दीड तासाचा प्रवास by Ravi Ate | Story on Happiness in Marathi 2024

साहित्यबंध समूह आयोजित साप्ताहिक स्पर्धेत रवी आटे यांनी Story on Happiness in Marathi या कीवर्ड वर आधारित “दीड तासाचा प्रवास” हा लेख लिहिला आहे. चला तर वाचूया.

दीड तासाचा प्रवास | Story on Happiness in Marathi

साहित्यबंध समूह
साप्ताहिक उपक्रम क्रमांक ६
कथालेखन विषय-छोट्या गोष्टीतील सुख
शीर्षक-दीड तासाचा प्रवास

दीड तासाचा प्रवास | Story on Happiness in Marathi

एका मोठ्या प्रवेशद्वारासमोर त्याला गाडी थांबवावी लागली. विशाल असे महाद्वार व महाद्वारावर अनेक दरबान कर्तव्यावर तैनात होते. वेगवेगळ्या भाषा बोलणारे दरबान वेगवेगळ्या प्रदेशातून आलेले दिसत होते. सर्वांची वर्दी मात्र एक सारखी. सर्वच दरबान मात्र हिंदीतून अभ्यागतांशी बोलत होते. त्याच्यासोबत त्याचा एक नातेवाईक जो तिथल्या कर्मचारी संघटनेचा अध्यक्ष होता तो होता त्याचप्रमाणे प्रवासावर निघताना त्याने त्याच्या लाडक्या कन्येला सोबत घेतलेले होते. तिघांचेही आधार कार्ड बघितल्यानंतर व प्रवासाचा उद्देश जाणून घेतल्यानंतर त्या सर्व दरबानांनी त्या तिघांनाही अर्ध्या तासाच्या प्रवासासाठी मुभा दिली. महाद्वार ओलांडून आता जनरल करिअप्पा रोडने प्रवासास प्रत्यक्षात सुरुवात झाली होती. संपूर्ण परिसर व संपूर्ण स्थळे परिचित असलीत तरी दोन अडीच दशकांहून अधिक कालावधीचा खंड पडल्याने नाविन्यपूर्ण जाणवत होती.

Story on Happiness in Marathi

दीड तासाचा प्रवास | Story on Happiness in Marathi

डाव्या बाजूने मोकळे मैदान जरा जास्तच होते. उजव्या बाजूला मात्र केंद्रीय विद्यालय तसेच सैनिकी अधिकाऱ्यांची व इतरही निवासस्थाने एका पाठोपाठ एक दिसून येत होती. निवासस्थानात काहीही बदल झालेला दिसला नाही. डाव्या बाजूने ऑफिसर्स क्लब ओलांडल्यानंतर लेबर कॅम्प हायस्कूल, पुलगाव कॅम्प असा बोर्ड नजरेस पडला. शाळा त्याचीच होती पण सदर स्थळावरील शाळेत तो कधीच शिकला नव्हता. त्याचे गुरुजन देखील एक दोन अपवाद वगळता हयात नव्हते. तरीपण एक आंतरिक ओढ होती. वाहन चालकाला त्याने डाव्या बाजूने वळण्यास सांगितले. नंतर वाहन हळूहळू पुढे घेत संपूर्ण शाळेचा परिसर पाहिला.

या मैदानाला खेल मंडप अथवा कार्निवाल मैदान म्हणायचे. वर्षातून एकदा तीन ते चार दिवसांचा मीनाबाजार देखील या ठिकाणी भरत असे. परिसराचे चित्र डोळ्यात व आठवणी हृदयात साठवून त्याने चालकाला उजव्या हाताने वळायला सांगितले व सैनिकी दवाखान्याकडून वाहन घ्यावयास सांगितले.

दीड तासाचा प्रवास | Story on Happiness in Marathi

अर्थातच दोन्ही बाजूने सैनिकी अधिकाऱ्यांची निवासस्थाने पूर्वी जशी होती तशीच त्याला आढळून आलीत. मात्र सैनिकी दवाखान्याकडून डाव्या बाजूला त्यांचे वाहन कृष्ण मंदिराच्या दिशेने पुढे सरकले व प्लाटून्सकडून न जाता मशिदी कडून ते उजव्या हाताने वळलेत व गुरुद्वारा आणी चर्च यामधील रस्त्याने ते पुढे जाऊ लागलेत. डाव्या हातावर वाहन वळताच जेउमल सेठच्या कॅन्टीनचे दुरूनच दर्शन झाले. कॅन्टीन च्या जवळ जाण्याचा मोह खूपच झाला पण त्याने तो आवरला. मोबाईल मध्ये या स्थळाचे चित्र घ्यायला मात्र तो विसरला. त्याच्या जन्माच्या आधी सदर कॅन्टीन त्याच्या वडिलाने चालविण्याल्याची त्यास माहिती होती. तसेच मिलिटरीच्या लॉन्ड्री मध्ये कपडे देताना या कॅन्टीन कडूनच तो जात असे. त्यामुळे कॅन्टीन आतून कशी आहे हे त्याला चांगलेच स्मरत होते.

दीड तासाचा प्रवास | Story on Happiness in Marathi

पुढे चालकाला हनुमान मंदिराच्या दिशेने वाहन घ्यायला सांगितले. रेल्वे रूळ ओलांडल्यानंतर आठवणीतला तो खोल रस्त्याचा भाग दिसला. जुन्या मोहफुलांच्या झाडाखाली वाहन थांबविले. रस्त्याच्या उजव्या बाजूला थोडेसे नवीन बांधकाम आढळून आले. काही क्षणातच मोठे तीन ते चार प्राणी दृष्टीस पडले. सोबतच्या नातेवाईक व्यक्तीनुसार त्या निलगायी होत्या. थुई थुई नाचत गेलेला मोर मात्र थोड्याच वेळात दृष्टी आड झाला. त्यामुळे त्याला जरा हिरमुसल्यासारखे झाले.

दीड तासाचा प्रवास | Story on Happiness in Marathi

वडिलांचा बालपणातील परिसर बघून कन्या मंत्रमुग्ध झाली होती. तिथून पुढे उंच रस्त्याने जाताना उजव्या हातावर त्याचे जन्मस्थळ होते. पण शेकडो निवासस्थानापैकी कोणत्या निवासस्थानात त्याचा जन्म झाला व बालपण गेले ते कळेना. काही निवास स्थाने पाडल्या गेलेली होती. खरे सांगायचे तर नेमके निवासस्थान हे त्याला पूर्वीही माहीत नव्हते. फक्त परिसर माहीत होता. पुढे जाता जाता निवास स्थनावरील क्रमांक वगैरे तो उगाचच न्याहाळीत होता. भारावलेल्या अंतकरणाने तो कन्येला अंगुली निर्देश करून त्याच्या जन्मस्थळाचा परिसर दाखवीत होता. थोडेसे पुढे जाता डाव्या हातावर विद्युत यंत्र बसवलेले एक जुनेच परिचित घर होते. कदाचित आत डीपी वगैरे असावी. नेमके काय ते त्यालाही माहीत नव्हते. काही फुटावरच त्याची शाळा होती. लेबर कॅम्प हायस्कूल पुलगाव कॅम्प. मात्र शाळेची इमारतच पाडली असल्याने त्याच्या पायाखालची जमीनच जणू काहीशी हलली.

दीड तासाचा प्रवास | Story on Happiness in Marathi

शाळेची इमारत संपूर्णपणे नखशिखांत त्याच्या स्मरणात होती. त्यामुळे लगेच त्याने आपले दुःख आवरले व शाळेच्या जमिनीवर पसरलेल्या हिरव्यागार झाडीकडे पाहून स्मरणातल्या शाळेला हृदयातून सलाम त्याने केला. तिथल्या गवताला व गवतफुलांना स्पर्श देखील त्याने केला. एका बाजूची सैनिकी दवाखान्याची छोटी इमारत त्याला खुणावत होती. मात्र तशाच प्रकारची असलेली शाळेची इमारत मात्र आता अस्तित्वात नव्हती. लगेच त्याच्या मनात विचार आला… शाळेची काही छायाचित्रे तरी कोणी काढून ठेवली असतील ना! शाळेतील पाचवी ते दहावीपर्यंतच्या असंख्य आठवणी त्याच्या स्मरणकक्षेत जाग्या झाल्यात.

दीड तासाचा प्रवास | Story on Happiness in Marathi

अर्ध्या तासाच्या प्रवासाची मुभा असल्याने शाळेची रिकामी जागा हृदयात साठवून पुढील प्रवासासाठी ते निघालेत. शाळेच्या मागे रस्त्याच्या पलीकडे एक वाहत्या पाण्याचा नाला होता. तिथे छोटेसे मैदान देखील होते. सुट्टीच्या वेळेत मुले त्या मैदानावर क्रिकेट खेळायला जात असत. घनदाट झाडीमुळे व कुंपणामुळे त्याला तिकडे जाता आले नाही. तसेच वेळेची मर्यादा देखील होती. रस्त्यावरून जाताना राजेश वानखेडे राहत होता त्या निवासस्थानांची ओळ दृष्टीस पडली. राजेश हयात नसला तरी पन्नास वर्षांपूर्वीचा त्याचा चेहरा त्याला आठवला. हळूहळू राजेश संपूर्णपणे त्याच्या डोळ्यासमोर उभा ठाकला. त्याचबरोबर शाळेत शिकलेले इतर मित्र तसेच मैत्रिणी त्याला तीव्रतेने आठवल्या. मग हळूहळू शेकडो आठवणी मनात येत राहिल्या. जड अंतकरणाने त्यांनी तो परिसर सोडला व ते सर्व पुढे जायला लागले.

दीड तासाचा प्रवास | Story on Happiness in Marathi

दुरूनच डाव्या बाजूला दुसरे एक हनुमानाचे मंदिर व उजव्या बाजूला ४८ नंबरचे गेट दिसले. रेल्वे रूळ तिथेही दृष्टीस पडला. पन्नास वर्षांपूर्वी तो जिथे होता तिथेच होता. त्या रेल्वेरुळाने देखील कदाचित त्यास ओळखले असावे. रस्त्याच्या कडेला शेत आत्ताही तसेच उभे होते. शाळेचा रस्ता या शेतातूनच जात होता. शेतातून वाहणाऱ्या छोट्या नाल्याची त्यास आठवण झाली.

दीड तासाचा प्रवास | Story on Happiness in Marathi

डाव्या हातावरील हनुमान मंदिर किंवा भैरव बाबा देवस्थानाकडे न जाता ज्या ठिकाणी त्याचे बालपण गेले तिकडे त्याचे पाय वळल्याने चालकाने वाहन त्या दिशेने नेले. जाताना त्याला त्याच्या एमइएस कॅन्टीनचे व फेअर प्राईस शॉप चे दर्शन शेवटी झालेच. मोबाईल मध्ये त्या दोन्ही दुकानांची छायाचित्रे घ्यायला तो विसरला नाही. वाहन थांबवून काही मिनिटे स्तब्ध होऊन तो त्या बालपणातल्या स्मारकांकडे अनाहुत ओढीने बघू लागला. त्या ठिकाणी दुकानाच्या कोपऱ्यात ओल्या मातीचे घर तो करायचा. खेळण्यासाठी एखादा चेंडू सोबत ठेवायचा. याच रस्त्याने बाईकवरचा पहिला प्रवास केल्याचे त्याला आठवले. थोडेसे पुढे जाता गॅरीसन सिनेमाचे पोस्टर लागायचे तो भाग आला.

दीड तासाचा प्रवास | Story on Happiness in Marathi

एस पी कॅम्प कडे जाताना उजव्या बाजूचे बोराचे झाड आठवले. आत्ताही ते बोराचे झाड तिथेच असेल काय असा विचार त्याच्या मनात येऊन गेला. एस पी कॅम्पची डेअरी मात्र आढळून आलीच नाही. आता ती अस्तित्वातच नव्हती. गुणवंत कार डवार तिथे राहायचा. अनामविरा या कवितेच्या अत्युत्कृष्ट गायकाच्या स्वरूपात त्याला ओळखले जायचे. एका बाजूला प्रदीप लाकडे राहत असे. श्री राऊत यांचे फेअर प्राईस शॉप (कंट्रोल) त्याला आठवले. समोर आंब्याचे खूपच विशाल असे झाड होते. एस पी कॅम्प कडे जाताना उजव्या हातावर श्री भगतकरबाबा जी यांचे घर व शेत होते. त्यांनी खवले मांजर मारले होते. त्या घटनेला ५२- ५३ वर्षे झाली असतील.

दीड तासाचा प्रवास | Story on Happiness in Marathi

पण तरी तो प्रसंग जसाच्या तसा त्याला आठवत होता. कधी कधी मित्रांसोबत सदर शेतात व आजूबाजूच्या शेतात शेंगा वगैरे चोरल्याची आठवण त्याला आली.

बघतो तर काय… डोळ्यासमोरच एसपी कॅम्प उभे. त्याला वाटले… अरे वा… आता तर बिहाड्याचे झाड देखील दिसेल. एस पी कॅम्प मधील त्याचे निवासस्थान मात्र पाडल्या गेलेले होते. अर्थातच त्याला दुःख वाटले. शाळा पण पाडली व घर पण पाडले… मात्र बिहाडा दिसल्याने त्याचे मन अतिशय प्रसन्न झाले. मरण पावल्यानंतर एखादी अतिप्रिय व्यक्ती डोळ्यासमोर जिवंत भेटावी तसे त्याला झाले. श्री .येसनकर यांचे घर तसेच देवजीभाई व मनिलाल यांचे दुकान त्याचप्रमाणे अजित आणि कुदरत यांचे घर देखील जसेच्या तसेच होते.

दीड तासाचा प्रवास | Story on Happiness in Marathi

बालपणाच्या असंख्य आठवणी त्याच्या डोळ्यासमोर आल्यात. वडिलांच्या चेहऱ्यावरील मंत्रमुग्ध हावभाव कन्या न्याहाळीत होती व ती देखील या छोट्या छोट्या स्थळांचे छायाचित्र घेण्यात मग्न होती. वडिलांची प्राथमिक शाळा देखील तिला दाखविण्यात आली व एसपी कॅम्पचा नवीन रंगमंच देखील दाखविला. अर्थातच आजूबाजूंच्या टेकड्या दृष्टीस पडल्यात. घरापासून शाळेपर्यंत जाणारा रस्ता दुरून त्याला खुणावत होता. एस पी कॅम्प संपूर्णपणे डोळ्यात साठवून परतीच्या मार्गाने ते जाऊ लागलेत. जाताना इ पी बॅरेक्स , वाचनवाड ,भैरव बाबा मंदिर दुसरे एक हनुमान मंदिर व गॅरेसन सिनेमा टॉकीज या सर्व स्थळांचे दर्शन त्याने घेतले. जिथे जीवनाचा खूप मोठा कालावधी व्यतीत केला ती स्थळे त्याने संपूर्णपणे न्याहाळली.

दीड तासाचा प्रवास | Story on Happiness in Marathi

ही सर्व स्थळे न्याहाळताना असंख्य स्मृती जाग्या झाल्यात. एसपीकॅम्प मधील भीम जयंती, कादरचा नागपूरचा ऑर्केस्ट्रा, अमरावतीचा संगम आर्केस्ट्रा, एस पी कॅम्प मधील कलाकार, गणपती उत्सव, रावण दहनाचा कार्यक्रम, दुर्गा देवी उत्सव, ग्यारेसन टॉकीज मध्ये बघितलेले शेकडो चित्रपट. भेटलेल्या हजारो व्यक्ती यांचेशी निगडित हजारो आठवणी त्याच्या हृदयात दाटून आल्यात. परिसर न्या हाळत न्याहाळत केंद्रीय विद्यालया कडून वाहन पुढे घेत पुन्हा त्याच महाद्वारातून ते बाहेर पडले. अर्ध्या तासाऐवजी दीड तास का लागला अशी कोणीही त्यांना विचारणा केली नाही.

दीड तासाचा प्रवास | Story on Happiness in Marathi

त्याला या छोट्या छोट्या गोष्टींपासून खूपच सुख मिळाले. या छोट्याशा प्रवासवारीने स्वित्झर्लंडला जाण्याची इच्छा हृदयाच्या एका कोपऱ्यात अक्षरशः गाडली गेली. आता आपण कितीही त्याला म्हणा… हमे मालूम है जन्नत की हकीकत लेकिन

दिलके बहलाने को गालिब ये खयाल अच्छा है!

रवी आटे सानपाडा मुंबई
दिनांक 19 -11 –
९३२४७४५९७०

दीड तासाचा प्रवास | Story on Happiness in Marathi

समाप्त.

साहित्यबंध समूहाची माहिती आणि जाहिरात

दिवसेंदिवस मराठी भाषेवर इतर भाषेतील शब्दांचा अतिरेक होत आहे. कित्येक मराठी शब्द तर नवीन पिढीच्या कानावर देखील पडले नाहीत. यामुळे पुढे जाऊन मराठी भाषा हळू हळू लुप्त होईल अशी आम्हाला भीती आहे. लिहिणे, बोलणे, ऐकणे आणि वाचणे ह्यातूनच मराठी भाषा अनंत काल टिकू शकते.

marathi lekh katha nibandh

त्यामुळे नवनवीन साहित्यिक मराठी भाषेतून निर्माण होणे ही काळाची गरज आहे. तसेच लेखकांचा पुरेसा सन्मान मिळणे आणि त्यांना योग्य प्लॅटफॉर्म उपलब्ध होणे त्याचबरोबर साहित्य चोरी थांबवणे या उद्देशातून आम्ही हा समूह तयार केला आहे.

मराठी भाषेच्या प्रती आमचे जे कर्तव्य आहे ते पार पाडण्याचा हा छोटासा प्रयत्न. तुम्ही देखील मराठी भाषेप्रती आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी हा समूह जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आमची मदत करा.

लक्षात घ्या की ह्या समूहाची सभासद फी ५०₹ प्रती महिना आहे. सभासद फी 9146494879 या Gpay किंवा PhonePe नंबर वर टाकल्यानंतर ग्रुप मध्ये add केले जाईल. एकदाच वार्षिक सभासदत्व घेणाऱ्यांना फी मध्ये १०० ₹ सूट मिळेल.

या मासिक सभासदत्वामध्ये तुम्हाला मिळेल

१) साहित्यक्षेत्रातील प्रगतीसाठी ४ साप्ताहिक स्पर्धा

२) सहभागासाठी आकर्षक डिजिटल प्रमाणपत्रे

३) स्पर्धेतील तुमचे चार लेख सुप्रसिद्ध अशा मराठी टाईम वेबसाईटवर पब्लिश केले जातील. ज्याची लिंक तुम्ही कुठेही शेअर करू शकता.

४) तुमचा फोटो आणि लेखाच्या नावासहीत चार सुंदर वॉलपेपर.

५) लेख त्याच्या विषयाला अनुसरून छान वॉलपेपरसने सजविला जातील.

६) तुमचा लेख गुगल सर्च मध्ये आणण्यासाठी SEO techniques वापरल्या जातील.

तुमच्या एका लेखावर अंदाजे ५००₹ चे काम केले जाईल म्हणजे ५०₹ च्या सभासद फी मध्ये ४ लेखांवर होणारे २०००₹ चे फायदे तुम्हाला मिळणार आहेत

https://chat.whatsapp.com/JDA5qGHXn43IofHbacHWBd

9146494879 या Gpay/ PhonePe नंबरवर एका महिन्याची ५०₹ फी किंवा वर्षाची ५००₹ सभासद फी पाठवा. Payment कमेंट मध्ये स्वतःचे नाव टाका. आणि वरील ग्रुप लिंकला जॉईन व्हा.

आमच्या समूहातील कविता वाचण्यासाठी भेट द्या mazablog.online

दीड तासाचा प्रवास | Story on Happiness in Marathi

Read More

Marathi Thriller Story

रवींद्र आटे
रवींद्र आटे

Author Information - श्री.रवींद्र प्रल्हाद आटे, सानपाडा नवी मुंबई येथील रहिवासी असून, तालुका सानपाडा आणि जिल्हा ठाणे आहे. त्यांनी मराठी व इंग्रजी भाषेतून मधून आपले शालेय शिक्षण घेतले असून त्यानंतर एम ए राज्यशास्त्र-एम फिल राज्यशास्त्र देखील पूर्ण केले आहे. त्यांना 30 वर्षे मराठी भाषेतून लेख लिहिण्याचा अनुभव असून त्यांनी 35 वर्षे मराठी कविता देखील लिहिल्या आहेत. तसेच त्यांना 20 वर्षापेक्षा जास्त मराठी भाषेची ओळख आहे. ते आठवड्यातून नियमितपणे 5-10 तास इतका वेळ मराठी भाषेत लिखाण करण्यास देतात. त्यांना मराठीतील लेख,कविता व चारोळी हा प्रकार आवडतो. मराठी लिखाण करताना त्यांना फक्त काही प्रमाणपत्रे हे पुरस्कार प्राप्त झालेले आहे. त्यांना तुम्ही पुढील फोन नंबर वर संपर्क करू शकता. फोन नंबर - 9324745970

Leave a Reply