जबाबदारी by अर्चना कुलकर्णी | Best Story on Responsibility in Marathi 2024

साहित्यबंध समूह आयोजित साप्ताहिक स्पर्धेत अर्चना कुलकर्णी यांनी Story on Responsibility in Marathi या कीवर्ड वर आधारित “जबाबदारी” हा लेख लिहिला आहे. चला तर वाचूया.

जबाबदारी | Story on Responsibility in Marathi

साहित्य बंध समूह
साप्ताहिक उपक्रम क्र ६

दिनांक: २१/११/२०२३
विषय: छोट्या छोट्या गोष्टीतील आनंद
शीर्षक :जबाबदारी

जबाबदारी | Story on Responsibility in Marathi

अथर्व….! माझ्या मुलीचा, मीनाचा मुलगा.त्या दिवशी प्रथमच आईला सोडून आमच्या कडे राहीला होता.

मीनाचे सासर खूप श्रीमंत आहे. त्यांचा मोठा बंगला आहे ठाण्यात. एकत्र कुटुंब आहे त्यांचे.सर्वजण आनंदाने एकमेकांना सांभाळून एकत्र रहातात.खूप समाधान वाटते हो त्याचे.

तर. सकाळी नाश्ता झाल्यावर आजी आणि नातू अशी आमची जोडी बाजारात जायला निघाली.
आम्ही डोंबिवली ला कांचन गावात रहातो.तिथून बाजारात, म्हणजे स्टेशनजवळ जायला बस सोयीस्कर असते.

आम्ही बसस्थानकावर पोहचलो.रांगेत उभे राहिलो.
अथर्वसाठी हा अनुभव नवीन होता. तो खूप कुतुहलाने सर्व पहात होता. बस आली . आम्ही बसमध्ये बसलो. बसमध्ये चढताना त्याची बरीच धावपळ झाली. त्याने खिडकी जवळ जागा पटकावली. बसमध्ये सगळीकडे पहात निरीक्षण करून झाल्यावर अथर्व खिडकीतून बाहेर पाहू लागला.

जबाबदारी | Story on Responsibility in Marathi

बस कंडक्टर कडून मी
तिकीटे घेतली तेव्हा अथर्व आश्चर्याने म्हणाला,
” आजी ,एवढ्याशा कागदासाठी तू इतके पैसे का दिले काकांना?”
आपल्या आजीला कसं काहीच कळत नाही हे भाव त्याच्या चेहऱ्यावर उमटले होते.

तिकीट म्हणजे काय ,बसने प्रवास करण्यासाठी तिकीट काढणे का आवश्यक असते हे सर्व त्याला जेव्हा मी समजावले तेव्हा त्याला फारच गंमत वाटली.

जबाबदारी | Story on Responsibility in Marathi

Story on Responsibility in Marathi

भाजी बाजारात पोहोचल्यावर पुन्हा कुतुहल…!रस्त्यावर भाजी कशी घेतात हे प्रथमच पहात होता तो.
अथर्वचा चेहरा लालबुंद झाला होता.उन्हात पायी चालणे त्याला माहीतच नव्हते. भाजी , फळे घेतांना मी प्रत्येकाला पैसे देत आहे हे पाहून तो मला म्हणाला,
“आजी तू किती पैसे खर्च करतेस उगाच? आम्ही तर माॅलमध्ये भाजी, फ्रूट्स् आणायला जातो तेव्हा आई नाहीतर काकू फक्त कार्ड देतात आणि परत घेतात.
तू आपली सगळ्यांना पैसे देतेस.”

जबाबदारी | Story on Responsibility in Marathi

मी हसून त्याला बॅंकेच्या खात्यामधले पैसे कार्डमधून कसे माॅलमधल्या काकांना दिले जातात हे समजावून सांगितले तेव्हा मात्र आपल्या आजीला बरंच समजतं असं त्याला वाटलं.

खरेदी आटोपल्यावर आईस्क्रीम खातांना अथर्वचा चेहरा एकदम खुलला.घरी परतताना मात्र आम्ही रीक्षा केली.रीक्षेतला प्रवासदेखील त्याला खूप आवडला.तरीही जवळून जाणाऱ्या वहानांच्या धुराने तो त्रस्तच झाला. सगळं किती कठीण आहे हे त्याला जाणवत होते.

घरी पोहचल्यावर आजोबांना कडकडून भेटल्यावर अथर्व ने विचारले,
” आजी तू नेहमी बसने जातेस , बाजारात,उन्हात चालतेस एवढी.
किती थकत असशील गं?”

जबाबदारी | Story on Responsibility in Marathi

मी त्याच्याकडे पाहत स्मितहास्य केले. जेवल्यावर लगेच गाढ झोपलेल्या अथर्वकडे पहात मी मनात म्हटलं,

” यापुढे मध्यमवर्गीय लोकांच्या नातवंडांची जीवनशैली अशीच असेल. कार , क्रेडिट कार्ड या सारख्या सोयी सुविधा असल्यामुळे मुलांना कष्ट आणि पैशांचे महत्वच कळणार नाही. पैशांच्या हिशोबाशी मैत्री होणार नाही.हे सर्व त्याना समजलेच पाहिजे आणि ती जबाबदारी आजी आजोबाच पाडू शकतात.”

आज अथर्व दहावीत आहे.खूप समजुतदार आहे.आज त्याला जेवढे आॅन लाईन, मआॅलमधए खरेदी करायला आवडते तेवढेच प्रत्यक्ष बाजारात जाऊन खरेदी करणे, अगदी भाजी,फळे, आकाश कंदील या सारख्या अनेक वस्तू खरेदी करायला बाजारात जायला मनापासून आवडते.
मला ते पाहून आमची त्या दिवशीच्या भटकंतीची आठवण येते.मन आनंदून जाते.

अर्चना कुलकर्णी, ठाणे

जबाबदारी | Story on Responsibility in Marathi

समाप्त.

साहित्यबंध समूहाची माहिती आणि जाहिरात

दिवसेंदिवस मराठी भाषेवर इतर भाषेतील शब्दांचा अतिरेक होत आहे. कित्येक मराठी शब्द तर नवीन पिढीच्या कानावर देखील पडले नाहीत. यामुळे पुढे जाऊन मराठी भाषा हळू हळू लुप्त होईल अशी आम्हाला भीती आहे. लिहिणे, बोलणे, ऐकणे आणि वाचणे ह्यातूनच मराठी भाषा अनंत काल टिकू शकते.

marathi lekh katha nibandh

त्यामुळे नवनवीन साहित्यिक मराठी भाषेतून निर्माण होणे ही काळाची गरज आहे. तसेच लेखकांचा पुरेसा सन्मान मिळणे आणि त्यांना योग्य प्लॅटफॉर्म उपलब्ध होणे त्याचबरोबर साहित्य चोरी थांबवणे या उद्देशातून आम्ही हा समूह तयार केला आहे.

मराठी भाषेच्या प्रती आमचे जे कर्तव्य आहे ते पार पाडण्याचा हा छोटासा प्रयत्न. तुम्ही देखील मराठी भाषेप्रती आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी हा समूह जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आमची मदत करा.

लक्षात घ्या की ह्या समूहाची सभासद फी ५०₹ प्रती महिना आहे. सभासद फी 9146494879 या Gpay किंवा PhonePe नंबर वर टाकल्यानंतर ग्रुप मध्ये add केले जाईल. एकदाच वार्षिक सभासदत्व घेणाऱ्यांना फी मध्ये १०० ₹ सूट मिळेल.

जबाबदारी | Story on Responsibility in Marathi

या मासिक सभासदत्वामध्ये तुम्हाला मिळेल

१) साहित्यक्षेत्रातील प्रगतीसाठी ४ साप्ताहिक स्पर्धा

२) सहभागासाठी आकर्षक डिजिटल प्रमाणपत्रे

३) स्पर्धेतील तुमचे चार लेख सुप्रसिद्ध अशा मराठी टाईम वेबसाईटवर पब्लिश केले जातील. ज्याची लिंक तुम्ही कुठेही शेअर करू शकता.

जबाबदारी | Story on Responsibility in Marathi

४) तुमचा फोटो आणि लेखाच्या नावासहीत चार सुंदर वॉलपेपर.

५) लेख त्याच्या विषयाला अनुसरून छान वॉलपेपरसने सजविला जातील.

६) तुमचा लेख गुगल सर्च मध्ये आणण्यासाठी SEO techniques वापरल्या जातील.

तुमच्या एका लेखावर अंदाजे ५००₹ चे काम केले जाईल म्हणजे ५०₹ च्या सभासद फी मध्ये ४ लेखांवर होणारे २०००₹ चे फायदे तुम्हाला मिळणार आहेत

https://chat.whatsapp.com/JDA5qGHXn43IofHbacHWBd

9146494879 या Gpay/ PhonePe नंबरवर एका महिन्याची ५०₹ फी किंवा वर्षाची ५००₹ सभासद फी पाठवा. Payment कमेंट मध्ये स्वतःचे नाव टाका. आणि वरील ग्रुप लिंकला जॉईन व्हा.

आमच्या समूहातील कविता वाचण्यासाठी भेट द्या mazablog.online

जबाबदारी | Story on Responsibility in Marathi

Best Marathi Blog

अर्चना कुलकर्णी
अर्चना कुलकर्णी

Author Information - सौ.अर्चना अशोक कुलकर्णी , ठाणे येथील रहिवासी असून, तालुका ठाणे आणि जिल्हा ठाणे आहे. त्यांनी इंग्लिश मिडीयम मधून आपले शालेय शिक्षण घेतले असून त्यानंतर मेकॅनिकल इंजिनीअरिंगची पदविका देखील पूर्ण केले आहे. त्यांना 10 वर्षे मराठी भाषेतून लेख लिहिण्याचा अनुभव असून त्यांनी 10 वर्षे मराठी कविता देखील लिहिल्या आहेत. तसेच त्यांना 20 वर्षापेक्षा जास्त मराठी भाषेची ओळख आहे. ते आठवड्यातून नियमितपणे 2-5 तास इतका वेळ मराठी भाषेत लिखाण करण्यास देतात. त्यांना मराठीतील लेख हा प्रकार आवडतो. मराठी लिखाण करताना त्यांना नाही हे पुरस्कार प्राप्त झालेले आहे. त्यांना तुम्ही पुढील फोन नंबर वर संपर्क करू शकता. फोन नंबर - 7506020990

Leave a Reply