डायरीची पाने by सौ उज्वला महादेव कुंभार सातारा | Story on Diary in Marathi 2023

सौ उज्वला महादेव कुंभार लिखित डायरीची पाने हा अतिशय सुंदर लेख असून जर तुम्ही Story on Diary in Marathi शोधत असाल तर एकदम योग्य पर्याय आहे.

डायरीची पाने | Story on Diary in Marathi

अरे थांब ना रे श्री’, थोडा धीर धर ,आणते… बघ… हा बघ..

वाफाळलेला चहा आणि गरमागरम भजी. बाहेर पडणाऱ्या बेधुंद पावसाच्या सरी आणि मातीचा तो सुगंध सोबत चहा आणि कांदा भजी आणि श्री म्हणजे दुग्ध शर्करा योगच. अशाच बेधुंद पावसात माझी आणि श्री ची ती पहिली भेट मन आठवणीत रमायला लागलं आणि मला आठवली ती माझी डायरीची पानं .मी चटकनच बाल्कनीतून उठले आणि कपाटे चाळली आणि डायरीची पाने पुन्हा वाचू लागली. आठवणी अगदी ताज्या तवांना झाल्या आणि पुन्हा भूतकाळात मन डोकावू लागलं.

Story on Diary in Marathi

खरं तर ही डायरी माझी अगदी जीवाभावाची मैत्रीणच आहे आरशासारखी पारदर्शक जिथे फक्त माझेच प्रतिबिंब मला दिसते. रागाचे ,लोभाचे, तिरस्कारचे ,आनंदाचे, दुःखाचे ,अपमानाचे, मानहानीचे ,शृंगाराचे असे कितीतरी भावनांची शब्दलेखन प्रतिबिंब मी डायरीच्या आरशात रेखाटते आणि तेही निसंकोच. कितीतरी झालेल्या चुका मी या डायरीत लिहिल्या किती जणांना माफी मागितले कित्येकांना माफ देखील केल. मनाची घालमेल मी या शब्दरूपी नदीने सागराच्या डायरीत मिळवली.

डायरीची पाने by सौ उज्वला महादेव कुंभार सातारा | Story on Diary in Marathi 2023


आज मात्र ही डायरी माझी जीवश्यकंठश्य मैत्रीणच झालेली आहे दिवसभरात होणारे घटना चक्र भेटणारे मित्र मैत्रीण ऑफिसमधले कलीग सार्वजनिक ठिकाणी भेटणारी माणसे त्यांच्याशी मी साधलेला संवाद, ठळक घटना वारा सकट मी यात लिहिते…. मला ना तो सचिन खेडकर जिंचा आणि तब्बूचा अस्तित्व चित्रपट आठवतो तुम्हालाही आठवत असेल सचिन जीना डायरी लिहिण्याची सवय आणि त्यांच्या या एका सवयीमुळे त्यांच्या आयुष्याला मिळालेली कलाटणी आणि डायरीमुळेच घडलेले हे कथानक आपण विसरू शकत नाही.

डायरीची पाने by सौ उज्वला महादेव कुंभार सातारा | Story on Diary in Marathi 2023


” स्वसंवाद एक जादू” हा स्वसंवाद आपण फक्त डायरीत लिहू शकतो, आजकाल माणसे सोशल मीडियामुळे एकटी पडलेली आहेत मानसिक आजाराने ताण-तणावाने ग्रस्त आहेत फेसबुक वर मित्र मैत्रिणी आहेत पण प्रत्यक्ष जीवनामध्ये जीवाभावाचे संवाद साधण्यासाठी मित्र मैत्रिणी नाहीत बरं कोणाकडे बोलावे तरी कुणावर विश्वास नाही कुणी कधी कोणत्या अडचणीचा गैरफायदा घेईल याचा देखील भरवसा नाही. थोडक्यात काय मनाला “आउटलेट” नाही.

डायरीची पाने by सौ उज्वला महादेव कुंभार सातारा | Story on Diary in Marathi 2023

Story on Diary in Marathi 2023

प्रेशर कुकर मधील शिट्टी म्हणजे ही डायरी खूप सारे टेन्शन प्रेशर आले की मी डायरी लिहिते आणि जे काही मनातील भाव जळमट असतील ती या डायरीत उतरविते. आणि मनात थैमान घालणारे प्रश्नांची उत्तरे मला अलगद मिळत जातात आणि त्रास राग हळू शांत होऊन प्रेशर कुकरच्या शिट्टी प्रमाणे माझ्या मनावरचं प्रेशर ओझं आपोआपच बाहेर पडतं.
खरं सांगू का….

डायरीची पाने by सौ उज्वला महादेव कुंभार सातारा | Story on Diary in Marathi 2023


ही डायरी आपल्याला आपले “आत्मपरीक्षण”
करण्यासाठी लाख मोलाची ठरते. आपल्यातले गुण व अवगुण दोघांचीही जाणीव करून देते. आणि आपल्यातले असलेले सुप्त गुण जागृत करते. सकारात्मकता आणि आत्मविश्वास वाढवते. कारण डायरी आपल्याला’ ‘नियोजन’ करायला शिकवते.

रात्री झोपताना मी जेव्हा डायरी लिहिते ना तेव्हा माझा उद्याचा प्लॅन तयार असतो. त्याचप्रमाणे मी स्वतःसाठी आरोग्य, ऑफिस वर्क ‘,घरातील कामे ,कुठे ट्रीप ला जायचे ,त्यासाठी करावयाची नियोजन आर्थिक नियोजन हे सर्व मी डायरीमध्ये नमूद करते त्याचप्रमाणे महत्त्वाचे फोन नंबर्स सणवार सर्व प्रकारची बिले आणि महत्त्वाच्या घटना पत्कर्षाने मी डायरीमध्ये लिहूनच ठेवते.

डायरीची पाने by सौ उज्वला महादेव कुंभार सातारा | Story on Diary in Marathi 2023

खरंतर या डायरीत मी आठवणी साठवते माझी डायरी मला कधीही खोटे बोलू देत नाही सत्यमेव जयते मनात दाटून येणारी वादळे मी नेहमीच या डायरीत रिते करते. आणि मन पुन्हा एकदा फुलपाखरासारखं उडू लागतं गाऊ लागतं मुक्त होतं स्वच्छंदी होतं. या डायरी वाचण्याच्या नादात बेधुंद पडणारा पाऊस कधी संपला त्याचं बरोबर माझी आणि श्री च्या आठवणीत हरवून चहा कधी संपला कळालाच नाही आणि पावसाच्या सरीने भिजलेला तो रस्ता हिरवेगार डोंगर – रांगा कोसळणारे धबधबे धुक्यांची आरास या सर्व दृश्यांची माझ्या डोळ्यावर आणि मनावर चढलेली धुंदी आणि सोबत श्री चा सहवास हे सर्व मी माझ्या डायरीत बंदिस्त करणार आहे तेही अगदी कायमचं.

धन्यवाद@

सौ उज्वला महादेव कुंभार सातारा.

डायरीची पाने by सौ उज्वला महादेव कुंभार सातारा | Story on Diary in Marathi 2023

………………………………समाप्त………………………………………

प्रकाशवाटाच्या अधिकृत सभासदांसाठी खुशखबर.

साप्ताहिक प्रकाशवाटा? वार्षिक सभासदत्व कसे घ्यावे❓

साप्ताहिक प्रकाश वाटा हे स्व निर्मित साहित्यिकांचे साहित्य यामध्ये कथा, कविता,गाणी सर्व काही प्रसिद्ध करण्यासाठी साप्ताहिकाचे वार्षिक सदस्यत्व फक्त 250/- रुपये इतके माफक दर निश्चित करण्यात आले आहे. वार्षिक सदस्यत्व घेण्यासाठी साप्ताहिकाच्या संपादिका प्रतिक्षा मांडवकर – +918308684865 यांच्याशी संपर्क करावा. तसेच +918308684865 या क्रमांकावर फोन पे अमाऊंट पाठवून वार्षिक सभासदत्व घ्यावे.
दर महा आपले दर्जेदार साहित्य प्रकाशित केले जाईल.

शिवाय

आता तुमचे लेख ऑफलाइनच नाही राहणार तर ते जातील ऑनलाइन

प्रकाशवाटा आणि मराठी टाईम यांच्या संयुक्त विद्यमाने तुमचे साहित्य होईल जगप्रसिद्ध ते देखील एकच सभासद फी मध्ये.

तुम्ही बरोबर वाचले आहे. प्रकाशवाटाच्या सभासद फी (250) मध्ये तुम्हाला मिळेल marathitime.in या सुप्रसिद्ध वेबसाईटचे सभासदत्व. ज्यात प्रत्येक महिन्याला तुमचे चार लेख/ कथा/ निबंध/ प्रवासवर्णन वेबसाईट वर टाकले जातील.

त्वरित या ऑफरचा फायदा घ्या. ऑफर पहिल्या 50 साहित्यिकांसाठी लिमिटेड.

prakashvata marathi saptahik

संपादिका
प्रतिक्षा मांडवकर
8308684865

मराठी टाईमच्या इतर गोष्टी वाचा

Marathi story

Katha lekhan in marathi

Avatar
Marathi Time

Leave a Reply