मिळवलेल माझं हे शरीर सैन्यात भरती होण्यासाठी तयार होतं.

सैनिकाचे आत्मवृत्त 1000 शब्द | Best Soldier Autobiography in Marathi

एक दिवस मी टीव्हीवर जाहिरात पाहिली. त्या जाहिरातीमध्ये सैन्य भरतीचे काही चाचणी घेण्यात येणार होती. ती चाचणी पाच करण्यासाठी मी आणखी एक महिना जोरदार मेहनत केली. सकाळी चार वाजता उठून मी प्रॅक्टिस करायला लागलो. एक महिन्यानंतर मला तिथे जायचं होतं. आई-बाबांचा आशीर्वाद घेऊन मी तिथे गेलो. आणि तिथे माझ सिलेक्शन झालं. मात्र माझ्या आई-बाबांच्या डोळ्यांमध्ये असू आले त्यांचे अश्रू पाहून माझं मन गहिवरल व मी क्षणभर विचार केला, माझ्यानंतर आणि मी गेल्यानंतर माझ्या आई-बाबांचं काय होईल. पण माझ्या आईने माझ्या पाठीवर हात फिरवला आणि मला शाबासकी देत म्हणाली. जा !तुझे स्वप्न पूर्ण कर या भारत तू भूमीचा मुलगा आहे. आणि हीच गोष्ट तू लक्षात ठेव तिचे हे प्रभावशाली शब्द ऐकून मला पुन्हा तिथे जाण्याचा बळ मिळाल.

सैनिकाचे आत्मवृत्त

त्या दोघांचा आशीर्वाद घेऊन मी पुढे निघालो. माझी ट्रेनिंग सुरू झाली. ट्रेनिंग फार खडतर होती, पण डोळ्यासमोर आईवडिलांचे चेहरे आणि देशसेवा मी नेहमी ठेवत असे. सहा महिन्यांनी माझी ट्रेनिंग संपली. तेव्हा मी खऱ्या अर्थाने एक सैनिक झालो. माझी पोस्टिंग चीन बोर्डर वरील एका उंच ठिकाणी झाली. तिथे आम्ही ७० सैनिकांचे बिर्हाड होते. जेव्हा एकत्र येण्याचे कारण फार कणखर असते तेव्हा मैत्री फार लवकर जुळते. आणि देशसेवेपेक्षा मोठे कारण ते कोणते. आम्ही सार्वजन अगदी जन्मोजन्मीच्या जोडीदारांसारखे मित्र झालो.

सैनिकाचे आत्मवृत्त 1000 शब्द | Best Soldier Autobiography in Marathi

असेच दिवस जात होते. आम्ही सीमेवरती अतिशय चोख पहारा ठेवत असू. आणि कुणीही चीनच्या बाजूने आपल्या सीमेत घुसखोरी करण्याचा प्रयत्न करू नये याची खात्री ठेवत असू. एक दिवस सिमेपार जरा संशयी हालचाली जाणवल्या तेव्हा मी आमच्या तुकडीच्या प्रमुखांना त्याची माहिती दिली. प्रमुखांनी लगेच दुसर्या छावणीकडे मदतीसाठी निरोप धाडला. मदत येई पर्यंत आम्हाला छावणी लढवायची होती. शत्रूने पुढे चाल करणे सुरु केले आणि गोळीबार चालू केला. आम्ही सर्वांनी संरक्षण घेतले. प्रमुखांनी बचावात्मक फायरिंग करायचे मला आणि आणखी ७ सैनिकांना आदेश दिले.

बचावात्मक फायरिंग मध्ये आम्ही साधारणतः २ तास शत्रू सैन्याला पुढे सरकू दिले नाही. पण आमच्यासारखी वाईट गोष्ट अशी झाली कि शत्रू सैन्यात काही नवीन सैनिक अधिक झाल्याचे दिसून आले. त्यांच्या कडून होणार्या गोळीबाराचा वेग वाढला आणि या वेग मुळे आमच्या ८ सैनिकांना बचावात्मक फायरिंग करणे जरा अवघड झाले. त्यात धोका वाढला.

सैनिकाचे आत्मवृत्त 1000 शब्द | Best Soldier Autobiography in Marathi

आमचे इतर साथीदार सुद्धा वेगवेगळ्या जागा घेऊन आता गोळीबार करू लागले. प्रमुखांनी दिलेल्या आदेशांचे पालन करत होतो. पण शत्रू मोठ्या संखेने असल्याने त्यांचा दबाव वाढू लागला. आम्ही आमचा एक एक साथीदार गमावू लागलो. आणि आमचे मनोबल खचू लागले. पण शरीरात शेवटचा श्वास असे पर्यंत आम्ही लढणार होतो हे नक्की.

मी आत्ता पर्यंत ३ शत्रू सैनिक ठार केले होते. एका अवघड क्षणी माझ्या समोरून २ आणि उजव्या बाजूने १ शत्रू सैनिक माझ्यावर गोळीबार करत पुढे सरकत होते. माझ्यावर दबाव वाढत होता आणि मी तीनही शत्रूंना तोंडात देत होतो आणि स्वतःचा बचाव देखील करत होतो. पण समोरच्या दोघांन पैकी एकाने माझ्यावर निशाणासाधलाच. त्याची गोळी थेट माझ्या उजव्या खांद्यावर लागली. आयुष्यात पहिल्यांदाच मी गोळी खाल्ली होती. हा गोळीचा मारा अतिशय वेदनादायक होता. मी जागेवरच गळून पडलो. पण अशा स्थीतीत शांत राहिलो तर शत्रू आणखी पुढे सरकणार होता. म्हणून मी डाव्या हातात माझी बंदूक घेऊन शरीर आडोश्याच्या आत ठेवून गोळीबार करत राहिलो.

सैनिकाचे आत्मवृत्त 1000 शब्द | Best Soldier Autobiography in Marathi

माझ्या जखमी हातातून खूप रक्त वाहून गेले होते. खांद्याचे हाड बाहेर उघडे दिसत होते. पण माझे शत्रू विरुद्ध लढण्याचे बळमात्र संपत नव्हते. आज मला माझाच अभिमान वाटत होता. स्वतःच्या असीम शौर्याचे दर्शन मातृभूमीमुळे मला घडत होते. अर्धा तास असा गेला असेल पण त्यानंतर माझ्या डोळ्यांवर झापड येऊ लागली. मी तीनही शत्रूंना पुढे सरकू दिले नव्हते. शरीरातून रक्त जास्त वाहून गेल्यामुळे शरीरातले त्राण गेले आणि तसाच मी बेशुद्ध होऊन पडलो.

जेव्हा मी शुद्धीवर आलो तेव्हा कळले कि मी आमच्या छावणीच्या दवाखान्यात बिछान्यावर झोपलेलो आहे. माझे दोन मित्र शेजारी बसले होते. त्यांनी मला सांगितले कि आपण आपले ठाणे शत्रूपासून वाचवले आहे. माझी शुद्ध हरवल्यानंतर लगेचच दुसर्या छावणीची सैनिक तुकडी आमच्या मदतीला पोहोचली आणि त्यांनी शत्रूचे सर्व सैनिक पिछाडीवर ढकलले. आणि त्यांना पळवून लावले.

सैनिकाचे आत्मवृत्त 1000 शब्द | Best Soldier Autobiography in Marathi

खांद्याला झालेल्या इजेमुळे मला पुढे माझा सैनिकी पेशा चालू ठेवता नाही आला. याचे मला दुःख अजिबात नव्हते. कारण देशभक्तीसाठी कित्त्येक सैनिक धारार्तीर्थी पडतात त्यांच्या समोर माझे हे दुःखणे काहीच नव्हते.

मनामध्ये कुठला स्वार्थ न ठेवता फक्त देशाच्या कल्याणासाठी जगणे हे प्रत्येकाला जमत नाही. आणि ते फक्त एक सैनिकच करू शकतो कारण छातीवर दगड ठेवलेले त्याचे मायबाप त्याला त्याच्या नजरेआड कुठेतरी, कधीतरी मेलेल्या अवस्थेत पाहिल हे माहित असताना सुद्धा त्याला सैन्यात भरती करतात. आणि देशासाठी लढण्यासाठी प्रवृत्त करतात .जे प्रत्येकच मायबापाला समजत नाही. समाजामध्ये परिवर्तन घडवून आणायचं असेल तर सुरुवात स्वतःपासून केली पाहिजे असं मला वाटतं.

ना सोच तू खुद के बारे मे सोचने के लिए जमाना है!
तुझे जीना हे वतन के लिये, याद रख ये देश तुम्हारा है!

वंदे मातरम जय हिंद!

सैनिकाचे आत्मवृत्त 1000 शब्द | Best Soldier Autobiography in Marathi

Author :- मिस. प्रतिक्षा गजानन मांडवकर

Pratiksha

Kalpana Chawala Information in Marathi

Shiv Jayanti Information in Marathi 2023

Avatar
Marathi Time

Leave a Reply