Frustration….ताण तणाव by सौ.मोहिनी डंगर | Stress Management in Marathi 2024

साहित्यबंध समूहामध्ये सौ. मोहिनी डंगर यांनी Stress Management in Marathi या कीवर्ड वर आधारित “Frustration….ताण तणाव” हा लेख लिहिला आहे. चला तर वाचूया.

Frustration….ताण तणाव | Stress Management in Marathi

कधी कधी सगळ्याच गोष्टी हाताबाहेर जातात.कशाचाच कशाशी सबंध लावता येत नाही की त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधता येत नाही अगदी चक्रव्यूहात अडकल्यासारखे वाटते.गोंधळून जातो आपण..खूप रडावसं वाटत पण रडून काय होणार? असा प्रश्न उभा राहतो…कोणी तरी असावा ज्याला आपले problems सांगावे,त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून रडावं अस वाटत पण कोण ती व्यक्ति?असा प्रश्न पडतो कारण आजुबाजूला जरी आपण ज्यांना आपली समजतो अशी माणसे असली तरी ती माणसे आपल्याला आपली समजणारी,समजून घेणारी असतीलच असे नाही.आणि मग द्विधा मनस्थितीत मेंदू अगदीच निष्काम होतो, हृदय सांगते कोणीच तुझं नाही….एकटेपणाच्या वादळात आणि संकटाच्या चकव्यात आपण अडकतो.अणि मनावर अजून ताण येतो.राग येतो.

Frustration….ताण तणाव | Stress Management in Marathi

Frustration….ताण तणाव by सौ.मोहिनी डंगर | Stress Management in Marathi 2024

बर्‍याचदा हा राग मुलांवर भांड्यांवर, कामावर आणि चुकून फोन ची रिंग वाजली च तर समोरच्या व्यक्तीवर निघतो.चिडून ओरडून आपटून काहीही ऊपयोग होणार नाही हे समजत पण frustration(ताण)च काय?हा frustration निघायलाच हवा न कुठेतरी…मग तरी मनाचे समाधान होईल..कारण मानवी मनाची समजूत आहे problem मधून आपण बाहेर पडो ना पडो पण मनातून, डोक्यातून frustration बाहेर पडला की कस हलक हलक वाटत..

अशा वेळेस काय करावं?

शक्य असेल त्या आवडीच्या ठिकाणी जाऊन निवांत बसावं..आजूबाजूच्या परिस्थितीचा आढावा घ्यावा.कुठे जाणे शक्य नसेल तर निदान खिडकीत,व्हरांड्यात,टेरेस वर जाऊन बसावे.पाखरे, किडे मुंग्यां,रस्त्यावरील प्राणी,पक्षी यांविषयी विचार करावा..त्यांना आहे का tension? त्यांना आहे का frustration?

उत्तर मिळेल कुणास ठाऊक?

पण खर सांगु का त्या मुक्या जिवांना देखील भूक आहे निवाऱ्याची गरज आहे..म्हणजे चिंता त्यांनाही आहेच की पण ते दिसतात का कधी आत्महत्या करताना किंवा चिडचिड करताना?नाही ना?

Frustration….ताण तणाव | Stress Management in Marathi

ऐश्वर्य,कपडेलत्ते, गाड्या घोड्या असल्या त्यांच्या गरजा नाहीतच. पोटाला अन्न अणि रहायला जागा ह्या व्यतिरिक्त त्यांचे विचार नसावेत. कोणी मेल्याचं सुतक नसेल ना कोणी जन्मल्याच सुयार म्हणूनच कदाचित ते सुखी.समाधानाचे म्हणाल तर त्यांच्या एवढ समाधान कोणाकडेच नाही.म्हणजे बघा ना घरातल्या किंवा रस्त्यावरच्या भटक्या कुत्र्याला ताटवर जेवण दिल तरी तो पोट भरेल इतकंच खातो.अन निघून जातो.हे राहिलेले नंतर ला राखून ठेवीन असा विचार तो करत नाही.इतर सजीव देखील तसेच,ते कुठले डब्बे भरून ठेवतात अणि साठा करत असले तरी ती त्यांची गरज असते लोभ नाही.

Frustration….ताण तणाव | Stress Management in Marathi

सौ.मोहिनी डंगर | Stress Management in Marathi 2024

मनुष्य मात्र अत्यंत लोभी आहे अणि याच लोभापायी तो ताणतणाव,टेंशन,दुःख यांचे साखळदंड गळ्यात अडकवून घेत कष्टी होतो.या सर्वांचे कारण एकच ते म्हणजे अपेक्षा करणे,मग त्या अपेक्षा स्वत कडून असतिल किंवा दुसर्‍या कडून..स्वतः कडून अपेक्षा करणे चुकीचे नाही पण त्या अपेक्षांची पूर्तता करण्यास असमर्थ ठरणे चुकीचे आहे..म्हणजे मी एखादा व्यवसाय करेन,खूप श्रीमंत होईन हा स्वतःवरचा विश्वास आहे म्हणून लोन घेऊन व्यवसाय सुरू करतो परंतु मेहनत करायचा कंटाळा म्हणून तो व्यवसाय ठप्प होऊन नुकसान होते अणि त्यामुळे frustration येते.. अणि दुसर्‍या कडून केल्या गेलेल्या अपेक्षा मध्ये भावनिक मानसिक अणि आर्थिक अपेक्षा असतात ज्या कोणावर लादता येत नाहीत म्हणजे समोरचा नेहमी आपल्या अपेक्षा पूर्ण करायला समर्थ असेलच असे नाही..तेव्हाही मिळते ते दुःख frustration….

Frustration….ताण तणाव | Stress Management in Marathi

मनुष्य सुंदर आयुष्य जगायचे सोडून अपेक्षांच्या ओझ्याखाली दबला जातो इतका की आनंद,सुख, समाधान त्याला सहजासहजी स्विकारता येत नाहीत. exceptions always hurt….अपेक्षा केली की दुःख ही मिळतेच.

कुठेतरी वाचले होते,आशा ही निराशेची बहीण आहे. म्हणून समोरच्या कडून अपेक्षा करणे सोडा.आहे ती परिस्थिती स्विकारली,शांत डोक्याने त्यातून मार्ग काढला की काही प्रॉब्लेम्स निश्चित सुटतात. दुसऱ्यावर अवलंबून राहून थोडे थोडके असमाधान मिळणार हे नक्की म्हणून frustrate न होता जगता आले पाहिजे पशु पक्षांप्रमाणे समाधानानं!!!

सौ.मोहिनी संजय डंगर
रायगड

Frustration….ताण तणाव | Stress Management in Marathi

समाप्त.

साहित्यबंध समूहाची माहिती आणि जाहिरात

दिवसेंदिवस मराठी भाषेवर इतर भाषेतील शब्दांचा अतिरेक होत आहे. कित्येक मराठी शब्द तर नवीन पिढीच्या कानावर देखील पडले नाहीत. यामुळे पुढे जाऊन मराठी भाषा हळू हळू लुप्त होईल अशी आम्हाला भीती आहे. लिहिणे, बोलणे, ऐकणे आणि वाचणे ह्यातूनच मराठी भाषा अनंत काल टिकू शकते.

marathi lekh katha nibandh

त्यामुळे नवनवीन साहित्यिक मराठी भाषेतून निर्माण होणे ही काळाची गरज आहे. तसेच लेखकांचा पुरेसा सन्मान मिळणे आणि त्यांना योग्य प्लॅटफॉर्म उपलब्ध होणे त्याचबरोबर साहित्य चोरी थांबवणे या उद्देशातून आम्ही हा समूह तयार केला आहे.

मराठी भाषेच्या प्रती आमचे जे कर्तव्य आहे ते पार पाडण्याचा हा छोटासा प्रयत्न. तुम्ही देखील मराठी भाषेप्रती आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी हा समूह जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आमची मदत करा.

लक्षात घ्या की ह्या समूहाची सभासद फी ५०₹ प्रती महिना आहे. सभासद फी 9146494879 या Gpay किंवा PhonePe नंबर वर टाकल्यानंतर ग्रुप मध्ये add केले जाईल. एकदाच वार्षिक सभासदत्व घेणाऱ्यांना फी मध्ये १०० ₹ सूट मिळेल.

या मासिक सभासदत्वामध्ये तुम्हाला मिळेल

१) साहित्यक्षेत्रातील प्रगतीसाठी ४ साप्ताहिक स्पर्धा

२) सहभागासाठी आकर्षक डिजिटल प्रमाणपत्रे

३) स्पर्धेतील तुमचे चार लेख सुप्रसिद्ध अशा मराठी टाईम वेबसाईटवर पब्लिश केले जातील. ज्याची लिंक तुम्ही कुठेही शेअर करू शकता.

४) तुमचा फोटो आणि लेखाच्या नावासहीत चार सुंदर वॉलपेपर.

५) लेख त्याच्या विषयाला अनुसरून छान वॉलपेपरसने सजविला जातील.

६) तुमचा लेख गुगल सर्च मध्ये आणण्यासाठी SEO techniques वापरल्या जातील.

तुमच्या एका लेखावर अंदाजे ५००₹ चे काम केले जाईल म्हणजे ५०₹ च्या सभासद फी मध्ये ४ लेखांवर होणारे २०००₹ चे फायदे तुम्हाला मिळणार आहेत

https://chat.whatsapp.com/JDA5qGHXn43IofHbacHWBd

9146494879 या Gpay/ PhonePe नंबरवर एका महिन्याची ५०₹ फी किंवा वर्षाची ५००₹ सभासद फी पाठवा. Payment कमेंट मध्ये स्वतःचे नाव टाका. आणि वरील ग्रुप लिंकला जॉईन व्हा.

आमच्या समूहातील कविता वाचण्यासाठी भेट द्या mazablog.online

Frustration….ताण तणाव | Stress Management in Marathi

Reservation Meaning in Marathi

Frustration….ताण तणाव | Stress Management in Marathi

Leave a Reply

%d bloggers like this: